पुणे- भाजप सेना युती झाली तर पूर्व भागातील अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आणि अनेकांनी आमदारकी साठी गुढग्याला बाशिंगे बांधली ,पण युती हि तूर्तास तरी लोकसभेसाठी झालेली आहे ,असे सांगत आपण केलेल्या विविध विकास कामांची जंत्री वाचून दाखवीत भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी १५ वर्षात कोणी केली नाही एवढी कामे आपणा आपल्या मतदार संघात सुरु केलीत असा दावा काल येथे केला .
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक गोपाळराव चिंतल यांच्या हस्ते करण्यात आले . याचवेळी सुखसागरनगर सर्वे नंबर 19 मधील मुलांसाठी खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन,कात्रज-कोंढवा रोड ते गंगोत्री हॉटेल या रस्त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले .
टिळेकर म्हणाले ,१५ वर्षात कोणी केली नाही एवढी कामे आपणा आपल्या मतदार संघात सुरु केलीत , कात्रज कोंढवा रस्ता होणार नाही अशी स्थिती असताना त्याच्या कामाला आपण प्रारंभ केला ,24 तास पाणी पुरवठा यंत्रणा आता पुढील एक वर्षात सुरु होईल .विरोधकांचा समाचार आपल्या भाषणातून घेताना त्यांनी ,आता त्यांना इथे कामच उरले नाही ,एकच काम उरले आहे ,योगेश टिळेकर कोठे कोणत्या गाडीने जातो,काय खातो यावरच त्यांचे लक्ष आहे , कार्यकर्त्यांची कामे करत असताना आपल्यावर खंडणीचा गुन्हा दाखला झाला . पण कार्यकर्त्यांसाठी आपण असे हजारो गुन्हे अंगावर घेवू असेही ते म्हणाले .
या भागातील ,मतदार संघातील नागरिक आपल्याला घरातल्यांसारखेच आहेत असे सांगणाऱ्या टिळेकरांना अखेरीस आपल्या पित्याच्या आठवणीने रडू कोसळले …पहा आणि ऐका नेमके योगेश टिळेकर यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात आहे तसे …
१५ वर्षात कोणी केली नाही एवढी कामे केली -आमदार टिळेकरांचा दावा …. (व्हिडीओ)
गळून पडतील ‘त्या’ आक्रमक निष्ठावंतांच्या तलवारी ……..
पुणे- ‘त्यांचा निरोप जाऊ देत ,त्यांची ‘मनधरणी ‘ ‘त्यांच्या’कडून होऊ देत आपोआप ‘पक्ष हिताच्या ‘ गोंडस नावाखाली ‘त्या ‘ निष्ठावंतांचा विरोध मावळून पडेल ..आणि तेच घोषणा देतील ..सबसे बडा खिलाडी …====
कॉंग्रेसचे वाट्टोळे जर कोणी करू शकते तर अन्य पक्षांची त्या साठी आवश्यक्यता निश्चितच नाही. कॉंग्रेस मधीलच निष्ठावंत म्हणवून घेणारे ‘ते ‘ मुठभर त्यासाठी कायम कार्यरत राहिले आहेत याची प्रचीती गेली कित्येक वर्षे कॉंग्रेस मधील जुन्या जाणत्या ..पण ‘सिर्फ देखते रहो..झंडा लहराते रहो’ एवढीच ताकद उरलेल्या पण शेकडो कार्यकर्त्यांनी वारंवार घेतली आहे . वारंवार म्हणण्यापेक्षा जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न येतो , तेव्हा, तेव्हा याची प्रखर प्रचीती आली आहे . बॅरिस्टर गाडगीळ यांच्या अस्ताच्या काळात सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व उदयास येत असताना असे अनेक ‘निष्ठावंत ‘ कॉंग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिलेत, ज्यांनी कलमाडींना प्रखर विरोध केला .धनशक्ती विरुद्ध आमची लढाई आहे असा आभास तेव्हाही निर्माण केला गेला .पण पुढे काय झाले ? हेच सारे ‘ निष्ठावंत ‘ पक्षहिताच्या गोंडस नावाने ,नंतर कलमाडींच्या आगे मागे हुजरेगिरी करताना सातत्याने दिसून आले .याच पर्वाची आताही पुनुरावृत्ती होत असल्याचे समीक्षकांना वाटते आहे .
