Home Blog Page 1569

संगमवाडी ते बंडगार्डन एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे काढणे अत्यावश्यक: पालिकेच्या प्रकल्प अभियंत्यांचे स्पष्टीकरण

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही

समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे : पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ झाडे सामाविष्ट आहेत, अशी माहितीही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदी काठच्या बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जी वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत असताना बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत यापूर्वीही पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जी वृक्ष काढली जाणार आहेत, त्यामध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा अजिबात समावेश नाही. तर, मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण हे जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातीमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे. तर, याशिवाय खैर २, निलगिरी २ अशी चार वृक्ष काढण्यात येणार आहेत.
तर, बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम करीत असताना १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहेत. यामध्येही १ हजार २५३ वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील असून अशा झाडांचे प्रमाण हे एकूण काढावयाच्या झाडांच्या ७९ टक्के आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ/विलायती किकर/विलायती चिंच ५७९ अशी एकूण १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे.

परिसंस्था सुधारण्यास होणार मदत

बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे. हे करीत असताना लावण्यात येणारे गवत व वृक्षांचे प्रकार स्थानिक असून सहजगत्या उपलब्ध होऊ शकणारे असेच असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिका जी वृक्ष लावणार आहेत, ती वृक्ष नैसर्गिकदृष्ट्या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी असतील हे वृक्ष हवामान बदल, पूर परिस्थिती आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती तसेच इतर सुक्ष्म बदलांना तोंड देण्यास सक्षम असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ही वृक्ष नदीकाठाच्या संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळण्यासाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्ष्यांची घरटी, निवासस्थाने निर्माण करण्यासाठी, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचरांच्या वाढीसाठी याचाच अर्थ एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी आहेत. याशिवाय, ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व नदीकाठ परिसंस्थेला सुसंगत असलेली योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, करंज, अर्जुन, मुचकुंद, गुलार, कैलासपती, निम, काडंब आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे.

वृक्षांना लावलेल्या फलकांबाबत गैरसमज

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करताना वृक्षांना एक फलक लावून त्यावर नंबर टाकण्यात आला होता. केवळ वृक्षांची संख्या मोजता यावी, यासाठी सर्वेक्षणाचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र समाज माध्यमांवर या फलकांबाबत सुद्धा गैरसमज निर्माण करून देण्याचे काम सुरू आहे. हा फलक ज्या ज्या वृक्षावर आहेत, ते सर्व वृक्ष तोडले जाणार आहेत, अशा स्वरुपाचा संदेश समाज माध्यमातून दिले जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे फलक केवळ सर्वेक्षणाचा भाग आहे.
मुळात, पुणे महानगरपालिका नेहमीच पुणे शहराचा विकास करीत असताना पर्यावरण संवर्धनाला सुद्धा तेवढेच महत्त्व देत असते. पर्यावरण संवर्धन आणि विकास याचा समतोल साधण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केला आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करीत असताना सुद्धा पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी पुणे महानगरपालिका घेत आहे. त्यामुळेच नदीच्या काठापासून जवळ असणाऱ्या जुन्या व दुर्मिळ वृक्षांना वाचवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहेच. तसेच बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जास्तीतजास्त वृक्षांचे पुर्नरोपण करण्यावर भर दिला जातोय. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पुणे महानगर पालिकेकडून ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार आहेत, अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमांवर टाकून चुकीची माहिती प्रसारीत करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातोय. या माहितीमध्ये तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.

संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशभरात ५०,००० हून अधिक यूनिट रक्त संकलित

गंगाधाम पुणे येथे ११८० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पुणे –  ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
              संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन चे प्रमुख आदरणीय ताराचंद करमचंदानी जी यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, पुणे येथे ११८० यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ५०००० हून अधिक रक्त संकलित करण्यात आले.


            सदगुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.
            निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ या दिवशी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते.
          रक्तदानाचे महत्व समजावताना सदगुरु माताजींनी म्हटले, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे. रक्त देताना ते कोणत्या शरीरामध्ये जाईल याचा आपण विचार करत नाही. हे तर एक मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक कार्य आहे. निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले.
           या रक्तदान शिबिराला सुनील शिंदे (आयकर विभाग), माधुरी मिसाळ (आमदार), स्मारथना पाटील (पोलीस उपायुक्त), सुनील कांबळे (आमदार) तसेच विभागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शिवली. या रक्तदान शिबिरामध्ये वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी यांनी ५५० युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ६३० युनिट रक्त संकलन केले.

अभिनेत्री कालिंदी आणि अभिनेता पृथ्वीराज करणार ‘टीडीएम’ चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश

नवख्या कलाकारांना आकार देत भाऊरावांनी ‘टीडीएम’ साकारला, पृथ्वीराज आणि कालिंदीने मानले आभार

रोमँटिक आणि आशयघन कथा घेऊन दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून दोन नवे चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतील, ते म्हणजे ‘ऑफिस बॉय’ पृथ्वीराज थोरात आणि ‘विदर्भ कन्या’ कालिंदी निस्ताने. पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास ‘टीडीएम’च्या टीमला आहे. ‘टीडीएम’मधील गाणी याचा पुरावा देतात. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा आणि बबनमधील गाणी आजही लोकांना भुरळ घालतात. अशातच ‘टीडीएम’मधील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहेत. ‘एक फूल वाहतो सखे’, या गाण्यात पृथ्वीराज आणि कालिंदीमध्ये हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाने तरुण-तरुणींच्या हृदयाला साद घातली आहे. तर ‘मन झालं मल्हारी’ गाण्यानेही प्रेमीयुगुलांना वेड लावलं आहे. या दोन्ही गाण्यांबरोबरच टीडीएमच्या ट्रेलरमध्येही नवखे कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदीच्या जबरदस्त अभिनयाची अनुभूती होते. 

अभिनेत्री कालिंदीला करावा लागला या आव्हानाचा सामना
पृथ्वीराज आणि कालिंदी या दोघांसाठी या भूमिका करणे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. कारण कालिंदी ही मूळची विदर्भातील आहे. त्यामुळे तिची भाषा आणि ‘टीडीएम’मधील तिच्या पात्राची अस्सल रांगडी मराठी भाषा यांमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे.

भाषेबद्दलच्या आव्हानाबद्दल सांगताना कालिंदी म्हणते, “मी विदर्भाची असल्यामुळे वर्कशॉपदरम्यान सातत्याने माझ्या बोलण्यात तोंडात रुळलेले शब्द यायचे. परंतु वर्कशॉपवेळी सर्वांची भाषा सतत कानावर पडल्याने मला माझ्या पात्राची भाषा शिकण्यात मदत झाली. बऱ्याचदा म्हणी, वाक्यप्रचार मला समजत नसत. आताही मी म्हणी किंवा वाक्यप्रचार ऐकले की गोंधळून जाते. एकूणच मला भाषेसाठी खूप तयारी करावी लागली. परंतु सगळ्या गोष्टी मला नव्याने शिकायला मिळाल्या याचा मला आनंद आहे.”

अभिनेता पृथ्वीराजने टीडीएमसाठी घेतली खूप मेहनत
पुण्यात ऑफिस बॉयची नोकरी करणारा पृथ्वीराज याची ‘टीडीएम’मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि पृथ्वीराजही त्या भूमिकेवर खरा उतरला आहे. शिक्षण कमी असताना आणि ऑडिशनचा अनुभन नसतानाही पृथ्वीराजने ‘टीडीएम’मधील पात्र कसे साकारले? याबद्दल तो म्हणतो, “भाऊरावांनी मला बरीच पुस्तके वाचायला सांगितली, ज्यांची मला खूप मदत झाली. भाऊरावांना स्लिम आणि फिट बॉडी अपेक्षित होती. त्यासाठी मी एकही दिवस न चुकता व्यायाम केला. जिमला जाण्याचा कंटाळा यायचा, म्हणून घरीच दररोज कसरत केली. चपाती भाजी असा घरचाच पौष्टिक आहार घेतला. याबरोबर भिजलेले शेंगदाणे, कडधान्ये खाल्ले.”

