Home Blog Page 2989

मनवाच्या मालिकेतल्या वाढदिवसाची तयारी केली रिअल लाईफ सिद्धार्थ ने !!

0

मराठी मालिका आणि त्यात होणारे वाढदिवस सण, लग्न यांची तयारी ही खूप जोरदार असते. प्रत्येक गोष्ट ही रिअल लाईफ मध्ये कशी दिसेल तशीच आपलया वाहिनीवर सुद्धा दिसले पाहिजे, आपल्या प्रेक्षकांनी त्याची चर्चा केली पाहिजे याची काळजी नेहमीच टीव्ही वाहिनी घेत असते. सध्या झी युवा वाहिनी वरील ‘तू अशी जवळी राहा’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ७:३० वाजता प्रेक्षकांचे नित्यनेमाने मनोरंजन करते. तू अशी जवळी रहा मधील राजवीर हा असाच एक उत्तम नवरा आहे. ज्याचं त्याची बायको मनवा हिच्यावर अफाट प्रेम आहे. एक अतिशय नावाजलेलं आणि आत्मविश्वासी व्यक्तिमत्व जेव्हा एका साधारण मुलीवर प्रेम करू लागतो तेव्हा तो नक्की कसा वागेल याची खरं तर कोणीच खात्री देऊ शकत नाही. तू अशी जवळी राहा या मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी राजवीर आणि मनवाला भरपूर प्रेम दिले.

 

मालिकेत राजवीर ची भूमिका सिद्धार्थ बोडके तर मनवाची भूमिका तितिक्षा तावडे करत आहे. तर झालं असं की मालिकेमध्ये मनवा चा वाढदिवस साजरा करायचा होता. आणि त्यासाठी तयारी सुद्धा झाली. मात्र सिद्धार्थला ती तयारी आवडली नाही, त्याच म्हणणं होत राजवीर मनवा वर एवढं वेड्यासारखं प्रेम करतो की तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. त्यामुळे सिद्दार्थने एक विशेष लिस्ट प्रोडक्शन ला दिली, त्यामध्ये गुलाबाची फुले, त्याचबरोबर संपूर्ण रूमला लाईट , हार्ट शेप चे लाल रंगाचे फुगे आणि तिचा आवडीचा चॉकलेट केक या  आलेल्या सर्व गोष्टींनी त्यानेच मनवाच्या वाढिदवसाची संपूर्ण तयारी केली आणि तिला सरप्राईझ केले .

संविधान सन्मान रॅलीतुन पुलवामातील शहीदांना अभिवादन

0
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने झाली. सायंकाळी शिवाजीनगर एआयएसएसपीएमएस शाळेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून संविधान सन्मान रॅलीला सुरवात झाली.
पुलवामातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा संविधान सन्मान रॅली साध्या पद्धतीने काढण्यात आली. तसेच कँडल मार्च काढून हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे’चा नारा देत ही रॅली पुणे महापालिका परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत आली. तेथे महात्मा फुले यांना अभिवादन करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विचाररथावरून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. मेणबत्त्या लावून शहीद जवानांप्रती आदराची भावना व्यक्त केली.
यावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर, माजी न्यामूर्ती रोहिदास गायकवाड, प्रा. डॉ. विजय खरे, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे, अमरनाथ सिंग, राजाराम भैलुमे, धर्मराज निमसरकर, कुमार आहेर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे, जी. के. ऐनापुरे, परशुराम वाडेकर यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
संमेलनाचे  उद्घाटन
सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आज गुरुवारी (दि. २१) दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमालकर आदी उपस्थित राहणार आहेत. संविधान नागरी, बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा रंगणार आहे.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी नवीन होंडा सीबीआर६५०आर भारतात दाखल

0
  • सदैव तत्पर, दमदार: उच्च कामगिरी देणारे शक्तिशाली चार सिलिंडर इंजिन
  • संपूर्ण नियंत्रण: रेसिंग बाईकचा जोश व रोड बाइकमधील व्यावहारिक उपयुक्तता यांचा मेळ
  • सीबीआरला मिळाला एक्स्ट्राआर: अत्यंत प्रभावी फायरब्लेड स्टायलिंग व अनोखी ऐट
  • पाहताक्षणी नजरा खिळवून ठेवेल अशी राजेशाही शान: प्रभावी अँगल्ससोबत फुल एलईडी लायटिंग
  • २२ शहरांमधील होंडा विंग वर्ल्डडीलरशिप्समध्ये फक्त १५,००० रुपयांना बुकिंग्सचा शुभारंभ
  • मेक-इन-इंडियाचा लाभ मिळालेला असल्याने सीबीआर६५०आरची किंमत अतिशय आकर्षक – ८ लाख रुपयांपेक्षा कमी

 

नवी दिल्ली:  रेसट्रॅकवरचा जोश ज्यांना सतत खुणावत असतो अशांना गेले बरेच दिवस ज्याची उत्कंठा लागून होती ती इच्छा आता पूर्ण होणार आहे.  होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या बहुप्रतीक्षित नवीन सीबीआर६५०आर बुकिंग्सचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली आहे.  स्पोर्ट्स मिडलवेट विभागात होंडाची ही नवीन बाईक दाखल होत आहे.

