Home Blog Page 1562

मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

पुणे: भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, सा. बां. पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, मांजरी गावचे  सरपंच शिवराज घुले आदी उपस्थित होते.

उड्डाणपुल कामाच्या पाहणीनंतर कार्यक्रमात मंत्री श्री. चव्हाणे म्हणाले, नवीन रेल्वे पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेल्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया संबंधितांनी त्वरित पूर्ण करावी. या कामाबरोबरच सेवा रस्ते आणि इतर अडचणी लवकरच सोडविण्यात येतील. नवीन रेल्वे उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा उड्डाणपूल परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काम दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशाही सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

प्रकल्पामध्ये 25 मीटर लांबीचे 14 गाळे असा एकूण 350 मीटर लांबीचा मुख्य पूल असून हडपसर बाजूला 149.5 मीटर आणि मांजरी बाजूला 174.955 मीटर असा एकूण 324.5 मीटर लांबीचा रॅम्प आहे.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत नारायणन वाघुल लिखित ‘रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई-केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते – मुंबईत प्रसिद्ध बँकर -नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात -वाघुल यांच्या भारताच्या आर्थिक परिदृश्यातील अनेक दशकांच्या अनुभवांची ठळक विस्तृत माहिती आहे. या कार्यक्रमाला नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष श्री. के. व्ही. कामथ, जे. पी. मॉर्गन साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियाचे माजी अध्यक्ष श्रीमती कल्पना मोरपारिया तसेच  प्रख्यात बँकर्स आणि आघाडीच्या वित्तीय संस्थांचे सदस्यही उपस्थित होते.

भारतातील आधुनिक बँकिंगचे शिल्पकार म्हणून व्यापकपणे मानले जाणारे श्री. वाघुल यांचे पुस्तक त्यांच्या संपूर्ण सुविख्यात कारकिर्दीतील नाट्यमय, हलक्याफुलक्या आणि महत्त्वपूर्ण घटनांचे वर्णन करते. आकर्षक किस्यांनी भरलेल्या या पुस्तकात विविध उपक्रमांची माहिती आहे. या उपक्रमांचा एक भाग बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.

श्री वाघुल यांनी प्रस्थापित केलेल्या प्रक्रिया पद्धती भारतीय आर्थिक परिसंस्थेत मजबूत आणि शाश्वत होत गेल्या. बँकिंग टॅलेंटमधील असंख्य कौशल्यवान लोकांना मार्गदर्शन करण्यात आणि बँकिंगमध्ये अधिक महिला सीईओना सक्रियपणे घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याद्वारे स्त्री-पुरुष समानतेच्या गुणवत्तेची संस्कृती वाढायला मदत झाली आहे.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नारायणन वाघुल यांचा बँकिंगमधील व्यापक अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली. शाश्वत प्रभाव पाडणाऱ्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यातील त्यांचे योगदान देखील त्यांनी वाखाणले. त्यांनी  श्री. वाघुल यांच्या महिला सक्षमीकरणावरील कल्पना आणि दूरदृष्टी यांवर प्रकाश टाकला.  आर्थिक सेवांमध्ये अधिकाधिक महिला नेतृत्वाची भूमिका घेत असताना हे भारतासाठी सुसंगत  आणि मौल्यवान राहील.

यावेळी बोलताना पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले, “नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या आठवणींचा हा खजिना सादर करताना मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याविषयी मला पराकोटीचा आदर आहे आणि मार्गदर्शनासाठी आणि प्रेरणा मिळावी म्हणून मी अनेकदा त्यांच्याकडे जातो. श्री. वाघुल यांना भारतातील बँकिंगचे ‘भीष्म पितामह’ मानले जाते आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास निःस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी, मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण यांसाठीचा आदर्श आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या या जीवन प्रवासातील  गोष्टी तरुण पिढ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मूल्य प्रणालींच्या अंगभूत सामर्थ्यांवरील त्यांचा दृढ विश्वास त्यांच्या विविध व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रयत्नांतून खऱ्या अर्थाने परावर्तित होतो. माहिती आणि किस्यांनी परिपूर्ण असलेले ‘रिफ्लेक्शन्स’ आपल्याला वैयक्तिक आणि एकत्रितपणे भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला तयार करण्याकरता विचारांचे खाद्य देते.”

‘रिफ्लेक्शन्स’ चे लेखक नारायणन वाघुल म्हणाले, “या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल मी श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्याविषयी आत्यंतिक आदर आणि स्नेह आहे अशा अजय पिरामल यांचेही मी आभार मानू इच्छितो. त्यांच्या सातत्यपूर्ण चिकाटी आणि प्रोत्साहनामुळेच मला माझ्या सात दशकांहून अधिक काळातील आठवणी लिहिण्यास चालना मिळाली.

अनेक अविस्मरणीय घटनांच्या मालिकेने माझी कारकीर्द भरलेली होती आणि माझ्या दृष्टिकोनाचा आधार म्हणून माझ्या स्वतःच्या अनुभवांचे संकलन असलेले हे पुस्तक सादर  करताना मला आनंद होत आहे.  भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आपण केवळ वेळोवेळी तीव्र अडथळ्यांचा सामना केला असे नाही तर अशा संकटांवर मात करण्यासाठी आणि आपल्या परंपरांशी मजबूत दुवा कायम ठेवत आपले स्थैर्य राखण्यात उल्लेखनीय लवचिकता दाखवली आहे. आज, प्रमुख नेत्यांनी एकत्र येणे आणि येणाऱ्या आगामी वर्षांमध्ये समाजाचा पाया बनणाऱ्या तरुण पिढीला मूल्य प्रणाली देणे अधिक आवश्यक आहे. माझ्या मते, शैक्षणिक अभ्यासक्रमातील मूल्यशिक्षणाचे पुनरुज्जीवन, भारतीय अर्थव्यवस्थेला तिची पूर्ण विकास क्षमता साध्य करण्यात मदत करण्यासाठी चालना देणारे ठरेल.”

१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार

मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत.

रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सोहळ्याच्या समग्र नियोजनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गडावर संबंधित लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वय वर्षे १९ ते २२ दहा जणांची टोळी आणि अन्य १८ साथीदार सर्वांना लावला मोक्का ..म्हणाले होते आम्ही आहोत इथले भाई …. समजले …

पुणे- पुण्यातील पीएमसी कॉलनी येथे सराईत गुन्हेगार अजय विटकर याच्यासह इतर साथीदारांनी संघटित टोळी तयार करून ‘आम्ही इथले भाई आहे’ असे मोठे मोठयाने बोलून वाईट शिवीगाळ करत पार्किंग केलेल्या 14 दुचाकी व चार चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते.अशा २८ जणांना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का लावला आहे.या संदर्भात पोलिसांनी संगील्तले कि,’ अजय विटकर, रा. हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकनं २३ वडारवाडी पुणे ( टोळी प्रमुख) त्याचे इतर ३०-३२ साथीदार यांनी संघटीत टोळी तयार करुन त्यांनी गैरकायदेची मंडळी जमवून आम्हीइथले भाई आहे असे मोठ मोठ्याने, वाईट वाईट शिवीगाळ करुन, पीएमसी कॉलनी मध्ये पार्किंग केलेल्यादुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करुन यांनी त्यांचे हातातील लोखंडी हत्याराने, लाकडी दांडक्यांनीआजुबाजुस पार्क केलेल्या ०४ चारचाकी, १४ दुचाकी व ०१ तिन चाकी गाड्यांचे तोडफोड करुन नुकसान
केले तसेच आरोपीनी त्याचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशानेडोक्यात वार करुन गंभिर जखमी केले.त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर २७३ / २०२३ भादवि कलम.३०७,१२०(ब)४२७,३२३,
५०४,५०६(२),१४३,१४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५), फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२,३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्हयाच्या तपास दरम्यान यातील निषन्न आरोपी नामे १) रूपेश उत्तम विटकर, वय – २२वर्षे, धंदा- काही नाही, रा.स.नं.३३७/९५४, विटकर बंगला, पांडवनगर, पुणे २) ईस्माईल इब्राहिम शेख, वय – १९वर्षे, रा.१००१ जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डींग जवळ, पांडवनगर, पुणे. ३) गणेश हरीचंद्र धोत्रे,वय-१९वर्ष,रा-राजु मित्रमंडळा जवळ, ८८३, वडारवाडी पुणे ४) साहिल गणेश विटकर, वय – २० वर्ष, रा-ब्लॉक नं.४५,मारुती मंदिराजवळ, वडारवाडी पुणे. ५) लवकुश रामाअधीन चौव्हाण, वय – २२ वर्ष,रा-रुम नं. ३०७, एस आरेकॉलनी,पांडवनगर पोलीस चौकी जवळ, पुणे. ६) विजय ऊर्फ चपात्या हनुमंता विटकर, वय – २१ वर्ष, रा-डॉ. होमीभाभा हॉस्पीटल मागे, वडारवाडी पुणे. ७) चेतन ऊर्फ आण्णा राजु पवार, वय – २२ वर्ष, रा-८८३ मारुतीमंदिराजवळ वडारवाडी पुणे. ८) अनिल ऊर्फ काळया हनुमंत डोंगरे, वय – २१ वर्ष, रा – लालचाळ गोखलेनगर
पुणे. ९) विजय चंद्रकांत विटकर, वय १९ वर्षे, रा. हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकनं २३ वडारवाडी पुणे.१०) धनराज ऊर्फ चिम्या काळुराम धोत्रे, वय – २३ वर्ष, रा-मारुती मंदिरामागे, ब्लॉकनं. ४३, वडारवाडी पुणे सर्व( टोळी सदस्य ) यांना अटक करण्यात आली असुन इतर २०-२२ आरोपींचा शोध सुरु आहे
.आरोपी अजय विटकर (टोळी प्रमुख ) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखालीप्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वताची संघटीत टोळीकरुन गुन्हे केलेले असून त्यांनी अवैध मार्गान अर्थिक फायदा मिळवण्याच्या उददेशाने जिवे ठार मारण्याचा
प्रयत्न करणे,गंभीर दुखापत करणे,, जबरी चोरी करणे, नागरीकांच्या मालमत्तेच तोडफोड करुन नुकसानकरणे,सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवारकेले आहेत यातील आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वताच्या अर्थिक फायदया करीतासदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम१९९९चे कलम ३(१)(ii), ३ (२) ३ (४) अर्तभाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर
पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.न.२७३ / २०२३ भादवि कलम ३०७, १२० (ब) ४२७,३२३,५०४,५०६(२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५),फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) सह १३५प्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii),३(२)३(४) अर्तभाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांनी
मान्यता दिली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्रीमती
आरती बनसोडे ह्या करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेशकुमार, सह पोलीसआयुक्त संदिप कर्णीक अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा,पोलीस उप-आयुक्त परी ४ पुणे शहर श्री शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजीपांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण, निगराणी पथकाचे सहा पोलिस निरीक्षक रत्नदीप
गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, निलेशकुमार महाडीक, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, अमंलदार
अमित गद्रे, सुहास पवार, मारुती केंद्रे यांनी केली आहे.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावरबारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे
सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भरदेण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही २३ वी कारवाई आहे.

शाब्बास पुणे पोलीस: हरविलेल्या बालिकेला सुखरूप घरी पोहोचविले

पुणे- आम्ही पुण्याच्या पोलिसांना नेहमीच टार्गेट करतो , अर्थात गुन्हेगारी वाढली ,बरेचसे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऐवजी इन्व्हेस्टमेंट ला प्राधान्य देत असल्याने पोलीस टीकेचे धनी बनतात . पण काही काही वेळा त्यांनी केलेले चांगले काम हि विसरून चालत नाही अर्थात काही मंडळी विसरतात ..पण पुणेकरांनी विसरू नये .अशीच एक घटना पेट्रोलिंग करताना पुण्याच्या पोलीसंनिकेली . घटना तशी कर्तव्य म्हणून अत्यंत साधी ..पण तशी अविस्मरणीय देखील.

झाले असे …

पोलीस अंमलदार मगर आणि शिंदे हे पेट्रोलिंग करत असताना काल दुपारी दीड वाजता पुणे रेल्वे स्टेशन च्या फलाट क्रमांक ६ वर पोहोचले ..तेव्हा कोपर्यात एक ४ वर्षाची मुलगी त्यांना रडत बसलेली दिसली .तेव्हा या पोलीसामामांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला ना मराठी येत होती ना हिंदी भाषा … मग समजले तिला कन्नड भाषा येते . आणि मग एका कन्नड भाषिकाला बोलावून घेण्यात आले. तेव्हा तिचे नाव फक्त समजले श्रावणी तोरणी …. अन्य काही बिचारीला सांगता येईना … मग डिजिटल मिडिया चा वापर करायचे ठरले . त्याप्रमाणे मुलीचा फोटो घेऊन व्हाटस अप ग्रुप वर टाकून चौकशी सुरु झाली तेव्हा हि मुलगी ताडीवाला रोड भागात राहणाऱ्या दानाम्मा गंगाधर तोरणी या महिलेची असल्याची माहिती पुढे आली .ह त्यांची सर्वात लहान मुलगी होती . आणि मग सारे सोपस्कार उरकून आईच्या ताब्यात मुलीला देण्यात आले.

कामगिरी तशी खूप छोटी पण तिचे महत्व मात्र खूप मोठे .. या दोन्ही पोलीस अंमलदारांचे या कामगिरीबाबत खूप खूप कौतुक आणि पुढील कारकीर्दीस शुभेछ्या ..

एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धेचे सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने येत्या ५ ते ७ मेदरम्यान आयोजन

पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे. स्पर्धा शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे, अशी माहिती सुधांशू मेडसीकर यांनी दिली.बायजूज, होस्टरोयल, मॅच पॉइंट, द रस्टल नेस्ट, ऑल थिंग्ज फिजिओ हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, ३० वर्षांवरील पुरुष एकेरी आणि दुहेरी, ४० वर्षांवरील पुरुष एकेरी व दुहेरी आणि ५० वर्षांवरील पुरुष एकेरी व दुहेरी या गटात होणार आहे. कॉर्पोरेटसाठी आयोजित या स्पर्धेत प्रथमच रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

यातील विजेत्यांना ट्राॅफी आणि रोख पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्षे आहे. यात केवळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत २०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १ मे असल्याचे मेडसीकर यांनी सांगितले.

भर दुपारी रस्त्यावर तरुणाला अडवून लुटमार :आंबेगाव पठारावर गुन्हेगारीचे साम्राज्य

पुणे- अवघ्या २५ वर्षीय तरुणाला भर दुपारी सव्वादोन वाजता रस्त्यावर अडवून त्याच्याकडील चीजवस्तू जबरदस्तीने हिसकावून त्याला तीन चोरट्यांनी लुटल्याची घटना आंबेगाव पठारावर घडली भारती विद्यापीठ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून या ३ भामट्यांचा शोध जारी केला आहे.

काल दुपारी जिजामाता चौकाकडून ज्ञानपीठ चौकाकडे संबधित फिर्यादी तरुण जात असताना हि जबरी चोरी झाली .तिघा अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी कडील सोन्याची चेन २ मोबाईल, ब्लू टूथ आणि रोकड असा मिळेल तो ऐवज लुटून नेला.फौजदार धीरज गुप्ता 9284871360 याप्रकरणी तपास करत आहेत .

शंकरशेठ रस्त्यावर वाहतुकीच्या समयी गाडीची काच फोडून चोरी

सायंकाळी ६ ते साडेसहा वाजण्याची वेळ म्हणजे शंकरशेठ रस्त्यावर वाहतुकीची वेळ. या वेळेत सेन्ट्रल पॉईंट बिल्डींग च्या स्मोरो थोडे पुढे निळे पत्रे असलेल्या ठीकाणाला लागून रस्त्याच्या बाजूलापार्क करून ठेवली असताना या वेळी अर्धा तासाच्या अवधीत अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप आणि लाखाची रोकड असा ऐवज चोरू नेला .स्वारगेट पोलीस ठाण्याचे फौजदार येवले 8888802252 अधिक तपास करत आहेत.

