Home Blog Page 3046

महा टेनिस फाउंडेशनतर्फे आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमीचे उद्घाटन

0

पुणे– टेनिसची लोकप्रियता वाढविण्याच्या आणि महाराष्ट्रातील इच्छुक आणि विद्यमान टेनिस प्रतिभेस उत्कृष्ट प्रशिक्षण प्रदान करण्याच्या हेतूने महा टेनिस फाउंडेशनतर्फे आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी(एपीएमटीए)चे उद्घाटन आज करण्यात आले.

 एपीएमटीएच्या वतीने खेळाडूंच्या विकासाबरोबरच त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावरच भर देणार नसून स्पोर्ट्स सायन्सच्या सहकार्याने त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि जीवनशैली विकसित करण्यासाठी मदत करणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणूनसंपूर्ण राज्यभर भागीदार केंद्राद्वारे टेनिस खेळाचा प्रसार व सहभाग वाढविण्यासाठी भर देण्यात येणार आहे. ट्रेन-द-ट्रेनर कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दर्जा आणखी विकसित करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

एपीएमटीएचे अध्यक्ष आदर पुनावाला म्हणाले की,  कोणत्याही देशातील युवा वर्गाला महत्वपूर्ण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी खेळ महत्वाचा आहे. भारतामध्ये अनेक गुणवान युवा खेळाडू असून कोणत्याही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तसेच जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. या अकादमीच्या माध्यमातून भारतात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून उचललेले हे एक पाऊल आहे. जागतिक स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी व सर्वसामान्य लोकांना यामध्ये सामावून घेण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिका-यांची आहे. युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावे व देशासाठी नवे शिखर गतवे यासाठी एपीएमटीएने उचललेले एक पाऊल आहे.

 महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून आणि मुख्य सचिव प्रवीण परदेशीश्री प्रवीण दराडेश्री संजय खंदारे,आदर पुनावाला यांच्या सहकार्याने भारतातील यशस्वी खेळाडू घडविण्याच्या हेतूने हा प्रयत्न केला गेला आहे.

महा टेनिस फाउंडेशनचे चेअरमन असिमकुमार गुप्ता म्हणाले कीराज्यातील प्रतिभावान व उभरत्या खेळाडूला आगामी काळात भविष्यात जागतिक दर्जाचे प्रशिक्षण फायदा मिळणार असून खेळाडूंना आपली गुणवत्ता वाढवण्याकरिता यातून मदत मिळणार आहे.

एपीएमटीए मधील खेळाडूंच्या विकासासाठी अनुभवी प्रशिक्षकांची एक टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये माजी राष्ट्रीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे याचे तांत्रिक संचालक म्हणून टीमचे प्रतिनिधित्व करतील.याशिवाय मुख्य प्रशिक्षक केदार शहाआदित्य मडकेकरराधिका कानिटकर,फिजीकल कंडीशन एक्सपर्ट कैफी अफजल व स्ट्रेंथ ट्रेनर गौरव निजॉन यांचा समावेश असणार आहे.

महा टेनिस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सुतार म्हणाले की, गतवर्षी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या प्रारंभी आणि अनावरण झाल्यानंतर एपीएमटीए स्थापन करण्याची संकल्पना मांडली गेली होती. या संकल्पनेला पाठींबा दिल्याबद्दल आम्ही आदर पुनावाला ग्रुपचे आभारी असून महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या मदतीने महाराष्ट्रातील टेनिस वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड असेल आणि भविष्यात प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.

 या अकादमीचे पहिले तीन केंद्र पुण्यात पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखान येथे तर एक नाशिक टेनिस सेंटर येथे सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय कोल्हापुर,सोलापुर व नागपुर मध्येही तीन केंद्र सुरु करण्याचा विचार आहे. 

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, यासारख्या ग्रामीण कार्यक्रमांअंतर्गत आलेले खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या विजेत्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय यश मिळविण्यासाठी एमएसएलटीएशी संलग्न होऊन एपीएमटीए सहकार्य करेल, अशी आशा आहे.  

2018 अशियायी क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती व भारतीतील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू अंकिता रैनाऋतुजा भोसलेडेव्हिस कुपर व टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा वाइल्डकार्ड विजेता अर्जुन कढेआर्यन गोविसराष्ट्रीय खेळाडू सिध्दांत बांठीया हे या अकादमीचे पहिले प्रशिक्षणार्थी असणार आहेत.