मिलानमध्ये पार पडलेल्या २०१८ ईआयसीएमए मध्ये सीबीआर६५०आरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.  होंडाच्या स्पोर्ट्स मिडलवेट गाड्यांपैकी सीबीआर६५०एफ च्या जागी आता ही सीबीआर६५०आर असणार आहे.  फायरब्लेड सुपर स्पोर्ट्स स्टाइलपासून प्रेरणा घेऊन बनवलेली ही गाडी स्वतःदेखील एक अनोखी स्टाईल आहे.  स्पोर्टी जोश, शक्ती आणि क्षमता जर रस्त्यांवर अनुभवायची असेल तर २०१९ सीबीआर६५०आर तुमच्यासाठी ती संधी घेऊन आली आहे.

भारतामध्ये बायकिंगच्या मौजमजेच्या, अनुभवांच्या सीमा विस्तारण्याची क्षमता असलेल्या नवीन सीबीआर६५०आर बद्दल होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. यादवींदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, सीबी३००आर ही गाडी संपूर्ण देशभरात दाखल केल्यानंतर दोन महिन्यांहूनही कमी कालावधीत मिडलवेट विभागात सिल्वर विंगमार्क असलेली दुसरी जागतिक स्तराची गाडी सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेईआयसीएमएमध्ये २०१९ ग्लोबल फन मॉडेल लाईनअपचा शुभारंभ केल्यानंतर होंडाने आपल्या नवीन मिडलवेट स्पोर्ट्स गाडी सीबीआर६५०आरची बुकिंग्स भारतातही सुरु केली आहेतप्रभावी फायरब्लेडने प्रेरित बॉडीवर्क, सीबीआरमधील स्पोर्टींगचा जोश, शक्ती याने परिपूर्ण असलेली होंडाची मेकइनइंडिया सीबीआर६५०आर भारतातील फन बायकर्सना अभूतपूर्व अनुभव मिळवून देईल.”   

सीबीआर६५०आरदमदार जोश, शक्ती, गुणवत्ता!

तुमच्यातल्या रेसिंग जोशला मिळणार पुरेपूर वाव: नवीन सीबीआर६५०आरमध्ये शक्तिशाली ६४९सीसी लिक्विड कूल्ड चार सिलिंडर असलेले, डीओएचसी १६-वाल्व इंजिन असून त्यामुळे ही गाडी उत्तम कामगिरी बजावते.

संपूर्ण नियंत्रण:  वेगवान डाऊनशिफ्टिंग ते सहज नियंत्रणात राहून करता येईल अशी कॉर्नर एन्ट्री हे सर्व लीलया करू शकेल अशा असिस्ट / स्लीपर क्लच मुळे तुम्हाला सीबीआर६५०आरचा थरार अतिशय आत्मविश्वासाने अनुभवता येतो.  होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) मागील चाकाचे घर्षण नियंत्रणात ठेवते व जेव्हा रायडरची इच्छा असेल तेव्हा ते बंददेखील करता येते.

शार्पर चेसिस: अतिशय वेगवान क्षमता असलेल्या सीबीआर६५०आरचे चेसिस आधीच्या गाड्यांपेक्षा ६ किलोने कमी वजनाचे आहे त्यामुळे याची साईड-टू-साईड स्टिअरिंग स्फूर्ती खूप जलद आहे.  हलवता येण्याजोग्या ४१ एमएम शोवा सेपरेट फोर्क फंक्शन (एसएफएफ) युएसडी फोर्क्समुळे सस्पेन्शन खूप चांगले आहे.

अत्याधुनिक ब्रेकिंग: रेसींगसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सीबीआर६५०आरमध्ये अत्याधुनिक ब्रेकिंग असल्यामुळे सहज थांबता येते.  ड्युअल रेडिअल-माउंट कॅलिपर्स व मागील बाजूस सिंगल-पिस्टन कॅलिपरमुळे गाडीचे संतुलन अधिक चांगले राहते.  ड्युअल चॅनेल एबीएसमुळे रस्ते ओले असोत वा सुके गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवता येते.

शानदार रोअरिंग:  इंजिनच्या पुढील बाजूस ४ एगझास्ट डाऊनपाईप्स व खास डिजाईन करण्यात आलेले मफलर यामुळे मिळणारी इलेक्ट्रीफाईंग रोअर प्रत्येक राईडच्या वेळेस रायडरला नवेपणाचा अनुभव देते.