वानवडीत घरफोडी

वानवडी गावातील साईसागर हॉटेल मागे असलेल्या इसार सोसायटी मधील १७ क्रमांकाच्या फ्लॅट चे रात्री ११ ते सकाळी ८च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात घुसून पावणेतीन लाखाचे दागिने घरफोडी करुन चोरून नेले. वानवडी पोलीस ठाण्यातील फौजदार संतोष गायकवाड ̈8308932100 या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंची पुतळ्याचे अनावरण

मराठी फेडरेशनला ८ कोटी रुपये; १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महाराष्ट्रीयन समुदायासाठी स्वतंत्र कक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोका (मॉरिशस) 29: अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.

मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशस रुपये अर्थात 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. अपार उत्साहात आणि संपूर्णपणे मराठी प्रतिबिंब असलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

यापूर्वी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य आणि चातुर्य आजही तितकेच मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘महाराष्ट्र धर्म’ शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या 14 व्या वर्षी घेणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले आणि त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले.

‘बारसू’त बेकायदा जमीन घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, उदय सामंत म्हणाले,’ उद्धव ठाकरेंशी बोलणार

मुंबई-बारसू येथे बेकायदा जमीन घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, अशी माहिती शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. बारसू प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या वादावरून आज बैठक झाली. या बैठकीनंतर सामंत यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली.बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना जर काही ब्रिफिंग हवे असेल, तर त्यांची वेळ घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्यात. जिल्हाधिकारी आजच त्यांच्यांशी बोलतील. आयुक्त बोलतील, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाने चार पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन आणि पोलिस विभाग 353 सारखी गुन्हे लावेल, अशी शंका आंदोलनकर्त्यांना होती. हे गुन्हे लावणार नाही, याची खात्री आम्ही आजच्या बैठकीत दिली. त्या भागात काही अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्याची माहिती खासदारांनी दिली होती. आंदोलनकर्त्यांनीही सांगितले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी नेमली आहे. उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणाबाहेर येथे जमीन घेतलेली असेल, तर ती कशा प्रकारे घेतली? का घेतली? याची दोन दिवसांत चौकशी होईल. जर या ठिकाणी बेकायदेशीर जमीन घेतली असेल, तर त्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल, हा निर्णय आजच्या बैठकीत घेतला.

उदय सामंत म्हणाले की, महावितरणच्या ज्या अधिकाऱ्याच्या नावावर ही जमीन खरेदी केली आहे, त्या अधिकाऱ्याची तातडीने हेडक्वॉर्टरला बदली करण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्याने मी घेतला आहे. आता शासनाने पाऊल पुढे टाकलेले आहे. विनायक राऊत यांचे पदाधिकारी, अजित यशवंतराव हे बैठकीला उपस्थित होते. त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधला.

उदय सामंत म्हणाले की, येत्या दोन किंवा तीन तारखेला एक विस्तारित बैठक मुंबईत घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. मुख्यमंत्र्यांशीही काल बोललो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी यांना जर काही ब्रिफिंग हवे असेल, तर त्यांची वेळ घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी आजच त्यांच्यांशी बोलतील. आयुक्त बोलतील. आजपर्यंत जी काही दडपशाही झाले, असे ते म्हणत आहेत, त्याचे स्पष्टीकरणही आमचे अधिकारी त्यांना देतील.

उदय सामंत म्हणाले की, शरद पवारांना स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी ब्रिफिंग केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनाही ब्रिफिंग केले आहे. अजून अन्य पक्षाचे काही नेते असतील, तर त्यांच्या शंका दूर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कुठेही टोकाची भूमिका घेतलेली नाही. तुम्ही तिथल्या प्रकल्पग्रस्तांना समजवावे. आम्ही समन्यवयाचा प्रयत्न करू, असे विनायक राऊत म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले की, बारसूच्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. आपण जिथे बोअरवेल मारत आहोत, तिथे काँक्रिट टाकून पिलर करणार आहोत, असाही गैरसमज पसरवला जात आहेत. मात्र, कुठलेही सर्वेक्षण इथे होत नाही. हे फक्त मातीचे परीक्षण आहे. ते आठ-पंधरा दिवसांत होईल. जगातल्या सर्वात मोठ्या लॅबने इथे प्रकल्प होऊ शकतो, असे सांगितले तरच इथे प्रकल्प होईल याचा उल्लेख त्यांनी केला.

 महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. 29: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसमधून 50 टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा आहे.

कोणाला सवलत मिळेल?

ही सुविधा 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, इयत्ता 12 वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी  दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन), सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील.  नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

राज्याच्या मुख्य सचिवपदी बिहारचे मनोज सौनिक यांची नियुक्ती

मुंबई, दि. २८ :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी श्री.सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौनिक येत्या रविवारी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारतील. श्री.सौनिक सध्या वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी आहेत.

श्री.सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

पुणे, दि.२८ : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी) उपक्रमात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असून ४ हजार ५०० दुकानांची कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेसाठी नोंदणी केली आहे. हे काम उत्कृष्ट असून असेच काम पुरवठा विभागामार्फत संपूर्ण राज्यभर व्हावे, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात पुरवठा विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी अन्न व पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे, पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी, वैधमापनशास्त्र विभागाच्या सहनियंत्रक सीमा वैद्य आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, विभागाने ९२ टक्के आनंदाचा शिधा वाटप केला आहे, ही चांगली बाब आहे. आनंदाचा शिधा लवकरात लवकर १०० टक्के वाटप होईल यासाठी तातडीने कार्यवाही करावी. इष्टांकपूर्तीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योजना तयार करुन गरजू व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल यावर लक्ष द्यावे, असे सांगून ई वितरण प्रणाली सुरु करण्यासाठी लागणारे संगणक उपलब्ध करुन दिले जातील तसेच पुरवठा विभागाचा आकृतिबंद सुधारित करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

श्री. चव्हाण म्हणाले, वैधमापन विभागाने ग्राहकांचे नुकसान होणार नाही यासाठी मोहीम स्तरावर बाजारातील वस्तूंचे मोजमाप घेऊन ते बरोबर असल्याची खात्री करावी. त्रुटी असलेल्या प्रकरणात कारवाई करावी. वैधमापन कार्यालयाच्या वाढीव जागेसंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करावा, असेही ते म्हणाले.

बैठकीत अन्नधान्य नियतन उचल वाटप, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आनंदाचा शिधा, धान खरेदी व भरडाईबाबतचा अहवाल, शिधापत्रिका योजना निहाय माहिती, तांदुळ वितरणाबाबतची जिल्हानिहाय माहिती, शिवभोजन योजना २०२२, अन्नधान्य साखळी वितरण, ई- वितरण प्रणाली, पोस्टल बँक, गुगल मॅपिंग, नोगा प्रॉडक्ट्स आदीबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सादरीकरणाद्वारे विभागात राबविण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. पुरवठा विभागाने तयार केलेल्या गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीला पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.
0000

अरबाज खान, अली असगर यांनी गायक अभिनेता एस शुभम यांचा संगीत व्हिडिओ लाँच केला

अरबाज खानने सोलग्लिट्झ प्रॉडक्शनचा नवीनतम संगीत व्हिडिओ “तुमसे प्यार है” लाँच केला, , मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात. त्याचे गायक आणि अभिनेते एस. शुभम तर व्हिडिओ मध्ये त्याच्यासोबत सुंदर अभिनेत्री अर्चना सिंग राजपूत आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शक बजरंग बादशाह आहेत, गीतकार आहेत संगीतकार एस शुभम. ‘तुम ही हो’ या म्युझिक व्हिडिओच्या यशाचा आनंदही यावेळी साजरा करण्यात आला. या गाण्याचे संगीत एसएलएफने दिले असून दिग्दर्शक बजरंग बादशाह आहेत, गीतकार शब्बीर अहमद आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरबाज खान होते, तर इतर सेलिब्रिटी पाहुण्यांमध्ये दिग्दर्शक दीपक शिवदासानी, अली असगर, शुभमचे वडील संजय सेठ, निर्माता सलमान अहमद खान, हनिफ छत्रीवाला, ईशान मसिह, एसआरके यांचा समावेश होता.
गायिका चंद्रकला यांनी आपल्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. अरबाज खानसह सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर तुमसे प्यार है हे गाणे दाखवण्यात आले, जे सर्वांना आवडले.

