पुणे-भवानी पेठमधील ८५० वर्षापूर्वीचे प्राचीन आसनस्थ श्री बालाजी मंदिरात देव दिवाळीनिमित्त ५६ भोग अन्नकोटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मंदिरात विविध ५६ प्रकारचे गोड पदार्थ मांडण्यात आले होते . त्यानिमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी होम हवन , अभिषेक , आरती व बालाजीची गाणी सादर करण्यात आली . यावेळी मंदिरात मोठया प्रमाणात बालाजी भक्त सहभागी झाले होते .
मंदिराचे पुजारी रामस्वरुपदास बैरागी , लालदास बैरागी , रामेश्वरदास बैरागी , डब्बू पांडे , राजू काळे , संजय व्हावळ आदी बालाजी भक्त उपस्थित होते .