पुणे-मोहम्मद पैगम्बर जयंतीनिमित्त बजमे मुनावर मैफिले या संस्थेच्यावतीने येरवडा येथील शादल बाबा दर्गाहमध्ये अनाथ मुलांना थंडी पासून बचाव करण्याकरिता ब्लॅंकेट वाटप शादल बाबा दर्गाहचे प्रमुख अकील मुजावर यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन सलीम मुजावर ,अविनाश शिंदे , रेहमान मुजावर , सादिक पठाण , शशिकांत काथवटे व अमित कट्टी आदींनी विशेष परिश्रम घेतले .
अल कुरेश यंग सर्कलच्यावतीने १२०० किलो मोतीचूर लाडू वाटप करण्यात करण्यात आले . यामध्ये सफाई कामगार , पोलीस कर्मचारी बांधवाना , रुग्णालयातील रुग्णांना व नागरिकांना हे लाडू वाटप करण्यात आले . यावेळी अल कुरेश यंग सर्कलचे संस्थापक मोहम्मद अली कुरेशी , अध्यक्ष अबू सुफियान कुरेशी , कार्याध्यक्ष रिझवान कुरेशी , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
साचापीर स्ट्रीट येथील पारशी अग्यारी चौकात हुसेन फ्रेंड्स सर्कल व इलियास शेख युवा मंचच्यावतीने मिरवणुकीतील बालचमूंना खाऊ वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन इलियास शेख , सादिक शेख , मजीद तांबोळी , इम्रान शेख , युनूस शेख आदींनी केले .
जान मोहम्मद स्ट्रीट येथे मिरवणुकीचे स्वागत गुलाबपुष्प व पाण्याचे बाटल्यांचे वाटप बजमे रेहबर कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अक्रम शेख यांनी केले . यावेळी फैयाज शेख , असिफ शेख , सादिक शेख , बल्लू शेख , जावेद मुल्ला , इरफान मुल्ला , जमीर शेख , अमजद शेख यांनी केले .
भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने क्वाटर गेट चौकात स्वागत कक्ष उभारून मिरवणुकीचे गुलाबपुष्प देउन स्वागत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी गुलाबपुष्प देउन केले . या कार्यक्रमाचे संयोजन जयप्रकाश पुरोहित , तुषार पाटील , किरण क्षीरसागर , गणेश यादव , नईम शेख , बबलू यादव , विजय चव्हाण , रफिक शेख , जाकीर कुरेशी , राज तांबोळी व किशोर घाडगे आदींनी केले .
शरबतवाला चौकात बजमे इरफान फ्रेंड्स सर्कलच्यावतीने शरबत वाटप करण्यात आले . यावेळी इरफान फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष असिफ शेख , सचिव इरफान शेख , उपाध्यक्ष इस्माईल शेख , मुजमिल शेख , आरकान शेख , युसूफ खान व इमाद शेख आदींनी केले होते .
महात्मा गांधी रोडवरील पंधरा ऑगस्ट चौक प्रतिष्ठानच्यावतीने मिरवणुकीमध्ये पाण्याच्या बाटल्यांचे वाटप निलेश कणसे यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन राजू कुरेशी , परवेज कुरेशी व बाबुलाल सय्यद आदींनी केले होते .
नॅशनल सोशल फाऊंडेशनच्यावतीने मिरवणुकीमधील नागरिकांना नॅशनल सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान खान यांच्याहस्ते अल्पोपहार वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन रफीफ सय्यद , एजाज सय्यद , फिरोज खान , हाजी फैज , युनूस खान यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ , वसंत कुंवर , नगरसेवक अतुल गायकवाड , नगरसेवक विनोद मथुरावाला , सरफराज गबरानी व निलेश कणसे आदी मान्यवर उपस्थित होते .
सहारा सेवा संस्थेच्यावतीने महात्मा फुले पेठ येथे वयोवृध्द नागरिकांना थंडी पासून बचाव करण्याकरिता ब्लॅंकेट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन सहारा सेवा संस्थेचे अध्यक्ष सलीम अहमद शेख , उपाध्यक्ष सादिक पानसरे , समीर सुतार , मोहसीन शेख , अझहर शेख , आकाश पवार , निखिल कांबळे , मुकेश चव्हाण ,सोहेल शेख , अलीम शेख , अरुणा पवार , रोहिणी कांबळे , शबाना शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चेतन मोरे , विक्रम मोरे , मार्तंड थोरात , भारत जाधव , रेणुका पाटील, अर्जुन रणदिवे , निरंजन अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते .