Home Blog Page 3049

डॉ. अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन

0
पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक व प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेसह कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकृष्ट्या स्वावलंबी करण्याचा संकल्प डॉ. आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. यंदापासून समितीच्या कार्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नगरमध्ये जून महिन्यापासून समितीची शाखा उघडण्यात येणार आहे. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी राजू इंगळे आदी उपस्थित होते.
प्रतापराव पवार म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने डॉ. आपटे यांनी विद्यार्थी सहायक समितीची 1955 मध्ये स्थापना केली. तीन विद्यार्थ्यांपासून सुरवात केल्यावर आता समितीचे कार्य विस्तारले असून, शहरात पाच वसतिगृहांत सुमारे 775 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. आपटे यांचे जन्मशताब्दी वर्ष 8 नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. समितीच्या माध्यमातून केवळ वसतिगृह चालविले जात नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून स्वावलंबनाचे धडे देत चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यात येते. समितीची वसतिगृहे म्हणजे परिवर्तनाची आणि व्यक्तिमत्व विकासाची केंद्रे आहेत. नवीन वसतिगृहासह कौशल्य विकास प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासिका, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत,” असे पवार यांनी नमूद केले.
तुकाराम गायकवाड म्हणाले, “संस्थेत सध्या विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे 450 विद्यार्थी असून, सुमारे 30 विद्यार्थी दिव्यांग आहेत. तसेच लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश येथील गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेने संधी दिली आहे. संस्थेत विद्यार्थी- विद्यार्थिनी, जात-धर्म असा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा- शिका योजनेतून स्वावलंबनाची शिकवणही दिली जाते. संस्थेचे माजी विद्यार्थीही समितीच्या कामात सक्रिय आहेत. कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी कोणतेही मानधन न घेता ते संस्थेचे कामकाज चालवतात.”
“संस्थेत दाखल मुलाला निवास, आहार आणि सर्व प्रकारची शैक्षणिक मदत केली जाते. एका विद्यार्थ्यामागे वर्षासाठी सुमारे 45 हजार रुपये खर्च येतो. त्यातील 22 हजार रुपये विद्यार्थ्याने करायचा आहे, तर उर्वरित 23 हजार रुपये संस्था देणगीदारांच्या माध्यमातून उभारते. येथील सर्व कामात विद्यार्थी सहभाग घेत असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी व्यायाम, योगासने, तज्ज्ञ मार्गदर्शन, आरोग्य शिबिर आदी उपक्रम सुरु असतात. सध्या एका विद्यार्थ्यामागे वर्षाला २२ हजार रुपयांची तूट सहन करावी लागते. त्यामुळे समाजातील दानशूरांनी अर्थसहाय्य करावे,” असे आवाहन प्रभाकर पाटील यांनी केले.

स्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाला विजेतेपद

0
पुणे- स्टार स्पोर्टस् अकादमी यांच्या तर्फे आयोजीत स्टार प्रिमीयर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पराभव करत विजेतेपद  पटकावले. 
 
स्टार स्पोर्टस् अकादमी क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत  मिहिर देशमुखच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना पार्थ शेवाळे व साईराज चोरगे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र  संघ 44 षटकात सर्वबाद 151 धावांत गारद झाला. पीवायसी हिंदू जिमखाना संघाच्या पार्थ शेवाळे व साईराज चोरगे यांनी प्रत्येकी 2 तर रोहित कांबळे, सय्यद सुफियान व  मिहिर देशमुख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 151 धावांचे लक्ष मिहिर देशमुखच्या नाबाद 70 धावांच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 41 षटकात 4 बाद 155 धावांसह पुर्ण करत विजेतेपद पटकावले. यात समर्थ काळभोरने 17 तर रोहित कांबळेने 16 धावा करून मिहिरला सुरेख साथ दिली. नाबाद 70 धावा व 1 गडी बाद करणारा मिहिर देशमुख सामनावीर ठरला.
पीवायसी हिंदू जिमखाना संघा संघाचा   मिहिर देशमुख मालिकावीर तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला तर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा साईराज चोरगे सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
क्लब ऑफ महाराष्ट्र –  44 षटकात सर्वबाद 151 धावा(गिरिष शहापुरकर 37, प्रणव केळकर 25, विवेक टिपरे 20, पार्थ शेवाळे 2-31, साईराज चोरगे 2-16, रोहित कांबळे 1-5, सय्यद सुफियान 1-7, मिहिर देशमुख 1-37) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 41 षटकात 4 बाद 155 धावा(मिहिर देशमुख नाबाद 70, समर्थ काळभोर 17, रोहित कांबळे 16, हितेश यादव 1-22, अथर्व जयहर 1-21, पार्थ कांबळे 1-35, साहिल कड 1-29) सामनावीर- मिहिर देशमुख
पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.  
 
इतर पारितोषिके
मालिकावीर- मिहिर देशमुख(164 धावा आणि 7 गडी बाद)
सर्वोत्कृष्ट फलंदाज- मिहिर देशमुख(164 धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- साईराज चोरगे(8 गडी बाद)

तळजाई टेकडीवरील कै. सदु शिंदे क्रिकेट स्टेडियमचा २६ नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

0
*आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी मोफत प्रशिक्षण 
  *सरावाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
  * नक्षत्र गार्डन ,बांबू उद्यान , सोलर पॅनल या प्रकल्पांचे  भूमिपूजन व सेल्फी    पॉईंटचे उद्घाटन 
  *माजी उपमहापौर आबा बागुल यांची पत्रकार परिषदेत माहिती 
पुणे -क्रिकेट हा भारतीयांसाठी जणू धर्मच बनला आहे. केवळ शहरीच नव्हे तर निम शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी ’सचिन’ किंवा ’माही’ होण्याची स्वप्न पहात आहेत.त्यानुसार पुण्यातील तळजाई टेकडीवर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यातील  पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर महान क्रिकेटपटू  कै. सदू  शिंदे यांच्या नावाने  एका सुसज्ज क्रिकेट  स्टेडीयमची निर्मिती करण्यात आली आहे.  प्रशिक्षण आणि सरावाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या या सदु शिंदे क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 
  सदू  शिंदे क्रिकेट स्टेडियम, तळजाई टेकडी, पुणे येथे सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या या लोकार्पण  सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते   पृथ्वीराज चव्हाण ,कै, सदू शिंदे यांचे कुटुंबीय , पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट , राज्याचे वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ,आयुक्त सौरभ राव  यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि पक्षनेते,स्थानिक नगरसेवक  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
 
याबाबत  अधिक माहिती देताना आबा बागुल म्हणाले कि, शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी माझ्या संकल्पनेतून एक सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत प्रथमच तळजाई टेकडी परिसरात पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प साकारला जात आहे. विशेष म्हणजे वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरीक यांच्या सहभागाने  प्रकल्प  होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५ एकर जागेवर कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले आहे. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उभारणीत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर टाळून स्थानिक पातळीवर मिळणार्‍या दगड, मातीचा वापर केला आहे. त्यामुळे हे स्टेडीयम पूर्णपणे पर्यावरणपूरक  आहे. विशेषतः या क्रिकेट स्टेडियमद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत  दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे . त्याचबरोबर या सोहळ्यात  बांबू उद्यान नक्षत्र गार्डन ,सोलर रूफ पॅनल या प्रकल्पांचेही   भूमिपूजन  होणार आहे. 
 
