पुणे- आम्ही पुण्याच्या पोलिसांना नेहमीच टार्गेट करतो , अर्थात गुन्हेगारी वाढली ,बरेचसे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऐवजी इन्व्हेस्टमेंट ला प्राधान्य देत असल्याने पोलीस टीकेचे धनी बनतात . पण काही काही वेळा त्यांनी केलेले चांगले काम हि विसरून चालत नाही अर्थात काही मंडळी विसरतात ..पण पुणेकरांनी विसरू नये .अशीच एक घटना पेट्रोलिंग करताना पुण्याच्या पोलीसंनिकेली . घटना तशी कर्तव्य म्हणून अत्यंत साधी ..पण तशी अविस्मरणीय देखील.
झाले असे …
पोलीस अंमलदार मगर आणि शिंदे हे पेट्रोलिंग करत असताना काल दुपारी दीड वाजता पुणे रेल्वे स्टेशन च्या फलाट क्रमांक ६ वर पोहोचले ..तेव्हा कोपर्यात एक ४ वर्षाची मुलगी त्यांना रडत बसलेली दिसली .तेव्हा या पोलीसामामांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला ना मराठी येत होती ना हिंदी भाषा … मग समजले तिला कन्नड भाषा येते . आणि मग एका कन्नड भाषिकाला बोलावून घेण्यात आले. तेव्हा तिचे नाव फक्त समजले श्रावणी तोरणी …. अन्य काही बिचारीला सांगता येईना … मग डिजिटल मिडिया चा वापर करायचे ठरले . त्याप्रमाणे मुलीचा फोटो घेऊन व्हाटस अप ग्रुप वर टाकून चौकशी सुरु झाली तेव्हा हि मुलगी ताडीवाला रोड भागात राहणाऱ्या दानाम्मा गंगाधर तोरणी या महिलेची असल्याची माहिती पुढे आली .ह त्यांची सर्वात लहान मुलगी होती . आणि मग सारे सोपस्कार उरकून आईच्या ताब्यात मुलीला देण्यात आले.
कामगिरी तशी खूप छोटी पण तिचे महत्व मात्र खूप मोठे .. या दोन्ही पोलीस अंमलदारांचे या कामगिरीबाबत खूप खूप कौतुक आणि पुढील कारकीर्दीस शुभेछ्या ..