अगोदर क्लीनचीट,नंतर राजकीय दबावाखाली माझ्यावर कारवाई : सुभाष जगताप

पुणे : – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त आणि उघड चौकशीमध्ये यापूर्वी क्लीनचिट दिली आहे. असे असतानाही केवळ राजकीय दबावाखाली माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बऱ्हाटे यांनी दिलेल्या खोट्या माहीतीच्या आधारे याच विभागाने माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर खोटा गुन्हा दाखल केला, हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रातील विसंगत माहितीतून समोर येत आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

उत्पन्ना पेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी नगरसेवक सुभाष जगताप आणि त्यांची पत्नी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यावेळी जगताप दाम्पत्य यांना अटक करून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लाचलुचपत विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पांडुरंग इंगळे या राजकीय विरोधकाने 1992 मध्ये माझ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने याप्रकरणी आमची गुप्त आणि उघड चौकशी केली होती. तक्रारीत काही तथ्य न आढळल्याचे स्पष्ट करत लाचलुचपत विभागाने चौकशी बंद करून आम्हाला क्लीनचिट दिली.

यानंतर बऱ्हाटे यांनी 2014 मध्ये माझ्या विरोधात पुन्हा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यावेळी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मी प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या संपत्तीच्या विवरणातील माहितीला आव्हान देत त्यांच्यासोबत स्पेस असोसिएट या संस्थेत भागीदारी असून संस्थेच्या नावे धनकवडी येथे 15 आर जमीन असून ती माहिती मी प्रतिज्ञा पत्रात दिली नाही, असा त्यांचा आरोप होता. त्यांनी यासंदर्भात दिलेली कागदपत्र बनावट असल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळेच दोषारोप पत्रात या जागेचा उल्लेख केलेला नाही. फेरचौकशीत माझी डोणजे येथील आणि लक्ष्मीनगर येथील दुकानाची किंमत रेडिरेकनर नुसार वाढली आहे. विशेष असे की जमिनीचे व्यवहार असो अथवा व्यवसाय असो याची सगळी पेमेंट्स चेकने दिली असून त्याचा इनकम टॅक्सही भरला आहे.

फिर्यादी मध्ये माझ्या बँक खात्यात 35 लाख 52,523 रुपये रक्कम असल्याचे लाचलुचपत विभागाने नोंदविले होते. प्रत्यक्षात तपासात आणि बँकेने दिलेल्या पत्रात केवळ 6 लाख 15 हजार 36 रुपये शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले. लाचलूचपत उत्पन्न विभागाने उत्पन्न आणि खर्चाचा तक्ता चुकीचा दाखवीत 46 लाख 14 हजार 722 रुपये अपसंपदा केल्याचा ठपका ठेवला. परंतु त्यांच्याच दोषारोप पत्रातील आकडेवारी वरून ही रक्कम 10 लाख, 9 हजार 611 च्या वर जात नाही.

एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा अपसंपदेची रक्कम असेल तरच गुन्हा दाखल होतो. केवळ आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी लाचलुचपत विभागाने सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली खोटी आकडेवारी देऊन आम्हाला गुन्ह्यात अडकवले आहे. हा गुन्हा काढून टाकावा यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.

रविंद्र बऱ्हाटे हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे हस्तक असून त्यांनी माझ्यासह अनेकांवर खोट्या आणि अर्धवट कागदपत्रांच्या आधारे गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्यक्षात बऱ्हाटे यांनी बनवेगिरी करून 2 हजार कोटींची मालमत्ता जमविली आहे. हे प्रकरण मी बाहेर काढले असून याची उच्चस्तरावर चौकशी सुरू आहे. याच रागातून त्यांनी माझ्याविरोधात कुंभाड रचले आहे. त्याला सत्ताधारी आणि पोलिसांचा पाठिंबा आहे. परंतु याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असा दावा जगताप यांनी यावेळी केला.

दगडूशेठ हलवाई गणपतीला २२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

0

पुणे-त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला २२१ मिष्ठान्नांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. एवढंच नाही तर सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजले होते. गणपती बाप्पाभोवती विविध प्रकारच्या फळांची आणि भाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मिठाई, फराळाचे तिखट आणि गोड पदार्थ या सगळ्यांना गणपतीचा अन्नकोट सजवण्यात आला.

