Home Blog Page 1416

भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ! -सचिन अहिर यांची टीका

पुणे-कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त गुप्ते मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सचिन अहिर बोलत होते. याप्रसंगी महिला आघाडीच्या संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, समीर तुपे, गजानन पंडित, आनंद गोयल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळासाहेब मालुसरे, रामभाऊ पारीख, युवासेनेचे राम थरकुडे, सनी गवते, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, ‘ही निवडणूक महाविकास आघाडी या नात्याने आपल्याला जिंकायची आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता कसबा मतदारसंघात बदल शक्य आहे. महाविकास आघाडी म्हणून धंगेकर यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही आघाडी केवळ विधानसभेपुरती नाही. ही निवडणूक अटीतटीची असून, आपल्याला प्रत्येक बूथमध्ये काम करून विजय निश्चित करायचा आहे.’

तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, ‘कसबा मतदारसंघात आपला महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे. यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्न करतील. येत्या पालिका निवडणुकीत आपले शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रवींद्र धंगेकर, संजय मोरे, विशाल धनवडे, ज्येष्ठ शिवसैनिक विजय ठकार यांचीही भाषणे झाली.

डॉ. बाबा आढाव यांची धंगेकर यांनी भेट घेऊन घेतले आशीर्वाद

रवींद्र धंगेकर यांनी आज ज्येष्ठ नेते व समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची घरी जाऊन सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र किराड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे होते. सध्या परीस्थित रवींद्र धंगेकर निवडून येणे गरजेचे आहे. त्यांना सर्व स्तरातून पाठींबा आहे, आमचाही पाठिंबा आहे. अनेक नागरी प्रश्न आहेत की जे धंगेकर सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. असे या प्रसंगी बाबा आढाव म्हणाले. त्यांनी यावेळी मतदार संघातील अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. ‘या प्रत्येक प्रश्न लक्ष घालून ते सोडवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन’ अशी खात्री रवींद्र धंगेकर यांनी यावेळी त्यांना दिली. याप्रसंगी हमाल पंचायतचे सरचिटणीस गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय डोंबाळे, व्यवस्थापक हुसेन पठाण, सहचिटणीस विनोद शिंदे, संघटक संदीप मारणे, रिक्षा पंचायतीचे व्यवस्थापक रांजणे, राहुल नागावकर, टेम्पो पंचायतीचे सरचिटणीस संपत सुकाळे, पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस मोहन चिंचकर, महिला अध्यक्षा नीलम अय्यर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन वाडेकर,  सहसचिव ओंकार मोरे आदी उपस्थित होते.

कसब्यात भाजप म्हणजे ‘विकासाचे स्पीड ब्रेकर’-रविंद्र धंगेकर.

पुणे-गेल्या पाच वर्षापासून पुण्यात खासदार, आमदार भाजपचे असून पुणे महापालिका देखील त्यांच्याच हाती होती, मात्र एवढे असूनही कसबा विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास का झाला नाही ? कसब्याच्या विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठा निधी का आणला नाही? काहीही विकास काम केले नाही तरी आपण निवडून येतो हिच मानसिकता असल्याने भाजपचे विकासाकडे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे, तर ते विकासाचे ‘स्पीड ब्रेकर’ बनले आहेत.  आता मात्र कसब्यातील मतदार विकासासाठी उत्सुक असून ते निश्चित परिवर्तन घडवतील, असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी (ता.१०) रोजी रात्री संपलेल्या पदयात्रेनंतर बोलताना सांगितले.

दुपारी चार वाजता कागदीपुरा येथून पदयात्रेला सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मोठे झेंडे घेतलेले तीन तरुण प्रारंभी, त्यानंतर ढोल-ताशा पथक आणि नंतर उमेदवार येत असल्याची माहिती देणारा रिक्षा अशा रचनेने पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. उमेदवार रवींद्र धंगेकर हे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना अभिवादन करत पुढे चालले होते. औक्षण करण्यासाठी थांबलेल्या महिला भगिनींकडून मान स्वीकारत तसेच ठिकठिकाणचा सत्कार स्वीकारत,  चौका चौकांमध्ये फटाक्यांच्या माळा लावून व हार घालून नागरिक त्यांचे स्वागत करीत होते. कसबा गणपती, नानावाडा, पासोडया विठोबा येथून मार्गक्रमण करत पदयात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत घेत पुढे गेली

पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदयात्रेच्या अग्रभागी होते. तांबोळी मस्जिद येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर धंगेकर यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मस्जिद येथे जाऊन माथा टेकला. पदयात्रेचे ठिकठिकाणी होणारे स्वागत कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असल्याचे चित्र होते.

