Home Blog Page 3039

एमसीई सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला इंडीवूड एक्सलन्स अॅवार्ड

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला  माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक  योगदानाबद्दल ‘ इंडीवूड एज्युकेशन एक्सलन्स अॅवार्ड ‘  हा सन्मान मिळाला आहे.
२ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात इब्राहिम अब्दुल्ला हुमेद अल होस्नी यांच्या हस्ते  ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ चे संचालक प्रा. ऋषी आचार्य यांनी हा सन्मान स्वीकारला.
माहिती -तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील संस्थांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

सिंगापूर टुरिझम बोर्डाची ओलाशी भागिदारी, प्रवाशांना मिळणार सिंगापूरला भेट देण्याची संधी

0

मुंबईसिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) आज जगातील सर्वात मोठी राइडहेलिंग कंपनी ओलाशी भागिदारी करत असल्याचे जाहीर केले. या भागिदारीचा एक भाग म्हणून ओलाद्वारे पश्चिम मध्य भारतातील १९ शहरांतील आपल्या व्यासपीठावर ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान एक अभियान राबवले जाणार असून त्याअंतर्गत ग्राहकांना सिंगापूरची एक सहल जिंकता येणार आहे. यासाठीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओला ग्राहकांना किमान तीन राइड्स घ्याव्या लागतील आणि ‘SINGAPORE’ हा पासकोड द्यावा लागेल. विजेत्यांच्या तीन जोड्या निवडून त्यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ईमेलने तसे कळवले जाईल. या अभियानाखेरीज एसटीबीच्यापॅशन मेड पॉसिबलब्रँडचा कंटेंट ओलाच्या सर्व व्यासपीठांवर दर्शवला जाईल.

 भारतीय प्रवाशांसाठी तंत्रज्ञान वरदान ठरत असतानाच एसटीबी भारतातील ओला व्यासपीठावरील डिजिटल ग्राहकांपर्यंत या भागिदारीद्वारे पोहोचणार आहे.

 जीबी श्रीथर, प्रादेशिक संचालकदक्षिण आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिका (एसएएमईए), एसटीबी म्हणाले, ‘ओला हा भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. ही भागिदारी नाविन्यपूर्ण विपणन योजनांचा एक भाग असून त्याद्वारे भारतीय ग्राहकांना आकर्षित करून, त्यांना सिंगापूरला जाण्याची संधी देऊन आमच्या वैविध्यपूर्ण योजनांची माहिती करून द्यायची आहे. उदा. भारतातील तरुणासाठी ही डिजिटल माध्यमे त्यांच्या सामाजिक परिवाराचा, मित्रमंडळींचा, नात्यांचा एक विस्तारित भाग आहे असे मानतात. त्यांना एकमेकांच्या जवळ असण्यापेक्षा किंवा इतर औपचारिक संवादांपेक्षा समान छंद आणि पॅशन जास्त पसंत असतात. ओलाबरोबर झालेल्या करारामुळे सिंगापूरला असा वेगळ्या प्रकारच्यापॅशन ट्राइबला विविध अनुभव देण्याची संधी मिळेल.’ पॅशन ट्राइबबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अनेक्स चा संदर्भ घ्या.

 शेखर दत्ता, ओलाचे व्यावसायिक प्रमुख म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना प्रवासाचा उत्तम अनुभव देण्यात आम्हाला अभिमान वाटतो. सिंगापूर टुरिझम बोर्डाबरोबर भागिदारी करून त्याद्वारे ग्राहकांना सिंगापूरची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि विविध अनुभवांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.’

 २०१७ मध्ये सिंगापूला भारतातून .२७ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली पर्यटकांच्या संख्येत वार्षिक पातळीवर झालेल्या १६ टक्के वाढीने भारत देश सिंगापूरसाठी सर्वाधिक पर्यटक आणणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ दरम्यान . दशलक्ष भारतीयांनी सिंगापूरला भेट दिली असून या संख्येत वार्षिक पातळीवर १४. टक्के वाढ झाली आहे.