तळजाई टेकडीच्या पर्यावरणपूरक नियोजनाबाबत अधिक माहिती देताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, २७ वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे. अनेक पथदर्शी प्रकल्प माझ्या कारकिर्दीत शहरात साकारले आहेत. सहकारनगर भागात काम करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र प्रभागरचनेमुळे तशी संधी मिळाली नाही. मात्र आता नव्या प्रभागरचनेमुळे कार्य करण्याची संधी मिळाल्याचा  आनंद आहे. शहराच्या फुफ्फुसांपैकी महत्वाची असलेल्या तळजाई टेकडीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकासात्मक कामे होत आहेत. या पार्श्वभूमीवर वन्य जीवांच्या अधिवासाचे पुनरुजीवन व दुर्मिळ वनस्पती, वृक्षांचे संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांसह विद्यार्थी, कलावंत, पर्यावरणप्रेमी, महिला, तरुणवर्ग यासह सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार्‍या पथदर्शी प्रकल्पांचा आणि मूलभूत सुविधांसह तातडीच्या सेवांचा समावेश असलेला सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला त्यानुसार सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर  जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र    त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प  उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे. वाहनतळापासून   जाण्या येण्यासाठी ई रिक्षा सायकल  उपलब्ध असणार आहेत. नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. व्यायाम आणि चालण्यासाठी येणार्‍या नागरिकांकरिता तसेच वनक्षेत्रात वर्दळ संपूर्णत: रोखण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज  पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही  होत आहे.
मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स,  महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण , सांस्कृतिक क्षेत्राला वाव देण्यासाठी अँफी थिएटर,  रेन वटर हार्वेस्टिंगद्वारे तळ्यांची निर्मिती, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्क स्टेशन्स, रोजगार निर्मितीसाठी तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू; अथवा अन्य उपक्रमांसाठी खुले प्रदर्शन केंद्र, रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीला चालना देणारा  प्रकल्प होणार आहे आणि उत्पादित शेतमालासाठी तेथेच विक्री केंद्र, मध्यवर्ती भागात पर्यटकांसह नागरिकांसाठी ’मार्केट प्लेस’, पक्ष्यांच्या अभ्यास व निरीक्षणासाठी ’गाईड विथ टूर’ हा महत्वाचा प्रकल्पही या आराखड्यात आहे.त्याचबरोबर  स्वच्छतागृहे व अन्य नागरी सुविधाही उपलब्ध करून  दिल्या जाणार आहेत. 
प्रकल्पाचे वैशिष्ट्ये 
 
* निसर्गभ्रमण:
पुणे शहर हे देशातील महानगरांच्या यादीत जाऊन बसले आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या महानगरीत निवास करणार्‍या नागरिकांना अनेक प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जावे लागते. निसर्गाचे सान्निध्य हे या ताणतणावांपासून मुक्ती मिळविण्याचे प्रभावी साधन आहे. त्यातून वृक्षवेली आणि प्राणिजगताची शास्त्रीय माहिती मिळवून निसर्गाकडे अधिक डोळसपणे पाहण्याची दृष्टी लाभली तर ती पर्वणीच ! याच उद्देशाने  जैववैविध्य उद्यानात निसर्गभ्रमणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती ही शास्त्रीय माहिती देणार्‍या ’गाईड’सह !

* देशी वृक्षांचे रोपण आणि संगोपन:
सध्याच्या जागतिक तापमानवाढीच्या काळात वृक्ष ही मानवी अस्तित्वासाठी संजीवनी ठरत आहे. त्यासाठी वृक्षांचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. त्यात स्थानिक वृक्षांचे संगोपन अधिक पर्यावरणपूरक ठरते. त्यासाठी या परिसरात अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, ऐन, आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, कडुनिंब, कढीलिंब, कदंब, कनकचंपा, करंज, कवठ, कळंब, कांचन, काटेसावर, किनई, कुसुंब, खडशिंगी, शमी , खैर, गुंज, चाफा, चिंच, जांभूळ, निरगुडी, नेपती, पळस, पांगारा, बूच, पारिजातक, पिंपळ, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, बेल, बेहडा, बोर, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, रिठा, वड, साग, हिरडा अशा देशी वृक्षांच्या प्रजातींचे रोपण आणि संगोपन केले जाणार आहे.
* जलाशय:
मागील सलग 3 वर्ष महाराष्ट्रातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे लहरी पाऊसमान आणि पाण्याच्या टंचाईचे संकट अधिकाधिक गहिरे होत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ’रेन वटर हार्वेस्टींग’ ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून या परिसरात पावसाचे पाणी अडवून आणि जिरवून पूर्णत।: नैसर्गिक पद्धतीने जलाशयाची उभारणी केली जाणार आहे. अर्थातच त्यासाठी कोणतेही कृत्रिम बांधकाम आणि बाहेरून आणलेले पाणी वापरले जाणार नाही; हे विशेष !

 

* पक्षी उद्यान:
एकेकाळी आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असणारा पुणे शहराचा परिसर अनेक स्थानिक तसेच हंगामी स्थलांतर करणार्‍या विदेशी पक्षांसाठी महत्वाचा अधिवास होता. वाढत्या नागरीकरणामुळे सध्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पक्ष्यांना अनुकूल पर्यावरण निर्माण करून या प्रकल्पात पक्षी उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठीही हे उद्यान उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये पक्षी आणि एकूण पर्यावरणाविषयी आस्था निर्माण होण्यासाठीही ते महत्वाचे ठरणार आहे.
 