फायरब्लेड डीएनएचा जोश:  फायरब्लेड डिझाईनपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या सीबीआर६५०आरमध्ये स्टायलिंग नवी व अतिशय प्रभावी आहे.  विस्तारित साईड फेअरिंग्स व सुपर-शॉर्ट रिअर सेक्शन यामुळे गाडीची शान वाढली आहे.  आधुनिक फुल एलईडी लायटिंग ड्युअल हेडलॅम्प, फायरब्लेड, डिजिटल एलसीडी डिस्प्ले याचा प्रभाव वाढवतात.  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी संपूर्णतः स्पोर्टी आहे, टॉप योकच्या खाली हँडलबार्स क्लिप-ऑन व गिअर पोझिशन व शिफ्ट अप इंडिकेटर दर्शवणारे इंस्ट्रुमेंट्स यामुळे ही गाडी पुरेपूर स्पोर्टी अनुभव देते.

सीबीआर ६५० आर दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – ग्रँड प्रिक्स रेड मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक.  भारतातील सर्व होंडाच्या खास विंग वर्ल्ड आउट्लेट्समध्ये फक्त १५,००० रुपयांमध्ये ही गाडी बुक करता येईल.

महाराष्ट्र जोशी समाजातील मान्यवरांचा सत्कार

0

पुणे-महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या महाराष्ट्र जोशी समाजातील आजी माजी शासकीय अधिकारी , पदाधिकारी व क्रीडा विश्वातील मान्यवर आणि समाजबांधव यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला . आळंदी रोडवरील कस्तुरबा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक अमोल बालवडकर , महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे , उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम नगरसेवक सुनिल विजय टिंगरे , पुणे शहराध्यक्ष शेरू परदेशी , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश मारुती जोशी व जयश्री हेंद्रे  आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक शंकर भोसले पिंपरी चिंचवड एम एस इ बीचे अभियंता शिवाजी वायफळकर माजी आरोग्य सेवा  अधिकारी शशिकला अरविंद साळुंके ,इंदापूर येथील विस्तार अधिकारी  किरण मोरे ,सोलापूर परिवहन समितीचे अध्यक्ष  किरण सरवदे आदींचा नगरसेवक सुनिल विजय टिंगरे व महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे   यांच्याहस्ते सत्कार स्मृतिचिन्ह , शाल , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी पाडगे , तानाजी सुर्वे , अविनाश निकम , रामदास निकम , सुरेखा संदीप निकम , गीतांजली सारगे , सुरेखा हेंद्रे , सुनीता सुर्वे , दगडू जोशी , शिवाजी खेडेकर , अविनाश धीवार , भानुदास मोरे , सुजित हांडे आदीनी विशेष परिश्रम घेतले . सूत्रसंचालन राजेंद्र सुर्वे यांनी केले तर आभार निलेश प्रकाश निकम यांनी मानले .

360 एक्स्प्लोरर टीमने 12,500 फुटांवर तिरंगा फडकवला.

0

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली पॅरालाईज असलेल्या चैतन्य कुलकर्णी चा विक्रम.

रमेश कलेल, गणेश नारकर यांनीही गाठली उंची.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनाली जवळ “नेगीडुग” या ठिकाणी १२,500 फुट चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीन सुरु होवून १४ फेब्रुवारी रोजी १२,500 फुटांवर चढाई करून यश मिळवले. ४ वर्षापूर्वी झाडावर पडून अपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली वर्षभर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक तयारी तो करत होता. मुंबई मध्ये सध्या काम करत असलेले गणेश नारकर व रमेश कलेल यांनीही ही उंची गाठण्यात यश मिळवले आहे. याच काळात मनाली परिसरात हाय-अलर्ट होता व सतत बर्फ पडून सर्व वाट निसरडी झाली होती. घसरडा रस्ता, धुक्यात हरवणारी वाट, वरून पडणारा बर्फ, बदलते वातावरण ई. अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड देत सर्वांनी “नेगीडुग” हा ट्रेक पूर्ण केला.

अक्षया-आनंदची “मिशन फिनिक्स”-

आंतरराष्ट्रीय सक्सेस कोच असलेल्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्याच्या पत्नी अक्षया बनसोडे यांनी “फिनिक्स मिशन” सुरु केले असून अनेक अपंग, आत्मविश्वास गमावून बसलेले, वंचित घटकातील लोकांना साहसी खेळाद्वारे आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहायला लावून त्यांना लाइफ कोचिंग ते देत असतात. या अंतर्गतच या मोहिमेत चैतन्य कुलकर्णी या कमरेखालून पॅरालाईज असलेल्या युवकाला जगण्याचा “फिनिक्स मार्ग” देण्यासाठी ही माहीम आयोजित केली होती. कोणाला अश्या पद्धतीने निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायचे असेल तर 9067045500 / 9067035500 वर संपर्क करावा असे अक्षया बनसोडे यांनी सांगितले आहे.

