- दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०१९ दरम्यात लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे भरणार आहे.
- फुलांच्या क्षेत्रातील विविध व्यावसायिक, तज्ज्ञ, विक्रेते, आयात – निर्यात करणारे यांच्यासाठी फ्लोरा एक्स्पो हे सर्वोत्तम माध्यम आहे.
भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील वातावरण फळ, भाज्या, फुले, काजू, मसाले इ. पिकांच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनुकूल आहे. म्हणूनच भारत जगातील फळ आणि भाज्या उत्पादकांपैकी एक मुख्य उत्पादक आहे. यामुळेच देशाच्या जीडीपी मध्ये हॉर्टिकल्चर क्षेत्राचे योगदान दिवसेंदिवस वाढत आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हॉर्टिकल्चर क्षेत्राच्या उत्पादनात आश्चर्यकारक बदल झाला आहे. हॉर्टिकल्चर सेक्टरचे महत्त्व लक्षात घेऊन, मीडिया टुडे ग्रुप ने पुण्यात एका भव्य प्रदर्शनाचे आयोजित केले आहे. हे ‘१४ वे आंतरराष्ट्रीय फ्लोरा’ प्रदर्शन असून या बरोबर ‘११वे आंतरराष्ट्रीय होर्टी’ व ‘१३वे आंतरराष्ट्रीय लँडस्केप आणि गार्डनिंग एक्सपो’ चे आयोजन लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे भरवण्यात येणार आहे.
हे तीन दिवसीय प्रदर्शन असून दि. २२ फेब्रुवारी २०१९ ला याची सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी,हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स, फार्म मशीनीरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज या क्षेत्रासाठी भारतातील सर्वात भव्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते.
या प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणामध्ये उत्पादने व तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये फुले, फळ भाज्याची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले तसेच हायड्रोपोनिक्स, सौर ऊर्जा चे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान, ऑटोमेशन इ. गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
विशेष आकर्षण
आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि परिषद;
२३ फेब्रुवारी रोजी हरित गृहनिर्माण संकल्पना या विषयावर “वनस्पती, ठिकाणे आणि लोक” अशा आंतरराष्ट्रीय परिषद आणि नेटवर्किंग मीट चे आयोजन लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा, पुणे येथे केले आहे.
इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सीलेंस अवॉर्ड्स:
ज्या व्यक्तींनी हरित क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिल्ये आहे त्यांना हे इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सीलेंस अवॉर्ड्स दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.