पुण्याच्या कॉंग्रेसला कलमाडी नंतर कोणी खमक्या नेता मिळाला नाही, म्हणून सामुहिक नेतृत्वाचा पर्याय स्वीकारावा लागला आणि प्रत्येकजण नेता बनला .पण कार्यकर्ता मात्र विखुरला गेला .आणि कार्यकर्ता सांभाळणारा संपूर्ण शहर पातळीवरचा नेता दिसेनासा झाला . भाजपच्या हाती सत्ता गेली आणि कॉंग्रेसची अवस्था आणखीच सैरभैर झाली .आता नोटबंदी ,महागाई आणि एकूणच आणखी काही कारणांनी भाजपच्या विषयी नाराजी पसरली असताना कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत प्रियांका गांधी ,राहुल गांधी यांचा चेहरा लाभला आणि अनुकूल वातावरण आहे पण शहरात नेता नाही, असे वातावरण असताना बाहेरचा शक्तिशाली नेता मिळू शकतो असे चित्र असताना पुन्हा कॉंग्रेसचे ‘ते ‘ निष्ठावंत ‘ पक्षहिता ऐवजी स्व हिताला महत्व देवून कॉंग्रेसचे खच्चीकरण करायला ‘गुढग्याला बाशिंग ‘ लाऊन पुढे येताना दिसू लागले आहे .
दरम्यान पुन्हा एस के म्हणजे संजय काकडे नामक नव्या नेत्या चा आता कॉंग्रेस मध्ये उदय होण्याची चिन्हे असताना ,प्रवीण
गायकवाड नावाची ची नवी खेळी देखील चाणक्यनीति ने खेळली जाऊ लागली आहे . खुद्द प्रवीण गायकवाड यांनाही आपण पुण्यातून लोकसभा लढवू शकतो काय ,निवडून येवू शकतो काय याबाबत साशंकता आहेच . असे असताना त्यांच्या नावाची ‘पुडी’ कोणी का सोडावी हा प्रश्न जाणकारांना नाहक विचार करण्यासारखा वाटतो आहे.
पृथ्वीराज चौव्हाण ,हर्षवर्धन पाटील या सारख्या नेत्यांनी खरे तर या साऱ्या गोष्टींचा विचार केलाही असेल , ,ज्यांनी आयुष्यभर प्रगल्भ वाचनाचा आधार घेऊन पोपटपंची केली ,अनेक महामंडळाच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली , त्यांना कधी 4 कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत जर कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलाविले तर घरापासून कार्यक्रमस्थळी न्यायला आणायला गाडी आणि सोबत कार्यकर्ता किंवा माणूस हि पाठवावा लागतो .अशाज्येष्ठ अभ्यासक असलेल्या पण महापालिकेची निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या जाणकारांकडून राहुल गांधींना होणारा खाजगी पत्रप्रपंच ,राहुलगांधींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विशिष्ठ माध्यामंना कसा पोहोचतो , त्यामागे गौड बंगाल आहे कि षड्यंत्र आहे ? असे प्रश्न हि आता कॉंग्रेसच्या खऱ्या ..म्हणजे निव्वळ कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्याना निरर्थक वाटणार आहेत .निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांचा विचार जरूर झाला पाहिजे , पण कोणत्या निवडणुकीच्या वेळी कोणत्या कार्यकत्यांचा विचार व्हावा हि गोष्ट त्यांना महत्वाची वाटते आहे . लोकसभेला कॉंग्रेसकडे निवडून येण्याची क्षमता असलेला आज तरी उमेदार नाही हे वास्तव ते जाणून आहेत .आणि निवडून येण्याची क्षमता असणारे नवे नेतृत्व येण्या पूर्वी त्या नेतृत्वाने , आपली जागा म्हणजे स्व् जागा कायम ठेवावी आपला मान राखावा ,एवढ्यासाठीच ‘त्या ‘निष्ठावंत लोकांची धडपड सुरु आहे. हे देखील नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे असे खऱ्या कार्यकर्त्याला वाटते आहे .
