पुणे-महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या महाराष्ट्र जोशी समाजातील आजी माजी शासकीय अधिकारी , पदाधिकारी व क्रीडा विश्वातील मान्यवर आणि समाजबांधव यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला . आळंदी रोडवरील कस्तुरबा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक अमोल बालवडकर , महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे , उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम , नगरसेवक सुनिल विजय टिंगरे , पुणे शहराध्यक्ष शेरू परदेशी , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश मारुती जोशी व जयश्री हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक शंकर भोसले , पिंपरी चिंचवड एम एस इ बीचे अभियंता शिवाजी वायफळकर , माजी आरोग्य सेवा अधिकारी शशिकला अरविंद साळुंके ,इंदापूर येथील विस्तार अधिकारी किरण मोरे ,सोलापूर परिवहन समितीचे अध्यक्ष किरण सरवदे आदींचा नगरसेवक सुनिल विजय टिंगरे व महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास हेंद्रे यांच्याहस्ते सत्कार स्मृतिचिन्ह , शाल , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी पाडगे , तानाजी सुर्वे , अविनाश निकम , रामदास निकम , सुरेखा संदीप निकम , गीतांजली सारगे , सुरेखा हेंद्रे , सुनीता सुर्वे , दगडू जोशी , शिवाजी खेडेकर , अविनाश धीवार , भानुदास मोरे , सुजित हांडे आदीनी विशेष परिश्रम घेतले . सूत्रसंचालन राजेंद्र सुर्वे यांनी केले तर आभार निलेश प्रकाश निकम यांनी मानले .