* संकल्पनाधारित 7 उद्याने:
भारतीय संस्कृतीनुसार 28 नक्षत्रांना एकेका वृक्षाशी जोडण्यात आले आहे. या संकल्पनेवर आधारित नक्षत्र उद्यान, बांबूच्या विविध प्रजातींचा समावेश असलेले बांबू उद्यान, महाराष्ट्राच्या डोंगरी भागात उपलब्ध असलेल्या रानमेव्यापैकी करवंदे, जांभळे, आवळा, रायआवळे याची माहिती बहुतेकांना असते. मात्र यापेक्षा वेगळे तोरणं, आमगुळे, आळू असेही वेगळे प्रकार पाहायला मिळणारे रानमेवा उद्यान, मसाल्याच्या पदार्थांच्या वृक्ष वेलींचे दर्शन घडविणारे उद्यान, आयुर्वेदात वर्णन केलेल्या वनौषधींची ओळख करून देणारे वनौषधी उद्यान, ओळखी, अनोळखी फुलांच्या झाडे आणि वेली यांचे दर्श घडविणारे पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पती उद्यान या संकल्पनांवर आधारित 7 उद्याने या प्रकल्पात असणार आहेत.
 

* निसर्ग इतिहास संग्रहालय:
निसर्गाचा इतिहास हा एक उद्बोधक विषय असला तरीही तो सर्वसामान्यांपासून दूर आणि उपेक्षित राहिला आहे. या विषयाची ओळख करून देणारे संग्रहालय या प्रकल्पात असणार आहे. या विषयाची ओळख करून घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि तज्ज्ञ या सर्वांसाठी हे संग्रहालय उपयुक्त असणार आहे.
 

* महिलांसाठी स्वतंत्र क्रिडांगण :
सध्याच्या काळात सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. क्रीडाक्षेत्रही त्याला अपवाद नाही. महिलांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा, विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सरावाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने या प्रकल्पात महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहे.
 

* सेंद्रिय शेती विकास:
रासायनिक खते आणि औषधे यांच्यामुळे शेतजमिनींचा होणारा र्‍हास लक्षात घेता सेंद्रीय शेतीचा प्रचार अन प्रसार होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या प्रकल्पात सेंद्रीय शेती करण्यासाठी भाडेतत्वावर जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी पिकविण्यात आलेल्या कृषी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी इको- बाजारही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
 
* साहसी खेळांची सुविधा:
भारतात आतापर्यंत साहसी खेळ फारसे रुजले नाहीत. याचे प्रमुख कारण या खेळांना लागणार्‍या सुविधा शहरी भागातही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. आता मात्र विद्यार्थ्यांमध्ये या खेळांबद्दल आकर्षण वाढत आहे. त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी साहसी खेळांच्या सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध असणारे केंद्र या प्रकल्पात उभारण्यात येणार आहे.
 

* सोलर रूफ पॅनल्स:
सध्याच्या काळात ऊर्जा टंचाईवर मार्ग काढण्यासाठी पर्यावरणानुकूल सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. भारतीय वातावरणात तब्बल 8 ते 10 महिने स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या प्रकल्पातील वाहनतळांवर सोलर पॅनल्स बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे निर्माण होणारी वीज या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून अतिरिक्त वीज नजीकच्या परिसरात पुरविण्यात येईल.

आसनस्थ बालाजी मंदिरात ५६ भोग अन्नकोटाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे-भवानी पेठमधील ८५० वर्षापूर्वीचे प्राचीन  आसनस्थ श्री बालाजी मंदिरात देव दिवाळीनिमित्त ५६ भोग अन्नकोटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मंदिरात विविध ५६ प्रकारचे गोड पदार्थ मांडण्यात आले होते . त्यानिमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी होम हवन , अभिषेक , आरती व बालाजीची गाणी सादर करण्यात आली . यावेळी मंदिरात मोठया प्रमाणात बालाजी भक्त सहभागी झाले होते .

मंदिराचे पुजारी रामस्वरुपदास बैरागी , लालदास बैरागी , रामेश्वरदास बैरागी , डब्बू पांडे , राजू काळे , संजय व्हावळ आदी  बालाजी भक्त उपस्थित होते . 

पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या भेटीला

0
मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक,दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे.लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव *‘एक होतं पाणी’* असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. या सिनेमातून एक नवा चेहरा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीचे नाव *श्रिया मस्तेकर* असं आहे. श्रियाच्या डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती लेखक *आशिष निनगुरकर* यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळचा एक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत *आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि अभिनेत्री श्रिया मस्तेकर* पाहायला मिळत आहे. सामाजिक विषयाला हात घालणारा *’एक होतं पाणी’* हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.
सध्या मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जातो आहे. अशाच एका सामाजिक विषयाला हात घालणारा ‘एक होतं पाणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे…काही दुष्काळग्रस्त भागात तर दोन वेळचा खाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.
या चित्रपटाला संगीत दिग्दर्शन विकास जोशी यांचे असून रोहित राऊत,आनंदी जोशी,ऋषिकेश रानडे यांनी गाणी गायली आहेत. *विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ* हे सिनेमाचे निर्माते आहेत. *आशिष निनगुरकर* लिखित या सिनेमाचे छायाचित्रण *योगेश अंधारे* यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, आशिष निनगुरकर,रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, वर्षा पाटणकर,राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.

इराकच्या नागरिकावर इनामदार हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

0
पुणे :अ‍ॅबडॉमिनल एऑर्टिक अ‍ॅन्युरिझम या पोटाच्या  दुर्मीळ   आजाराने त्रस्त असलेल्या इराकमधील रुग्णाला फातिमानगर(वानवडी,पुणे  ) येथील इनामदार मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर्सच्या टीमने यशस्वी उपचार केले. परदेशातूनही पेशंट उपचारासाठी पुण्यात येत असल्याने मेडिकल टुरिझम वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅबडॉमिनल एऑर्टिक अ‍ॅन्युरिझमला ‘ट्रीपल ए’ असे म्हणतात. ज्यामध्ये एओर्टाची (शरीरातील सर्वांत मोठी धमनी) भिंत कमकुवत होऊन धमनीच्या साधारण लांबीपेक्षा ५० टक्के जास्त फुगवटा होतो.  एओर्टा   हे हृदयामधून येणाऱ्या रक्ताच्या सतत दबावाखाली असते. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर एओर्टा  च्या भिंती रुंद होतात व पुन्हा मागे सरकतात. ज्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या भिंतीवर अधिक दबाव किंवा ताण आणतात. यामुळे एओर्टा  ची भिंत फुटण्याचा धोका उद्भवतो.

