Home Blog Page 1577

संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

पुणे :- प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जेष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांपर्यंत या केंद्राची माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने महानगरपालिका विभागाच्या ६१ उद्यानांची निवड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार संभाजी उद्यान येथे २ फलक लावण्यात आले. या फलकांवर ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती देण्यात आली आहे.

‘चला बोलूया’ ही संकल्पना सर्वोच न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांची आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आले. जिल्हा विधि सेवा प्राधिकर पुणे कार्यालयामार्फत हा उपक्रम कौंटुंबिक न्यायालयात येणाऱ्या दाव्याकरीता सुरु करण्यात आला आहे.

दाखल पूर्व दाव्यांमध्ये समुपदेशन करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात पती-पत्नी मधील वाद पोटगी संबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, मालमत्तेचे वाद या व्यतिरिक्त आई-वडील व मुलांमधील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोड न झाल्यास उभय पक्षकारांना विधि सेवा दिली जाते. गेल्यावर्षी ४३२ दाव्यांपैकी ४२२ दावे निकाली काढण्यात आले.

या उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे, प्रमुख विधि सल्लागार निशा चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

फलकाच्या माध्यमातून वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे शक्य होईल अशी माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांनी दिली आहे.

मंजुश्री खर्डेकरांच्या इशाऱ्यानंतर शिक्षण मंडळातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या:प्रशासकाला जागे करण्यास माजी नगरसेवक सरसावले,आठवड्याभरामध्ये 700 बदल्या !

पुणे- कॉंग्रेसचे अरविंद शिंदे,शिवसेना शिंदे गटाचे नाना भानगिरे आणि आता त्यानंतर भाजपच्या माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनीही महापालिका प्रशासकाला धारेवर धरल्यावर प्रशासकाला जाग आली आणि खर्डेकर यांनि निदर्शनास आणून दिल्यानुसात शिक्षण मंडळातील १७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

शिक्षण मंडळाचा कारभार महापालिकेकडे आल्यानंतर अनेक वर्षे शिक्षण मंडळाकडे काम करणार्‍या १७ कर्मचाऱ्यांच्या वॉर्ड ऑफीसला बदल्या करून प्रशासनाने एक प्रकारे या कर्मचार्‍यांना धक्का दिला आहे.

कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष अरविंद शिंदे आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे शहरअध्यक्ष नाना भानगिरे यांनी अनेक वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली होती.आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने अशा अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने मागील आठवड्यात १३२ कनिष्ठ अभियंते आणि शाखा अभियंत्यांची अन्य विभागात बदली केली होती. तर काल एकाच दिवसांत अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ आणि कनिष्ट लिपिक अशा ६६३ जणांची बदली केली.बदली करताना सेवा ज्येष्ठतेचा विचार करण्यात आला असून यापुर्वी ज्या विभागात काम केले आहेतो विभाग सोडून उर्वरीत विभागामध्ये संबधित कर्मचार्‍याच्या मागणीच्या प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पदावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना एकत्रित बसवूनच त्यांच्या मागणीनुसार बदली करण्यात आली असून
यामध्ये पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनानुसार पारदर्शकपणे बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात आलीअशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.

सारथीमार्फत शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १८ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे झाली. यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा पूर्व परीक्षा) प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वी 250 होती ती वाढवून आता 750 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 8 हजार रुपये 8 महिन्यांसाठी देण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 250 वरून 500 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शिकवणी शुल्क (ट्युशन फी) दीड ते दोन लाख रुपये भरण्यात येत आहे. तसेच त्यांना निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमहिना 13 हजार रुपये 10 महिन्यांसाठी देण्यात येते. बार्टीच्या धर्तीवर पीएचडी फेलोशीप संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर प्रभावी बाजू मांडण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ वकिलांच्या नियुक्तीकरिता टास्क फोर्स समिती गठित करण्यात येत आहे. मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग व अन्य विभागामार्फत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बीज भांडवल व अन्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत स्वयंरोजगारासाठी कोणत्याही व्यवसायाकरिता 20 मे 2022 पूर्वी पात्रता प्रमाणपत्र धारकांना बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील 15 लाखांच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्के अथवा साडे चार लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकारी/नागरी बँकांच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले

महानगरपालिकेतील’या’कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत तात्काळ कार्यवाही करा -फडणवीस

माजी आमदार मेधा कुलकर्णींच्या मागणीवरून उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

पुणे- पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील पदनिर्मितीबाबत व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या सेवकांना महानगरपालिका सेवेत सामावून घेणेबाबतच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत .

या संदर्भात मेधा कुलकर्णी यांनी मायमराठी ला संगितले कि,’पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत गेली अनेक वर्ष उलट सुलट पत्रव्यवहार चालू आहेत. समाज विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सर्व विभाग सकारात्मक असताना व नगर विकास विभागाच्या सर्व प्रश्र्नांना समर्पक उत्तरे मिळालेली असतानाही हा विषय मार्गी लागत नाही यासाठी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

नवी मुंबई मनपा (समाजविकास विभाग), संभाजीनगर मनपा(समुहसंघटिका पद), परभणी मनपा स्थापत्य विभाग पिंपरी-चिंचवड मनपा (RCH), नांदेड मनपा (उपभियंता स्थापत्य),कल्याण डोंबिवली मनपा (वाहनचालक), मीरा भाईदर मनपा विधी विभाग लातूर मनपा (ANM) इ.ठिकाणी ठोक मानधनावर असलेल्या सेवकांना मनपा सेवेत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले.
पुणे मनपा मध्येदेखील आरोग्य विभागाकडील (RCH) च्या 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. असे असताना समाज विकास विभागाकडील या सर्व कर्मचाऱ्यांना हा न्याय का देण्यात येत नाही याचे आश्चर्य वाटते. मनपा वरील आर्थिक बोजा या निर्णयाने फारसा वाढणार नसल्याचेही आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.या सर्वाचा सकारात्मकरित्या विचार करुन समाज विकास विभागाकडील मानधन तत्त्वावरील सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेऊन न्याय द्यावा अशी विनंती या पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यावर त्यांनी त्वरित कार्यवाही करावी असा आदेश UD 2 विभागाला दिला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवासांमध्ये वाचनालय / ग्रंथालय सुरु करणार…



अष्टाविनायकांपासून ते पंढरपूर पर्यंत अनेक धार्मि‍क स्थळे, निसर्गाव्दारे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नदया, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपारिक संस्कृति, खादयसंस्कृति अशा विशिष्ठ वैशिष्ठयांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशभरातून नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसता, पाउलखुणा दिसतात.
पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणेकरिता तसेच नकारात्मक परिणामांना आळा घालणेकरिता, ते कमी करणेकरिता एक साधा आणि वाखणण्याजोगा उपाय म्हणजे जबाबदार पर्यटन, जे आज संपूर्ण जगभरात पुष्कळ ठिकाणी स्विकारले गेले आहे. जबाबदार पर्यटन या संकल्पनेचा मुळात उददेश हाच आहे कि सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्विकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे. आजच्या स्पर्धात्मक युगात पर्यटन व्यवसाय खुप वाढीस लागला असून पर्यटनाला खुप चालना मिळाली आहे. पर्यटनाबरोबरच आपला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जोपासणे आवश्यक आहे. या परंपरांची आणि वारशाची इत्यंभुत माहीती पर्यटकांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला असणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणुन वाचन संस्कृती वाढीस लागणे आवश्यक असल्याचे दिसुन येत आहे. मुलांना मोबाईल आणि केबलच्या आभासी जगातुन बाहेर काढुन आपल्या समृध्द असलेल्या भारतीय परंपरेची ओळख ही वाचन परंपरेतुन करुन देता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील महामंडळाच्या सर्व पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणी ऐतिहासिक माहिती, महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती, संतांची माहिती, क्रांतीकारांची माहिती, हिंदी/इंग्रजी/मराठी या भाषांमधील इतर साहित्य इ. महत्वाच्या विषयांची पुस्तके मोठया प्रमाणांत पर्यटकांना उपलब्ध करुन देणे बाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही 15 दिवसांत करावी, अश्या आशयाच्या सुचना श्री. मंगलप्रभात लोढा, मा. मंत्री, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास, महाराष्ट्र शासन यांनी दिल्या आहेत.
महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांचा वास्तव्याचा कालावधी मनोरंजनात्मक व अविस्मरणीय व्हावा. तसेच पर्यटकांच्या आयुष्यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, वैज्ञानिक तसेच सामान्य ज्ञानात अधिकाअधिक भर पडण्याच्या दृष्टीकोनातुन महामंडळामध्ये वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्याचे नियोजन आले होते. प्रादेशिक स्तरावर व काही पर्यटक निवासे येथे वाचनालय सुरु देखील करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन आणि निसर्ग यांसाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्यास अनुसरुन महामंउळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये तृणधान्याचे पदार्थ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जबाबदार पर्यटनाची संकल्पना अंगिकारण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये स्थानिक खादयपदार्थांना प्रोत्साहन दिले जात असुन पर्यटकांचे मन मोहून टाकणारे स्थानिक खादयपदार्थ जसे की पिठले, उसळ, काळा मसाला असे खास पदार्थ पाहुण्यांना सुचविण्यात येणार असुन स्थानिक पाककृतीच्या चवींचा आणि विशिष्टतेचा आनंद पर्यटकांना देण्यात येत आहेत. यास अनुसरून प्रत्येक पर्यटक निवासात पुरेपुर विचार करून सदर मुल्ये प्रत्यक्षरित्या अंमलात आणणार असुन पर्यटकांचे आदरातिथ्य जबाबदार पर्यटन या संकल्पनेस अनुसरून MTDC ची पर्यटकांची मनामध्ये असलेली प्रतिभा अजुन उंचावणार आहोत. प्लॅस्टिक प्रदुषण कमी करताना निसर्गाचे भान ठेवुन कचरा न करणे आणि पर्यावरणाची स्वच्छता ठेवणे या बाबी कटाक्षाने करण्यात येत आहेत.
पर्यटक निवासांच्या ठिकाणी वाचनालय सुरु करण्याबाबत सर्व वरिष्ठ / प्रादेशिक व्यवस्थापक व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा यांनी निर्देशित केले आहे. वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्यासाठी सुयोग्य पर्यटक निवासे येथील जागेची त्वरीत पाहणी करुन ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहेत. सुरु करण्यात आलेल्या वाचनालय / ग्रंथालयात महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती, संतांची माहिती, क्रांतीकारांची माहिती, हिंदी/इंग्रजी/मराठी या भाषांमधील इतर साहित्य इ. महत्वाच्या विषयांची पुस्तके मोठया प्रमाणांत पर्यटकांना वाचनाकरिता सहजरित्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर, महाबळेश्वर या ठिकाणी वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. आगामी काळात पर्यटक निवास लोणार, पर्यटक निवास फर्दापुर या ठिकाणीही वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहेत. लहान मुले आणि जेष्ठ नागरिक असलेल्या पर्यटकांसाठी ही वाचनालये माहीतीची पर्वणी ठरणार आहेत. वाचनाबरोबरच निसर्गाचा समतोल साधत पर्यटनाचा पुरेपुर आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

कारागृहावर आता ड्रोनची नजर

पुणे:

राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार आहे. अशी महिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे पश्चिम विभाग,कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय श्री.सुनील ढमाळ ,येरवडा कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले ,प्राचार्य दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा श्री.चंद्रमणी इंदुरकर इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार १२ ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींवर हालचाली टिपणार आहे. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे , अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीसाठी प्राधान्य दिले आहे.
उत्तर प्रदेश राज्याने देशात प्रथम कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी Drone Camera वापर सुरू केला.महाराष्ट्र राज्य कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी Drone वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे.

राज्यातील कारागृहासह बंदिवानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आता ड्रोनद्वारेही हालचाली टिपण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर 8 मध्यवर्ती 2 जिल्हा कारागृहावर व 2 खुले कारागृहावर ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे.

अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र

संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

पुणे दि. १८: प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्र फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जेष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांपर्यंत या केंद्राची माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने महानगरपालिका विभागाच्या ६१ उद्यानांची निवड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार संभाजी उद्यान येथे २ फलक लावण्यात आले. या फलकांवर ‘चला बोलूया’ या वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती देण्यात आली आहे.

‘चला बोलूया’ ही संकल्पना सर्वोच न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांची आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आले. जिल्हा विधि सेवा प्राधिकर पुणे कार्यालयामार्फत हा उपक्रम कौंटुंबिक न्यायालयात येणाऱ्या दाव्याकरीता सुरु करण्यात आला आहे.

दाखल पूर्व दाव्यांमध्ये समुपदेशन करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात पती-पत्नी मधील वाद पोटगी संबंधीचे वाद, मुलांच्या ताब्याचे वाद, मालमत्तेचे वाद या व्यतिरिक्त आई-वडील व मुलांमधील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोड न झाल्यास उभय पक्षकारांना विधि सेवा दिली जाते. गेल्यावर्षी ४३२ दाव्यांपैकी ४२२ दावे निकाली काढण्यात आले.

या उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त विकास ढाकणे, प्रमुख विधि सल्लागार निशा चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

फलकाच्या माध्यमातून वादपूर्व समुपदेशन केंद्राची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे शक्य होईल अशी माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांनी दिली आहे.
000

आयएमडीआरमध्ये पदविका प्रदान समारंभ

पुणे-डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा (आयएमडीआर) 48 वा ‘पदविका प्रदान समारंभ’ संस्थेच्या सावरकर सभागृहामध्ये संपन्न झाला.विकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांच्या हस्ते पदविका व पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री मल्होत्रा यांनी पदविका धारकांना गेल्या 70 वर्षातील नवीन शोध, वातावरणीय बदल व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले.

आदित्य पुराणिक यांना सुवर्ण पदक आणि समृद्धी कुलकर्णी यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.उपाध्यक्ष महेश आठवले,कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी,आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘सुगम सरिता’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बिझिनेस प्लॅन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. पृथा उबगडे आणि प्रा. अमिता कुलकर्णी यांनी संयोजन केले.

भारतकेंद्रीत शैक्षणिक धोरणाचे कार्यान्वयन यशस्वीपणे करु या – प्रा. अनिरुद्ध देशपांडे

पुणे : नवीन भारतकेंद्रीत शैक्षणिक धोरणाचे कार्यान्वयन करण्यासाठी सिद्ध होण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे या चार संस्थांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देशपांडे बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस.के. जैन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव आणि संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. किशोर देसर्डा उपस्थित होते.

प्रा. देशपांडे पुढे म्हणाले की, विद्यापीठ ही एक लोकतांत्रिक रचना असून त्यातील विधायकता जपली गेली पाहिजे. या दृष्टीने अधिसभेची जबाबदारी मोठी आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये अत्यंत चांगले बदल होऊ घातले आहेत. हे बदल समाजात प्रसृत करण्यासाठी अधिसभा सदस्यांनी आपल्या कर्त्रुत्वाच्या वलयाचा वापर करावा. छात्रकेंद्री शिक्षण, स्त्रीकेंद्री परिवार, मनुष्यकेंद्री विकास आणि गरीबकेंद्री अर्थव्यवस्था अशी चतुःसुत्री डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडली होती, जी खरे तर या सहस्रकाची चतुःसुत्री आहे. याच आधारावर राष्ट्रीयतेचे भरणपोषण करणारे नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. सोनवणे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “पहिली ते पीएच.डी. पर्यंतच्या शिक्षणाचे टप्पे श्रेयांकामध्ये मांडण्याचे महत्वपूर्ण काम देशाच्या इतिहासात प्रथमच झाले आहे. या परिस्थितीत अधिसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्या दृष्टीने विद्यापीठातील बदलांद्वारे समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करणे हे आता सर्वांचे दायित्व आहे.”

डॉ. शरद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये
नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना ‘नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जे बदल समाजात घडवून आणायचे आहेत, त्या बदलांची सुरुवात म्हणजे आजचा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त सदस्य श्री. रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्ष राबविण्याचे काम करताना निर्वाचित अधिसभा सदस्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. हे आव्हान सर्व सदस्य समर्थपणे पेलतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सह सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन महर्षी कर्वे संस्थेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य डॉ. किशोर देसर्डा यांनी केले.

वेताळ टेकडीवर सुप्रिया सुळे ..टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसोबत..

विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार
टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिले.

सुळे यांनी आज वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसोबत टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शहराचा विकास झालाच पाहिजे. आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विकासाच्या बाजूनेच आहोत, तथापि विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी चर्चा करायलाच हवी. त्यासाठी आपण विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

कोथरूड हून पुणे विद्यापीठ तसेच पाषाण-बाणेर-औंध या भागात जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक कोंडी कमी।करण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या रस्त्याचे नियोजन केले आहे. यात बालभारती ते पौड फाटा रस्ता तसेच कोथरुड, पाषाण आणि सेनापती बापट रस्ता या दोन रस्त्यांना जोड देण्यात येणार आहे. यासाठी वेताळ टेकडी फोडून दोन बोगदे आणि एक पूल उभारण्यात येणार आहे. तथापि याला शहरातील पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असून गेल्या आत्यावड्यापासून हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे. यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीही स्थापन झाली असून या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. १६) खासदार सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते.

त्यानुसार आज दुपारी खासदार सुळे यांनी समितीच्या सदस्यांसोबत वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या भावना समजून घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. टेकडी फोडून प्रस्तावित रस्ता आणि बोगदे रद्द करावेत तसेच वेताळ टेकडीला ‘नैसर्गिक वारसास्थळ’, ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर करावे, अशी समितीची मागणी आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी असे त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, हर्षद अभ्यंकर, सुषमा दाते, प्रदीप घुमरे, अवंती गाडगीळ, गौरी मेहेंदळे, अंगद पटवर्धन यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १८ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात.  सदर योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

१८ वर्षांवरील व वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत, प्रकल्प मर्यादा ५० हजारापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.

तसेच, बीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार ते ५ लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के दर साल दर शेकडा व्याजदराने देण्यात येते. तर, बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफ्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरणे गरजेचे असणार आहे.

इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -५१ या ठिकाणी अर्ज सादर करावेत.

ST बस सवलत: जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

पुणे, दि.१८: राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून पुणे जिल्ह्यात १६ एप्रिलपर्यंत १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कोणत्या आगारात किती लाभार्थी:
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १ लाख १६ हजार, स्वारगेट १ लाख ७ हजार, भोर १ लाख ५५ हजार, नारायणगाव २ लाख ८९ हजार, राजगुरुनगर २ लाख २८ हजार, तळेगाव ७५ हजार, शिरुर १ लाख १८ हजार, बारामती २ लाख २८ हजार, इंदापूर १ लाख ७१ हजार, सासवड ९० हजार, दौंड ६३ हजार, पिंपरी-चिंचवड ५१ हजार, एमआयडीसी ८२ हजार असे एकूण जिल्ह्यात १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ६ कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.
0000

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. १८ : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३-२४ अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली असून इच्छुकांनी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज भरावा. अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमत संकेतस्थळावर नोंदणी करावी. स्वतःचा भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करता येईल. साखर कारखाने व गटांसाठी अर्ज करण्याची सुविधा २१ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल.

प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

अर्जदारांना अर्ज करतेवेळी अडचणी आल्यास अथवा अर्जाच्या अनुषंगाने सूचना करावयाच्या असल्यास संकेतस्थळावरील तक्रारी, सूचना या बटनावर क्लिक करून आपली तक्रार किंवा सूचना नोंदवावी, अशी माहिती साखर आयुक्त श्री. गायकवाड यांनी दिली आहे.
0000

आज बिल्किस, उद्या आणखी कोणी असेल…; दोषींच्या सुटकेवर न्यायालयानं सरकारला ठणकावलं

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची गेल्या वर्षी पॅरोलवर मुक्तता प्रकरण

नवी दिल्ली – बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारवर आपल्या झालेल्या बलात्कार प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले.न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली तेव्हा त्यात हे गुन्हेगार पुढील आयुष्यभर तुरुंगात राहाणं अपेक्षित होतं. पण त्यांना सरकारच्या आदेशांनी सोडून देण्यात आलं. आज या महिलेच्या (बिल्किस बानो) बाबतीत हे घडतंय. उद्या तुम्ही किंवा मीही तिच्या जागी असू शकतो. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेताना निश्चित अशी नियमावली असायला हवी. जर तुम्ही आम्हाला याचं कारण दिलं नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने यावर निष्कर्ष काढू”, अशा शब्दांत न्यायालयानं गुजरात सरकारला ठणकावलं आहे.

