पुणे – बारा बारा तासांची ड्युटी, त्यामुळे अनिमित दिनश्चर्या……दिवसातील अधिकांश वेळ ड्युटी कऱण्यात जात असल्याने ते कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आरोग्याचा चार्तुमास उपक्रमांतर्गत आज पोलीस मुख्यालयामागे असलेल्या शिवाजीनगर पोलिस वसाहतीत रहात असलेल्या पोलीस कुटंबातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे शिबीर आयोजित केले होते. याच पोलिस वसाहतीशेजारी असलेल्या पोलीसांच्या दवाखान्यात झालेल्या या शिबिरात 200 महिलांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली.
आमदार काळे यांनी मगिलवर्षी जून महिन्यापासून महिलांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी आरोग्याचा चार्तुमास हा उपक्रम बोपोडी येथे शिबिराचे आयोजन करून सुरू केला. या शिबिराला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमाचे अनुकरण भाजपच्या प्रत्येक आमदाराने मतदारसंघात करावे अशा सूचनाही त्यांनी नंतर सर्वांना दिल्या. त्यानंतर गोखलेनगर, गर्भवती महिलांची तपासणी, खडकी, बोपोडी रेल्वे पोलीसदल वसाहत या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली होती. आज शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील दवाखान्यात झालेले सहावे शिबीर आहे. आजच्या या शिबीराचे औपचारिक उदघाटन आमदार विजय काळे यांनी केले. यावेळी या शिबिरासाठी समन्वयक म्हणून पोलीस आयुक्तांनी जबाबदारी दिलेले पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस दवाखान्याचे डॉ. धनंजय राऊत व त्यांचे सहकारी उपस्थीत होते.
या शिबिरात तपासणीसाठी येणा-या महिलांना आरोग्य तपासणीची महिती एकत्रित राहू शकेल अशी एक पुस्तिका देण्यात आलेली आहे. तपासणीनंतर डॉक्टर त्या पुस्तिकेत नोंद करत होते. त्यामुळे त्या महिलेला काही झाले तर ती पुस्तिका सोबत नेल्यास त्यांच्या आरोग्याची पूर्व महिती (पेशंन्टस हिस्टरी) संबंधित डॉक्टरांना महिती होऊ शकणार आहे. तसेच ज्यांना रूग्णालयात जाण्याची आवश्यकता भासणार आहे अशा महिलांना पुढील सहा महिन्यात त्या रूग्णलयात मोफत उपचार केले जाणार असल्याची महिती आमदार विजय काळे यांनी महिलांना दिली.
शिबीरात बेस्टकॅन्सरसाठीची मेमोग्राफी, स्त्रीरोग, मधुमेह, हृदय कान नाक घसा, दंत तपासणी, हाडांची तपासणी. कंबर किंवा गुडघे दुखी, रक्त, हिमोग्लोबीन अशा तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्या करण्यासाठी खडकीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश भोसले, सिव्हील हॉस्पिटलचे सहमुख्य अधिक्षक डॉ. जगदाळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर आणि त्यांचे सहकारी, ससून रूग्णालयाचे डॉ. तावरे व त्यांचे सहकारी यांनी केल्या. अशा प्रकारे पोलीस कुटुंबातील महिलांसाठी आरोग्य तपासणीचे शिबीर पहिल्यांदाच होत असल्याची भावन अनेक महिलांनी व्यक्त केली.
पोलीस मुख्यलयाशेजारी असलेल्या शिवाजीनगर पोलीस वसाहतीत एकूण 900 (नऊशे) पोलीस कुटुंब रहातात. त्यांना मागिल दोन दिवसात आरोग्य पुस्तिका आणि पत्रकांचे वाटप घरोघर जाऊन कऱण्यात आले होते. या पूर्वी बोपोडी येथील रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबातील महिलांच्या आरोग्याची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याचा चार्तुमास अंतर्गत झालेल्या मोफत आरोग्य तपासणीच्या सहा शिबिरात एकूण दहा हजार महिलांच्या आरोग्याची तपासणी कऱण्यात आलेली आहे.