प्रवीण गायकवाड यांचा विषय मात्र वेगळा आहे , त्यांना कॉंग्रेस ने उमेदवारी का म्हणून द्यावी ,त्यांची क्षमता लोकसभा जिंकण्याची नाहीच आणि नाही ..खिलाडी बनण्याची .. मग राष्ट्रवादीचा कोणी बडा नेता .. हि ‘पुडी ‘ का सोडतो आहे .. कि हि पुडी सोडून अन्य काही साधायचे आहे ,यावर विचार गरजेचा आहे . तुम्हाला प्रवीण चालेल कि संजय चालेल ? असा इशारा द्यायचा आहे काय ?या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे असेही कार्यकर्त्यांना वाटते आहे .
शिवाजीनगर वसाहतीतील 200 पोलीस कुटुंबातील महिलांची आरोग्य तपासणी
पुणे – बारा बारा तासांची ड्युटी, त्यामुळे अनिमित दिनश्चर्या……दिवसातील अधिकांश वेळ ड्युटी कऱण्यात जात असल्याने ते कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आरोग्याचा चार्तुमास उपक्रमांतर्गत आज पोलीस मुख्यालयामागे असलेल्या शिवाजीनगर पोलिस वसाहतीत रहात असलेल्या पोलीस कुटंबातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे शिबीर आयोजित केले होते. याच पोलिस वसाहतीशेजारी असलेल्या पोलीसांच्या दवाखान्यात झालेल्या या शिबिरात 200 महिलांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली.
आमदार काळे यांनी मगिलवर्षी जून महिन्यापासून महिलांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी आरोग्याचा चार्तुमास हा उपक्रम बोपोडी येथे शिबिराचे आयोजन करून सुरू केला. या शिबिराला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमाचे अनुकरण भाजपच्या प्रत्येक आमदाराने मतदारसंघात करावे अशा सूचनाही त्यांनी नंतर सर्वांना दिल्या. त्यानंतर गोखलेनगर, गर्भवती महिलांची तपासणी, खडकी, बोपोडी रेल्वे पोलीसदल वसाहत या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली होती. आज शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील दवाखान्यात झालेले सहावे शिबीर आहे. आजच्या या शिबीराचे औपचारिक उदघाटन आमदार विजय काळे यांनी केले. यावेळी या शिबिरासाठी समन्वयक म्हणून पोलीस आयुक्तांनी जबाबदारी दिलेले पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस दवाखान्याचे डॉ. धनंजय राऊत व त्यांचे सहकारी उपस्थीत होते.
या शिबिरात तपासणीसाठी येणा-या महिलांना आरोग्य तपासणीची महिती एकत्रित राहू शकेल अशी एक पुस्तिका देण्यात आलेली आहे. तपासणीनंतर डॉक्टर त्या पुस्तिकेत नोंद करत होते. त्यामुळे त्या महिलेला काही झाले तर ती पुस्तिका सोबत नेल्यास त्यांच्या आरोग्याची पूर्व महिती (पेशंन्टस हिस्टरी) संबंधित डॉक्टरांना महिती होऊ शकणार आहे. तसेच ज्यांना रूग्णालयात जाण्याची आवश्यकता भासणार आहे अशा महिलांना पुढील सहा महिन्यात त्या रूग्णलयात मोफत उपचार केले जाणार असल्याची महिती आमदार विजय काळे यांनी महिलांना दिली.
शिबीरात बेस्टकॅन्सरसाठीची मेमोग्राफी, स्त्रीरोग, मधुमेह, हृदय कान नाक घसा, दंत तपासणी, हाडांची तपासणी. कंबर किंवा गुडघे दुखी, रक्त, हिमोग्लोबीन अशा तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्या करण्यासाठी खडकीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश भोसले, सिव्हील हॉस्पिटलचे सहमुख्य अधिक्षक डॉ. जगदाळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर आणि त्यांचे सहकारी, ससून रूग्णालयाचे डॉ. तावरे व त्यांचे सहकारी यांनी केल्या. अशा प्रकारे पोलीस कुटुंबातील महिलांसाठी आरोग्य तपासणीचे शिबीर पहिल्यांदाच होत असल्याची भावन अनेक महिलांनी व्यक्त केली.