अरबाज खानने सांगितले की शुभमसाठी हे एक अतिशय महत्त्वाचे कार्य आहे कारण आज त्याचा अल्बम रिलीज होत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण येथे आहोत. शुभमचे वडील इतके आनंदी दिसत आहेत की त्यांच्या मुलाचे नाही तर त्यांचे गाणे रिलीज होत आहे. प्रत्येक वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाच्या यशाचा आनंद आहे. मी गाणे पाहिले आणि मला ते खूप आवडले. त्याचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये अप्रतिम अभिनय करणारी अभिनेत्री अर्चना सिंग राजपूत हिचेही मी अभिनंदन करतो. शुभम पडद्यावर खूप आश्वासक दिसत आहे, त्याचा आवाजही अप्रतिम आहे. मी त्याला थेट गातानाही ऐकले आहे आणि तो अप्रतिम गातो. शुभमला सपोर्ट करण्यासाठी अली असगर, इशान मसिह आणि सर्वजण येथे उपस्थित आहेत. बजरंग बादशाहने व्हिडीओचे दिग्दर्शन उत्तम केले आहे.

यावेळी शुभमचे वडील खूप भावूक झाले. ते म्हणाले की, वडील म्हणतात मोठे नाव कमावणार, आमचा मुलगा असे काम करेल, शुभमने ते करून दाखवले. शुभमला आशीर्वाद देण्यासाठी अरबाज खानने आपला मौल्यवान वेळ काढल्याबद्दल आम्ही सर्वजण त्याचे आभारी आहोत.

यावेळी शुभमही खूप उत्साही दिसत होता. माझ्या ताज्या गाण्याच्या लाँचसाठी आलेल्या अरबाज खान, अली असगर यांसारख्या पाहुण्यांचे आभार कसे मानावेत, असे माझ्याकडे शब्द नाहीत. या गाण्यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही ते 17 डिग्रीच्या खाणीत शूट केले आहे, आज त्याचा निकाल पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

प्रभावशाली इशान मसिहने सांगितले की, शुभमने बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये आपल्या कामगिरीने चांगलीच चमक दाखवली आहे. मी आणि अर्शी खान या गाण्यावर एक वेगळी रील बनवणार आहोत.

अभिनेत्री अर्चना सिंग राजपूत हिने देखील येथे आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला आणि अरबाज सरांनी आमचा अल्बम लाँच करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.

जागतिक नृत्य दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे बहारदार कार्यक्रम

