पुणे- येथील जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यांच्या हस्ते अनुलोम सन्मित्र सन्मान देऊन गौरवण्यात आले. प्रशासनाच्या दृष्टिने समाजास पूरक आणि अनुकूल कार्य करीत असल्याबद्दल अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम या संस्थेच्यावतीने हा गौरव करण्यात आला. बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमास पुणे उपविभाग प्रमुख मुकूंद माने, अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, अनिल मोहिते यांच्यासह इतर अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.