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची गेल्या वर्षी पॅरोलवर मुक्तता करण्यात आली. गुजरात सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पडसात देशभर उमटल्याचं पाहायला मिळालं. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील एकूण ११ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, गुजरात सरकारने ही शिक्षा पूर्ण होण्याआधीच या गुन्हेगारांना १५ ऑगस्ट २०२२ रोजी पॅरोलवर सोडलं. गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने गुजरात सरकारला फैलावर घेतलं.

बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. “शिक्षा पूर्ण होण्याआधीच गुन्हेगारांची मुक्तता करण्यात आल्यामुळे समाजाच्या मूलभूत मानवी तत्वांनाच धक्का बसला आहे”, असं बिल्किस बानो यांनी याचिकेत म्हटलं होतं. २७ मार्च रोजी त्यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी चालू आहे. यावेळी न्यायालयाने गुजरात सरकारला परखड शब्दांत सुनावलं.

न्यायालयाने यावेळी गुजरात सरकारला सुनावताना महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिप्पणी केली. “राज्य सरकारने या गुन्हेगारांची पॅरोलवर मुक्तता करताना संबंधित गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेणं गरजेचं होतं”, असं न्यायालयाने नमूद केलं. “फक्त केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या निर्णयाला मान्यता दिली याचा अर्थ राज्य सरकारने या प्रकरणात स्वत: विचारच करायचा नाही असा होत नाही”, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं.

“इथे प्रश्न हा आहे की राज्य सरकारने यावर काही विचार केला की नाही? हा निर्णय राज्य सरकारने कोणत्या पुराव्यांच्या आधारे घेतला? न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली तेव्हा त्यात हे गुन्हेगार पुढील आयुष्यभर तुरुंगात राहाणं अपेक्षित होतं. पण त्यांना सरकारच्या आदेशांनी सोडून देण्यात आलं. आज या महिलेच्या (बिल्किस बानो) बाबतीत हे घडतंय. उद्या तुम्ही किंवा मीही तिच्या जाही असू शकतो. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेताना निश्चित अशी नियमावली असायला हवी. जर तुम्ही आम्हाला याचं कारण दिलं नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने यावर निष्कर्ष काढू”, अशा शब्दांत न्यायालयानं गुजरात सरकारला ठणकावलं आहे.

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींवेळी हा गुन्हा घडला होता. ३ मार्च २००२ रोजी बिल्किस बानो यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. गुजरातच्या डाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यात दंगलींमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एकूण १४ जणांमध्ये बिल्किस बानो यांची तीन वर्षांची चिमुकली मुलगीही होती.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन

पुणे दि. १८: यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर च्या सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी केले आहे.

कारखान्याच्या ११ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी ना परतावा म्हणून स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात निवडणूक निधी जमा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. त्या अनुषंगाने सभासदांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- लोणी काळभोर, खाते क्रमांक २००५१६०००४४, आयएफएस कोड- एमएएचबी००००१३१ या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एनइएफटी/आरटीजीएसद्वारे किंवा अकाऊंट पेयी धनादेशाद्वारे वर्गणी भरणा करावा व तपशील पुराव्यासह प्रशासकीय समितीच्या कार्यालयात जमा करावा. वर्गणी भरणा करताना तपशीलात सभासदाचे नाव नमूद करावे.

मयत सभासदांच्या बाबतीत त्यांच्या वारसदारांनी सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अध्यक्ष, प्रशासकीय समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर, कार्यालय- प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे सादर करावीत, असेही कळविण्यात आले आहे.