एवढेच नाही तर कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांमुळे मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला. यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा बसवा : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा महापालिकेला इशारा

0

पुणे-राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेने लवकरात लवकर बसवावा अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. संभाजी बागेतील ज्या ठिकाणाहून राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढण्यात आला त्याच जागी त्यांचा पुतळा बसवावा आणि लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा शहरातील कोणत्याही ठिकाणी पुणे महापालिकेने लवकरात लवकर बसवावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली. जर पुणे महापालिकेने या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊन पुतळे स्वतः च्या खर्चाने बसवू, असा इशारा त्यांनी दिला. ब्राह्मण महासंघाच्या या मागणीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्यावर्षी प्रमाणे यंदा एल्गार सारखी परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्या परिषदेमुळे समाजात कोणत्याही प्रकारचे पडसाद उमटता कामा नये. त्यामुळे या परिषदेवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली.

यावेळी आनंद दवे म्हणाले की, ‘राम गणेश गडकरी यांचा दोन वर्षांपूर्वी पुतळा काही व्यक्तींनी काढून टाकला होता. त्यानंतर महासंघाकडून पुतळा देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी बागेत पुतळा बसवण्यास कोणत्याही प्रकारचा ठराव आणायची महापालिकेला गरज नाही. त्यांनी पुतळा लवकरात लवकर बसवावा. तसेच लाल महाल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही संघटनांशी चर्चा केल्यावर त्यांनी पुतळा बसविण्यास सहमती दर्शवली असून हा पुतळा शहरातील कोणत्याही ठिकाणी बसवला जावा, अशी मागणी त्यांनी केली. जर हे दोन्ही पुतळे महापालिकेने बसवले नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊन पुतळे स्वतः च्या खर्चाने बसवू, असा इशाराही त्यांनी दिला.

मोहम्मद पैगम्बर जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रम

0

पुणे-मोहम्मद पैगम्बर जयंतीनिमित्त बजमे मुनावर मैफिले या संस्थेच्यावतीने येरवडा येथील शादल बाबा दर्गाहमध्ये अनाथ मुलांना थंडी पासून बचाव करण्याकरिता ब्लॅंकेट वाटप  शादल बाबा दर्गाहचे प्रमुख अकील मुजावर यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन सलीम मुजावर ,अविनाश शिंदे रेहमान मुजावर , सादिक पठाण , शशिकांत काथवटे व अमित कट्टी आदींनी विशेष परिश्रम घेतले .

अल कुरेश यंग सर्कलच्यावतीने १२०० किलो मोतीचूर लाडू वाटप करण्यात करण्यात आले . यामध्ये सफाई कामगार , पोलीस कर्मचारी बांधवाना , रुग्णालयातील रुग्णांना व नागरिकांना हे लाडू वाटप करण्यात आले . यावेळी  अल कुरेश यंग सर्कलचे संस्थापक मोहम्मद अली कुरेशी , अध्यक्ष अबू सुफियान कुरेशी , कार्याध्यक्ष रिझवान कुरेशी , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

साचापीर स्ट्रीट येथील पारशी अग्यारी चौकात हुसेन फ्रेंड्स सर्कल व इलियास शेख युवा मंचच्यावतीने मिरवणुकीतील बालचमूंना खाऊ वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन इलियास शेख , सादिक शेख , मजीद तांबोळी , इम्रान शेख , युनूस शेख आदींनी केले .

जान मोहम्मद स्ट्रीट येथे मिरवणुकीचे स्वागत  गुलाबपुष्प व पाण्याचे बाटल्यांचे वाटप बजमे रेहबर कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अक्रम शेख यांनी केले . यावेळी फैयाज शेख , असिफ शेख , सादिक शेख , बल्लू शेख , जावेद मुल्ला , इरफान मुल्ला , जमीर शेख , अमजद शेख यांनी केले .

भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने क्वाटर गेट चौकात स्वागत कक्ष उभारून मिरवणुकीचे गुलाबपुष्प देउन  स्वागत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी गुलाबपुष्प देउन केले . या कार्यक्रमाचे संयोजन  जयप्रकाश पुरोहित , तुषार पाटील , किरण क्षीरसागर , गणेश यादव , नईम शेख , बबलू यादव , विजय चव्हाण , रफिक शेख , जाकीर कुरेशी , राज तांबोळी व किशोर घाडगे आदींनी केले .

शरबतवाला चौकात बजमे इरफान फ्रेंड्स सर्कलच्यावतीने शरबत वाटप करण्यात आले . यावेळी  इरफान फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष असिफ शेख , सचिव इरफान शेख , उपाध्यक्ष इस्माईल शेख , मुजमिल शेख , आरकान शेख , युसूफ खान व इमाद शेख आदींनी केले होते .

महात्मा गांधी रोडवरील पंधरा ऑगस्ट चौक प्रतिष्ठानच्यावतीने मिरवणुकीमध्ये पाण्याच्या बाटल्यांचे वाटप निलेश कणसे यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन राजू कुरेशी , परवेज कुरेशी व बाबुलाल सय्यद आदींनी केले होते .

नॅशनल सोशल फाऊंडेशनच्यावतीने मिरवणुकीमधील नागरिकांना नॅशनल सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान खान यांच्याहस्ते  अल्पोपहार वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन रफीफ सय्यद , एजाज सय्यद , फिरोज खान , हाजी फैज , युनूस खान यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ , वसंत कुंवर , नगरसेवक अतुल गायकवाड , नगरसेवक विनोद मथुरावाला , सरफराज गबरानी व निलेश कणसे आदी मान्यवर उपस्थित होते .

सहारा सेवा संस्थेच्यावतीने महात्मा फुले पेठ येथे वयोवृध्द नागरिकांना थंडी पासून बचाव करण्याकरिता ब्लॅंकेट वाटप  करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन सहारा सेवा संस्थेचे अध्यक्ष सलीम अहमद शेख , उपाध्यक्ष सादिक पानसरे , समीर सुतार , मोहसीन शेख , अझहर शेख , आकाश पवार , निखिल कांबळे मुकेश चव्हाण ,सोहेल शेख , अलीम शेख , अरुणा पवार रोहिणी कांबळे , शबाना शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चेतन मोरे , विक्रम मोरे , मार्तंड थोरात , भारत जाधव , रेणुका पाटीलअर्जुन रणदिवे , निरंजन अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते .

आबा बागुल यांनी तळजाई येथील राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये -नितीन कदम

 पुणे-कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आबा बागुल यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढून ,राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केले आहे .यामुळे तळजाई टेकडी वरील विकास कामावरून कॉंग्रेस राष्ट्रवादी मध्ये वादंग निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पर्वती मतदारसंघामध्ये तळजाई येथे पवारसाहेबांना मैदानाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे, परंतु आमचे साहेब हे जाणते नेते आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्या  कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न नगरसेवक आबा बागुल करीत आहेत हे त्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य आहे.  मैदान करण्यात आलेल्या जमिनीसाठी आमचे पक्षाचे सुभाष जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला व न्यायालयीन लढा हि दिला त्या नंतर स्वतः निधी देऊन विकास कामे हि केली तसेच याठिकाणी क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रयत्न केले. असे असताना तुटपुंजा निधी खर्च करून आयात पिठावर रेखोट्या मारण्याचा प्रकार नगर आबा बागुल करीत आहेत. त्यांचा हा बुरखा आम्ही फाडू या भीती पोटी त्यांनी ह्या मैदानाला कै. सदूभाऊ शिंदे यांचे नाव ठेवून पवारसाहेबांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पेक्षाही पुढे होती. त्यामुळे आघाडी झाल्यास पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडेच राहणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडेच सक्षम उमेदवार असल्यामुळे आयात उमेदवाराची गरज हि नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद काँग्रेस आय पेक्षा पर्वती मतदारसंघामध्ये निश्चितच जास्त असून आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच वाट्याला पर्वती मतदारसंघ येणार व आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होणार याबाबत आमचे ठाम मत आहे.या आगामी कार्यक्रमाला पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता स्वतःच्या इच्छे विरुद्ध परंतु फक्त आणि फक्त आमच्या पवारसाहेबांच्या प्रेमा खातरच उपस्थित राहील.

असे हि नितीन कदम यांनी म्हटले आहे .

भारतातील एक भव्यदिव्य सोहळा.. गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची

0
पुणे-विश्वविव्हा कॉन्सेप्ट इव्हॉल्वर्स प्रा. लिमिटेड आणि सिद (एस.आय.डी जन) फाऊंडेशन यांच्या वतीने भारतातील पहिलावहिला ‘गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची’ हा भव्यदिव्य सोहळा दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी एन.डी.स्टुडियो, कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे.  सौ. विमल कार्तिक सोमण(मुंबई) ह्या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत.यावेळी विनय  वाघ उपस्थित होते.
शिवकालीन वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिवतत्वे शिकून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करावा याचं अनुभव समृद्ध शिक्षण देणारा आगळा वेगळा रोमांचकारी अनुभव म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराजांची”… वीरगाथा, मोठे रंगमंच, किल्ले बनविण्याची प्रात्यक्षिके, मर्दानी खेळ(प्रात्यक्षिके), पोवाडे, गनिमी कावा प्रात्यक्षिक आणि अशा ब-याच गोष्टी ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
 जेव्हा आपण इतरांना त्यांची स्वप्नं साकारण्यात मदत करतो, तेव्हा आपलीसुद्धा प्रगती होते,. आणि कुटुंब व समाज सक्षम आणि संपन्न होतो… उत्तम विश्वाची निर्मिती होते. ही निर्मिती म्हणजेच “गाथा- छत्रपती शिवाजी महाराज”. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा हे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे.
छत्रपती शिवाजी  महाराजांच्या मूल्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, शासकीय शाळा दत्तक घेऊन त्यांचे आधुनिक गुरुकुलात परिवर्तन करणे, आपला वारसा (किल्ले/गडकोट) जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्ये असल्याचे कार्यक्रमाचे संयोजिका सौ. विमल कार्तिक सोमण यांनी म्हटले आहे, तसेच ह्या कार्यक्रमाला अंदाजे १ लाख इतक्या जास्त संख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र संघांचा मोठा विजय