 सिंगापूर टुरिझम बोर्डाबद्दल

सिंगापूर टुरिझम बोर्ड (एसटीबी) ही पर्यटन क्षेत्रातील आघाडीची विकास संस्था सिंगापूरमधील महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील भागिदार आणि समाजाबरोबर एकत्र येत आम्ही सिंगापूर पर्यटनाचे दमदार स्वरुप तयार केले आहे. आम्ही पॅशन मेड पॉसिबल ब्रँड जिवंत करून त्याद्वारे सिंगापूरचे वेगळे रूप सर्वांपुढे आणत लोकांना त्यांची पॅशन इतरांबरोबर शेअर करण्यासाठी आणखी दृढ करण्यासाठी प्रेरणा देत आहोत.

ओलाबद्दल

भाविश अगरवाल आणि अंकित भाती यांनी स्थापन केलेली ओला जगातील सर्वात मोठ्या राइड- हेलिंग कंपन्यांपैकी एक आहे. ग्राहक आणि चालकांसाठी ओला शहरी वाहतुकीचे मोबाइल तंत्रज्ञान व्यसापीठावर एकत्रीकरण करते व त्याद्वारे सोयीस्कर, पारदर्शक, सुरक्षित आणि जलद सेवा मिळेल याची खात्री करते. जागतिक पातळीवर प्रचलित असलेल्या सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना यांचे एकत्रीकरण करण्यावर ओलाने लक्ष केंद्रित केले आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे २०१६ मध्ये ओला प्ले हा राइड शेअरिंगचा जगातील पहिला कनेक्टेड कार प्लॅट प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव लक्षणीयरीत्या बदलला, शिवाय या क्षेत्रात जागतिक नाविन्यास वाव मिळाला. ओला मोबाइल अपच्या मदतीने १२५ पेक्षा जास्त शहरांतील ग्राहक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या व त्यांच्या लाखो चालकांशी जोडले जाऊशकतात. स्थानिक पातळीवर भर देणारे ओला अब्जावधी लोकांसाठी प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहे.

तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी संघाला विजेतेपद

0
पुणे: पूना क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी संघाने झाल्टन ऑफ स्विंग संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
 
पूना क्लब फुटबॉल  मौदानावर पार पडलेल्या या  स्पर्धेत गेट मेस्सीने ब्रेंडोन डिसुझा व इशान मोतीवाले यांच्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर झाल्टन ऑफ स्विंग संघाचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचा फुटबॉलपटू रॉबीन सिंग,मेश को वर्कचे  शार्दुल सिंग आणि कृष्णा सिंग, सुलभा पृथ्वी सिंग बायस
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, उपाध्यक्ष नितिन देसाई, क्रीडा विभागाचे सचिव मनिष मेहता, क्रीडा समितीचे प्रमुख शशांक हळबे, सुनिल हंडा  व स्पर्धा संचालक तारीक परवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
गेट मेस्सी – 2(ब्रेंडोन डिसुझा 7मी, इशान मोतीवाले 12मी) वि.वि झाल्टन ऑफ स्विंग – 1(गुनिश बेदी 9मी)
 
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक- विशाल सेठ
गोल्डन बुट- ब्रेंडोन डिसुझा 
सर्वोत्कृष्ट खेळाडू- अखलाक पुनावाला
सर्वोत्कृष्ट डिफेंडर- गुनिश बेदी
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक- रजित परदेशी

दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा

0

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व प्रहार अपंग क्रांती आंदोलन वाघोली नं.१ ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, ता.हवेली.जि.पुणे येथे सकाळी १० वाजता फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन असून, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक अ.उ.पवार यांनी केले आहे.

 पुणे जिल्हयातील पुणे शहर, रांजगणगाव, सणसवाडी, चाकण या औद्योगिक परिसरातील एकूण -१८ उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण-७९६ रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे फक्त अस्थिव्यंग, मुक व कर्णबधीर उमेदवारांकरीता नोंदविण्यात आलेली आहेत.

जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बेराजगार उमेदवारांना चांगले रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. किमान १० वी, १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई इ. शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या आणि फक्त वरील प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांनी रविवार, दि. ९ डिसेंबर रोजीच्या मेळाव्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, आपला अपंगत्वाचे प्रमाण व प्रकार दर्शविणारा अपंगत्वाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही सहायक संचालक श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

पर्यटकांसाठी काश्मीर अतिशय सुरक्षित – शफाकत अहमद

0

पुणे : “पर्यटकांसाठी काश्मीर अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांचे अतिथ्य आम्हाला करायचे आहे. काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्वतोपरी सुरक्षा देण्यासाठी आमचा पर्यटन विभाग तयार आहे. त्यामुळे पुणेकरांनी बिनधास्तपणे काश्मीरला यावे,” असे आवाहन जम्मू-काश्मीर पर्यटन विभागातील सहायक अधिकारी शफाकत अहमद यांनी केले.