पोलीस मुख्यलयाशेजारी असलेल्या शिवाजीनगर पोलीस वसाहतीत एकूण 900 (नऊशे) पोलीस कुटुंब रहातात. त्यांना मागिल दोन दिवसात आरोग्य पुस्तिका आणि पत्रकांचे वाटप घरोघर जाऊन कऱण्यात आले होते. या पूर्वी बोपोडी येथील रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबातील महिलांच्या आरोग्याची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याचा चार्तुमास अंतर्गत झालेल्या मोफत आरोग्य तपासणीच्या सहा शिबिरात एकूण दहा हजार महिलांच्या आरोग्याची तपासणी कऱण्यात आलेली आहे.
फुले-आंबडेकरांना डॉ. गेल यांनी जागतिक स्तरावर नेले डॉ. रावसाहेब कसबे
स्थायीचे समितीचे अध्यक्षपद मिळणार तरी कोणाला ?
पुणे :महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी , नगरसेवक सुनील कांबळे यांना सलग दुसर्यांदा संधी मिळाल्यानंतर अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असताना ,लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील जातीय समीकरणाचा विचार झाल्यास मराठा समाजाला आता अध्यक्ष पद दिले पाहिजे अशी मागणी जोर धरत असून त्या अनुषंगाने उमेश गायकवाड ,राजेंद्र शिळीमकर, दिलीप वेडे पाटील,हेमंत रासने हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत पुढे आले आहेत आणि त्यांनी आपल्या दृष्टीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे . याच पार्श्वभूमीवर आज खा.काकडे समर्थक म्हणून गणले जाणारे शिळीमकर यांनी बापट यांची भेट वेडे पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातच घेण्याचा प्रयत्न केल्याने यावेळी उपस्थित असलेल्या स्थायीच्या माजी अध्यक्षाने ‘काय फिल्डिंग काय ‘ म्हणून थेट उल्लेख केला .
स्थायी चे अध्यक्षपद भाजपकडे आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त होणार्या सदस्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार, कि जुन्या सदस्यांमधून कोणाची वर्णी लागणार यावर मंथन होते आहे .भाजपने तीन ज्येष्ठ नगरसेवकांना एकाच वेळी संधी दिल्याने आता अध्यक्षपदासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना सलग दुसर्यांना संधी मिळाली आहे. तब्बल पाच टर्म नगरसेवक असलेल्या कांबळे यांची गतवर्षी अध्यक्षपदाची संधी हुकली. त्यामुळे ते यावर्षी पुन्हा प्रयत्नशील होते. आता स्थायी समितीत त्यांच्या पुनरागमनामुळे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
पालिकेत सद्यःस्थितील महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदे मानली जातात. त्यामध्ये केवळ स्थायीचे अध्यक्षपद योगेश मुळीक यांच्या रूपाने सध्या मराठा समाजाकडे आहे. त्यात आता या पदावर अन्य समाजाला संधी मिळाल्यास मराठा समाजाकडे एकही महत्त्वाचे पद राहणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
त्यामुळे मराठा समाजाचा विचार झाल्यास शिळीमकर यांच्यासह गायकवाड,वेडे पाटील यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने राजकीय समीकरणे झाल्यास कांबळे यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा वर्षभराची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यात चालू वर्षात होणारे महापौरपदाचे आरक्षण महत्त्वाचे ठरणार असून त्यावर पुढील राजकीय गणिते बदलणार आहेत.
त्याचबरोबर पक्षात ज्येष्ठ असलेले रासनेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील प्रमुख उमेदवार मानले जात आहेत.
