पुणे : महाराष्ट्र राज्य निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे भरविण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल १५००० मुलांनी सहभाग नोंदवला असून ७५३३ मुलांना नोकरी देण्यात आली. दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात पोलिसांच्या मुला मुलींसाठी विविध कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती याचा फायदा अनेक मुलामुलींना झाला. या मेळाव्याचे आयोजन निवृत्त पोलीस अधीकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळक यांनी केले होते.
ज्या मुलांना नोकरी मिळाली नाही त्यासाठी जॉब कार्डचे वाटप यावेळी करण्यात आले. जॉब कार्डचा वापर मुलांना वर्षभर नोकरी संदर्भात कंपन्यामध्ये मुलाखतीसाठी करता येईल अशी माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. महाराष्ट्रात प्रथमच सर्व पोलिसांच्या मुलामुलींनीसाठी हा मेळावा असल्याने सर्व स्तरांमध्ये महोत्सवाचे कौतुक होत आहे या महोत्सवाच्या माध्यमातून पोलीसांची मुले, कुटुंब तसेच अधिकारी, कर्मचारी एकत्र आल्याने हा योग आला. तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तथा विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस मुख्यालय येथील मैदान आणि हॉल उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. या मेळाव्यामुळे निवृत्त कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची पाळेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरली असून अनेक लाईन बॉय संघ, संघटना, महिला संघटना, आर्मी व इतर लहान लहान संघटना यासुद्धा या संघटनेशी संलग्न होणार आहेत. असेही आंधळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी धनंजय जाधव, खंडेराव शिंदे, रामराव पवार, रामराव वाघ, न्यायनिरगुणे, सदानंद साब्दे, मदन चव्हाण, महागंडे, कचरे, धैर्यशील पवार, पाटील तसेच संघटनेचे संपत जाधव, नानासाहेब उन्हेरे, क्षितिज शिंदे, दिलीप मोरे, राजा सोनूले, सुरेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.