पुण्यात नुकतेच पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रदर्शन भरले होते. त्यानिमित्ताने शफाकत अहमद यांच्यासह जम्मू-काश्मीर येथील पर्यटन व्यावसायिकांनी पुण्यातील व्यावसायिकशी संवाद साधला. यावेळी मकसूद बदियारी, शाबीर भट, अबिद मत्तु, नासिर हुसेन या काश्मिरी व्यवसायिकांसह पुण्यातील ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे डॉ. विश्वास केळकर यांच्यासह इतर व्यावसायिक व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी काश्मीर आणि पुण्यातील व्यावसायिकांनी काश्मीर खोऱ्यातील पर्यटनासंबंधित अनेक बाबींवर चर्चा केली. तेथे पर्यटकांना येणाऱ्या अडचणी, चांगली ठिकाणे, राहण्याखाण्याची व प्रवासाची व्यवस्था यावरही चर्चा झाली. जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती शफाकत अहमद यांनी उपस्थितांना दिली.

शफाकत अहमद म्हणाले, “पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरु आहेत. काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. येथे येणारा प्रत्येक पर्यटक आमच्यासाठी देव आहे. पर्यटकांनी सुरक्षेबाबतची भीती मनातून काढून टाकावी. पुण्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच अधिक राहिलेली आहे. त्यामुळे पुणेकर पर्यटकांचे काश्मीरमध्ये स्वागत आणि आदरातिथ्य करण्यासाठी काश्मिरी जनता उत्सुक आहे.”

पॅरिस मध्ये चित्रित झाला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’

0

जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात रोमँटिकशहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे. परंतु पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण फ्रान्स या देशामध्ये झाले आहे. आगामी मराठी चित्रपट आरॉनयाचे बहुतांश चित्रीकरण फ्रान्समध्ये झाले असून त्या देशात घडणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शकाने बालक पालकांच्या मनोविश्वावर आधारित या कथानकाला हळुवारपणे हाताळत चित्रपटाच्या रंजकतेत भर टाकलीय. 


आरॉनचित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. होणार सून ….फेम शशांक केतकर, ‘पोश्टर बॉईझ/गर्लफेम नेहा जोशी उंबटुफेम अथर्व पाध्ये यांच्या आरॉनमध्ये प्रमुख भूमिका आहेत. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वस्तिका मुखर्जी आरॉनद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.
या चित्रपटाची पटकथा संवाद स्वामी बाळ ओमकार शेट्टी यांच्या लेखणीतून अवतरले आहेत. छायाचित्रीकरणाची बाजू सांभाळलीय सुमन साहू मार्तोन विझकेलेटी यांनी. संकलक आहेत आशिष म्हात्रे अपूर्वा मोतीवाले सहाय. सचिन लोवलेकर संतोष गायके यांनी अनुक्रमे वेशभूषा मेकअप ची जबाबदारी पार पाडलीय तसेच कलादिग्दर्शन केलंय जगन्नाथ हटनकर यांनी. आरॉनला संगीत दिलंय चिन्मय लेले यांनी तर पार्श्वसंगीत दिलंय साईपियुष यांनी. या चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर आहेत अमोल घरत असोसिएट प्रोड्युसर आहेत अऱ्हिमा शर्मा. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत एली लसझिओ बर्गर आणि लाईन प्रोड्युसर आहेत आनंद नामदेव गायकवाड राहुल दीनानाथ तुळसकर. जीएनपी फिल्म्स ची प्रस्तुती असलेला आरॉनयेत्या डिसेंबर ला संपूर्ण भारतात (पॅनइंडिया’) प्रदर्शित होणार आहे.

जुळ्या बालमुनींच्या शतावधानाने श्रोते अचंबित

0

पुणे : जैन धर्माच्या सागर समुदायातील अवघ्या दहा वर्षांच्या नमिचंद्रसागर व नेमिचंद्रसागर या जुळ्या बालमुनींनी केलेल्या शतावधान प्रयोगाने श्रोते अचंबित झाले. हे दोघे भाऊ आचार्य नयनचंद्रसागर यांचे शिष्य युवाशतावधानी अभिनंदनचंद्रसागर यांचे शिष्य आहेत. श्री नाकोडा पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने बंगळूर येथे नुकतेच या बालशतावधान प्रयोगाचे आयोजन केले होते.

संस्कृत, प्राकृत, कन्नड, उर्दू, मारवाडी, हिंदी, गुजराती, पंजाबी, मराठी व इंग्रजी या 10 भाषांमध्ये दोघांनीही प्रवचन करीत सुवर्णाक्षरांत इतिहास लिहिला. राज्यपाल वजूभाई वाला, शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा, ऑल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांच्यासह हिंदू, मुस्लीम, शीख धर्मातील धर्मगुरुंसह हजारोंच्या संख्येने श्रोते उपस्थित होते. सर्वच उपस्थितांना या दोन्ही भावांनी आश्चर्यचकित केले.

बालशतावधानी व बहुविधभाषाभाषी या सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेल्या पदवीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दोघांना प्रदान करण्यात आले. भूपेंद्रसिंग चुडासमा यांच्या प्रश्नाने बालशतावधाची सुरुवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ 100 प्रश्नांची विचारणा झाली. सरळ आणि उलट्या क्रमाने प्रश्न विचारले गेले. त्यांच्या अफलातून उत्तरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. गणित, अंकगणित आणि इतर अनेक प्रश्नांच्या अचूक उत्तरांनी श्रोते भारावून गेले.

पोलिसांच्या मुलामुलींसाठीचा रोजगार मेळावा संपन्न

0

पुणे : महाराष्ट्र राज्य निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे भरविण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल १५००० मुलांनी सहभाग नोंदवला असून ७५३३ मुलांना नोकरी देण्यात आली. दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात पोलिसांच्या मुला मुलींसाठी विविध कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती याचा फायदा अनेक मुलामुलींना झाला. या मेळाव्याचे आयोजन निवृत्त पोलीस अधीकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळक यांनी केले होते.

ज्या मुलांना नोकरी मिळाली नाही त्यासाठी जॉब कार्डचे वाटप यावेळी करण्यात आले. जॉब कार्डचा वापर मुलांना वर्षभर नोकरी संदर्भात कंपन्यामध्ये मुलाखतीसाठी करता येईल अशी माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. महाराष्ट्रात प्रथमच सर्व पोलिसांच्या मुलामुलींनीसाठी हा मेळावा असल्याने सर्व स्तरांमध्ये महोत्सवाचे कौतुक होत आहे या महोत्सवाच्या माध्यमातून पोलीसांची मुले, कुटुंब तसेच अधिकारी, कर्मचारी एकत्र आल्याने हा योग आला. तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तथा विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस मुख्यालय येथील मैदान आणि हॉल उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. या मेळाव्यामुळे निवृत्त कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची पाळेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरली असून  अनेक लाईन बॉय संघ, संघटना, महिला संघटना, आर्मी व इतर लहान लहान संघटना यासुद्धा  या संघटनेशी संलग्न होणार आहेत. असेही आंधळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी धनंजय जाधव, खंडेराव शिंदे, रामराव पवार, रामराव वाघ, न्यायनिरगुणे, सदानंद साब्दे, मदन चव्हाण, महागंडे, कचरे, धैर्यशील पवार, पाटील तसेच संघटनेचे संपत जाधव, नानासाहेब उन्हेरे, क्षितिज शिंदे, दिलीप मोरे, राजा सोनूले, सुरेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सुप्रिया सुळे उत्कृष्ट सेल्फीपट्टू- मंत्री शिवतारेंनी आता ललकारले बारामती कन्येला …

0

पुणे- पुण्याच्या पालकमंत्र्यांना मस्ती आलीय ,त्यांची चरबी उतरवेन असे कधी  म्हणणाऱ्या शिवसेनेचे  मंत्री शिवतारे यांनी नंतर बापटांशी कसे सूत जुळवून घेतले ते त्यांनाच ठाऊक….पण आता त्यांनी बारामतीच्या सुकन्या सुप्रिया सुळे-पवारांना ललकारले आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी उत्कृष्ट सेल्फीपटू बनल्या  आहेत. अशा शब्दांत शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांना डिवचले आहे. पुरंदरमधून शिवसेनेचे आमदार असलेल्या शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांना नुकतंच एक खुलं पत्र लिहून खुले आव्हान दिले आहे. आता सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहायचे आहे….पहा आणि वाचा हे शिवतारे यांनी लिहिलेले पत्र …

मा. खासदार सुप्रियाताई सुळे,

सप्रेम जय महाराष्ट्र…

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार करण्याबाबत मध्यंतरी आपली बातमी वाचली आणि एक दोन ठिकाणी काढलेले सेल्फीही पाहिले. कात्रज घाटात काम सुरु होण्याच्या बरोबर काही काळ आधी पहिला सेल्फी कात्रज घाटात काढलात. त्यानंतर दुसरा सेल्फी काढलात तो फुरसुंगीला. या राष्ट्रीय महामार्गासाठी खासदार म्हणून आपण गडकरींकडे पाठपुरावा करायचे सोडून सेल्फीच काढत बसलात. नंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नामदार गडकरी साहेबांकडून आम्ही हा रस्ता मार्गी लावला.

आपल्या दुर्दैवाने आपलं एक तंत्र माझ्या लक्षात आलं आहे. मी मंजूर केलेल्या कामांची यादी अधिकाऱ्यांकडून घ्यायची आणि ही कामे चालू होण्याच्या टप्प्यात आली की आपण सेल्फी काढत सुटता. उरुळी कांचन वाघापूर जेजुरी रस्त्यावर आपण काढलेला सेल्फीही मी पाहिला. तांत्रिक कारणामुळे या कामाच्या दोनदा निविदा झाल्या. आता ते श्री. डी.टी.पाटील नावाच्या उद्योजकाला मिळाले आहे. बँक आणि सरकारमधील वाटाघाटी पूर्ण होऊन हे काम आता लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसताच तिथेही आपण सेल्फिसाठी आपल्या कार्यकर्त्यांसह अवतरलात.

यापुढे सेल्फीसाठी आपण जास्त त्रास घेण्याची आवश्यकता नाही. मीच आपल्याला माहिती देतो. सासवड नारायणपूर कापूरहोळ या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. तिथे सेल्फीसाठी आपण जाऊ शकता. फुरसुंगी उरुळी देवाची या ९३ कोटींच्या पाणीयोजनेचे काम सदया वेगाने सुरू आहे. कुठल्याही स्थितीत जून २०१९ मध्ये योजना चालु करण्याचे आदेश मी प्राधिकरणाला दिले आहेत. स्वतःचे काहीच काम नसल्यामुळे तिथेही एखादा फेरफटका मारून आपण सेल्फी काढू शकता. मंतरवाडी खडीमशीन चौक रस्त्याचे जवळपास ७१ कोटीचे कॉक्रीटमध्ये काम सुरु आहे. खरं तर या रस्त्याची दुर्दशा आपल्याच काळात झाली.

पुण्यात वाहतूक कोंडी नको म्हणून सोलापूर रोड, मुंबई तसेच बंगळूर रस्ता या तीन-तीन राष्ट्रीय महामार्गांची रहदारी आपण मंतरवाडी कोंढवा रस्त्याने वळवलीत. त्याचा अमाप त्रास येथील लोकांनी भोगला. आता निदान सेल्फी काढण्यासाठी तरी आपण तिथे जायला हवे. दिवे गायरानात पुढील काळात राष्ट्रीय बाजार संकुल होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २४ रस्ते मंजूर आहेत. त्यातील अनेकांची कामे चालू आहेत तर काही सुरु होणार आहेत. तिथेही आपण सेल्फीसाठी जायला हरकत नाही. क्रीडासंकुल आणि धान्य गोदामाचे काम दिवे येथे चालू आहे. जलसंधारणाची तर अफाट कामे आहेत. आपल्याला सेल्फीचीच हौस असेल तर कुठल्याही बंधाऱ्यांच्या बाजूला उभे राहून ती भागवता येईल.

उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटू आपण नक्की होऊ शकाल. सेल्फी, आरोग्य शिबिरं किंवा जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. कोपऱ्यावरच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष अशी कामे नित्यनेमाने करत असतात. पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही आपण हे काम करू शकता. त्यासाठी उगाचच खासदारकीची जागा अडवून ठेवणे योग्य नाही. केंद्राकडून इतक्या वर्षात एकही प्रकल्प आपण आणू शकला नाही. केंद्रीय रस्ते विकास निधीतून एक छदामही तुमच्या मतदारसंघात तुम्हाला आणता आला नाही यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते? विमानतळ हा तसा केंद्राचा विषय पण त्याबाबत अजून तुमच्या घरातच एकवाक्यता नाही.

माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ या नावाने आपण एखादी मोहीम राबवा आणि आपली कामे जनतेला एकदा दाखवाच. जनतेलाही या मोहिमेचे खूप कुतूहल लागून राहिले आहे. तुम्हाला पुरंदरचा आमदार राष्ट्रवादीचा हवा असल्याचेही मी वाचले. पण हे निर्णय जनता घेत असते. तुमच्या इच्छेला त्यामुळे काडीचाही अर्थ उरत नाही. पवार साहेबांची कन्या या एकाच पात्रतेवर आपल्याला आजवर दिलेली संधी आपण काम करायचं सोडून सेल्फी काढत वाया घालवली. त्यामुळे आता बारामतीचा खासदार तुमचा नको ही जनतेची इच्छा आहे.

प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय व अन्य कामांसाठी आपण घंटानाद केलात. सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह २२ कोटींची राज्यातील ही एकमेव एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे. मी अधिवेशनात या कामाला निधी मिळवल्याचे समजताच आता काम पूर्ण होणार हे लक्षात आल्यावर आपल्याला घंटानाद आठवला आहे. प्रशासकीय प्रक्रियेत आमच्याकडे एखाद दुसरं काम रेंगाळतं कारण आम्ही काम करतो. पण शरद पवार साहेबांच्या कन्येकडे निदान स्वतःचं असं रेंगाळलेलं कामही दाखवायला नसावं ही बाब तुमच्यासाठी नसली तरी जनतेसाठी आश्चर्यकारक आहे. दर निवडणुकीला सासवड, जेजुरीला आपण भेट देऊन लोकल रेल्वे आणायचे आश्वासन देता. मागील १२ वर्ष झाली. आपली लोकल रेल्वे अजून कागदावर सुद्धा नाही. त्यासाठी घंटानाद करायचे आपण विसरलात.

असो. एकदा आपली कामे जनतेच्या अवलोकनार्थ जाहीर कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.

आपला हितचिंतक
विजय शिवतारे, राज्यमंत्री…

शरद पवारांनी का घेतली नारायण राणेंची भेट ?

0

सिंधुदुर्ग -मिडीयाला सांगण्यासारखे काही नाही,असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व खासदार नारायण राणे यांची कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन दिग्गज नेत्यांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सांगितले की, मिडियाला सांगण्यासारखं माझ्याकडे आणि राणे यांच्याकडेही काही नाही. दरम्यान, पवार – राणे यांची ही एक कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी ,पवारांचे राजकारण जाणून असणाऱ्या राजकीय समीक्षकांच्या भुवया  मात्र या भेटीमुळे उंचावल्या आहेत . राणे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात ,कॉंग्रेस शी त्यांनी फारकत घेतलेली आहे . अशा स्थितीत या भेटीने कुतुहूल निर्माण झाले नाही तर नवलच .


शरद पवार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौ-यावर आहेत. आंबोली, वेंगुर्लेचा दौरा करून पवार रविवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. यानंतर त्यांनी देवबाग येथे मुक्काम ठोकला. आज सकाळी मालवण देवली येथील कार्यक्रम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास पवार हे आपले दोन नातू रोहित पवार व पार्थ पवार यांच्यासह नारायण राणे यांच्या कणकवलीमधील निवासस्थानी दाखल झाले. खासदार नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. यानंतर राणे कुटुंबिय आणि पवार यांच्यात चर्चा झाली..

जागतिक एड्स दिन- फ्रीडम परेडसाठी स्मिता ठाकरे, सनी लियोन एकत्र

0

मुंबई-एचआयव्हीबद्दल जागरुकता पसरविण्याच्या बाबतीत, स्मिता ठाकरे यांची ‘मुक्ती ही नफारहित संस्था नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. ह्या संस्थेला गेल्या दोन दशकांपासून सातत्याने एचआयव्ही आणि एड्सच्या प्रति जागरूकता टिकवून ठेवण्यासाठी, नवीन सर्जनशील मार्ग शोधण्यासाठी तसेच सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनांनी जागतिक पातळीवर सन्मानित केले गेले आहे.

१ डिसेंबर, जागतिक एड्स दिनाप्रीत्यर्थ स्मिता ठाकरे, सनी लियोन आणि निशा हराळे आणि रोहित वर्मा  एलजीबीटीक्यू + समुदायांमध्ये एचआयव्ही जागरूकता पसरविण्यासाठी कार्टर रोड येथील मुक्ती फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फ्रीडम परेडच्या निमित्ताने एकत्र आले.

स्मिता ठाकरे म्हणतात की , “आता वेळ आली आहे की आपण सर्व समुदायांसह एकत्र येऊन एड्सबद्दल जागरुकता पसरवावी, जीवनाचा पूर्ण आनंद घ्यावा, पण सर्व सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे फक्त एकचं आयुष्य आहे.”

सनी लियॉन म्हणते की, “माझा असा विश्वास आहे की, हा पर्याय काही नाही. माझा विश्वास आहे की, तुम्ही एका विशिष्ट प्रकारे जन्माला आला आहात. आपल्याला हवे त्या मार्गाने व्यक्त करण्यासाठी आपण एका विशिष्ट अधिकाराने जन्माला आला आहात. प्रेमाला तुम्ही मुलगा आहात की मुलगी हे लिंग माहीत नसतं. एचआयव्ही हा एक प्रकारचा कलंक आहे. आणि तो आपल्याला होऊ शकण्याचे अनेक मार्ग आहेत. जर तो कसा पसरतो हे आपल्याला माहित नसेल तर फक्त स्वत: ला शिक्षित करा. जर का एखाद्याला स्त्री सारखी वस्त्र परिधान करायची असतील किंवा एखाद्याला पुरुषांसारखे वावरायचे असेल तर त्याने ते जरूर करावे माझे बरेच मित्र-मैत्रिणी गे आणि लेस्बिअन आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे.

एचआयव्ही आणि एड्सच्या रुग्णांच्या बाबतीत, भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे २१ लाख एचआयव्ही ग्रस्त रुग्ण भारतात वावरतात. अशा परिस्थितीत, देशभरात जागरुकता पसरविण्याची प्रचंड गरज आहे. भारतात, एचआयव्ही पसरण्याचा सर्वात मोठा आणि सामान्य कारण म्हणजे शारीरिक दूषितता २०१७-२०१८ या एका वर्षात ८६.१ टक्के लोक या रोगाचे बळी ठरले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत २०१७-२०१८ मध्ये 116 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले, जे एचआयव्हीचा प्रभाव कसा वाढत आहे हे दर्शविते. ही फक्त अधिकृत आकडेवारी आहे, वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतातून एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही दिसून येते.

आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पुणे विनर्स, रायझींग स्टार कोल्हापुर संघांची आगेकुच

0
पुणे:  आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत  रायझींग स्टार कोल्हापुर संघाने  नाशिक एव्हरशाइन  संघाचा तर पुणे विनर्स संघाने  इस्टर्न नाईटस् पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

मुळशी क्रिकेट मैदान व डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत   महेश घोरपडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे विनर्स संघाने इस्टर्न नाईटस् संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुधीर के व महेश घोरपडे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे इस्टर्न नाईटस् संघ 15 षटकात 7 बाद 88 धावांत गारद झाला. 88 धावांचे लक्ष महोश घोरपडेच्या 32 व ज्ञानेश्वर झेंडेच्या 30 धावांसह पुणे विनर्स संघाने 3 षटक बाकी राखत 5 बाद 91 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. 32 धावा व 2 गडी बाद करणारा महेश घोरपडे सामनावीर ठरला.
 
दुस-या लढतीत शैलेश भोसलेच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने नाशिक एव्हरशाइन संघाचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सचिन गाडगीळच्या आक्रमक गोलंदाजीने नाशिक एव्हरशाइन संघाचा डाव 15 षटकात 6 बाद 135 धावांत रोखला. 135 धावांचे लक्ष प्रितेश करणावतच्या 32, शैलेश भोसलेच्या 30 तर सत्यजीत पाटीलच्या 31 धावांसह रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 14 षटकात 3 बाद 136 धावांसह पुर्ण केले. शैलेश भोसले सामनावीर ठरला.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी  
इस्टर्न नाईटस्- 15 षटकात 7 बाद 88 धावा(अनिरूध्द बार्गी 30, रिषी अगरवाल 22, सुधीर के 3-8, महेश घोरपडे 2-10) पराभूत वि पुणे विनर्स- 12 षटकात 5 बाद 91 धावा(महोश घोरपडे 32, ज्ञानेश्वर झेंडे 30, देवदत्त देशपांडे 12, अंशुमन अग्रीनल्ला 1-4, अभिषेक अगरवाल 1-28, अनिरुध्द बार्गी 1-20) सामनावीर- महेश घोरपडे
पुणे विनर्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला
 