आनंद बनसोडे

“हिमालयाच्या १२, 500 फुटांव पोहचून सर्वजण भावूक झाले होते. तिरंगा फडकवताना सर्वाना खूप समाधान वाटत होते. येणाऱ्या काळात 360 एक्स्प्लोरर मार्फत अश्या अनेक मोहिमाद्वारे गिर्यारोहण व निसर्ग भटकंतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सामाजिक बांधिलकी जपून करण्यात येणार आहे. याशिवाय अपंग व वंचित घटकातील सर्वाना प्रेरणा देण्याचे काम करण्यात येणार आहे.”

चैतन्य कुलकर्णी (360 एक्सप्लोरर ट्रेकर)

360 एक्स्प्लोरर मार्फत आनंद बनसोडे सरांकडून गेली वर्षभर ट्रेनिंग घेत आहे. फक्त सरांमुळेच माझ्या आत असलेल्या भीतीवर मात करून मी सध्या सकारात्मकपणे आयुष्य जगण्यासाठी सुरवात केली आहे. १२,500 फुट उंचीवर जाणे व तिरंगा फडकावणे हे फक्त सरांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात माझासारख्या असंख्य मुलांना मला प्रेरणा द्यायची आहे.

गणेश नारकर व रमेश कलेल (ट्रेकर)

हा आमचा पहिला हिमालय ट्रेक होता. आम्ही जे स्वप्न पहिले होते त्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण होता. 360 एक्सप्लोरर चे योग्य नियोजन व नैसर्गिक अडचणीअसताना टीमने घेतलेले निर्णय यामुळेच हा ट्रेक यशस्वी होऊ शकला. पुढे आम्हाला ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याची इच्छा आहे.

राजेंद्र सरग यांना अनुलोम सन्मित्र सन्‍मान

0

पुणे- येथील जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना समाज कल्‍याण आयुक्‍त मिलींद शंभरकर यांच्‍या हस्‍ते अनुलोम सन्मित्र सन्‍मान देऊन गौरवण्‍यात आले. प्रशासनाच्‍या दृष्टिने समाजास पूरक आणि अनुकूल कार्य करीत असल्‍याबद्दल अनुगामी लोकराज्‍य महाभियान अर्थात अनुलोम या संस्‍थेच्‍यावतीने हा गौरव करण्‍यात आला. बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमास पुणे उपविभाग प्रमुख मुकूंद माने,  अनुलोमचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, अनिल मोहिते यांच्‍यासह इतर अधिकारी, नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

स्थायी समिती – ८ जागांसाठी ४७ नगरसेवक रेसमध्ये…

0

पुणे- कोणी गमतीने अलीबाबाबाची गुहा म्हणेल.कोणी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणेल ..अशा स्थायी समिती च्या सदस्यांमधून ८ सदस्य निवृत्त होत आहेत .यात भाजपचे सहा तर राष्ट्रवादीचे २ सदस्यांचा समावेश आहे .यांच्या जागेवर वर्णी लावून घेण्यासाठी भाजपमधील २६ तर राष्ट्रवादी मधून २१ नगरसेवक रेस मध्ये उतरले आहेत .यातून आता कोणाला आपापल्या नेत्याकडून स्थायी ची लॉटरी लाऊन घेण्यात यश येईल ते उद्याच स्पष्ट होणार आहे .

राष्ट्रवादीचे दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे तसेच भाजपचे राजाभाऊ बराटे ,सुनील कांबळे,मंजुश्री नागपुरे ,माऊली तुपे,कविता वैरागे,नीलिमा खाडे हे स्थायी समितीचे सदस्य २ वर्षाचा आपला कालावधी पूर्ण करून निवृत्त होत आहेत .आज पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मुख्य सभा तहकूब होईल ,त्यानंतर स्थायी च्या नव्या सदस्यांची हि निवड घोषित होईल . अर्थात भाजपच्या नवसद्स्यांची नावे मुख्यमंत्रीच पुण्याचे नेते असल्याने त्यांच्याकडून च येतील आणि राष्ट्रवादीची नावे अजित पवार यांच्याकडून येतील .

भाजपमधून  महेश लडकत, राजेश येनपुरे, हेमंत रासने, प्रसन्न जगताप, अर्चना पाटील, धनराज घोगरे, मंजुश्री खर्डेकर, सुनील कांबळे, मानसी देशपांडे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, आरती कोंढरे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, किरण दगडे, ज्योती कळमकर, जयंत भावे, मानसी देशपांडे आदी नगरसेवकांनी स्थायी समितीसाठी इच्छा व्यक्त केली.तर राष्ट्रवादी मधून प्रकाश कदम ,विशाल तांबे, सुनील टिंगरे,भैय्या साहेब जाधव ,योगेश ससाणे,  माजी महापौर असलेल्या वैशाली बनकर असे २१ ते २२ जन इच्छुक आहेत .

या आठ सदस्यांच्या निवडीनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. यासाठी  भाजपमधील मूळ सदस्य, तसेच महापालिका निवडणुकीत इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चुरस रंगते  आहे. विशेष म्हणजे तीन आमदारांचे नातेवाईक असलेले अनुक्रमे रंजना टिळेकर ,वर्षा तापकीर ,आणि सुनील कांबळे हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तर मराठा समाजाला अध्यक्षपद दिले पाहिजे हि मागणी लक्षात घेवून उमेश गायकवाड यांनी अध्यक्षपदाच्या रेस मध्ये उडी घेतली आहे. मात्र या रेस मध्ये सुनील कांबळे यांचेच नाव आघाडीवर असल्याचे दिसते आहे. 

स्थायी समितीत सध्या असलेल्या भाजपच्या सदस्यांकडून अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तर, स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवून नंतर अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठीही जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या सहा जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या सर्व आमदारांच्या बैठकीत सदस्य निवडीबाबत चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी सर्व आमदारांना आपआपल्या इच्छुक नगरसेवकांची नावे सूचविण्यास सांगितले आहे. शहरात भाजपचे आठ आमदार असले, तरी स्थायी समितीत सहा सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सहा जणांमध्ये नंबर लावण्यासाठी २६ नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

काही नगरसेवकांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही गळ घातली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पालकमंत्र्यांना एका नावाची शिफारस केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी झालेल्या पुणे दौऱ्यातही प्रमुख इच्छुकांची त्यांच्याभोवती असलेली लगबग लक्ष वेधून घेणारी होती. 

दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे स्थायी समिती सदस्यत्वासाठी इच्छूक नगरसेवकांच्या नावांची यादी मंगळवारी दिली. या यादीमध्ये आमदारांनी सूचविलेल्या नावासह मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या यादीतील नावांमधून सहा नावे स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी येणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते आहे. 

‘चौकीदार ही चोर है’ म्हणणारेच चोरांच्या टोळीत सहभागी – सुप्रिया सुळे

0

पुणे – चौकीदार ही चोर है कोण म्हटले होते. तुम्हीच सांगा, चौकीदार चोर आहे का नाही? मग चोरांच्या टोळीत का सामील झालात,असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेला विचारला आहे. राज्यात सोमवारी भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर त्यांनी आज शिवसेनेवर टीका केली. त्या पुण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी ही टीका केली.
गेली साडेचार वर्षे एकमेकांचे वस्त्रहरण करणाऱ्यांमध्ये युती झाली. जेव्हा राज्याला चांगल्या प्रशासनाची गरज होती. तेव्हा हे एकमेकांवर टीका करण्यात ‘मश्गुल’ होते. राज्यात भाजप-शिवसेना युती होणे दुर्दैवी असून बाळासाहेब ठाकरे कधी सत्तेसमोर वाकले नसल्याचेही त्या म्हणाल्या.

मी कधी असली विधानं करत नाही, पण चौकीदार ही चोर है कोण म्हटले होते. तुम्हीच सांगा चौकीदार चोर आहे का नाही. मग तुम्ही चोरांच्या टोळीत सामील झालात? याचे उत्तर शिवसेनेने राज्यातील जनतेला द्यावा. युतीमुळे सामान्य कार्यकर्ता भरडला गेला याचे दुःख असल्याचेही त्या म्हणाल्या.

युती राज्यात ४८ तर देशात ५४७ जागा जिंकेल-शरद पवारांनी उडविली खिल्ली

0

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित, रोहित आणि पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना युतीवर आश्चर्य वाटत नाही. युती राज्यात ४८ तर देशात ५४७ जागा जिंकेल, असा शरद शरद पवार यांनी लगावला. ते पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. युतीवर आश्चर्य वाटत नाही. गेल्या २ महिन्यांपासून मी नेहमी हेच सांगत आहे. युती करण्याचा निर्धार दोघांचा आहे. सेनेने संसार करण्यापूर्वी जेवढ्या दुगण्या झाडायच्या त्या झाडल्या आणि आता संसाराला लागली.
ते पुढे म्हणाले, की युती राज्यात ४५ नाही तर ४८ जागा जिंकेल. तसेच देशात ५४७ जागा जिंकेल, असे भाजपने म्हणायला हवे ते चुकले. या ४८ मध्ये बारामती मतदारसंघ पण येतो. सत्तेची गादी आणि ऊब सोडायची तयारी नव्हती. ऊब सोडायची वेळ आल्यावर पुन्हा ते गादीवर बसले. युतीने आघाडीचे काम सोपे झाले, तर ईडीचा दबाव होता यावर काही माहिती नाही.
पुलवामा येथे देशावर हल्ला झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. आम्ही राष्ट्रीय प्रश्न असल्याने बैठकीला गेलो, मात्र पंतप्रधानच गैरहजर होते. राष्ट्रीय आघात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना धुळे आणि यवतमाळला आमच्यावर दुगण्या झाडणे महत्त्वाचे वाटले. या बैठकीला सर्वपक्षीय नेते होते, मात्र भाजपचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. गृहमंत्री उपस्थित होते. दोन्ही देशांनी युद्धाची परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही. लष्कराने भारतीय महिलांना अपील केले आहे. मात्र, याचा पाकिस्तान फायदा घेईल? असाही धोका पवार यांनी बोलून दाखवला.

पुणे लोकसभा -लढाई ..उदय आणि अस्ताची…?

0

पुणे-अजून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी,आघाडी नंतर काल झालेल्या सेना भाजप युतीच्या घोषणेनंतर लोकसभेचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत .खरे तर पुण्याच्या लोकसभेचे बिगुल , ज्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हटले गेले किंवा म्हटले जाते ,त्या खासदार संजय काकडे यांनी आपली उमेदवारी ,आपणच जाहीर केली तेव्हाच वाजले . अन सुरु झाली, लढत ..नव्या राजकीय पर्वाची ,आणि अनुभवी ,मुरब्बी ,ज्येष्ठ अशा पालकमंत्री असलेल्या गिरीश बापटांच्या अस्तित्वाची ..आता कोण लोकसभेला लढणार ,कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार ? असे प्रश्न अजून अनुत्तरीत असले तरी ,कॉंग्रेस कडून संजय काकडे लढतील आणि भाजपकडून गिरीश बापट लढतील असे कयास व्यक्त करणारेच मोठ्या संख्येने दिसत आहेत .आणि हेच कयास मान्य केले तर .. हि लढाई ..उदय आणि अस्ताची च असेल यात शंका नाही .
पुण्याच्या लोकसभे साठी कॉंग्रेस कडून मोहन जोशी ,अभय छाजेड हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेतच . पण काकडे यांनी गेली काही महिने सुरु केलेला भेटीगाठींचा धुराळा काही खाली बसायला तयार नाही .तो उंच उंच वावटळी सारखा फोफावतो च आहे. अगदी माजी नगरसेवकापासून ..मग तो कोणत्याही पक्षाचा असेनात ..त्या पासून ते शरद पवार ,अजित पवार ,रामदास आठवले ,छगन भुजबळ, सुरेश कलमाडी ,शशिकांत सुतार अशा विविध पक्षांमधील विविध स्तरातील मान्यवरांच्यासह त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली . मध्यंतरी त्यांनी लष्कर परिसरातील लोकप्रतिनिधींना घेऊन दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी गाठी घेतल्या . पण सर्वात महत्वाच्या होत्या त्या त्यांच्या शहराच्या काना कोपऱ्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी …मराठा समाज ,मुस्लीम समाज अशा विविध समाजाच्या संघटना ,गणपती मंडळे त्यांनी सोडली नाहीत  .थोडक्यात वेगवेगळ्या भागात प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ,व्यापारी आणि सामजिक प्रतिनिधींच्या कडे जाऊन त्यांच्या सुरूच असलेल्या भेटी अन्य दिवशी सकाळी बंगल्यावर आणि दुपारी ऑफिसवर त्यांच्याकडे सुरूच असलेला भेटीचा ओघ .. पाहता … उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारी नंतर त्यांनी आता नव्या राजकीय पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केल्याचे म्हणावे लागेल .भाजप सह शिवसेना,आरपीआय ,कॉंग्रेस ,राष्ट्रवादी अशा विविध पक्षांमधील त्यांचा संपर्क बरेच काही सांगून जाणारा आहे .
या उलट भाजप ची ज्यांच्यावर मदार आहे , ते पालकमंत्री गिरीश बापट मात्र मंत्री पदाच्या वलयातून बाहेर पडल्याचे अद्याप दिसत नाही . पुण्याच्या अनेक प्रश्नावर त्यांनी अधिकारी ,लोकप्रतिनिधी यांच्या बैठका मात्र जरूर घेतल्या पण त्यातून ठोस काही ना पक्षाच्या हाती लागले ना कार्यकर्त्यांच्या ….नगरसेवक ते मंत्री पदापर्यंत चा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास …आणि राजकीय शिदोरी मोठी असली तरी काकडे यांनी गेल्या ३ महिन्यात संपर्काचा उडविलेला धुराळा बापटांनी कधी उडविलाय असे मानायला कोणी तयार नाही .
एकीकडे भाजपचे सहयोगी असलेल्या काकडे यांनी जसजशी पुण्याच्या राजकारणात आपल्या राजकीय पर्वाची सुरुवात करण्याचे संकेत दिले, तसं तसे ते भाजप कडून दुखावले गेले आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सानिध्यात रमत चालले . असे असले तरी अजूनही भाजपच्या नगरसेवकांची मोठी मोट त्यांच्या गाठी आहे .अमोल बालवडकर ,विजय शेवाळे यांच्या सारखे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच काय ते बापटांच्या गळाला लागले.
सातत्याने कसबा विधानसभेतून विजय मिळविलेले बापट यांच्या हाती विधानसभेतील सत्ता काल तसा फार काही लाभला नाहीच .ना नवे काही देण्याची ,निर्माण करण्याची संधी त्यांना लाभली. पर्यायाने आपल्या मूठभर समर्थकातच त्यांनी आपले राजकारण व्यतीत केले .
म्हणजेच आता बापट विरुद्ध काकडे अशी लढत झालीच तर नव्या राजकीय पर्वाचा उदय होईल कि सातत्याने कसब्यावर आणि त्या माध्यमातून पक्षावर आपला वरदहस्त ठेवत आलेल्या ज्येष्ठ ,अभ्यासू अशा बापटांनाच विजय मिळेल यावर कार्यकत्यांमध्ये आताच उत्सुकता दिसून येते आहे .