स्थायी समितीतील भाजपचे सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन अशा आठ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची गुरुवारी मुख्य सभेत निवड करण्यात आली. त्यामध्ये रिपाइंला एक जागा देताना भाजपने पक्षीय समतोल साधला आहे. लोकसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजपने वडगाव शेरी वगळता अन्य पाच विधानसभा मतदारसंघांतील सदस्यांना संधी दिली आहे. भाजपच्या सहा सदस्यांसाठी प्रत्येक आमदाराला एका नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यात शिळीमकर यांचे नाव आमदार तसेच शहरातील नेत्याकडून देण्यात आले नव्हते. मात्र, शिळीमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच वर्णीसाठी प्रयत्न केले आणि थेट त्यांच्या कोट्यातून स्थायी समितीत वर्णी लावत अन्य इच्छुकांना धक्का दिला.आता पुन्हा काकडे यांच्यामार्फत सीएम कोट्यातून स्थायीचे अध्यक्षपद जाणार कि, सीएम यांनाच गिरीश बापट यांच्या मताचा आता विचार करावा लागणार ? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. शेवटी भाजपचे स्थानिक नेतृत्व पालकमंत्री आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडे असले तरी ,पुणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय काहीही होत नाही हे वास्तव आहे . अध्यक्षपदाच्या या शर्यतीतील कोणाच्या गळ्यात सीएम माळ घालतील हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे .
कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी -पालकमंत्री गिरीश बापट
पुणे- प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी आपल्या कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न वऔषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखा ऑनलाईन प्रणाली उद्घाटन, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव व जिल्हा नियोजन समिती नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत तलाठयांना लॅपटॉप वितरण समारंभ कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ई फेरफार प्रकल्प समन्वयक रामदास जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.
श्री. बापट पुढे म्हणाले की, प्रशासकीय कामामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. आपण अनेक चांगली कामे केलेली आहेत. आपल्या कार्यालयाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सर्वांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. आधुनिकीकरणाचा फायदा करुन घेतला पाहिजे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मानसिकता ओळखून त्यास सन्मानाची वागणूक देऊन काम करा. यावर कार्यालयाची प्रतिमा अवलंबून असते. आपणास काम करण्यास लागणाऱ्या साहित्याची पूर्तता केली जाईल. आपण अशीच चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, शासनासाठी महसूल विभाग हा महत्त्वाचा असून पुणे जिल्हा हा सातबारा संगणकीकरणाच्या कामात पुढे आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे नेहमी आपले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. महसूल विभागात आपली भूमिका महत्त्वाची असून आपणावर कितीही ताणतणाव असला तरी आपण आपली मानसिकता सकारात्मक ठेवून प्रत्येक नागरिकासोबत चांगले वागणे गरजेचे आहे. यापुढेही आपण अधिक चांगले काम करुन दाखवू, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते एकूण 39 गुणवंत कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान केला तर एकूण 16 तलाठी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्याने आजारांवर मात : डॉ. जगन्नाथ दीक्षित
भारत फोर्जचा भारत इलेक्ट्रॉनिक्ससोबत समझोता करार
बंगलोर- येथे सुरु असलेल्या ‘एरो इंडिया २०१९’ या प्रदर्शनात भारत फोर्ज लिमिटेड व भारत सरकारच्या नवरत्नांपैकी एक, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्यम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) यांच्यादरम्यान एक विशेष समझोता करार करण्यात आला आहे. संरक्षण व एरोस्पेस उत्पादने/तंत्रप्रणाली या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य करून स्वदेशी बाजारपेठेतील नवनवीन संधींचा तसेच भारत सरकारच्या मेक इन इंडियासारख्या उपक्रमांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे.
या समझोता करारामुळे भारत फोर्ज व बीईएल यांना त्यांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे विकसित केलेली संरक्षण उत्पादने / तंत्रप्रणाली जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घेता येईल. अशाप्रकारे या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्यात प्रोत्साहन धोरणाचाही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतील.
रडार व शस्त्रास्त्रे तंत्रप्रणाली, एनसीएस व संचार व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री व वैमानिकी, नौसेनेसाठी लागणारी तंत्रप्रणाली, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स उत्पादने, टॅंक इलेक्ट्रॉनिक्स व गन सिस्टिम्स, सॅटकॉम, देशांतर्गत सुरक्षा व स्मार्ट सिटीसाठी लागणारी सोल्युशन्स, स्ट्रॅटेजिक कंपोनंट्स आणि निवडक नागरी उत्पादनांची रचना, विकास, अभियांत्रिकी व उत्पादन यामध्ये बीईएल कुशल आहे.
भारत फोर्ज ही तब्बल ३ बिलियन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या कल्याणी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. दर्जेदार, अतिशय चांगली कामगिरी बजावणाऱ्या, नाविन्यपूर्ण सुरक्षा तसेच इतर महत्त्वपूर्ण कामांशी संबंधित उत्पादने व सुविधा विविध क्षेत्रांना पुरवणारी ही जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, ऊर्जा, बांधकाम व खाण, समुद्री वाहतूक व व्यापार, तेल व वायू अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपनीची उत्पादने व सेवा वापरल्या जातात. संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत तोफा, बंदुका, युद्धात वापरल्या जाणाऱ्या गाड्या, संरक्षित वाहने, दारुगोळा, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स व छोटी हत्यारे यांची रचना, विकास, अभियांत्रिकी व उत्पादन यामध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.
भारत फोर्जचे अध्यक्ष व सीईओ (डिफेन्स अँड एरोस्पेस) श्री. राजिंदर सिंग भाटिया व बीईएलच्या मार्केटिंग विभागाच्या डायरेक्टर श्रीमती आनंदी रामलिंगम यांनी भारत फोर्जचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाबा कल्याणी व बीईएलचे सीएमडी श्री. गौतमा एम व्ही यांच्या उपस्थितीत या समझोता करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
कोणतेही पाकिस्तानी उत्पादन न विकण्याचा ‘दादर व्यापारी संगठने’चा निर्णय!
- पुलवामा दहशतवादाचा निषेध नोंदवण्यासाठी दादरमधीलव्यापाऱ्यांची एकजूट!
- शाहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी ‘दादर व्यापारी संगठनेची भरीव मदत!
- सर्व रक्कम एकत्रीत करून मुख्यमंत्र्यांकड़े सुपूर्द करणार!
- कोणतेही पाकिस्तानी उत्पादन न विकण्याचा संगठनेचा निर्णय!
- दादर व्यापारी संघटनेने अर्धा दिवस दुकाने बंद करून वाहिलीजवानांना श्रद्धांजली!
- भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी दादर व्यापारीएकजूटीचा ‘लॉंग मार्च‘
मुंबई-पुलवामा दहशतवादाचा निषेध नोंदवण्यासाठी काल दादरमधील सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत प्रचंड लॉंग मार्च काढून देशासाठी कायम बलिदान देणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. जनता या शूरवीरांचं बलिदान कदापी विसरणार नाही. आमच्या सर्व संगठना या जवानांच्या कुटुबीयांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यासाठी आमच्या संगठनांनी ठोस पाऊले उचलून निधी गोळा करायला सुरुवात केली असून व्यापारी वर्ग स्वतःहून पुढाकार घेत आहे. हा हल्ला करणाऱ्या पाकिस्तानातील संघटनांचा आम्ही तीव्र निषेध करतोय, यापुढे पाकिस्तानातील एकही वस्तू आमचे व्यापारी विकणार नाहीत, असे संघटनेच्या वतीने महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर,भैरव शहा, राजेश छेडा यांनी व्यक्त करीत या हल्ल्यात प्राण गमावून शाहिद झालेल्या भारताच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्राची खरी श्रीमंती म्हणजे त्याचे सैन्य, आणि या सैन्यावर जेव्हा असे भ्याड हल्ले होतात आणि आपले बहादूर जवान शाहिद होतात तेव्हा देश शोक सागरात बुडून हळहळ व्यक्त करतो आणि देशासाठी एकजुटीने आपल्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पाकिस्तानी अतिरेकी संघटनेने भ्याड हल्ला करून भारत मातेच्या ४४ शूर वीर पुत्रांचं घेतेलेलं बलिदान हे प्रत्येक भारतीयाच्या मनात सलत असून प्रत्येकात चीड निर्माण करीत आहे. या हल्याचा सर्वत्र तीव्र निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर दादर येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपली एकजूट दाखवीत काल त्यांची सर्व दुकाने बंद करून शत्रू राष्ट्राचा आणि दहशतवादाचा धिक्कार करीत प्रचंड लॉंग मार्च काढून निषेध नोंदवला. तसेच पाकिस्तानमधील एकही वस्तू यापुढे आम्ही विकणार नाहीत असा पवित्रा जाहीर केला. या मोर्चामध्ये जवळपास २५०० हून अधिक व्यापारी – कर्मचारी सामील झाले होते. यामध्ये ‘दादर व्यापारी संघ’, ‘उपनगरीय सराफी संघटना’, ‘सुवर्णकार कारागीर संघटना’, ‘मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ’, ‘दादर मेटल मर्चंट असोसिएशन’, ‘दादर हॉटेल संघटना’, ‘दादर धान्य व्यापारी संघटना’, ‘दादर फेरीवाले संघटनानी’ महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या सर्व संघटनांनी शाहिद जवानांच्या कुटुंबियांकरिता मदत म्हणून ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यक निधी’साठी कमीत कमी १००० रुपये पासून जास्तीतजास्त भरगोस मदत, दोन दिवसांच्या आत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर,भैरव शहा, राजेश छेडा यांनी केली. त्यासाठी “दादर व्यापारी संघ” या नावे धनादेश गोळा करून लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत.
आरोग्य चांगले राहण्यासाठी ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे-” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीश सरडे व लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. के. यादव यांच्याहस्ते करण्यात आले . पर्वतीमधील निर्मल बाग हॉलमध्ये झालेल्या ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यास योगाचार्य सतीश अरगडे , आंतरराष्ट्रीय योगाचार्य शिवाजी घोडके , ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे , डॉ. मृणाल आशय जमदाडे , लोकमान्य नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.सुरेखा यादव, समाजसेविका मेघना ससाणे , टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मनोजा जोशी , अजित जमदाडे , सुनिता जमदाडे , सुप्रिया ताम्हाणे , शितल कचरे आदी मान्यवर उपस्थित होते .
आजच्या धकाधकीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घर व्यवस्थित राहील . महिलांनी आपल्या दैनदिन जीवनातून आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे . त्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना योगासने व प्राणायाम करता येतील . या पुस्तकात सर्व आसनांची माहिती सचित्र माहितीसह प्रकाशित केली आहेत . त्यामुळे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . अशी माहिती ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे यांनी दिली .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कमल मारुती ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगल बोरावके यांनी केले तर आभार डॉ. मृणाल आशय जमदाडे यांनी मानले .
मानसी किर्लोस्कर यांचे केंब्रिज, मॅसॅच्युसेट्समधील ‘एमआयटी इंडिया कॉन्फरन्स’मध्ये विशेष भाषण
पुणे-किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांना केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे नुकत्याच १६ फेब्रुवारीला झालेल्या ‘एमआयटी इंडिया कॉन्फरन्स’मध्ये विशेष भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘इंडियाज कॉम्पिटिटीव्ह एज’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत सरकार, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्तपुरवठा, सामाजिक प्रभाव व चित्रपट उद्योग आदी विविध क्षेत्रांतील वक्त्यांनी व विचारवंतांनी सहभागी होऊन प्रेरणादायी कथा व भारताची यशस्वी कामगिरी मांडली.
मानसी किर्लोस्कर यांनी ‘Education to Free India’ या विषयावर दमदार भाषण देऊन उपस्थित मान्यवरांवर छाप पाडली. त्या म्हणाल्या, “वर्गामध्ये सर्व विद्याशाखांचा समन्वय घडवणे हा विद्यार्थ्यांसाठी शंका, संवाद व आकलनातून शिकण्यास प्रेरणा देणारा मार्ग असतो आणि तो केवळ अमूर्त व वास्तव संकल्पनांच्या सखोल अनुभूतीचे सर्वोत्तम संवर्धन घडवत नाही, तर सांघिक कार्य व परस्परांप्रती आदराची ताकदवान मानवी मूल्येही रुजवतो. जगातील सर्वांत मोठ्या युवा लोकसंख्येच्या नैतिक प्रगतीसाठी हीच मूल्ये महत्त्वाची असतात.”
आपल्या भाषणाचा समारोपही तितक्याच प्रभावी पद्धतीने करताना मानसी म्हणाल्या, “भारत हे एक महान राष्ट्र आहे. त्याची भव्यता वर्षानुवर्षे काळजीपूर्वक रक्षण केलेल्या संस्कृतीच्या संचयात आहे. श्रद्धा, आहार, वेशभूषा व भाषा यात विविधता असणारे लोक येथे शांतीपूर्वक एकत्र राहतात. आमची ताकद आमच्या वैविध्यात आहे आणि अभिनवता हे या वैविध्याचे फलित असेल. असहिष्णुतेच्या प्रकारातून मुक्त होऊन आपण सर्वांना एकत्र आणणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करुया.”
मानसी किर्लोस्कर यांची नुकतीच शाश्वत विकास ध्येयांसाठी फर्स्ट युनायटेड नेशन्स इन इंडिया यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून नियुक्ती झाली आहे. मानसी यांनी ‘केअरिंग विथ कलर’ हा सामाजिक विनानफा नवउद्योग स्थापन केला आहे. वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी शाळांत शिक्षणाचे रुप पालटून टाकण्याचे या उद्योगाचे ध्येय आहे.
उद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत -डॉ. राजेंद्र जगताप यांचा सल्ला
फोरसाइट महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न
पुणे-यशस्वी कारकीर्द आणि एकूणच जीवनात सफल होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान , कौशल्य याबरोबर भावनिक आणि मानसिक प्रशिक्षनाची आवश्यकता असल्याचे मत आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकांत कोठारी यांनी व्यक्त केले .
फोरसाइट महाविद्यालयातील बी कॉम , बी बी ए आणि बी बी ए ( सी ए) च्या विद्यार्थ्यांना विजयकांत कोठारी यांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली . यावेळी फोरसाइटचे संचालक शैलेश मेहता , नगरसेवक विशाल धनवडे , , प्रा. मन्सूर खान , प्रा. रवी पिल्ले , निशा मेहता ,प्रा. शिल्पा खाडे आदी मान्यवर उपस्थित होते .
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिराव फुले , महर्षी कर्वे यांच्या सारख्या महान व्यक्ती महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते . अनेक समस्यांना तोंड स्वतः शिक्षण घेतले . समाजात शिक्षणाचा प्रसार करून देश घडविण्यात मोठा वाटा उचलला ,अशा आदर्शांचा करणे आवश्यक आहे असे विजयकांत कोठारी यांनी व्यक्त केले .
सध्याच्या काळात केवळ औपचारिक शिक्षण घेणे पुरेसे नाही . आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य आणि सवांद कला आत्मसात करणे आवश्यक आहे . असे नगरसेवक विशाल धनवडे यांनी नमूद केले आहे .
महाविद्यालयामध्ये शिक्षणाबरोबर विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वागीण विकास साधणे यावर भर दिला जातो , फोरसाइटच्या संस्थेच्यावतीने आठवी ते दहावी शैक्षणिक वर्ग सुरु करणार आहोत . असे फोरसाइटचे संचालक शैलेश मेहता यांनी सांगितले .
यशाच्या राज्यमार्गावर चालत असताना आपल्यासाठी झटणाऱ्या आई – वडील , शिक्षक यांना कधी विसरू नका , असे मत प्रा. रवी पिल्ले यांनी व्यक्त केले .
कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक निशा मेहता यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शिल्पा खाडे यांनी केले . तर आभार प्रा. अर्चना म्हस्के यांनी मानले .