नाशिक एव्हरशाइन- 15 षटकात 6 बाद 135 धावा(संतोष दिंडे 33, तुषार चव्हाण 30, निलेश ठाकुर 25, ब्रिजमोहन लोंगानी 28, सचिन गाडगीळ 3-25, संजय सालोखे 1-35, रवीराज सायदेव 1-26) पराभूत वि  रायझींग स्टार कोल्हापुर- 14 षटकात 3 बाद 136 धावा(प्रितेश करणावत 32, शैलेश भोसले 30, सत्यजीत पाटील 31, संजय सालोखे 18, दिनेश ठाकुर 1-24, संतोष दिंडे 1-25) सामनावीर- शैलेश भोसले
 रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.  

जनता वसाहतीतील श्रमिक महिलांचा शिवसेनेने केला गौरव

0
पुणे- जनता वसाहत येथे साई जनसेवा प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने  गरजू कष्टकरी महिलांना  साडया  देवून  सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास महाड पोलादपुरचे आमदार भरतशेठ गोगावले ,जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे नगरसेवक दिपक गावडे , मुन्ना सपकाळ,विभाग प्रमुख सुरज लोखंडे , महिला आघाडी सगिता भुजबळ ,अरुणा पवार , लक्ष्मी दिवटे शाखा प्रमुख अजय कुडले  , अमर जंगम उपस्थीत होते ह्या कार्यकार्यक्रमात महाड तालुका -पुणे विभागातिल सर्व पदाधिकारी रहीवासी नागरिक मोठया प्रमाणातउपस्थित  होते.

बाकु अझरबैजन या देशात झालेल्या एफआयजी ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप एजीएफ ट्रॉफी मध्ये पुण्याच्या ऋषिकेश मोरेने पटकावले कास्य पदक

0

पुणे- बाकु अझरबैजन या देशात  झालेल्या एफआयजी ऐरोबटिकस जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप एजीएफ ट्रॉफी मध्ये भारताकडून २३ प्रतिनिधी या वर्ल्ड कपसाठी गेले होते. त्यापैकी चार प्रतिनिधींनी भारतासाठी कास्य पदकाची कमाई केली असून यामध्ये पुण्याच्या शिवदर्शन पर्वती भागात राहणाऱ्या ऋषिकेश मोरेने कास्य पदक पटकावले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले असताना,घरची परिस्थिती बेताची असताना  त्याची आई अनिता संजय मोरे हिने धुण्याभांड्याची कामे करून ऋषिकेशची  बहीण कोमल हिला इंजिनीरींगला शिक्षणासाठी टाकले. लहानपणापासूनच ऋषिकेश चा खेळाकडे कल असल्याने त्याला जिम्नॅस्टिक्स खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. अश्या बेताच्या परिस्थितीवर मत करत त्याने भारतासाठी ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्समध्ये कास्य पदक पटकावले . सध्या तो इंडियन आर्मी मधील एमइजी बेंगलोर येथे कार्यरत असून भारतासाठी या पुढेही खेळून सुवर्ण पदक जिंकण्याची  इच्छा व्यक्त केली . या अतुल्य कर्तृत्वान खेळाडूचा सत्कार पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी केला . त्यावेळी सागर आरोळे, अभिजित गायकवाड,शुभांगी चव्हाण,शैलेश दातार, इर्शाद शेख,अभिजित गवळी, सायली महाराव आदी  उपस्थित होते.   

पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोगाचा फरक द्या, माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी

0

पुणे –
राज्यसरकारने कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, सध्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम देण्याची गरज आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा न करता त्यांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार रोख स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणे आवश्यक आहे. सध्याच्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.त्यामुळे तातडीने कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी पहिली महापालिका यातही आपण अग्रेसर राहिले पाहिजे असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.