0
पुणे- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14 वर्षाखालील   निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत  पुना क्लब  संघाने  क्रिकेट मास्टर्स अकादमी  संघाचा तर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने युनायटेड क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
 
पुना क्लब येथे  झालेल्या या सामन्यात साखळी फेरीत हृतिक उत्तेकरच्या भेदक गोलंदाजीच्या दोरावर पुना क्लब संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना हृतिक उत्तेकर व भार्गव पाठक यांच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ केवळ 38.3 षटकात सर्वबाद 109 धावांत गारद झाला. साहिल अभंगने 22 तर प्रितम बंहालेने 20 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. हृतिक उत्तेकरने 18 धावात तर  भार्गव पाठकने 33 धावांत 3 गडी बाद केले तर विराज मेहेत्रे , अभिषेक कुलकर्णी  व ओम माळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 109 धावांचे लक्ष गौरव खांदवेच्या नाबाद 37 व  विराज मेहेत्रेच्या नाबाद 34 धावांसह पुना क्लब संघाने केवळ 23.3 षटकात 2 गडी गमावत 110 धावांसह पुर्ण करत विजय संपादन केला. 18 धावांत 3 गडी बाद करणारा  हृतिक उत्तेकर सामनावीर ठरला. 
 
 व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी  मैदानावर झालेल्या सामन्यात क्रिश शहापुरकारच्या अफलातून आष्टपैलु कीमगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र  संघाने  युनायटेड क्रिकेट क्लब संघाचा 38 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना क्रिश शहापुरकारच्या दमदार 147 धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 45 षटकात 6 बाद 256 धावांचा डोंगर रचला. 256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमकार काळेच्या 53 धावा संघाला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरल्या व क्रिश शहापुरकरच्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड क्रिकेट क्लब संघ 43.2 षटकात सर्वबाद 218 धावांत गारद झाला. क्रिशने केवळ 37 धावा देत 3 गडी बाद केले. साहिल कड व पार्थ कांबळे यांनी प्रत्येकी 2 तर रिध्देश भुरूक व अभिजीत मेचे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी   
क्रिकेट मास्टर्स अकादमी – 38.3 षटकात सर्वबाद 109 धावा(साहिल अभंग 22, प्रितम बंहाले 20, पार्थ बोत्रे 15, हृतिक उत्तेकर 3-18, भार्गव पाठक 3-33, विराज मेहेत्रे 1-4, अभिषेक कुलकर्णी 1-24, ओम माळी 1-12) पराभूत वि  पुना क्लब- 23.3 षटकात 2 बाद 110 धावा(गौरव खांदवे नाबाद 37, विराज मेहेत्रे नाबाद 34, श्रियांक जैन 2-11) सामनावीर- हृतिक उत्तेकर
पुना क्लब संघाने 8 गडी राखून सामना जिंकला. 
 
क्लब ऑफ महाराष्ट्र- 45 षटकात 6 बाद 256 धावा(क्रिश शहापुरकार 147(159), साहिल कड 21, यश जयभाय 2-43, समर्थ वाबळे 1-47, अंकित बढे 1-40) वि.वि 
 युनायटेड क्रिकेट क्लब- 43.2 षटकात सर्वबाद 218 धावा(ओमकार काळे 53, रणवीर सिंग चौहाण 39, क्रिश शहापुरकर 3-37, साहिल कड 2-25, पार्थ कांबळे 2-47, रिध्देश भुरूक 1-37, अभिजीत मेचे 1-0) सामनावीर- क्रिश शहापुरकर 
क्लब ऑफ महाराष्ट्र  संघाने 38 धावांनी सामना जिंकला. 