खासदार काकडेंच्या ‘थेट भेट-थेट संवाद ‘मोहिमेने राजकीय धुराळा …

0

पुणे-लोकसभेचे  इच्छुक उमेदवार आणि राज्यसभेचे विद्यमान सदस्य संजय काकडे यांनी आपल्या भेटीगाठीची मोहीम अधिक तीव्र केल्याने लोकसभेच्या चर्चेच्या वर्तुळात मोठा राजकीय धुराळा उडतो आहे .

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते  मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. दिवंगत माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, माजी उपमहापौर मुकारी अलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

काल खासदार संजय काकडे यांनी पुणे कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल येथे किरकोळ व्यापारी व व्यावसायिकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांचे प्रश्न व त्यांच्यासमोरील आव्हाने, समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि आपण  स्वत: व्यावसायिक असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी समजू शकतो. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्यासोबत असेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी माणिक भंडारी, भारतकुमार वर्मा, अनिल रणधीर, वसिम शेख, विजय भोसले, रवी जावळे मनीष साळुंखे, संदीप कांबळे, राजू परदेशी, सय्यद जाफर इराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय नगरसेवक सुनील टिंगरे यांच्या निवासस्थानी त्यांनी  भेट दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीबरोबरच इतर सामाजिक विषयांवर त्यांनी चर्चा केली . याप्रसंगी हनिफ शेख, माजी नगरसेवक इस्माईल भाई, अरुण भालेराव, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बापुसाहेब पठारे यांचीही त्यांच्या निवासस्थानी त्यांनी  भेट घेतली. यावेळी  नगरसेवक राहुल भंडारे, अमित जाधव, स्वप्नील वाखरे, संतोष कुटे, धनंजय जाधव, राजेंद्र पठारे, शिवा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेविका उषाताई कळमकर यांच्या निवासस्थानी त्यांनी  भेट दिली. याप्रसंगी ज्ञानेश्वर कळमकर, प्रशांत कळमकर, नगरसेवक राहुल भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

वडगावशेरी मतदार संघातील नारायण गलांडे यांची त्यांच्या निवासस्थानी त्यांनी  भेट घेतली. याप्रसंगी नगरसेवक व क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल भंडारे, रमेश गलांडे, श्यामराव गलांडे, ज्ञानेश्वर देवकर, योगेश गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही- शरद पवार

0
विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे  शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण
पुणे, दि. १९ फेब्रुवारी: “शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात व समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केले जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगा युगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते. त्यामुळे या युगपुरूषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
शिवजयंतीच्या दिवशी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेवाद्वितीय असा एक महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरूष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर हे होते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल  श्रीनिवास पाटील, सातार्‍याचे आमदार श्री. शिवेंद्रराजे भोसले व आमदार बाबूराव पाचर्णे आणि जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले,“भारतात अनेक राजे होऊन गेले व त्यांना त्यांच्या घराण्यांनी ओळखले जाते. परंतू छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे असून त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तृत्व होते. हा शेतकर्‍यांचा राजा होता.”
शिवाजी महाराज हे भारतातले असे पहिले राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. समाज आणि राज्य यांचा समन्वय साधला. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम सहकारी होते. त्यांचा उपयोग त्यांनी राज्य चालविण्यासाठी केला. धर्माधर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकारण वेगळे होते. आज राजकारणाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे येथील राजकारणाचे शिक्षण देणार्‍या संस्थेने सर्वांना योग्य दिशा दयावी.”
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “सुंदर परिसरात या वास्तूचा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनुभव येत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात सर्व धर्मातील घटकांचा समावेश केला.”
बाबूराव पाचर्णे म्हणाले,“ डॉ. कराड यांची भावना जगाला संदेश देणारी आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही पैकी अध्यात्माची ताकद मोठी आहे. विज्ञानाच्या पलिकडेही अध्यात्माची मोठी ताकद आहे. घुमटा बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. त्यामुळे हे कार्य पूर्ण झाले.”
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “शिवाजी महाराज यांचा संदेश जगासमोर पोहचावा या निमित्ताने शरद पवार साहेब आज येथे आले. हे उचित आहे. मानवतेचा संदेश देण्यासाठी या घुमटाची निर्मिती झाली आहे. स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार २१वें शतक हे भारताचे असून विश्‍वगुरू म्हणून उदयास येणार आहे. भारत देशच जगाला सुख, शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवेल.”
यानंतर श्रीनिवास पाटील यांनी विचार मांडले.
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड  यांनी आभार मानले.