याशिवाय आपल्यातील कलेला ओळखून आपल्याला टीडीएममध्ये संधी दिल्याने पृथ्वीराज आणि कालिंदीने दिग्दर्शक भाऊरावांचे आभार व्यक्त केले.

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न.

मुंबई, दि. २४ एप्रिल
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर व नागपूरच्या सभेला उपस्थित होते. अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत असे चित्र प्रसार माध्यमात रंगवण्यात आले होते पण वस्तुस्थिती जनतेने पाहिली आहे. मविआची वज्रमूठ सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची एकत्रित सभा असून या सभेला राज्यातील तीन्ही पक्षांचे नेते उपस्थित असतात.

मुंबई येथे १ मे २०२३ रोजी होणा-या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसाठी टिळक भवन, दादर येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ, राजू वाघमारे यांच्यासह ठाणे शहर व ग्रामीण, भिवंडी शहर, कल्याण शहर, उल्हासनगर शहर, वसई विरार शहर, मिरा भाईंदर शहर, नवी मुंबई शहर, पनवेल, रायगड, पालघर व मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळा संपन्न

पुणे दि २४: अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईच्यावतीने यशदा पुणे येथे १९ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय कोलकाता येथील औद्योगिक सांख्यिकी विभागाचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालय पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर आदी उपस्थित होते.

श्री. चक्रवर्ती म्हणाले, जगात बहुतांश देशात वार्षिक उद्योग पाहणी करण्यात येते. आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जाते. माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.

यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी देशातील सर्वेक्षणाचा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापरामुळे होणारे अपेक्षित, अनपेक्षित परिणाम याबाबत माहिती दिली. कृत्रिम बुद्धीमत्ता व मशीन लर्निंग अशा तंत्रज्ञानाचा माहिती संकलनाच्या कार्यपद्धतीमध्ये वापर करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

श्री. आहेर म्हणाले, कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन द्यावी. उद्योगांनीदेखील या कामासाठी सहकार्य करावे.

वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो.
0000

कृषि पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: कृषि क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी ३० जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृ‍षि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

राज्य शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

कृषि विभागामार्फत २०२२ या वर्षासाठी कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, संस्था, व्यक्तींनी आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक ३० जुन २०२३ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
0000

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटन
मुंबई, दि. २४ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाचा का म अधिक लोकाभिमुख होण्यासाठी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील चांगल्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) ही नवीन प्रणाली अधिक फायदेशीर ठरणार आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केले.

सी-डॅक व एमआरएसएसी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथे करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मला सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी जेव्हा दिली तेव्हा या विभागामध्ये जी व्यवस्था होती ती व्यवस्था पाहिल्यानंतर मला कळालं की, या विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलून या खात्यामध्ये अधिक सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांसाठी व पदोन्नतीसाठी कोणालाही आपल्या हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही हे मी माझ्या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्याच कार्यक्रमातील भाषणात बोललो होतो असे सांगतानाच मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मी जे बोललो त्याचप्रमाणे मी आतापर्यंत वागलो. कारण आता माझ्याकडे पदोन्नती संदर्भात कोणताही विषय प्रलंबित नाही हे मी आवर्जून नमूद करीत आहे. विभागाचे अभियंता असो वा अधिकारी आम्ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक विभागाच्या अधिका-यांनी आपल्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणून आपल्या कार्यपध्दतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे गरजेचे आहे. असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
पी. एम. आय. एस. व्यवस्थेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित्या येणारे एक लाख पाच हजार किलोमीटर रस्ते त्यांची असलेली सद्यस्थिती काय आहे. 31 हजार पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या इमारती पूल आणि या सर्वांची आताची असणारी परिस्थिती, त्यामध्ये काही कमतरता आहे काय रस्त्यांची किती कामे प्रगतीपथावर आहेत किती कामे अपूर्ण आहेत आदींची माहिती या नवीन संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे.
आापल्या विभागाच्या अंतर्गत येणा-या रिजनमधील रस्त्यांवर कुठेही खड्डा पडला असेल तर तो खड्डा आपल्याला दुरुस्त करणे हे आपल्या विभागाचे कर्तव्य आहे. तशी आपल्याकडे व्यवस्था तयार आहे आणि त्या व्यवस्थेमधून आपल्याला हे सर्व करायचं आहे असे सांगतानाच मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, एकदा पडलेला खड्ड्याला जर दुरुस्त केला नाही तर तो हळूहळू खड्डा वाढत जातो. त्यामुळे पुढील काळामध्ये रस्त्यामध्ये पडणारा जो खड्डा आहे तो फार काळ राहणार नाही, टाईम बाँड पिरियड मध्ये त्याची दुरुस्ती कशी होईल याकडे लक्ष देण्याची आणि यासाठी या विभागाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता चव्हाण, मुंबई विभागाचे मुख्य अभियंता राजभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीच्या निवडणूकीत अशोक गावडे, उमर बागवान यांना आम आदमी पार्टी चा पाठींबा

पुणे-कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली पुणेची निवडणूक दिनांक २८ एप्रिल रोजी आहे. या निवडणुकीनिमित्ताने बाजार समिती कामकाजामध्ये सुद्धा काही चांगले बदल व्हावेत अशी आम आदमी पार्टीची इच्छा आहे.

अशोक रामभाऊ गावडे हे गेले ४०वर्षे केळी व फळ विक्रीचा व्यवसाय गुलटेकडी मार्केट यार्ड येथे करीत आहेत. व्यापारी आडते आणि किरकोळ विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत तसेच गणेशोत्सव व इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. त्यांचे चिन्ह मोरपीस आहे.

उमर बागवान हे हडपसरचे रहिवासी व फळविक्रेता व्यवसायिक असून हातगाडी फेरीवाले पथविक्रेते याच्यासाठी संघर्ष करणाऱ्या जाणीव संघटनेचे ते कार्यवाह आहेत. बाजार समितीमध्ये आजवर किरकोळ व्यापारी पथविक्रेते यांच्या प्रतिनिधीला स्थान मिळालेले नव्हते. ते मिळावे यासाठीच आपण या चळवळीतील कार्यकर्त्याला पाठिंबा देत आहोत. त्यांचे चिन्ह टेलिव्हिजन आहे.

हे दोन्ही उमेदवार व्यापारी आडते मतदारसंघातून निवडणूक लढवत असून अखिल भारतीय जाणीव संघटनेने त्यांना पुरस्कृत केलेले आहे.
आम आदमी पार्टी सुद्धा सामान्य माणसाचे जनजीवन सुधारावे त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत, त्याचा विकास व्हावा यासाठी प्रतिबद्ध आहे. दिल्ली पंजाब येथील उत्तम कामगिरीनंतर आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. महाराष्ट्रातही आम आदमी पार्टीचे जोरदार घोडदौड चालू आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीच्या आडते व्यापारी मतदारसंघ निवडणूकीमध्ये अशोक गावडे (चिन्ह मोरपीस) आणि श्री उमर बागवान (चिन्ह टेलिव्हिजन) यांना आपला पाठिंबा जाहीर करीत असून त्यांना मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन करीत आहे.

जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत साहिल मरगजेने वरिष्ठ गटात पटकावली 7 पदके

पुणे : धनकवडी येथील साहील पांडुरंग मरगजे याने कोथरूड येथे झालेल्या जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर विविध प्रकारात तब्बल ७ पदके मिळविण्यात यश संपादन केले आहे.

