Home Blog Page 3069

शेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे 16 ऑक्टोबरला उद्घाटन

0

मुंबई,- राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करुन देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी  योजना, शेतकऱ्यांना  पुरेशा दाबाने वीज पुरवठा देणारी एचव्हीडीएस योजना व विद्युत वाहनकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन अशा तीन अभिनव योजनांचे उद्घाटन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी 16 आक्टोबर-2018 ला मुंबईत, मंत्रालयातील सभागृहात होणार आहे.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी 12.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या तिनही योजनांचे उद्घाटन होणार असून या प्रसंगी महसूल मंत्री   चंद्रकांतदादा पाटील, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी  मुख्य सचिव डी.के. जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना सध्या दिवसा आठ तास व रात्री दहा तास अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येतो. परंतू शेतकऱ्यांना दिवसाही अधिक प्रमाणात वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौरऊर्जा देण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील सुमारे 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे.

शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषीपंपासाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यात रोहित्राबद्दल स्वामीत्वाची भावना निर्माण होऊन रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण घटेल, वीज अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ राज्यातील 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.

वाहनांमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने विद्युत वाहनांना मोठे प्रोत्साहन दिले आहे. या धोरणाला मोठा पाठिंबा देण्यासाठी महावितरणच्या वतीने राज्यात 500 विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरूवात झाली आहे. याही योजनेचे उद्घाटन होणार आहे.

गदिमा,पुलं आणि बाबुजींची जन्मशताब्दी एकाच वर्षात येणे हा ईश्वरी संकेत-आ मेधा कुलकर्णी

0
सुनिल महाजन यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य स्पृहणीय –
कोथरूड नवरात्र उत्सवातील विविधरंगी कार्यक्रम ही रसिकांसाठी मेजवानी – आ मेधा कुलकर्णी.
पुणे–मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे गदिमा,पुलं आणि बाबुजींची जन्मशताब्दी एकाच वर्षात येणे हा ईश्वरी संकेत असून ह्या तिघांमुळे महाराष्ट्राचे साहित्य आणि सांस्कृतिक विश्व समृद्ध झाले असे गौरवोद्गार आमदार मेधा कुलकर्णी यांनी काढले.क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोथरूड नवरात्र उत्सवाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी नवरात्र महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,उत्सव प्रमुख विशाल भेलके,उमेश भेलके यांच्यासह नगरसेवक व शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे,वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष दीपक पोटे,विधी समितीच्या अध्यक्ष माधुरीताई सहस्त्रबुद्धे,नगरसेविका वृषाली चौधरी इ मान्यवर उपस्थित होते.
कोथरूड नवरात्र महोत्सवातील विविधरंगी कार्यक्रमाद्वारे संदीपजी गेली अनेक वर्ष कोथरूडकरांची सांस्कृतिक भूक भागवत असून याद्वारे उत्तम कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळते हे कौतुकास्पद असल्याचे ही त्या म्हणाल्या.आज पहिलाच कार्यक्रम ” लेणे प्रतिभेचे “हा ह्या अजरामर त्रयींच्या गीतांवर आधारित कार्यक्रम असल्याने ह्या विलक्षण प्रतिभावान गीतकार,संगीतकार,गायक,साहित्यिक अश्या विविध रुपातील पुलं,गदिमा आणि बाबुजीना ही समर्पक आदरांजली असल्याचे ही त्या म्हणाल्या.यावेळी आ मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते संवाद चे सुनिल महाजन व पायलवृंद च्या निकिता मोघे यांचा सत्कार करण्यात आला.
मी सुनिल महाजन यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य गत पंचवीस वर्षे जवळुन अनुभवत असून पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे ते जनक असल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून हा सत्कार आयोजित केल्याचे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.बाल चित्रपट महोत्सव,संभाजी बागेतील बाल वाचनालय,किल्ले स्पर्धा,कलावंतांची गुढी,पुस्तक हंडी,दिवाळी पहाट यासह विविध कार्यक्रमाचे सातत्याने नियोजन करणारे सुनील महाजन आणि निकिता मोघे पुणेकरांच्या कौतुकास पात्र असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
लेणे प्रतिभेचे ह्या कार्यक्रमात संजीव,मेहेंदळे,योगिता गोडबोले आणि प्रतिभा थोरात यांनी लावणी,भक्तीगीत,बाल गीत,भाव गीत,गीत रामायणातील गाणे इ विविधढंगी गाण्यांच्या मुक्त उधळणीत रसिकांना शब्दशः न्हाऊ घातले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी,स्वागत व सत्कार उमेश भेलके विशाल भेलके यांनी केले तर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