दहावी ची परीक्षा : विद्यार्थी आणि पालकांनो हे नक्की ऐका …

0

पुणे- येत्या 1 मार्च पासून दहावीची परीक्षा सुरु होते आहे . या पार्श्वभूमीवर आज चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे सर यांनी ‘माय मराठी’च्या माध्यमातून दहावीच्या  विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी  साधलेला हा संवाद ..  विद्यार्थ्यांना नक्कीच बळ देणारा त्यांचा हा मार्गदर्शन पर संवाद ..विद्यार्थी आणि पालकांनी निश्चित ऐकावा असा…

‘इनामदार कॉलेज ऑफ वेदा ‘ आयोजित ‘सायन्सीफाय २०१९ ‘ स्पर्धेत ३० शाळांचा सहभाग

0

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ‘इनामदार कॉलेज ऑफ वेदा ‘ ने आयोजित केलेल्या ‘सायन्सीफाय २०१९ ‘ स्पर्धेत ३० शाळांनी सहभाग घेतला . लाईफ लॅब आणि मराठी विज्ञान परिषद आयोजित हा उपक्रम आझम कॅम्पस येथे पार पडला . या उपक्रमांतर्गत मॉडेल मेकिंग आणि विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .

हर्षदा बाब्रेकर (संशोधक ,सायन्स पार्क ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ),डॉ विद्याधर बोरकर ,(कार्यकारी समिती सदस्य , मराठी विज्ञान परिषद ),लेवीट सोमराजन (संस्थापक ,लाईफ लॅब ),डॉ ऋषी आचार्य यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले .

‘आंतरराष्ट्रीय फ्लोरा’ भव्य प्रदर्शन- २२ फेब्रुवारीपासून पुण्यात …

0
  • दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०१९ दरम्यात लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे भरणार आहे.
  • फुलांच्या क्षेत्रातील विविध व्यावसायिक, तज्ज्ञ, विक्रेते, आयात – निर्यात करणारे यांच्यासाठी फ्लोरा एक्स्पो हे सर्वोत्तम माध्यम आहे.

 भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील वातावरण फळ, भाज्या, फुले, काजू, मसाले इ. पिकांच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनुकूल आहे. म्हणूनच भारत जगातील फळ आणि भाज्या उत्पादकांपैकी एक मुख्य उत्पादक आहे. यामुळेच देशाच्या जीडीपी मध्ये हॉर्टिकल्चर क्षेत्राचे योगदान दिवसेंदिवस वाढत आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हॉर्टिकल्चर क्षेत्राच्या उत्पादनात आश्चर्यकारक बदल झाला आहे. हॉर्टिकल्चर सेक्टरचे महत्त्व लक्षात घेऊन, मीडिया टुडे ग्रुप ने पुण्यात एका भव्य प्रदर्शनाचे आयोजित केले आहे. हे ‘१४ वे आंतरराष्ट्रीय फ्लोरा’ प्रदर्शन असून या बरोबर ‘११वे आंतरराष्ट्रीय होर्टी’ व ‘१३वे आंतरराष्ट्रीय लँडस्केप आणि गार्डनिंग एक्सपो’ चे आयोजन लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे भरवण्यात येणार आहे.

हे तीन दिवसीय प्रदर्शन असून दि. २२ फेब्रुवारी २०१९ ला याची सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी,हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स, फार्म मशीनीरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज या क्षेत्रासाठी भारतातील सर्वात भव्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते.

या प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणामध्ये उत्पादने व तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये फुले, फळ भाज्याची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले तसेच हायड्रोपोनिक्स, सौर ऊर्जा चे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान, ऑटोमेशन इ. गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

विशेष आकर्षण

आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि परिषद;

२३ फेब्रुवारी रोजी हरित गृहनिर्माण संकल्पना या विषयावर “वनस्पती, ठिकाणे आणि लोक” अशा आंतरराष्ट्रीय परिषद आणि नेटवर्किंग मीट चे आयोजन लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे केले आहे.

इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सीलेंस अवॉर्ड्स:

ज्या व्यक्तींनी हरित क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिल्ये आहे त्यांना हे  इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सीलेंस अवॉर्ड्स दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.