मुंबई-एचआयव्हीबद्दल जागरुकता पसरविण्याच्या बाबतीत, स्मिता ठाकरे यांची ‘मुक्ती ही नफारहित संस्था नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. ह्या संस्थेला गेल्या दोन दशकांपासून सातत्याने एचआयव्ही आणि एड्सच्या प्रति जागरूकता टिकवून ठेवण्यासाठी, नवीन सर्जनशील मार्ग शोधण्यासाठी तसेच सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनांनी जागतिक पातळीवर सन्मानित केले गेले आहे.
१ डिसेंबर, जागतिक एड्स दिनाप्रीत्यर्थ स्मिता ठाकरे, सनी लियोन आणि निशा हराळे आणि रोहित वर्मा एलजीबीटीक्यू + समुदायांमध्ये एचआयव्ही जागरूकता पसरविण्यासाठी कार्टर रोड येथील मुक्ती फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फ्रीडम परेडच्या निमित्ताने एकत्र आले.
स्मिता ठाकरे म्हणतात की , “आता वेळ आली आहे की आपण सर्व समुदायांसह एकत्र येऊन एड्सबद्दल जागरुकता पसरवावी, जीवनाचा पूर्ण आनंद घ्यावा, पण सर्व सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे फक्त एकचं आयुष्य आहे.”
सनी लियॉन म्हणते की, “माझा असा विश्वास आहे की, हा पर्याय काही नाही. माझा विश्वास आहे की, तुम्ही एका विशिष्ट प्रकारे जन्माला आला आहात. आपल्याला हवे त्या मार्गाने व्यक्त करण्यासाठी आपण एका विशिष्ट अधिकाराने जन्माला आला आहात. प्रेमाला तुम्ही मुलगा आहात की मुलगी हे लिंग माहीत नसतं. एचआयव्ही हा एक प्रकारचा कलंक आहे. आणि तो आपल्याला होऊ शकण्याचे अनेक मार्ग आहेत. जर तो कसा पसरतो हे आपल्याला माहित नसेल तर फक्त स्वत: ला शिक्षित करा. जर का एखाद्याला स्त्री सारखी वस्त्र परिधान करायची असतील किंवा एखाद्याला पुरुषांसारखे वावरायचे असेल तर त्याने ते जरूर करावे माझे बरेच मित्र-मैत्रिणी गे आणि लेस्बिअन आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे.
एचआयव्ही आणि एड्सच्या रुग्णांच्या बाबतीत, भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे २१ लाख एचआयव्ही ग्रस्त रुग्ण भारतात वावरतात. अशा परिस्थितीत, देशभरात जागरुकता पसरविण्याची प्रचंड गरज आहे. भारतात, एचआयव्ही पसरण्याचा सर्वात मोठा आणि सामान्य कारण म्हणजे शारीरिक दूषितता २०१७-२०१८ या एका वर्षात ८६.१ टक्के लोक या रोगाचे बळी ठरले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत २०१७-२०१८ मध्ये 116 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले, जे एचआयव्हीचा प्रभाव कसा वाढत आहे हे दर्शविते. ही फक्त अधिकृत आकडेवारी आहे, वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतातून एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही दिसून येते.