इनामदार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेज इनामदार म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी एक ६९ वर्षीय इराकी  रुग्णाला  उदर व पाठीच्या दुखण्याचा १० ते १५ दिवसांपासून त्रास होत होता. त्यांना उच्च रक्तदाबाचे उपचार सुरू होते.’ त्यांना होणाऱ्या वेदनांच्या निदानासाठी सोनोग्राफी करण्यात आली. त्यातून डॉक्टरांना अ‍ॅबडॉमिनल  एओर्टा   अ‍ॅन्युरिझम हा दुर्मिळ आजार असल्याची शंका आल्याने सिटी अँजिओग्राफी करण्यात आली. ज्यामध्ये हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले.

शस्त्रक्रियेची माहिती देताना डॉ. इनामदार म्हणाले, ‘रुग्णाचे वय व वैद्यकीय स्थिती लक्षात घेता कुठल्याही प्रकारची गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यामध्ये जोखीम होती. भूल दिल्यानंतर उद्भवणारी संभाव्य जोखीम आणि त्यांची आरोग्य स्थिती याचा विचार केला. त्यानंतर आम्ही ही प्रक्रिया दोन टप्प्यांत करण्याचे ठरविले.’

‘पहिल्या टप्प्यात मूत्रपिंड निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी तसेच रक्ताभिसरण व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी मूत्रपिंडाला सर्जिकल बायपास व्हेसलग्राफ्टस (रक्ताभिसरण कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेला पर्यायी मार्ग) निर्माण करण्यात आले. याचबरोबर त्यांना अखंड अतिदक्षता सेवा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यावर एंडोव्हस्क्युलर स्टेंट शस्त्रक्रिया करण्यात आली,’ असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.

डॉ. शार्दुल दाते, डॉ. ए. सी. चोपडावाला, डॉ. अनमोल एम., भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पी. आणि अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. के. तिवारी यांच्या नेतृत्वाखाली इतर सहकारी डॉक्टरांचा यामध्ये समावेश होता. ‘धूम्रपान टाळल्यास व आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हा रोग टाळता येऊ शकतो,’ असे इनामदार हॉस्पिटलमधील वैद्यकीय प्रशासक डॉ. समीर शेख यांनी सांगितले.

डॉ. परवेज ग्रांट, डॉ. संजय पाठारे यांना लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे पुरस्कार

0

पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर २०१८) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांना समाजरत्न पुरस्कार, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे यांना समाज मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्याम खंडेलवाल, सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले उपस्थित होते.

चंद्रहास शेट्टी म्हणाले, “अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी सकाळी ८ वाजता रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली सिटीप्राईड थिएटर, कोथरुड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी निघणार असून, त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यात विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते १२.३० या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामध्ये इन्शुलिन विषयी समज-गैरसमज, मधुमेहा बाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३.०० या वेळेत याच ठिकाणी मधुमेहा संबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.”

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, प्रांतपाल रमेश शहा, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे पाटील, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

ओबामांच्या योजनेहून मोदींची योजना मोठी – मुख्यमंत्री फडणवीस(व्हिडीओ)

पुणे–जगात सर्वात मोठी म्हणून ज्या अमेरिकेच्या बराक ओबामांच्या हेल्थकेअर योजनेची गणती झाली त्या ओबामांच्या योजनेहून मोठी योजना भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली , ओबामांची योजना १० कोटी जनतेला आरोग्य सहाय्य करणारी होती मोदींची योजना ५० कोटी जनतेला प्रत्येकी 5 लाखापर्यंत खर्चाचे आरोग्य सहाय्य करणारी आहे असे येथे नमूद करून यापूर्वी अनेकांनी केवळ कागदावर प्रकल्प दाखविले पण भाजपने अवघ्या साडेचार वर्षांत ते प्रत्यक्षात आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली.

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, पंधरा वर्ष प्रलंबित असलेला पुण्याचा वाहतूक प्रश्न भाजपने मेट्रो आणून सोडवला.रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.चोवीस तास पाणी योजनेतवर त्यांनी फक्त चर्चा केली. स्मार्ट सिटीचा पैसाही त्यांना योग्य वापरायचा नव्हता.गरीबापासून मध्यमवर्गीयांपर्यंत आणि श्रीमंतापासून ते फकिरापर्यंत सर्वांच्या स्वप्नातलं शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचं भाजपचं स्वप्न आहे.
बेघर गरीबांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार अशी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फक्त जमिनीचा पट्टाच नाही तर त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एक कोटी व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत आहेत. त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका ते केंद्रापर्यंत तुम्ही सत्ता भोगली तरी देखील प्रश्न राहीले आहेत. आता आमची सत्ता आली तर काही जण आम्हाला विचारतात की योजनांचे किंवा प्रकल्पाचे काय झाले? हा प्रश्न विरोधकांनी आम्हाला विचारू नये तो लोकांना विचारावा  असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या विद्वत्तेमुळेच मेट्रोला विलंब : देवेंद्र फडणवीस

पुणे :  मेट्रो वरून की खालून यावर पुण्यात फार विचार झाला. विद्वत्तेतील पुण्याची मक्तेदारी मान्यच आहे पण त्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मेट्रो व महापालिका संयुक्तपणे करणार असलेल्या नळस्टॉप चौकातील डबलडेक उड्डाणपुलाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी सभापती मुरलीधर मोहोळ, पुण्यातील सर्व आमदार, महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रोसाठी  झालेला विलंब भरून काढू. जगात कुठेही झाले नाही एवढे वेगात पुण्यामध्ये मेट्रोचे काम होत आहे असा दावाही त्यांनी केला. जगात कुठेही मेट्रोचे काम पहिल्या वर्षात फक्त १५ टक्के होते. पुण्यात ते २५ टक्के झाले आहे. याच वेगाने कामाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल.इ-बस ही पुण्यात लवकरच वापरात येतील. सोलर एनर्जी वापरून बस धावतील. शिवाजीनगर ते हिंजवडी असा मार्गही लवकरच तयार होईल. पीपीपी तत्वावर तो करत आहोत. स्वारगेटजवळ मोठा ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात येत आहे. त्यात मेट्रोसह एस.टी. पीएमपीएल अशा तिन्हींचा समावेश असेल.

          पालकमंत्री बापट म्हणाले, पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती, हे करू, ते करू असे फक्त म्हणत होते, कधी करू ते मात्र सांगतच नव्हते. आम्ही एका वर्षात करून दाखवत आहोत. मेट्रो च्या कामाला गती देण्यात येणार आहे. पुणेकरांनीभाजपाला भरभरून दिले आहे. आता आम्हीही कामात कमी पडणार नाही.मोहोळ म्हणाले, स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्याच वेळेला पक्षामुळे मिळाले. त्यावेळी निवडणूक जाहीरनाम्यात असलेले प्रत्येक आश्वासन प्रत्यक्षात आणायचे या भावनेने काम केले. या पुलासाठी विशेष तरतुद केली. तासाभरात ३२ हजार वाहनांची येजा होत असलेला कर्वेरस्ता हा सर्वाधिक वाहतूकीचा रस्ता आहे. त्यामुळे या पुलाची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष असल्यामुळे त्यांनी लगेचच या कामासाठी वेळ दिली.उपमहापौर डॉ. धेंडे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून मंत्रघोषात भूमीपूजन करण्यात आले.  नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजूश्री खर्डेकर यांच्या हस्ते खासदार, सर्व आमदार यांचा सत्कार करण्यात आला. 