अवाच्यासवा पाणीवापर म्हणूनच ता.ना.मुंडेंकडून पुण्याच्या पाण्यात पोलीस बंदोबस्तात कपात

0

पुणे-ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा पाणी उचलणाऱ्या पुणे महापालिकेने ४ ऑक्टोबरला कालवा समितीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. धरणांत पुरेसा पाणीसाठा नसतानाही पालिकेकडून अनियंत्रित पाणीवापर सुरू असल्यानेच खडकवासला धरण येथील पालिकेचे पंप थेट  पोलीस बंदोबस्तात बंद करण्याची कारवाई करावी लागली, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पंप बंद करण्याबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांना माहिती देण्यात आली होती, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

खडकवासला मुठा उजवा कालवा दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (८ऑक्टोबर) पालिकेत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांना कालवा समितीत ठरलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केली, असे जे सांगितले जात आहे त्यात तथ्य नाही, असे जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी  स्पष्ट केले.

खडकवासला धरणसाखळी अंतर्गत ७६ हजार हेक्टर जमीन अवलंबून आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य म्हणून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी पुणे पालिकेला मंजूर केले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून थेट पद्धतीने तसेच धरणक्षेत्रात पंप हाउसद्वारे बंद जलवाहिनी व पर्वती व लष्कर जलकेंद्रांतून थेट कालव्याद्वारे अशा तीन ठिकाणांहून पालिका धरणाचे पाणी उचलते. बैठकीत ठरल्यानुसार प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याबाबत पालिकेने कार्यवाही केली नाही. त्यामुळे पंपहाउस येथून ११५० दशलक्ष लिटर पाणी सोडल्यानंतर जलवाहिन्या बंद करण्यात आल्या.

शहराची लोकसंख्या ३९.१८ लाख, कॅन्टोन्मेंट बोर्ड व शेजारील गावे मिळून १.५८ लाख अशी एकूण ४०.७६ लाख लोकसंख्या पालिकेच्या शपथपत्राप्रमाणे आहे. तर, महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण आणि राज्य शासनाने मंजूर केल्यानुसार वाढीव असा एकूण ११.५० टीएमसी पाणीवापर बंधनकारक आहे. तसेच २०१७-१८ मध्ये पालिकेचा पाणीवापर आजवरचा १८.७१ टीएमसी आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७, जानेवारी-मार्च २०१८ या पाच महिन्यांत सरासरी प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर पाणीवापर आहे. याच कालावधीमध्ये काही वेळा महत्तम पाणीवापर प्रतिदिन १७५० दशलक्ष लिटपर्यंत झाला आहे.असेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा पाकिस्तानचा दौरा चांगला; पाकिस्तानात भाषा, माणसं बदलली नाहीत; दक्षिण भारतात सगळं बदलतं-सिद्धू

0

नवीदिल्ली-पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले आहे. हिमाचल प्रदेशाली कसोली या ठिकाणी असलेल्या साहित्य उत्सवात सिद्धूंनी पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत. पाकिस्तानचा माझा दौरा दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा खूपच चांगला होता असे सिद्धूंनी म्हटले आहे. तुम्ही पाकिस्तानात कधीही जा.. तिथे भाषा, माणसं खाद्यसंस्कृती काहीही बदलत नाही. मात्र तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथे तुम्हाला इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पाकिस्तानात असे काहीही नाही असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गेले होते तेव्हा त्यांनी पाकचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. ही गळाभेट त्यांना चांगलीच भोवली कारण भारतातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. इतके सगळे होऊनही सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांच्या गळाभेटीबद्दल स्पष्टीकरण देताना सिद्धू म्हणाले होते की, ‘जनरल बाजवा यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. यानंतर ते म्हणाले की, आम्ही गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर करतारपुर प्रवास सुरू करण्याच्या विचारात आहोत.’ त्यांच्या या पाकिस्तान भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धू आणि पर्यायाने काँग्रेस यांना धारेवर धरले होते.

द्रमुक सोडा ,आम्ही तुमच्याबरोबर ..कमल हसन चे राहुल गांधींना प्राधान्य

0

नवीदिल्ली-फेब्रुवारी महिन्यात राजकारणात सक्रीय प्रवेश केलेले दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी राजकीयदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आपण २०१९ च्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. मात्र यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडल्यास आपण असे करणार असल्याचे कमल हसन म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेससोबत एकत्र आल्यास त्याचा तामिळनाडूतील जनतेला विकासाच्यादृष्टीने निश्चितच फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असं आहे. पक्षाच्या स्थापना सभेत त्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचंही अनावरण केलं. आपला पक्ष जनतेसाठी काम करणार असून आगामी काळात आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे असं म्हणत हसन यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली होती. ‘मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहात होतो. पण, आता राजकारणाच्या माध्यमातून मला तामिळनाडूच्या जनतेच्या घराघरात पोहोचायचे आहे, जनतेत राहायचे आहे. राजकारणात सक्रिय असताना जनसेवेलाच माझे प्राधान्य असेल’, असे ते म्हणाले होते.

जूनमध्ये कमल हसन यांनी दिल्लीमध्ये जाऊन अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात तमिळनाडूतील राजकारणाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही राजकारणाबाबत बोललो मात्र तुम्ही विचार करताय तसे काही झाले नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे कमल हसन यांचे हे वक्तव्य फारसे आश्चर्यकारक नसल्याचे बोलले जात आहे. मात्र द्रमुकच्या विरोधात कमल हसन यांनी पहिल्यांदाच थेट विधान केले आहे. याआधी कमल हसन हे सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहील्याने द्रमुककडून त्यांना सुनावण्यात आले होते. आपण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी राजकारणात आल्याचेही कमल हसन त्यानी वेळोवेळी सांगितले होते. मात्र आताचे हे वक्तव्य तामिळनाडूतील राजकारणाच्यादृष्टीने निश्चितच महत्त्वाचे आहे.

महिंद्रा बाहा एसएईइंडिया 2019च्या 12व्या आवृत्तीला सुरुवात-363पैकी 251 महाविद्यालयांची अंतिम फेरीत धडक.

0

 

पुणे: महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने एसएईइंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सच्या सहयोगाने, बाहा सीरिजच्या 12व्या आवृत्तीला सुरुवात होत असल्याचे जाहीर केले आहे. अंतिम फेरी 24 ते 27 जानेवारी, 2019 या कालावधीत, इंदोरनजिकच्या पिठमपूर येथील एनएटीआरआयपी येथे होणार आहे व त्यानंतर 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीत चंडीगडजवळील आयआयटी रोपर येथे होणार आहे.

बाहा एसएईइंडिया 2019 साठी 363 प्रवेशिका आल्या. त्यातील 201 संघांची निवड पारंपरिक एम-बाहासाठी करण्यात आली, तर 50 संघांची निवड व्हर्च्युअल फेरीतून ई-बाहासाठी करण्यात आली.

बाहा एसएईइंडिया 4 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सिंगल-सीटर, चारचाकी ऑल-टिरेन व्हेइकलचे (एटीव्ही) डिझाइन, बांधणी, चाचणी करण्यास सांगते. या कार्यक्रमामध्ये, टेक्निकल इन्स्पेक्शन; डिझाइन, कॉस्ट व सेल्स प्रेझेंटेशन असे स्टॅटिक इव्हॅल्युएशन आणि अॅक्सिलरेशन, स्लेज पुल, मॅन्युव्हरेबिलिटी असे डायनॅमिक इव्हेंट यांचा समावेश असेल. सस्पेन्शन व ट्रॅक्शन, यानंतर 4 दिवसांचा एंड्युरन्स इव्हेंट असेल.

दरवर्षी नवी मध्यवर्ती संकल्पना स्वीकारणे, हे बाहा एसएईइंडियाचे खास वैशिष्ट्य आहे. या वर्षी, बाहा 2019 साठी मध्यवर्ती संकल्पना अॅडव्हेंचर रीलोडेड ही असून, त्यामध्ये उदयोन्मुख इंजिनीअर्सची पॅशन, परिश्रम व चिकाटी यांची, तसेच आव्हाने घेण्याची ईर्ष्या व जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची क्षमता यांची दखल घेतली जाणार आहे.

बाहा एसएईइंडियाने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचे पर्व सुरू झाल्याचा लाभ घेण्यासाठी 2015 मध्ये ईबाहा सीरिज सुरू केली. पारंपरिक बाहा वाहने सर्व 201 एमबागा संघांसाठी सामायिक असलेल्या 10 एचपी ब्रिग्स अँड स्ट्रॅटन गॅसोलिन इंजिनावर चालतात, तर ईबाहा वाहने 6 kW सर्वोच्च इलेक्ट्रिक पॉवर असणारा व रिचार्जेबल लिथिअम-इयॉन बॅटरी पॅक असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरवर चालणार आहेत. येथे, विद्यार्थ्यांना मोटर, कंट्रोलर व बॅटरी संपादित करता येईल आणि स्वतःची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम तयार करता येईल. या वर्षी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी मनुष्यबळाची गरज विचारात घेऊन, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग क्षेत्रातील अधिक विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले आहे.

बाहा 2019 साठी, महाराष्ट्रातून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 70 प्रवेशिकांमध्ये पुण्यातील 24 महाविद्यालयांचा समावेश आहे. बाहा सीरिजच्या शेवटच्या काही आवृत्तींमध्ये, महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या प्रवेशिकांमध्ये पुण्यातील प्रवेशिकांची संख्या जास्तीत जास्त होती. गेल्या काही वर्षांत, पुण्यातील महाविद्यालयांनी अंतिम फेरीमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.

इंदोरमधील पिठमपूर येथे आयोजित केल्या गेलेल्या बाहा 2018च्या पहिल्या भागामध्ये, पुण्यातील श्रीम. काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने ईबाहासाठी विजेतेपद पटकावले, तर पुण्यातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला एमबाहासाठी संयुक्त विजेतेपद मिळाले. पंजाबमधील आयआयटी रोपर येथे 8 ते 11 मार्च 2018 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाहा 2018च्या दुसऱ्या भागामध्ये, कोईम्बतरूमधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजने विजेतेपदाचा मान मिळवला.

बाहा अंतिम फेरीसाठी, देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधून आलेल्या प्रवेशिकांचे मूल्यमापन जुलै 2018 मध्ये पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या व्हर्च्युअल राउंडमध्ये करण्यात आले. अंतिम फेरीमध्ये डिझाइन तयार करण्याची इच्छा असलेल्या बाहा बग्गी वाहनाचे डिझाइन त्यांनी त्यामध्ये सादर केले.

कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण आणि रोल केज, सस्पेन्शन, स्टीअरिंग व ब्रेक्स यांचे बारकाईने विश्लेषण, तसेच त्यांना देण्यात आलेल्या विषयांवरील रुल बुक व्हायव्हा सेशन व मूल्यमापन यानुसार पात्र संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका म्हणजे मॉक-अप्स होते, ज्यांची निर्मिती सहभागींनी नमूद केलेल्या अचूक बाबींनुसार केली जाऊ शकते. अंतिम फेरीत पोहोचलेले संघ ऑटोमोबाइलमधील कौशल्य, आकलन व पॅशन दाखवणार आहेत, तसेच स्वतःची बग्गी रेस कारही तयार करणार आहेत.

यानिमित्त बोलताना, एसएईइंडियाचे अध्यक्ष डॉ. बाला भारद्वाज म्हणाले, “एसएईइंडियामध्ये, 2007 मध्ये सुरुवात झाल्यापासून आम्ही बाहा एसएईइंडियामध्ये अधिकाधिक सुधारणा करत आहोत. गेल्या काही वर्षांत, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगविषयी उत्साह निर्माण करू शकलो आहे. एक कंपनी म्हणून, ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी बाहा एसएईइंडियापेक्षा चांगले व्यासपीठ कुठले असणार.”

उमेश शहा, सीनिअर व्हीपी व सीओओ (सीव्हीआरबीयू), गॅब्रिएल इंडिया लि., समन्वयकबाहा एसएईइंडिया 2019, पिठमपूर, म्हणाले, “बाहा एसएईइंडिया गेल्या 11 आवृत्त्यांमार्फत, उद्योग व शिक्षणक्षेत्र यांना एकत्र आणून, ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंगचे भविष्य घडवण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करत आहे. या उपक्रमाची रचना विचारात घेता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्याचा उपयोग त्यांना सांघिक कार्य व स्पर्धात्मकता ही व्यावसायिक यशाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कौशल्ये शिकण्यासाठी होणार आहे. कंपन्यांमध्ये सर्वोत्तम मनुष्यबळाचा समावेश करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या संभाव्य एम्प्लॉयरसाठी हे आदर्श व्यासपीठ आहे.”

पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला – सत्ताधारी आमदार योगेश टिळेकरांची तक्रार

पुणे-निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात प्रचंड मोठे राजकीय षडयंत्र गेल्या वर्षापासून सुरू असून, पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकीय संन्यास घेईल असे भाजप आमदार आणि भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर यांनी मायमराठी शी बोलताना म्हटलं आहे.दरम्यान त्यांनी महापालिका आवारात संध्याकाळी उशिरा येवून काही माध्यमांशी संवाद हि साधला .तेव्हा हि पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला.आजपर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे राजकीय रोषातून पोलीस कारवाया करत असल्याचा आरोप करत आलेत .आता खुद्द भाजप आमदाराने हा आरोप केला आहे.

मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनव्दारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून यात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. याप्रकरणात मी मदतीच्या हेतूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असे टिळेकर म्हणाले. दरम्यान, पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही टिळेकर यांनी सांगितले.

आमदार टिळेकर यांच्यावर रविंद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम 385,379,427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालु असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिला, त्यांनी 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली अशी तक्रार आहे.

फिर्यादी हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.

दरम्यान, गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

भाजपचे आमदार योगेश टिळेकरांना अटक होण्याची दाट शक्यता ….

पुणे-मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनद्वारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सुमारे महिनाभराच्या पोलीस तपासानंतर आज सकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला  . याबाबत स्वतः आ. टिळेकर यांनी हे ‘आपल्या विरुद्ध चे प्रचंड मोठे असे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा करत पोलिसांच्या कारवाई विषयी संशय घेतला आहे .त्यांच्यावर  भादवि 385, 379, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.यातील  385, 379 हि दोन्ही कलमे अजामीनपात्र अशी आहेत .यामुळे टिळेकर यांची  अटक अटळ असल्याचे देखील मानले जाते . तर उद्या टिळेकर हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे . गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, ते यावर काय निर्णय घेतात यावर सारे काही अवलंबून असल्याचे सांगितले जाते .

रवींद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार  गुन्हा दाखल केला आहे.

दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिला. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली .असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदार हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.

दरम्यान,  गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

 

सहाशे लहान मुलींचे कन्या पूजन

0
पुणे-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज ललिता पंचमीच्या निमित्ताने इयत्ता 1 ली ते 4 थी मधील 600 हून अधिक मुलींचे कन्यापूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या या लहान मुलींनी डोक्यावर ‘जय माता दी’ च्या पट्ट्या बांधल्या होत्या. तसेच तांबडा, हिरवा व पिवळा अशा रंगातील पोशाख परिधान करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या तीन रंगातील पंजाबी ड्रेस, परकर पोलके वा पारंपरिक ड्रेस घालून आलेल्या या मुलींचे प्रथम पाय धुवून कुंकवाने त्यांच्या पायावर स्वस्तिक काढण्यात आले. यानंतर गुरूजींच्या मंत्रोचारात या मुलींना पारंपारिक पद्धतीने ओवाळले गेले. तसेच सामुहिक देवीची आरतीही करण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमावेळी शेकडो पालकांनी गर्दी केली होती. यानंतर सर्व मुलींना अल्पोपहार व खाऊ देण्यात आला. तसेच पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील विजेता मुली तसेच सहभागी प्रत्येक मुलीस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात छाया कातुरे, निर्मला जगताप, दीपा बागुल, हर्षदा बागुल, योगिता निकम, सोनम बागुल, नम्रता जगताप आदींनी विशेष प्रयत्न केले.

झी युवा दांडिया २०१८’ ठाण्यात रंगणार १५ ऑक्टोबर ला

0

‘नवे पर्व, युवा सर्व’ हे ब्रीद वाक्य असलेली झी युवा ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आली आहे. झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे तर प्रेक्षकांसोबत अनेक कार्यक्रमांद्वारे देखील एक वेगळं व घट्ट नातं निर्माण केलं आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच वाहिनीने वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या मालिका आणि ऑनग्राउंड इव्हेंट्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑकटोबर ला ‘श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान’च्या सहकार्याने , झी युवा दांडिया २०१८ ‘चे आयोजन संध्याकाळी ते वाजेपर्यंत केले आहे .झी युवा दांडिया मध्ये झी युवा वाहिनीवरील मालिकांपैकी फुलपाखरूतील  ऋता दुर्गुळे आणि यशोमान आपटे आणि टीम , बापमाणूस मधील  सुयश टिळक , श्रुती अत्रे पल्लवी पाटील आणि टीम , आम्ही दोघी मधील  विवेक सांगळे , खुशबू तावडे  व  प्रसिद्धी किशोर आणि टीम , तू अशी जवळी राहा मधील  सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे आणि टीम आणि सूर राहू दे मधील संग्राम साळवी आणि गौरी नलावडे आणि टीम या सर्व कलाकारांचा समावेश असेल. झी युवावरील एवढे सर्व कलाकार एकत्र एका जागी पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे .

ठाण्यातील झी युवा च्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत दांडिया  खेळण्याची ही एक सुवर्णसंधी असून प्रेक्षकांनी देखील त्यासाठी तयारी सुरु करावी . १५ ऑक्टोबरला श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, भगवती शाळेचे मैदान, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे येथे , झी युवा आणि श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान’  घेऊन येत आहे “झी युवा दांडिया २०१८ ‘

 

कार्यक्रम : झी युवा दांडिया

कुठे :  श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान, भगवती शाळेचे मैदान, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे

वेळ : ते वाजेपर्यंत

मालिका कलाकार उपस्तीथी : फुलपाखरू , बापमाणूस , आम्ही दोघी , तू अशी जवळी राहा , सुर राहू दे

‘किक’च्या अनुभवाने विद्यार्थी भारावले

0
राउंड टेबल इंडिया’, ‘हॉटफिट’ व ‘रोटरी’तर्फे फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धा
पुणे : पायात सॉक्स-बूट… अंगावर शॉर्ट्स आणि टी-शर्टस… सहकाऱ्यांचे चिअर्स… मारलेली ‘किक’… आणि झालेला निर्णायक ‘गोल’… अशा उत्साही वातावरणात पहिल्यांदाच ‘फ्लड लाईट’च्या प्रकाशात खेळण्याचा अनुभव घेताना हे विद्यार्थी भारावून गेले. साखळी, उपांत्य आणि अंतिम फेरीत फुटबॉलचा थरार या विद्यार्थ्यांनी अनुभवला.
निमित्त होते, राउंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर १५, हॉटफिट फाउंडेशन आणि रोटरी क्लब रिव्हरसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित फुटबॉल स्पर्धेचे. ‘२०० ड्रीम्स १ गोल’ हे ध्येय घेऊन हडपसर भागातील साने गुरुजी ट्रस्टच्या प्रगती विद्यालय, आदर्श विद्यालय, नूतन विद्यालय, समता विद्यालय या शाळांतील २०० विद्यार्थ्यांना अडीच महिन्याचे फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन १२ व १४ वर्षाखालील गटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येकी १० संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या १२ व १४ वर्षाखालील गटातील प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांना हॉटफिट फाउंडेशन आयोजित फुटबॉल पुणे लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. १२ वर्षाखालील गटात ‘आदर्श विद्यामंदिर १२०’ या संघाने, तर १४ वर्षाखालील गटात ‘प्रगती विद्यालय १२१’ या गटाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी ‘राउंड टेबल इंडिया एरिया १५’चे चेअरमन दर्शन काबरा, ‘पूना चॅप्टर १५’चे चेअरमन प्रोमित सूद, हॉटफिट फाउंडेशनचे गुरुपवीत सिंग, रोटरी क्लब रिव्हरसाईडचे अध्यक्ष आदित्य मिश्रा, सचिव कमलेश मिश्रा, राउंड टेबल पुणे-१५चे देवेश जाटिया, कीर्ती रुईया, अभिषेक मालपाणी यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रोमित सूद म्हणाले, “एकूण सहा शाळांमधून ९०० पैकी २०० विद्यार्थ्यांची निवड करून अडीच महिने त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना फुटबॉलचे संपूर्ण कीट, प्रशिक्षणाचे प्रशस्तिपत्रक, पदक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. यातील १६ खेळाडूंना पुणे लीगमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना फुटबॉलसारख्या खेळासाठी तयार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरेल.”

पालकमंत्री घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा

0

पुणे ता १२  : परतीचा पाऊस न झाल्याने  जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य  परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्याचा तालुकानिहाय आढावा पालकमंत्री  उद्यापासून  घेणार आहेत. या परिस्थितीचा सविस्तर अहवाल लवकरच  मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल.अशी माहिती गिरीश बापट यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे दिली.

यंदा मान्सूनने  परततांना  ओढ दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच उन्हाच्या झळा लागत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी आढावा घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता.  दुष्काळाबाबत केंद्र सरकारने निकष तयार केले असून, त्यानुसार ही माहिती घेण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसंदर्भात ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

मंचर आणि आंबेगाव तालुक्याची बैठक आज मंचर येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्या इंदापूर, बारामती तालुक्यातील बैठक बारामती येथे, दौंड पुरंदर तालुक्यातील बैठक सासवड येथे, हवेली तालुक्याची बैठक मांजरी बुद्रुक येथे तर रविवारी भोर, वेल्हा तालुक्याची बैठक नसरापूर येथे होणार आहे. या दौऱ्यात पालकमंत्री या तालुक्यांची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुष्काळामुळे भविष्यात काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास तर काय उपाय योजना करता येतील याबाबत चर्चा करून अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.असे या पत्रकात नमूद केले आहे.

दूध भेसळखोरांना राजकीय आश्रय खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य ; पिंपरीत दुधपरिषेदेचे उदघाटन

0

पिंपरी, दि १२- भारतातल्या  दूध व्यवसायाला सध्या बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. १४ कोटी लिटर  दूध उत्पादन असून  ६४ कोटी लिटर दुधाचा खप हे संशयास्पद आहे. दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. राजकीय आश्रयामुळे  भेसळखोरांचं फावत आहे. या भेसळीचा त्रास सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही भेसळ रोखने   गरजेचे आहे. असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त  केले.

पिंपरी येथे ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे दूध परिषदेचे उदघाटन दुग्ध विकास व पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी खासदार राजू शेट्टी , खासदार अमर साबळे, कात्रज डेअरीचे संचालक विष्णूकाका हिंगे ,कांतीलाल उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महादेव जानकर म्हणाले, पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर भारतात पहिला “एक्सलन्स  स्टेट” म्हणून महाराष्ट्राला दर्जा मिळाला. याशिवाय  दुधाचे दर ३ रुपयांवरून ७ रुपयांपर्यत वाढवण्याचे काम आमच्या खात्याने केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी  ” गोवंश गोवर्धन” योजना हि भारतातील सुरु करणारे  महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. चारायुक्त शिवार योजना या सारख्या  अनेक योजना सुरु केल्या आहेत. गोसंवर्धन गोशाळेला मोठा निधी दिला.

खासदार अमर साबळे म्हणाले, दूध उत्पादक संस्थांनी प्रामाणिकपणा, सचोटीने व्यवसाय करावा. वर्ड हेल्थ ऑर्गनायजेंशनने हि चिंता व्यक्त केली आहे कि, दुधाच्या भेसळीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेसळ करताना दूध संस्थांनी प्रामाणिकपणा सचोटीने राहणे गरजेचे आहे.

दगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार: डॉ. नितीन करमाळकर

0
पुणे :
दगड हे पृथ्वीच्या उत्क्रांतीचे साक्षीदार आणि माहितीचे साठे असल्याने दगडांचा अभ्यास करणे म्हणजे पृथ्वीची, उत्क्रांतीची माहिती मिळवणे होय ‘ ,असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले.
‘जीविधा’, ‘डेक्कन कॉलेज’ व ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माणसाने केलेला दगडाचा वापर’ या विषयावरील प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी सायंकाळी झाले. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
ते म्हणाले, ‘ दगडांचा इतिहास लाखो , करोडो वर्षांचा आहे.पृथ्वीच्या उदरात काय दडले आहे, याचा अंदाज दगडांच्या अभ्यासातून करता येतो. दगडात सौंदर्य आहे आणि माहितीही आहे. हिरे हे अलंकारात वापरले जात असले तरी पृथ्वीच्या खोल उदरातील माहिती त्यात लपलेली असते.
या सर्व अभ्यासासाठी  हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. यात पुणे विद्यापीठ ‘ जीविधा ‘ संस्थेला सहकार्य करेल
‘जीविधा ‘ चे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्ताविक केले.
हे प्रदर्शन दि. 11  ते 14 आॅक्टोबर या काळात सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत राजा रविवर्मा कलादालन, महात्मा फुले संग्रहालया समोर, घोले रोड आयोजित करण्यात आले आहे
माणसाच्या प्रगतीसार प्रदर्शनाची तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. प्रागैतिहासिक, ऐतिहासिक व आधुनिक,प्रागैतिहासिक काळात माणूस दगडाचा वापर प्रामुख्याने हत्यारे बनवण्यासाठी, राहण्यासाठी म्हणून गुहा व दफनभूमीत करायचा. डेक्कन कॉलेज ने या प्रदर्शनात त्या काळातील माहीती मांडलीआहे,
ऐतिहासिक काळात किल्ले, मंदिरे, पाण्याची टाकी, शिलालेख, लेणी इत्यादी विविध ठिकाणी दगडाचा वापर दिसतो. ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ च्या साह्याने या काळाची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडली  आहे.
 अशी माहिती  राजीव पंडीत यांनी प्रास्ताविकात दिली.
उदघाटनानंतर ‘डेक्कन कॉलेज’चे डॉ. प्रबोध शिरवळकर यांचे ‘हडप्पन संस्कृतीतील दगडाचा कलात्मक वापर’ या विषयावर व्याख्यान झाले.
आधुनिक काळातही दगडाचा वापर कमी झाला नाही. बांधकाम, घर सजावट, दागिने, खनिजे, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय, केमिकल वगैरे क्षेत्रात दगडाने मानवी जीवन व्यापले आहे, याची माहिती होणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रदर्शनात फोटो व माहितीपूर्ण पोष्टर्स, अनेक वस्तू यांचा समावेश आहे.
यावेळी डॉ. प्रबोध शिरवळकर,डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. संजीव नलावडे, डॉ. तुषार शिरोळे, डॉ. अजित वर्तक, डॉ. उदयसिंह पेशवा, या अभ्यासकांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तनिष्कच्या `उत्सव’ कलेक्शनमध्ये इतिहास आणि परंपरांचा संगम

0

~ऐतिहासिक प्रकार आणि कारागिरीसह समकालीन अचूकता आणि स्टाइल यांचा संगम~

सणासुदीचे दिवस आता लवकरच सुरू होतील आणि तनिष्कही यंदाची दिवाळी अगदी दिमाखात साजरी करणार आहे. आपल्या देशाची संपन्न संस्कृती, सौंदर्य आणि दिव्यांच्या सणाचा खरा अर्थ दाखवणारे `उत्सव’ हे कलेक्शन सादर करण्यात आले आहे.

आजची आधुनिक भारतीय स्त्री सातत्याने नवीन रचनांच्या आणि तिच्या रुपावर खुलून दिसतील अशा नव्या डिझाइनच्या शोधात असते. मात्र, अशातही ती ऐतिहासिक सौंदर्य आणि परंपरा विसरत नाही. हा सण साजरा करण्यासाठी तनिष्कने आधुनिकता आणि पंरपरा यांचे उत्तम फ्युजन नव्या कलेक्शनद्वारे सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये नाजूक कारागिरसह अचूकता आणि स्टाइलचा उत्तम मेळ साधला गेला आहे.

सेच, या कलेक्शनमधील दागिन्‍यांमध्‍ये अत्यंत अभिमानी आणि संपन्न इतिहासाचे दाखले देणारी परंतु अत्याधुनिक स्टाइल समाविष्ट आहे, याशिवाय पश्चिम आणि दक्षिण भारतातील कारागिरीच्या उत्तम नमुन्यांचाही समावेश आहे. अत्याधुनिकता आणि पारंपरिक संस्कृती यांचा सुंदर मिलाफ असलेलं हे कलेक्शन एक स्टेटमेंट बनू शकतं, शिवाय ही परंपरा आपल्या नंतरच्या पिढ्यांकडे सोपवता येते, कारण ही स्टाइल कधीही कालबाह्य होणारी नाही.

उत्सवमधील दागिने ३०,०००/- रुपयांपासून भारतातील आतापर्यंत १६५ शहरांतील २६७ दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

तनिष्क विषयी:

तनिष्क या टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय दागिन्यांच्या ब्रँडने त्यांच्या अद्वितीय कारागिरी, खास डिझाइन्स आणि चोख व्यवहारामुळे गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भारतीय स्त्रीचे अंतरंग समजून घेणारा आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे कधी परंपरागत तर कधी आजच्या युगाचे दागिने पुरवणारा एकमेव ब्रॅंड म्हणून तनिष्क प्रसिद्ध आहे. याच लौकिकाला साजेसा ‘भारतातला सर्वाधिक विश्वासार्ह दागिने ब्रँड’ हा पुरस्कार तनिष्कला ‘ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायजरी’ यांच्यातर्फे २०१७मध्ये मिळाला आहे. त्यांच्या याच लौकिकाला अधोरेखित करणारी तनिष्क शोरूम्स अद्ययावत अशा कॅरेटमीटरने सुसज्ज आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वाधिक खात्रीलायक पद्धतीने पडताळता येते. सोने आणि हिऱ्यांच्या (२२ आणि १८ कॅरेट) ५०००हुन जास्त डिझाइन्सचे भारतीय, पाश्चात्य आणि या दोन्हींचा मेळ घालणारे दागिने तनिष्क तुम्हाला पुरवतात. त्यांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा कारखान्यांमध्ये तयार झालेले दागिने म्हणजे कलेचा सर्वोच्च अविष्कार असतात. तनिष्कच्या रिटेल साखळीत १४४ शहरांमधल्या २६६ खास शोरूम्स आणि बुटीक्स आहेत.