पिंपरी- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 27 एप्रिल रोजी डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेचे आयोजन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. सौ. भाग्यश्रीताई पी. पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार व कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ लिबरल आर्टस्‌, पिंपरी, पुणेचे संचालक डॉ. नंदकिशोर कपोते, प्रा. डॉ. स्वाती दैठणकर, श्रीमती निकिता मोघे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका प्रा. स्वाती दैठणकर यांच्या नृत्याने झाली. त्यांनी ‘भजे गोविंदम‌’ व ‘शबरी‌’ यावर अप्रतिम भरतनाट्यम नृत्य सादर केले. यानंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्य सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे‌’ यावर भाव प्रस्तुत करुन कथक नृत्यातील विविध प्रकार तोडे-तुकडे, पदसंचालन आदि प्रकार सादर केले. त्यांनी सादर केलेली जुगलबंदी व श्री गजानन महाराज यांची आरती यास सर्व प्रेक्षकांनी उभे राहुन भरभरुन दाद दिली. त्यांना तबलासाथ पंडित कालीनाथ मिश्रा, गायनसाथ पंडित संजय गरुड, सितारसाथ अलका गुजर, बासरीसाथ अजहरुद्दीन शेख, पखावजसाथ ज्ञानेश कोकाटे यांनी केली. यानंतर डॉ. नरेंद्र कडू (संचालक- शैक्षणिक) यांचे गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यांनी अभंग, भजन आदि प्रकार सादर केले.
यानंतर खास जागतिक नृत्य परिषदेसाठी देश-विदेशातुन आलेल्या नृत्य कलाकारांनी शोध-निबंध प्रस्तुत केले. यात दिल्ली- रजनी राव, राहुल रजक, कुवैत- किरण जावा, अमेरिका- किरण चव्हाण, हैद्राबाद- प्रेरणा अग्रवाल, प्रियंका भारदे , सोलापुर- मनिषा जोशी, मुंबई- डॉ. सुनिल सुंकारा, पौलमी मुखर्जी, स्मृती तळपदे, अक्षोभ्य भारद्वाज, अमृता साळवी, पुणे- डॉ. परिमल फडके, मुग्धा डिसुझा, अमला शेखर, आकांक्षा ब्रह्मे, रोहिणी कुलकर्णी , भोपाळ- कविता तिवारी, जयपुर- मनस्विनी शर्मा आदि नामवंत कलाकार सहभागी झाले होते. त्यांनी नृत्य शिल्प, नृत्य साहित्य, नृत्य शास्त्र, नृत्य मानसशास्त्र अशा विविध विषयांवर शोध निबंध प्रस्तुत करुन शास्त्रीय नृत्यही सादर केले.
रसिकांच्या भरघोस प्रतिसादाने संपुर्ण कार्यक्रम यशस्वी व रंगतदार झाला.

पुराचा फटका बसणाऱ्या नागरी वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 सांगली, दि. 28,  : सांगली जिल्ह्यात ज्या नागरी वस्त्यांना पुराचा फटका बसतो त्यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

            शासकीय विश्रामगृह सांगली येथे सांगली, कुपवाड, मिरज परिसर आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे येत असलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूरस्थिती रोखणे, कायमस्वरूपी उपाय शोधणे, संबंधित भागात पुरामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन, योजनांची अंमलबजावणी या संदर्भात  जिल्ह्यातील  विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

        सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील महापूराचा फटका बसणाऱ्या गावांचा आढावा घेवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली शिष्यवृत्ती, जिल्ह्यातील ॲट्रॉसिटीची प्रकरणे, वृध्दाश्रम, आंतरजातीय विवाह प्रकरणी वाटप करण्यात आलेले अनुदान, सफाई कामगार, दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना यांची सविस्तर माहिती घेतली. याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी कृष्णा नदीत मृत झालेले मासे व कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण याबाबत करण्यात येत असणाऱ्या कारवाईचाही त्यांनी आढावा घेतला.

            यावेळी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमध्ये जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 810 गॅस कनेक्शन देण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 531 गॅस जोडण्या अनुसूचित जाती संवर्गाला तर 353 जोडण्या अनुसूचित जमातीतील संवर्गाला पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात सन 2016 पासून आत्तापर्यंत 21 हजार 872 घरकुले मंजूर असून त्यापैकी 15 हजार 308 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर 6 हजार 564 घरकुलांचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 ची महानगरपालिकेतर्फे अंमलबजावणी करण्यात येत असून अशा सफाई कामगारांच्या मृत्यूबाबत नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली महानगरपालिकेने दोन जणांच्या मृत्यू प्रकरणी प्रत्येकी 10 लाख रूपये असे 20 लाख रूपये अदा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            वंचित घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत यावेळी केंद्रीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातील, शिष्यवृत्तीपासून कोणीही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले.  ॲट्रॉसिटी प्रकरणांचा आढावा घेऊन ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये संवेदनशिलपणे तपास होणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीच्या लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत दक्षता घ्या, असेही त्यांनी निर्देशित केले.