बापटांची हुकलेली संधी काकडेंनी साधली 

पुण्याच्या प्रदुषणात वाढ झाली आहे. वीसपंचवीस वर्षांपर्वी या काळात पुण्यात छान थंडी असायची.  मेट्रोमुळे प्रदुषण कमी होते. ती वेगवान असते. वेळ वाचतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो चांगला पर्याय आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.भूमीपूजन करताना पालकमंत्री बापट यांच्या हातून वाढवण्यासाठी घेतलेले श्रीफळ सुटले व ते दूर गेले. खासदार संजय काकडे यांनी ते हातात घेतले व वाढवले. बापट यांच्या हातून सुटलेले श्रीफळ काकडे यांनी वाढवले अशी मल्लीनाथी लगेचच यावर काहींनी केली.

बापटांच्या तिकिटासाठी मीच भांडलो होतो – खा. संजय काकडे (व्हिडीओ)

पुणे :  पुण्यातील भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाच्या   कार्यक्रमात   राज्यसभेचे खासदार संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची जुगलबंदी  बघायला मिळाली. लोकसभेचे खासदार अनिल शिरोळे यांच्या मितभाषी स्वभावावरून सुरु झालेली चर्चा थेट दुसरे खासदार काकडे यांच्या बोलक्या स्वभावापर्यंत गेल्याचे बघायला मिळाले.

शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. त्यावेळी खासदार काकडे यांनी बोलताना शिरोळे यांचे काही अनुभव उपस्थितांना सांगितले. त्यात त्यांनी २०१४ साली मी तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे लोकसभेसाठी बापट यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला. त्यानंतर काकडे यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. पण त्यांनी याबाबत मनात काहीही ठेवलं नाही. त्यांनी यावेळी शिरोळे यांच्या मोजकं बोलण्याच्या स्वभावाचे कौतुक केले. याच व्यासपीठावर बापटही उपस्थित असल्याने त्यांनी उत्तर देणेही अपेक्षित होतेच. बापट यांनी नेहमीच्या खेळकर शैलीत शिरोळे यांच्या मितभाषी स्वभावाचे कौतुक केले. पण त्याच वेळी बोलताना काकडे यांना, ‘शिरोळे कमी बोलतात तेव्हा त्यांना जास्त बोलायला सांगा आणि तुम्ही थोडं कमी बोलणं मनावर घ्या’असा सल्ला देताच प्रेक्षकात हशा पिकला. त्याच वेळी तुमचे बोलून झाले की मी बोलेन असे सांगायलाही ते विसरले नाहीत. अर्थात त्यांच्या या जुगल बंदी मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.

भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडेल-मुख्यमंत्री

0

पुणे -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून साकारणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प हा भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे एक मोठे अर्थकारण उभे राहणार असून ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे ते विकासाच्या समृद्धीचे नवे मॉडेल म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

महाळुंगे-माण येथील हायटेक सिटीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या वेट लिफ्टिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अनिल शिरोळे, आमदार सर्वश्री. संग्राम थोपटे, बाबुराव पाचर्णे, मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, माणच्या सरपंच स्मिता भोसले, महाळुंगेचे सरपंच मयूर भांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंजेवाडी हे पुण्याचे ग्रोथ इंजिन आहे. त्याप्रमाणेच महाळुंगे-माण हाय टेक सिटी प्रकल्पाचे पुणे शहराच्या विकासात महात्वाचे योगदान राहणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशभरात होणार आहे.

मुंबई आणि परिसराचा विकास एमएमआरडीएच्या माध्यमातून झाला, त्याच धर्तीवर पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे परिसराचा विकास होणार आहे. पीएमआरडीएच्या विविध प्रकल्पांमधून पुण्याच्या नागरिकीकरणाला योग्य दिशा मिळणार आहे. यासाठी नागरी विकासासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या सिंगापूरच्या सरकारी कंपनीशी आपण करार केला आहे. पुढील ४० ते ५० वर्षांचा कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.

पुण्याच्या नियोजनबध्द वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरचे काम डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रिंगरोड अत्यंत महत्वाचा आहे. रिंगरोडसाठी आवश्यक असणारी जमीन राज्य शासन अधिग्रहित करून देईल. केंद्र सरकार रिंगरोडचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे. याच बरोबर पुरंदर विमानतळाच्या जमिनीच्या आधिग्रहणाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. या विमानतळाशेजारी एअरपोर्ट सिटी वसविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. पीएमआरडीएने बांधकाम नियमावली मंजूर केल्यामुळे नियोजनबध्द विकासाच्या कामांना वेग आला आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नागरीकरण करण्यात येत असून स्थानिक भूमीपूत्रांना पूर्णपणे भूमीहीन न करता त्यांना या संपूर्ण व्यवस्थेत सहभागी करून विकास आणि समृध्दी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, गेल्या काही दिवसात पुणे शहर आणि परिसराचा कायापालट होत आहे. पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. महाळुंगे-माण हाय-टेक सिटी हा प्रकल्प देशात आदर्श ठरेल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उल्लेखनीय काम सुरू आहे.

राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, महाळुंगे-माण हाय-टेक सिटीही नवीन कल्पनांचा संगम आहे. या प्रकल्पामुळे राज्याचे नाव देशभर होईल. अत्याधुनिक शहरामुळे विकासाला चालना मिळेल. पुणे शहर व परिसराचा विकास वेगाने होत आहे.

तत्पूर्वी, कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या पीएमआरडीए प्रकल्पाच्या प्रदर्शनात नगररचना योजनेच्या नकाशाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी पीएमआरडीएच्या महाळुंगे-माण हाय-टेक सिटीच्या बोधचिन्हाचे आणि डिजीटल फलकाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पीएमआरडीएच्या ऑनलाईन बांधकाम प्रणालीचे उद्घाटन आणि त्याच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही श्री. फडणवीस यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी मानले.

कार्यक्रमास नगररचना विभागाचे संचालक नागेश्वर शेंडे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयक्त मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  • पीएमआरडीए ला “आंतरराष्ट्रीय प्रीमियम गुंतवणूक क्षेत्र” विकसीत करणार.
  • याचा एक भाग म्हणून ‘म्हाळुंगे माण हाय-टेक सिटी’ची स्थापना.
  • राज्यातील पहिले 250 हेक्टर क्षेत्राचे शहर होणार.
  • परिसरासाठी दीड लाख कोटींचा मास्टर प्लॅन.
  • प्रकल्पात 14 टीपी स्कीम.
  • पायाभूत सुविधांसाठी 620 कोटींची तरतूद.
  • रिंगरोडसाठी 10 हजार कोटींची तरतूद.
  • सुनियोजित पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, शाळा, बगीचे, दवाखाने, विद्युतीकरण इत्यादी सोयीसुविधा प्राधिकरण कडून उपलब्ध करून देण्यात येणार.
  • जमीनधारकांच्या जमिनीस योग्य रुंदीचा रस्ता असलेले भूखंड मिळणार आहे.
  • योजनेखालील क्षेत्र मंजूर, प्रादेशिक योजनेनुसार शेती तथा नगरविकास विभागात आहे.
  • नगर रचना योजनेमुळे कोणतेही अधिमूल्य न भरता विकसनक्षम विभागातील विकसित भूखंड प्राप्त होतो.
  • खासगी क्षेत्रातून 23 हजार कोटींची गुंतवणूक.
  • नगर रचना योजना 4 टप्प्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित.
  • छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून मल्टिनॅशनल कंपन्यांना येथे प्राधान्य दिले जाणार.
  • परदेशी कंपन्यादेखील गुंतवणूक करणार.
  • दीड लाख लोकसंख्येसाठी प्रामुख्याने टेमघर धरण, मुळा नदी आणि पिरंगुटसह सहा गावांत 4 कोटी रुपये खर्च करून पाणी योजना उभारण्यात येणार.
  • दळणवळणाची उत्तम सुविधा
  • मुंबई- पुणे महामार्गापासून केवळ 300 मीटरवर तसेच हिंजवडी आयटी पार्कलगत.
  • प्रस्तावित हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोद्वारे पुण्यातील इतर भागांना जोडले जाणार.
  • भविष्यातील हायपरलूप मार्गाच्या प्रथम स्थानकापासून जवळ.
  • शहरात 12 ते 36 मीटर रुंद रस्त्याचे जाळे.
  • पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर, त्यासाठी मुळा नदीकाठी सुशोभीकरणासाठी 12.50 हेक्टर क्षेत्र आरक्षित.
  • सर्वांना उत्कर्षाची संधी देण्यासाठी निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक वापरासाठी 6 दशलक्ष चौरस मीटर क्षेत्र.
  • खेळाचे मैदान, शॉपिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद केंद्र यासाठी 23 हेक्टर क्षेत्र राखीव.
  • परवडणाऱ्या गृहनिर्माणसाठी 13.3 हेक्टर क्षेत्र आरक्षित.
  • उद्योगानुकूलता धोरणानुसार गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक खिडकी योजना.
  • महाळुंगे- माण वर होणारा खर्च: (कोटी रुपयांमध्ये)
  • रस्ते व पूल – 285, नाले – 50, पाणीपुरवठा – 45, सांडपाणी व्यवस्थापन – 37, विद्युतीकरण – 127, सेवा वाहिन्या – 81, नियंत्रण कक्ष – 10, इतर खर्च – 92  
  • ????????????????????????????????????

गोवा टुरिझमतर्फे भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम लाँच

0

वैशिष्ट्ये

  • चार्जिंग पॉइंट्स आणि कम्युनिटी सेंटर्स म्हणून ई- हब्ज. ई हब हे स्मार्ट हब आहे, ज्यामध्ये मोफत वाय- फाय, पर्यटकांसाठी सेवा आणि गोव्याची इत्थंभूत माहिती असलेला गाइड या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
  • सहली आणि भाडेशुल्कावर वापरण्यासाठी स्मार्ट आणि डिजिटल पद्धतीने कनेक्ट करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सायकल्स प्रमुख पर्यटनस्थळी उपलब्ध करण्यात आल्या असून त्याद्वारे पर्यटकांच्या सुरक्षिततेवरही भर देण्यात आला आहे.
  • खास तयार करण्यात आलेल्या प्रयोगशील सहली स्थानिक वाटाड्याच्या मदतीने गोव्याचा अस्सल आणि सखोल अनुभव देतील.
  • ई टुर रेंटल – ई- बाइक भाडेतत्वावर घेऊन स्वशोधाच्या सहलीला जाता येईल व दरम्यान टेक प्लॅटफॉर्म ऑडिओ कमेंटरीद्वारे तुमची संगत करेल. प्रत्येक ठिकाण हे जिओ फेन्स्ड असल्यामुळे तुम्ही संबंधित प्रत्येक ठिकाणाच्या पुढे गेल्यानंतर कंटेट उपलब्ध करून देईल.

पणजी – पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर आणि जीटीडीसीचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी आज पर्यटन भवन, पणजी येथे भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम लाँच केला. याप्रसंगी जीटीडीसीचे संचालक मंडळ, पर्यटन आणि जीटीडीसीचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचा बी लाइव्ह’ हा इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) पर्यटन उपक्रम ‘अर्किस टुर्स प्रा. लि. यांच्याशी केलेल्या भागिदारीच्या माध्यमातून अमलात येणार असून तो शाश्वत पर्यटनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. यामुळे पर्यटकांना गोवा पर्यावरणपूरक आणि ट्रेंडी पद्धतीने नव्या माध्यमातून जाणणं व अनुभवणं शक्य होईल.

पर्यटन मंत्री,मनोहर आजगांवकर,  म्हणाले, ‘अर्किस टुर्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने‘बी लाइव्ह’ हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. शाश्वत पर्यटन हा आमच्या प्रयत्नांच्या गाभा असून भारतात ईव्ही यंत्रणा तयार करून इतरांसाठी आदर्श घालून देताना आम्हाला आनंद होत आहे. पर्यावरणात सकारात्मक बदल घडवणारे तंत्रज्ञान आणि उद्योगांना आम्ही पाठिंबा तसेच चालना देतो. देशातील विविध पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांचे नेतृत्व गोवा करत असून अर्किस टुर्स प्रा. लि. बोरबर झालेली भागिदारी हे आमचे शाश्वत पर्यावरण साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. ठाम हेतू असलेले बरेच उपक्रम सादर केले जात असतात, मात्र त्यामध्ये स्थानिकांना सक्षम करून सामाजिक भागिदारी सुधारण्याची क्षमता अभावानेच आढळून येते. बी लाइव्हद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या सहलींमध्ये स्थानिक समाजाचा सहभाग असल्यामुळे आमचे संबंध त्यांच्यासाठी जास्त अर्थपूर्ण ठरतील.’

