पॅरिस मध्ये चित्रित झाला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’

Date:

जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात ‘रोमँटिक’ शहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे. परंतु पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण फ्रान्स या देशामध्ये झाले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन‘ याचे बहुतांश चित्रीकरण फ्रान्समध्ये झाले असून त्या देशात घडणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शकाने बालक व पालकांच्या मनोविश्वावर आधारित या कथानकाला हळुवारपणे हाताळत चित्रपटाच्या रंजकतेत भर टाकलीय. 


‘
आरॉन‘ चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. ‘होणार सून ….’ फेम शशांक केतकर, ‘पोश्टर बॉईझ/गर्ल’ फेम नेहा जोशी व ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये यांच्या ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वस्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.
या चित्रपटाची पटकथा व संवाद स्वामी बाळ व ओमकार शेट्टी यांच्या लेखणीतून अवतरले आहेत. छायाचित्रीकरणाची बाजू सांभाळलीय सुमन साहू व मार्तोन विझकेलेटी यांनी. संकलक आहेत आशिष म्हात्रे व अपूर्वा मोतीवाले सहाय. सचिन लोवलेकर व संतोष गायके यांनी अनुक्रमे वेशभूषा व मेकअप ची जबाबदारी पार पाडलीय तसेच कलादिग्दर्शन केलंय जगन्नाथ हटनकर यांनी. ‘आरॉन’ ला संगीत दिलंय चिन्मय लेले यांनी तर पार्श्वसंगीत दिलंय साई–पियुष यांनी. या चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर आहेत अमोल घरत व असोसिएट प्रोड्युसर आहेत अऱ्हिमा शर्मा. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत एली लसझिओ बर्गर आणि लाईन प्रोड्युसर आहेत आनंद नामदेव गायकवाड व राहुल दीनानाथ तुळसकर. जीएनपी फिल्म्स ची प्रस्तुती असलेला ‘आरॉन‘ येत्या ७ डिसेंबर ला संपूर्ण भारतात (‘पॅन–इंडिया’) प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एसटी प्रवाशांना गुंगीच्या गोळ्या देऊन सोन्याचे दागिने लुटणारा सराईत चोरटा गजाआड;

स्वारगेट पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई६३ वर्षीय आरोपीला अटक;...

मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी!

१ नोव्हेंबरपासून नवीन वाहतूक नियम लागू; कारसाठी ताशी १००,...

राज्यातील ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना

विद्युत सुरक्षेचे धडे अन् हरित ऊर्जेचा जागर मुंबई, दि. २६...

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा: धनंजय शिंदे

मतदाराची पात्रता तपासा; दुबार ठराव, सभासदत्वातील विसंगती आणि पूर्वीच्या...