समता परिषद पुणे महानगर अध्यक्ष पदी रघुनाथ ढोक यांची निवड

0
पुणे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद   तर्फे थोरसमाज सुधारक महात्मा फुले यांची 128 वी पुण्यतिथी निमित्त  28 नोव्हेंबर 2018 रोजी अभिवादन आणि समता पुरस्कार सोहळा आढावा बैठक सेंट्रल पार्क हॉटेल येथे संपन्न झाली.या वेळी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी  सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ ढोक  यांची पुणे महानगर पश्चिम विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड केली ते निवडीचे पत्र मा.खासदार समीर भुजबळ  यांचे शुभहस्ते देण्यात आले.या प्रसंगी  कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे ,बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार दिप्ती चवधरी,आकृरशेठ कुदळे,रवी सोनावणे,संदीप लडकत,अंबादास गारूडकर,वसंतराव लोंढे,प्रा.गौतम बेंगाळे,मंजिरी धाडगे नगरसेवक संतोष लोंढे , सुरेखा भुजबळ, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रितेश गवळी तर आभार प्रदर्शन रवी चौधरी यांनी मानले यावेळी मोठया संख्येने समता सैनिक उपस्थित होते.
रघुनाथ ढोक अनेक सामाजिक,सहकार व शैक्षणीक  संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांची  निवड सार्थ झाल्याचे कौतुक होत आहे.

चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ !

0
चिंटू ‘ समवेत ढेपेवाडा येथे २४ नोव्हेंबर रोजी आयोजन 
पुणे :पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘ढेपेवाडा ‘ तर्फे  २४ नोव्हेंबरला (शनिवारी )   ‘चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ ! ‘ या उपक्रमाचे  आणि एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे .
‘चिंटू ‘ चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित हे या सहलीतील सहभागी मुलामुलींना ,पालकांना ‘चिंटू ” ची रेखाटने करून दाखवणार आहेत . ‘ढेपेवाडा ‘ चे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवणार आहेत ,वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची ओळख करून देणार आहेत .
सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत या सहलीत
७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पालकांसह  सहलीत अंतर्गत सहभागी होता येईल .
अधिक माहितीसाठी संपर्क 9822640599, 9763276232 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
‘ढेपेवाडा ‘ हा  मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून वाड्याची सर्व वास्तू वैशिष्टये येथे पाहावयास मिळतात  जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ‘ढेपेवाडा ‘  बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा आनंद देणारे पुण्यातील  हे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,अशी माहिती नितीन ढेपे यांनी पत्रकाद्वारे दिली

पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन- मिलींद सोमण आणि अदर पूनावाला यांच्याकडून विजेत्यांना पुरस्कार प्रदान

0

पुणे

पुणे रनिंग बियॉन्ड मायसेल्फ (पीआरबीएम)ने अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय)च्या सहकार्याने पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉन (पीसीसीएम)च्या विजेत्यांचा गौरव केला. मॅरेथॉनला १४००० पेक्षा जास्त नोंदणींसह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचे उद्घाटन आयर्न मॅन मिलिंद सोमण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसीसीआय, कृष्णन कोमांडूर यांच्या हस्ते पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे करण्यात आले. पीसीसीएमने शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारा संदेश दिला आणि पुणेकरांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.मॅरेथॉनच्या रूटला एम्सने प्रमाणित केले असून महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशनने अधिस्वीकृती दिली आहे. या उपक्रमातून पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य दिले गेले आणि त्यातून सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला गेला. तसेच पुणे महानगरपालिका, स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि पुणे स्मार्ट सिटी या प्रकल्पांनाही पाठिंबा दिला गेला.

अरविंद शिंदेंचे नाव आघाडीवर ..मात्र संजय काकडेंसाठी दरवाजा खुला -पुणे लोकसभा

0

नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी )-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम प्रशासकीय कारभार हाकू शकतात पण विरोधी पक्षांना शह देण्यासाठी उत्तम राजकारणी होऊ शकत नाहीत  पक्षश्रेष्ठींनी हे जाणले असून त्यांच्या युवा वर्गाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर पुणे लोकसभा मतदार संघातून अरविंद शिंदे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने होऊ शकतो ,आणि  जर शहर अध्यक्षांनी शिंदे यांच्याकडे   लोकसभा लढविण्यासाठी आवश्यक बळ असल्याची ग्वाही दिली तर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो ,दरम्यान  कॉंग्रेस ने राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या साठी दरवाजे उघडे ठेवले आहेत .  कॉंग्रेस मध्ये पक्ष श्रेष्ठींच्या दालनात सध्या या दोन नावावर पुणे अडकून आहे .
दिल्लीतील कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत ‘मायमराठी’ ने प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर हि माहिती दिली . आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या सूत्रांनी हे देखील सांगितले कि ,गेल्या लोकसभेला उषा काकडे यांना उमेदवारी देण्याचा विचार करण्यात आला होता . पण तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या नीतिमत्तेच्या राजकारणात त्यापेक्षा विश्वजित कदम यांच्या नावाला प्राधान्य दिले आणि पक्षश्रेष्ठींनी तात्काळ मंजुरी देखील दिली .पण आता बराच अस्तित्वात असलेला राजकीय प्रवाह आणि धोरणे नितीमत्ता यांची सांगड घालून श्रेष्ठी उमेदवाराचे नाव ठरवतील . आक्रमक युवा म्हणून ते शिंदे यांच्या नावाला पसंती देतील मात्र त्याबरोबर लोकसभा लढविण्याची ताकद राजनीती त्यांच्याकडे आहे काय हे पाहिले जाईल .मोहन जोशी हे निष्ठावंत आहेत ,त्यांनी  पूर्वी निवडणूक लढविली आहे. वारंवार कुठे ना कुठे त्यांना संधी देखील दिली आहे .अन्य उमेदवारात शिवरकर आणि अभय छाजेड यांची हि नावे आहेत ,मात्र हि नावे पिछाडीवर आहेत .लोकसभेसाठी जेवढी चुरस पुण्यातून असायला हवी तेवढी नाही हे देखील सूत्रांनी काबुल केले . कलमाडींचा झंजावात निर्माण करणारा नेता श्रेष्ठींना देखील हवा आहे पण कलमाडींना पुन्हा उमेदवारी देण्यावर विचार होऊ शकत नाही .त्यांनी केलेल्या गैरबाबीमुळे ते शक्य नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले .

विरोधी पक्षनेता -विशाल तांबे आणि बाबुराव चांदेरे यांच्यात चुरस

पुणे : पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विरोधी पक्षनेतेपद बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे नियोजन करण्यात येत असून, त्यानंतर नव्या विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.पूर्व भागाला आणि दक्षिण भागाला राष्ट्रवादीने आज पर्यंत बऱ्यापैकी बळ दिले आहे आता बाणेर बालेवाडी या भागाला बळ द्यावे आणि त्यासाठी बाबुराव चांदेरे यांना विरोधीपक्ष नेते पद द्यावे असा पक्षातील प्रवाह असताना , दक्षिण पुण्यातील विशाल तांबे यांचे नाव पहिल्यापासून आघाडीवर आहे .त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठींबा असल्याचे बोलले जाते .या पार्श्वभूमीवर तांबे आणि चांदेरे या नावात या पदासाठी चुरस दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

तुपे यांची नुकतीच शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तुपे यांच्याकडील पद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. तुपे स्वत:ही हडपसर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदाऱ्या नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान  तुपे यांची  पालिकेच्या राजकारणावर मोठी भिस्त आजवर राहिल्याने  या पार्श्वभूमीवर हे पद गेले तर  त्यांची तशी राजकीय कुचंबना होऊ नये याकडे देखील पक्ष लक्ष देऊ शकेल अशी स्थित आहे .मात्र या साठी ते हडपसर मधून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे कारण देऊन त्यांचा पक्षनेतेपदाचा प्रवास थांबवावा यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत .या पार्श्वभूमीवर   पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

माजी महापौर दत्ता धनकवडे, विशाल तांबे, दिलीप बराटे, बाबूराव चांदेरे अशा ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी विचार करण्यात येत आहे.

पुण्याच्या पत्रकार परिषदेत ‘माधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच

0

मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत निर्माते मोहसिन अख्तर, प्रेझेंटर उर्मिला मातोंडकर, संगीतकार अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकार सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी आणि या चित्रपटाचे लेखक समीर अरोरा उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका  तरुणीची भूमिका, सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच सोनाली कुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो.