पुणे जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशन यांचे वतीने कोथरूड येथे २२ आणि २३ एप्रिलला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत साहिलने फ्लोअर प्रकारात प्रथम, पोमेल हाॅर्स प्रकारात द्वितीय, रोमन रिंग्ज प्रकारात द्वितीय, व्हाॅल्ट प्रकारात तिसरे, पॅरलल बार प्रकारात तिसरे, होरिझंटल बार प्रकारात पहिले आणि आँलराऊंडर प्रकारात तिसरे याप्रमाणे एकूण सात पारितोषिके पटकावली आहेत. त्यामुळे त्याचेवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

साहिल पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून मागील ९ वर्षांपासून तो जिमनँस्टिक्सचे प्रशिक्षणघेत आहे.यापूर्वी त्याने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावताना २०१९मध्ये नँशनल स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह नॅशनल चॅम्पियन जिम्नॅस्टिक प्लेयर म्हणून नावलौकिक मिळविला होता.
सध्या तो राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते, सहायक पोलीस निरीक्षक,सौरभ कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एसके जिमनॅस्टिक्स अँकॅडमीमध्ये जिमनँस्टिकचा सराव करीत आहे.साहिल बरोबरच एस के जिमनँस्टिक अँकडमीच्या तब्बल ३८ विद्यार्थीनी पदके जिंकली यामध्ये ८ गोल्ड,१४ सिल्व्हर आणि १६ ब्राँझ पदकांचा समावेश आहे यामध्ये वरिष्ठ गटात हेरंब चव्हाण याने सहा तरकनिष्ठ गटात कौशल्य राठी व कौस्तुभ बेरी दोघांनीही प्रतेकी सात पदके पटकावली.

हरवलेले 51 मोबाईल हस्तगत केले

पुणे – शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील सायबर कक्षात कार्यरत असणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने 5 भाषांचा वापर करून 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील सायबर कक्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टीमनं ही कामगिरी केली आहे. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या सायबर कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक , पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, आदेश चलवादी आणि रूचिका जमदाडे यांनी परिसरातून हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला होता. त्यांनी त्याबाबत तांत्रिक तपास करून त्याचा वेळावेळी पाठपुरावा केला. पुण्यातून हरवलेले मोबाईल हे गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगला, बिहार, पंबाज आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी अ‍ॅक्टिव्ह असल्याचे सायबर कक्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सदरील मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अंमलदार आदेश चलवादी यांनी कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा वापर करून संवाद साधला.त्यांच्याजवळ असलेला मोबाईल हा पुणे आणि परिसरातून हरवला असून त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये नोंद असल्याचे मोबाईल वापरकर्त्यांना सांगितले. आदेश चलवादी यांनी त्यांच्याकडे असलेल्या बहुभाषिक कौशल्याचा पुरेपुर वापर करून एक वेगळीच कसब दाखवित 9 राज्यातुन 9 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 51 मोबाईल हस्तगत केले. सदरील मोबाईल संबंधित तक्रारदारास परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंदा पहावयास मिळाला. संबंधित तक्रारदारांनी पुणे पोलिसांचे आभार व्यक्त केले.दरम्यान, नागरिकांनी त्यांचा मोबाईल हरविल्यास त्याबाबतची तक्रार तात्काळ ऑनलाइन पध्दतीने पुणे पोलिसांच्या
वेबसाईटला करावी अथवा शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलवर नोंद
करून करावी असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.त्यांच्याजवळ असलेला मोबाईल हा पुणे आणि परिसरातून हरवला असून त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये नोंद असल्याचे मोबाईल वापरकर्त्यांना सांगितले. आदेश चलवादी यांनी त्यांच्याकडे असलेल्या बहुभाषिक कौशल्याचा पुरेपुर वापर करून एक वेगळीच कसब दाखवित 9 राज्यातुन 9 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 51 मोबाईल हस्तगत केले. सदरील मोबाईल संबंधित तक्रारदारास परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंदा पहावयास मिळाला. संबंधित तक्रारदारांनी पुणे पोलिसांचे आभार व्यक्त केले.दरम्यान, नागरिकांनी त्यांचा मोबाईल हरविल्यास त्याबाबतची तक्रार तात्काळ ऑनलाइन पध्दतीने पुणे पोलिसांच्या
वेबसाईटला करावी अथवा शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलवर नोंद
करून करावी असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजराव नाईक,पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, अर्जुन कुडाळकर आणिरूचिका जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणतीही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा (डेटा) आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचे आयोगाने खुलासा केला आहे.

आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.  पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना कळविले असल्याचे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी पत्राद्वारे कळविले आहे.

वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास: प्रशासकांनी आजवर केले तरी काय ?

येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महापालिकेला आदेश

पुणे, दि. २४: नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असून वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे विद्युत विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या, वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी करावी.

वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. खेमणार यांनी माहिती दिली, पुणे महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यदृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नीरी आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
0000

कोथरुडमधील सोसायट्यांना पाणी आणि पार्किंगच्या समस्यांचा करावा लागतो सामना-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला महापालिका प्रशासकांचा समाचार

जलदगतीने उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

पुणे, दि. २४: एकीकडे आपण २४ तास पाणी पुरविण्यासाठी लोकांना आशाव्सित करतो आहोत आणि दुसरीकडे आहे तो पाणी पुरवठा जर सुरळीत होत नसेल तर ठीक नाही ,दरवर्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या नावे जादा दराने पाणीपट्टी पुणेकरांकडून उकळली आहे आता त्यांना पाण्याच्या समस्येने त्रस्त करत असाल तर योग्य नाही ,शिवाय पार्किंगची हि समस्या येथील सर्वच समस्यांवर जलदगतीने उपाय योजना करा असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महापालिका प्रशासकांना दिले .

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षेखाली कोथरूड परिसरातील समस्यांबाबत बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. या भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न, पार्किंग आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी दिलेयावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माईर्स एमआयटी संस्था समूहाच्या सह महासचिव डॉ. अदिती कराड, सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

सिग्मा वन सोसायटी सोसायटीला पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने अतिरिक्त गरज भागवण्यासाठी विकत टँकर घ्यावे लागत असल्याने सोसायटीला महानगरपालिकेकडून दररोज किमान एक टँकर पाणी देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

सदर सोसायटी पाणीपुरवठा योजनेत टेल एंडला असल्यामुळे पाणीपुरवठा दाबाच्या सध्या समस्या आहेत. मात्र सध्या शहरात काम सुरू असलेल्या नवीन २४ बाय ७ योजनेत या परिसरातील बहुतांश भाग गांधीभवन जलकुंभावर शिफ्ट होणार असून सिग्मा वन सोसायटी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेवर राहणार असल्याने भार कमी होऊन योग्य दाबाने पाणी मिळेल. हे काम साधारणतः ५ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. पावसकर यांनी दिली. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

एमआयटी मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थीसंख्या असून अतिरिक्त वाहने संस्थेच्या आवाराबाहेर रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर यावेळी चर्चा करण्यात आली. संस्थेच्या आवारात नवीन बहुमजली पार्किंग उभारणी सुरू आहे. त्यामुळे बाहेर रस्त्यावर वाहने लागणे बंद होईल असे याविषयी एमआयटी संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

एमआयटीने आपले पार्किंगचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, एमआयटी संस्थेने त्यांच्या संस्थेचे विकेंद्रीकरण करावे जेणेकरुन एकाच ठिकाणी विद्यार्थीसंख्या वाढणार नाही. महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, सिगारेट आदी पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी पोलीस विभागाने दैनंदिन गस्‍त घालावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

यशश्री कॉलनीतील रहिवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने ग्रीनझोन कमी करण्याच्या अनुषंगाने विकास आराखड्यामध्ये सुधारणेबाबत प्रस्ताव तयार करावा, असे यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी निर्देश दिले.