गोवा पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडचे (जीटीडीसी) अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे म्हणाले, ‘भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) पर्यटन उपक्रम – बी लाइव्ह लाँच करण्यासाठी अर्किस टुर्स प्रा. लि.शी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा धोका आणि त्यामुळे गोव्याच्या वायू प्रदूषणात टाकली जात असलेली भर लक्षात घेता ईव्ही पर्यटन कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी भरीव मदत करेल. हा क्रांतीकारी उपक्रम आहे, जो पर्यटनाचा सखोल अनुभव घेतानाच प्रवासाची हरित साधने पुरवेल. यामुळे स्थानिक समाज सक्षम होईल आणि आपल्या प्रत्येकासाठी हरित भविष्य घडवण्यास मदत होईल.’

अर्किस टुर्स प्रा. लि. हे भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटनाचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी भारतातील पहिली ईव्ही पर्यटन यंत्रणा- ‘बी लाइव्ह’ उभारण्यासाठी जीटीडीसीशी भागिदारी केली आहे. या उपक्रमामध्ये ई- बाइकवरून भ्रमंती करत स्थानिक संस्कृती, इतिहास आणि गोव्याचा वारसा सहजपणे समजून घेता येईल. या ई बाइक्समध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली असून त्यात जीपीएस ट्रॅकर, २५ किमी वेग देण्यासाठी बॅटरीवर चालणारी मोटर, जास्त सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्क ब्रेक यांचा त्यात समावेश आहे. पर्यटक तसेच स्थानिकांना आता गोवा जास्त हरित व प्रदूषित न करणाऱ्या मार्गांनी पाहाता येणार आहे.

‘बी लाइव्ह लाँच करण्यासाठी जीटीडीसीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. प्रवासी वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कोंडी गोव्यासाठी चिंतेचा विषय झाली होती आणि सहजपणे प्रचलित होऊ शकणाऱ्या शाश्वत पर्यावरण पद्धती वापरात आणणे गरजेचे होते. बी लाइव्हद्वारे आम्ही लोकांना प्रवासाची हरित साधने वापरत अस्सल स्थानिक अनुभव घेण्यासाठी मदत करत आहोत. बी लाइव्हद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयोगशईल सहलीमध्ये स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्यात आले असून त्यामुळे पर्यटकांना अस्सल गोवन संस्कृतीचा आनंद घेता येईल,’ असे समर्थ खोलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह- संस्थापक, अर्किस टुर्स प्रा. लि. म्हणाले.

या सेवेच्या तंत्रज्ञानाबद्दल अर्किस टुर्स प्रा. लि.चे सीओओ आणि सह- संस्थापक संदीप मुखर्जी म्हणाले, ‘बी लाइव्हचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर. बीलाइव्ह.कं.इन प्लॅटफॉ४मवर प्रवाशांना डिजिटल करन्सी वापरून सहजपणे सहलीचे आरक्षण करता येते. वेब अपच्या मदतीने रायडर्सना सहलीशी संबंधित रियल टाइम माहिती दिली जाते. ई- बाइक्स अत्याधुनिक आणि प्रत्येक चार्जवर ५० किमीची रेंज देणाऱ्या असून त्यात मल्टी इन्फो डिस्प्लेसाठी डिजिटल स्क्रीन्स आणि सुरक्षिततेसाठी डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. आमचे कमांड सेंटर्स जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने रायडर्सवर देखरेख करते. यामुळे बी- लाइव्ह पर्यावरणपूरक आणि त्याचबरोबर देशातील सर्वात स्मार्ट पर्यटन बनते.’

 

बांधकामासाठीची पर्यावरण परवानगी प्रक्रिया आता झाली सुलभ स्थानिक संस्थांना मंजुरीचे अधिकार, निर्णयाचे क्रेडाई महाराष्ट्रकडून स्वागत

0

पुणे- अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे बांधकाम प्रकल्पांना पर्यावरणासंबंधी परवानगी मिळविण्यास विलंब लागत होता. मात्र, केवळ याकारणाने प्रकल्पांना दिरंगाई होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थानिक संस्थांना आता पर्यावरण मंजुरीचे अधिकार दिले आहेत. तसेच २० हजार चौ.मी  ते ५० हजार चौ.मी च्या प्रकल्पांची मंजुरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यात घेण्यात आला आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून कार्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे क्रेडाई महाराष्ट्रानेही स्वागत केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, एका प्रकल्पाच्या मंजुरीसाठी लागणार एक ते दीड वर्षाचा कालावधी केवळ पर्यावरण मंजुरीमुळे तब्बल तीन वर्षांपर्यंत लांबला जायचा. पर्यावरणाच्या परवानगीच्या नावाने आठ ते दहा महिने प्रकल्प विलंब तर मोठे आर्थिक नुकसान व्हायचे.तसेच यापूर्वी राज्याच्या राजधानीत ही परवानगी घेण्यासाठी यावे लागत होते ते यामुळे वाचणार आहे.

परिणामी, बांधकाम खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम घरांच्या किंमतीवर व्हायचा. या काळात बांधकाम व्यावसायिकांची गुंतवणूक अडकून पडायची, अशाप्रकारे गुंतवणूक अडकणे, हे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरायचे. पर्यावरण देखील महत्त्वाचेच आहे. पण या प्रक्रियेत सुलभता येणेही तितकेच आवश्यक होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रेडाईच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे अनेकदा पाठपुरावाही करण्यात आला होता. त्यामुळेच या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासात आड येणारी मोठी समस्या दूर झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

तसेच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेनुसार हाती घेण्यात आलेल्या २०२२पर्यंत सर्वांना घरे या उपक्रमासही गती प्राप्त होईल, असेही कटारिया यांनी नमूद केले

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी अर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान

0

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी पुण्याच्या अर्जुन कढे व आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले आहे. ही स्पर्धा 17ते24  नोव्हेंबर दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी संकुलात रंगणार आहे.