या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील ‘सॉरी’ हे गाणं पुण्यातील पत्रकारांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यासाठी घेतलेली खास मेहनत आणि सॉरी म्हणताना नेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातून मांडतानाचा अनुभव याविषयी पत्रकारांसोबत गप्पा रंगल्या.मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

इंडसइंड बँकेतर्फे ‘इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड’ हे बटनासह भारतातील पहिले इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड दाखल

0

 इंडसइंड बँकेने इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड हे बटन असलेले भारतातील पहिले इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड दाखल केले आहे. हे कार्ड ग्राहकांना केवळ कार्डवरील बटन दाबून, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल येथे पेमेंटचे तीन पर्याय उपलब्ध करणार आहे क्रेडिट, 4 कालावधीचे पर्याय असणाऱ्या ईएमआयमध्ये व्यवहाराचे रूपांतर (6, 12, 18 24 महिने) किंवा साठलेले रिवॉर्ड पॉइंट वापरणे.

 हे कार्ड डायनॅमिक्स इंकच्या भागीदारीने निर्माण केले असून कंपनीचे मुख्यालय पिट्सबर्ग अमेरिका येथे आहे आणि कंपनी इंटलिजंट, बॅटरी पावडर्ड पेमेंट कार्ड यांचे डिझाइन व उत्पादन करते.

 पेमेंट कार्डासाठी क्रांतीकारी ठरेल अशा तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये केला आहे. तसेच ग्राहकांना वापरण्यासाठीही ते अतिशय उपयुक्त आहे व मूल्य देणारे आहे. या तीन पर्यायांशी संबंधित असलेल्या एलईडी दिव्यांचा वापर करून हे कार्ड ग्राहकाच्या पसंतीचा पेमेंटचा पर्याय दर्शवते. ग्राहकांना पीओएस व्यवहारांचे रूपांतर ईएमआयमध्ये करण्यासाठी किंवा रिवॉर्ड पॉइंट रीडिम करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे भरून देण्याची किंवा त्यांच्या बँकेला कॉल करण्याची किंवा कोणत्याही बँकिंग चॅनलला लॉग इन करण्याची आवश्यकता नाही.

 याविषयी बोलताना, इंडसइंड बँकेचे कन्झ्युमर बँकिंग हेड सुमंत कठपालिया यांनी नमूद केले,इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड दाखल केल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कार्डामुळे, क्रेडिट कार्डाच्या वापराने पेमेंट करताना ग्राहकांना विविध पर्याय देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. निवड करण्याचे स्वातंत्र्य पूर्णतः ग्राहकांना देण्यात आले आहे. आमच्या दृष्टीने, ग्राहकांना मिळणारा अनुभव सर्वात महत्त्वाचा आहे आणि आमच्या नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवांद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.

 इंडसइंड बँकेचे मार्केटिंग व रिटेल अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे ईव्हीपी व हेड अनिल रामचंद्रन यांनी सांगितले, “इंडसइंड बँकमध्ये आम्ही ग्राहकांना सबल करतील व अधिकाधिक सोय देतील, असी वित्तीय उत्पादने तयार करताना आम्ही ग्राहकांच्या गरजांनुसार नावीन्य समाविष्ट करतो. आम्हाला इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. या कार्डामुळे ग्राहकांना पॉइंट ऑफ सेल येथे त्यांच्या पसंतीच्या माध्यमातून पेमेंट करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यांना केवळ एक बटन दाबून ही सुविधा वापरता येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.”

 मास्टरकार्डचे दक्षिण आशियाचे डिव्हिजन प्रेसिडेंट पोरुष सिंग म्हणाले, नेक्स्ट क्रेडिट कार्ड हे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य असलेले भारतातील पहिले क्रेडिट कार्ड दाखल करण्यासाठी इंडसइंड बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे कार्ड वापरून ग्राहकांना खरेदी करता येईल, क्रेडिट घेता येईल आणि मर्चंट टर्मिनलवर रिवॉर्ड वापरता येतील व त्यामुळे हे आजवरचे सर्वात नावीन्यपूर्ण उत्पादन ठरणार आहे. मास्टरकार्डने नेहमीच ग्राहकांना प्राधान्य दिले आहे आणि कार्डधारकांना खरेदीचा उत्तम अनुभव व सोय मिळेल यावर आमचे नावीन्य भर देते.”

 इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्डमध्ये विविध वैशिष्ट्ये समाविष्ट असून, त्यामुळे ग्राहकांना एंटरटेन्मेंट ऑफर्स, कन्सीर्ज सर्व्हिसेस, लाउंजची उपलब्धता, इंधन सरचार्ज माफ, रिवॉर्ड मिळवणे व रिवॉर्ड रिडम्शन यामार्फत खरेदीचा उत्तम अनुभव मिळू शकतो. कार्डामध्ये विशेष नेक्स्ट रिवॉर्ड पॉइंट्सही समाविष्ट असून, त्यामुळे ग्राहकांना अधिक लाभ मिळतील.