चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ !
चिंटू ‘ समवेत ढेपेवाडा येथे २४ नोव्हेंबर रोजी आयोजन
पुणे :पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘ढेपेवाडा ‘ तर्फे २४ नोव्हेंबरला (शनिवारी ) ‘चिंटू ‘ आणि वाडा संस्कृतीतील खेळ ! ‘ या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे .
‘चिंटू ‘ चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित हे या सहलीतील सहभागी मुलामुलींना ,पालकांना ‘चिंटू ” ची रेखाटने करून दाखवणार आहेत . ‘ढेपेवाडा ‘ चे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे या पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवणार आहेत ,वाडासंस्कृतीतील रहाणीमानाची ओळख करून देणार आहेत .
सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत या सहलीत
७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पालकांसह सहलीत अंतर्गत सहभागी होता येईल .
अधिक माहितीसाठी संपर्क 9822640599, 9763276232 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
‘ढेपेवाडा ‘ हा मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून वाड्याची सर्व वास्तू वैशिष्टये येथे पाहावयास मिळतात जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ‘ढेपेवाडा ‘ बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा आनंद देणारे पुण्यातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे ,अशी माहिती नितीन ढेपे यांनी पत्रकाद्वारे दिली