नदीकाठसुधारच्या नावाखाली पर्यावरणाची लचकेतोड दुसरीकडे पार्ट्या आणि सहलींच्या नावे मॅनेज कारभार

नदीकिनारची वृक्षतोड, आणि पर्यावरणाची लचके तोड त्वरित थांबवावी आपची आयुक्तांकडे मागणी-

पुणे-मोठा मॅनेज आणि दौरेबाज ,पार्ट्या करणारा कारभार सुरु करून पुण्याचा सुरू केलेला नदीकाठ सुधार प्रकल्प आणि त्यासाठी नदीकिनारची वृक्षतोड, आणि पर्यावरणाची लचके तोड त्वरित थांबवावी अशी मागणी आम आदमी पार्टीने महापालिका आयुक्त -तथा प्रशासक यांना इशारा देत केली आहे.

या संदर्भात आप चे विजय कुंभार यांनी असे म्हटले आहेकी,’पुणे मनपाने काही महिन्यांपूर्वीच मोठा गाजावाजा करत पुण्यातील नद्यांच्या तथाकथित पुनरुज्जीवनासाठी नदीकाठ सुधार प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सुरूवातीपासूनच वादात अडकलेला आहे.पर्यावरणवाद्यांनी अनेक शास्त्राधारित आक्षेप घेऊनही आणि आम आदमी पार्टीने विरोध करुनही आक्षेपांचे काहीही निरसन न करता मनपा बेगुमानपणे हा विध्वंसक प्रकल्प पुढे रेटत आहे.या नदीकाठ सुधार योजनेच्या प्रकल्प अहवालातच स्पष्ट दिसते की या प्रकल्पामुळे पुणे शहरात पूर पातळी ५ फुटांनी वाढणार आहे. नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी अंदाजपत्रकात एक रुपयाचाही खर्च दाखविलेला नाही. असे असताना केवळ तथाकथित सौंदर्यीकरणासाठी आपण पुणेकरांचे ४७२७ कोटी रुपये खर्ची घालावेत हे अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे.सध्या या नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रात कॉंक्रीटच्या भिंती बांधण्यासाठी मनपाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू केली आहे. प्रत्यक्षात प्रकल्प अहवालात मात्र वेगळंच काही तरी सांगितलेलं आहे:

“प्रकल्प संकल्पना अस्तित्वातल्या झाडांची काळजी घेणारीच आहे.”

“अस्तित्वातली झाडे सामावून घेण्यासाठी नदीपात्रातील भिंतीचे नियोजन प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीनुरूप केले आहे.”

“पुण्यातील नदीकिनारी खूप मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. ही झाडी या प्रकल्पात सामावून घेण्यात येईल.”

“पुण्यातील नदीकाठचा हरित वारसा जपणे आणि समृद्ध करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अस्तित्वातील झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षक पिंजरे वापरण्यात येतील.”असे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणि या आधारावरच सदर प्रकल्पाला शासनाने पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरी मध्ये या प्रकल्पासाठी वृक्षतोड लागू नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना आता या प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडणे हे बेकायदेशीर तर आहेच परंतु ही पुण्यातील सर्व नागरिकांची फार मोठी फसवणूक ठरेल. या वृक्षसंहारामुळे पुण्याची कधीही भरून न येणारी पर्यावरणीय हानी तर होईलच परंतु अगणित पक्ष्यांचा अधिवासही कायमस्वरूपी संपुष्टात येईल.एक जागरुक राजकीय पक्ष आणि पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून ही वृक्षतोड आम्हास कदापी मान्य नाही. आपण पर्यावरणाचे “संरक्षक” आहात “भक्षक” बनू नका ही माफक आशा आणि अपेक्षा.जर ही वृक्षतोड आणि संलग्न काम आपण तातडीने थांबविले नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी करावी लागेल.

“गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज

‘आभास की भास की तुझा हा श्वास गं’ असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्याला लाभला असून, उत्तम पद्धतीनं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या १९ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. तर आता पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे.