आरोग्य चांगले राहण्यासाठी ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन

Date:

पुणे-” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीश सरडे व लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी.  के. यादव  यांच्याहस्ते करण्यात आले . पर्वतीमधील निर्मल बाग हॉलमध्ये झालेल्या  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यास योगाचार्य सतीश अरगडे आंतरराष्ट्रीय योगाचार्य शिवाजी घोडके ,  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे डॉ. मृणाल आशय जमदाडे लोकमान्य नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.सुरेखा यादव,   समाजसेविका मेघना ससाणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मनोजा जोशी अजित जमदाडे सुनिता जमदाडे सुप्रिया ताम्हाणे शितल कचरे  आदी मान्यवर उपस्थित होते .

आजच्या धकाधकीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घर व्यवस्थित राहील . महिलांनी आपल्या दैनदिन जीवनातून आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे . त्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना  योगासने व प्राणायाम करता येतील . या पुस्तकात सर्व आसनांची माहिती सचित्र माहितीसह प्रकाशित केली आहेत . त्यामुळे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . अशी माहिती  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे यांनी दिली .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कमल मारुती ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगल बोरावके यांनी केले तर आभार  डॉ. मृणाल आशय जमदाडे यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....