भारतातील ही चॅलेंजर स्पर्धा जूनी व सातत्याने होत असून सलग पाचव्या वर्षी होणा-या या स्पर्धेत सर्व अव्वल भारतीय खेळाडूंसह 20हुन अधिक देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

पीएमडीटीएचे अध्यक्ष, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय आणि आशियाई खेळाडूंना पुरस्कृत करण्याचे आमचे लक्ष यशस्वी होत असल्याचाही मला आनंद वाटतो.आम्ही सलग पाचव्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आपल्या मानांकनात प्रगती करता येते. तसेच टेनिसमधील त्यांची कारर्किद घडविण्यास या स्पर्धेचा उपयोग होतो, याचा मला विशेष आनंद आहे. तसेच,  तसेच, गेली चार वर्षे आमच्या या स्पर्धेतील विजेते हे अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करत आहेत. त्यामुळे यावर्षीदेखील या स्पर्धेमुळे विजेत्याला अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करण्यास मदत होईल, अशी आशा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यंदाचा कट ऑफ 283 असा असून त्यामुळे ही स्पर्धा या स्तरावर अतिशय चुरशीची होणार आहे.   महाराष्ट्राच्या अर्जुन कढे व आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड देण्यात आले आहे.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, आम्हांला किमान 8 ते 10 भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ आणि पात्रता फेरीत खेळणे अपेक्षित आहे आणि या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी घरच्या मैदानावर लढण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. रामकुमार रामनाथन व प्रजनेश गुन्नेस्वरन यांनी आपल्या क्रमवारीच्या जोरावर मुख्य फेरीत स्थान प्राप्त केले आणि चार भारतीय खेळाडूंना वाईल्डकार्ड प्रदान करण्यात  आले आसून याशिवाय दोन ते तिन इतर भारतीय खेळाडू पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करतील अशी आशा आहे.

आयोजन सचिव व पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा म्हणाले की,  2019मध्ये होणा-या आगामी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेची पुर्व तयारी म्हणजे ही स्पर्धा आहे. तसेच  या स्पर्धेसाठी आम्ही याच दृष्टिकोनातुन तयारी करत आहोत.

पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या टेनिस फेस्टीव्ह एक्टीव्हीटीज् चे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे आणि महाराष्ट्रात व्हीलचेअर टेनिसची ओळख व्हावी यासाठी या वर्षी  पुण्यातील प्रशिक्षकांसाठी  एआयटीए ब्रँड अॅम्बेसेडर व्हील चेअरतर्फे एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय भारताचे डेव्हिस कप प्रशिक्षक झिशान अली पुण्यातील खेळाडूंसाठी एकदीवसीय शिबीराचे आयोजन करणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नरेंद्र सोपल, उमेश माने, शेखर सोनसाळे, अश्विन गिरमे, शितल अय्यर, प्रविण झिटे, जयंत कढे व केपीआयटी ऑफीशियल्स यांचा समावेश आहे.

अँड्री कोर्निलोव्ह यांची एटीपी सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नितीन कन्नमवार यांची एटीपी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 17 व 18 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस 19नोव्हेंबर रोजी होणार आहेत. स्पर्धेचे उपांत्य व दुहेरीचा अंतिम फेरीचा सामना शुक्रवार, दि.23 नोव्हेंबर रोजी होणार असून शनिवार, दि.24 नोव्हेंबर रोजी एकेरीच्या अंतिम फेरीचा सामना होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 7200डॉलर(5,25,000रूपये) व 80एटीपी गुण, तर उपविजेत्याला 4053डॉलर(2,95,000रूपये)व 55 एटीपी गुण देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील मुख्य फेरीतील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:

राडू एल्बोट (माल्दोविया,86), रामकुमार रामनाथन(भारत,121), इलियास यमेर (स्वीडन,132), मार्क पॉलमन्स (ऑस्ट्रीया, 137), प्रजनेश गुन्नेस्वरण(भारत,142),जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन, 175), हिरोकी मोरिया(जपान, 187), आंद्रेज मार्टिन(स्लोवाकिया,189).

केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेः
एकेरी गटः 

2017: युकी भांब्री(भारत)वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत) 4–6, 6–3, 6–4  
2016ः सादिओ डंबिया(फ्रांस)वि.वि.प्रजनेश गुन्नेस्वरण 4-6, 6-4, 6-3;
2015ः युकी भांब्री(भारत)वि.वि.एव्हेग्नी डॉंस्काय(रशिया)6-2, 7-6(7-4);
2014ः युईची सुगिता(जपान)वि.वि.एड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)6-7(1-7), 6-4, 6-4;

दुहेरी गटः 

2017: तोमीस्लाव्ह ब्रेकिक/अँटी पाविक वि.वि.पेड्रो मार्टिनेझ/अँड्रियन मेनेनडेझ मॅसिअर्स 6-1,7-6(5)  
2016ः पुरव राजा/दिविज शरण(भारत)वि.वि.लुका मार्गोली/हुगो न्यास(फ्रांस)3-6, 6-3, 11-9;
2015ः गेरार्ड ग्रॅनोलर्स/ऍड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)वि.वि.मॅक्सिलीअन न्युक्रिस्ट(ऑस्ट्रिया)/दिविज शरण(भारत)1-6, 6-3, 10-6;

2014ः साकेत मायनेनी/सनम सिंग(भारत)वि.वि.सँचाय/सोंचात रतीवत्ना(थायलंड)6-3, 6-2.

पनामा फाउंडेशनच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप

0

सूरतमधील हिरे व्यापाऱ्याप्रमाणे पुण्यातील पनामा ग्रुप व फाउंडेशनकडून कर्मचाऱ्यांच्या पुढच्या पिढीसाठी कार्य सुरु

पुणे : पनामा फाउंडेशनच्या वतीने आपल्या संस्था व उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी काम सुरु केले आहे. हे काम पाहिल्याल आपल्याला सूरतमधील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याची आठवण होते. कर्मचाऱ्यांच्या मुलांना पनामा फाउंडेशन शिक्षणासाठी गेली तीन वर्षे शिष्यवृत्ती देत असून त्याचे वाटप करण्यात आले.

विमाननगर येथील पनामा हाऊसमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील तीन वर्षापासून शैक्षणिक गुणवत्तेचे निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. याप्रसंगी पनामा फाउंडेशनचे अध्यक्ष समीर लडकत, मानसी लडकत, गाैतम लडकत, सागर शहा आदी मान्यवरांसह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्यां संख्येनं उपस्थित होते.

पनामा फाउंडेशन मागील अनेक वर्षापासून व्यवसायाबरोबरच समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषक जनजागृती आदी विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. एवढेच नाही तर बीड व उस्मानाबाद या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये देखील फाउंडेशनतर्फे विविध प्रकारचे समाजहिताचे उपक्रम राबविले आहेत.

कोणत्याही चांगल्या उपक्रमाची सुरूवात आपल्यापासून करायला हवी या विचाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. त्यामुळे हे काम हाती घेतले आहे, असे समीर लडकत यांनी यावेळी सांगितले.