मार्गात येणाऱ्या शितळा देवी मंदिर व सत्यनारायण भगवान मंदिरात जाऊन श्री धंगेकर यांनी दर्शन घेतले. याच परिसरात सुरू असलेल्या एका लग्न सोहळ्याला देखील उमेदवारांनी हजेरी लावून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या तृष्णाताई विश्वासराव, संदीप गायकवाड, विलास कतलकर, स्वाती कतलकर, संतोष भुतकर, शुभम दुगाने, राजेंद्र शिंदे, युवराज पाटील, नागेश खडके, जितेंद्र निजामपूरकर, अश्विनी मल्हारे, अनुपमा महांगडे, गौरी हेंद्रे  हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सोन्या मारुती चौक, डुल्या मारुती चौक येथील व्यापारी देखील पदयात्रा पाहायला दुकानाच्या बाहेर येत होते. श्री धंगेकर हे वैयक्तिक प्रत्येकाला भेटत व आशीर्वाद घेत पुढे चालले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर, गणेश नलावडे, दत्ता  सागरे, प्रसाद गावडे, राजेंद्र मोरे, राजेंद्र शिंदे, स्वाती कथलकर ,संतोष भुतकर, निलेश राऊत, हनुमंत दगडे तर कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका लताताई राजगुरू, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, संदीप आटवालकर, मंगेश निरगुडकर, प्रवीण करपे या प्रमुख कार्यकर्त्या. या प्रमुख कार्यकर्त्यांचा घोषणा देण्यात व अभिवादन करण्यात पुढाकार होता.

रात्री आठ वाजता बॉंम्बे वाडा येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर तेथे समारोप झाला. काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देत “महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचंड मतांनी विजयी होतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रिया बेर्डेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

नाशिक-२०२० मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज नाशकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला .नाशिक मध्ये होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा प्रवेश पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.आता प्रिया बेर्डेसह इतर काही कलाकारांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारणी बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित सुरुवात झाली आहे. भाजपाचे अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते या बैठकीला हजर आहेत. दरम्यान अनेक नवे प्रवेश पक्षात होत आहे. त्यात मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे सह इतर काही कलाकारांच्या प्रवेशाचा देखील समावेश होत आहे.

विनायक राऊत सिंधुदुर्गाला लागलेली कीड:नारायण राणेंचा प्रहार

पुणे-संजय राऊत यांनी कुठल्याही प्रकारची धमकी आलेली नाही, ते काही राज्याचे मोठे नेते नाहीत, ते बदनाम आहेत, सामना चालत नाही म्हणून ब्रेकिंगसाठी ते प्रयत्न करतात. आणि खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्गाला लागलेली कीड आहे, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

नऊ महिन्यामध्ये मुल होतं पण, राज्यात सहा महिने होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, “मुल होण्याचे आणि विस्ताराचा प्रोसेस काय आहे ते अजित पवारांचा माहिती आहे, त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केले त्यांची चौकशी सध्या सुरू आहे, सत्य समोर येईलच.

पुढे शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसेनेवाले आई-वडिलांना विसरले. कसबापेठ आणि पिंपरी चिंचवडची जागा आम्ही मताधिक्याने जिंकणारच आहोत. विरोधकांना आम्ही धुराड्यासारखे उडवणार आहोत” अस म्हणत पिंपरी-चिंचवड आणि कसबापेठ निवडणूक भाजप जिंकणार असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.

मुले जन्माला घातल्यानंतर नाव ठेवण्याचं अधिकार हा बापाला असतो, आम्ही विकास केला त्यामुळे मोदींचे राज्यात दौरे वाढत आहेत, अशी टीकाही यावेळी राणेंनी विरोधकांवर केली.

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

कोकणात रिफायनरीच्या बाजूने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दौरा झाला होता. त्यावेळी रिफायनरीला कोण विरोध करणार हे आम्ही पाहतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 24 तासात या रिफायनरी विरोधात लिहिणारे शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. त्यांच्या हत्तेमागे सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी आहे. शशिकांत वारिसे यांच्या हत्तेचा सूत्रधाराला अटक व्हावी. त्याच्या हत्तेला सरकार जबाबदार आहे. सरकारने त्यांचा खून केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला 50 लाख देण्यात यावे,’ अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी करत दोषींना पकडल्या शिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.

पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरण:SIT गठीत करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

0

मुंबई-पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही SIT गठीत करा अशा सूचना फडणवीसांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा 7 फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 48 वर्षीय शशिकांत वारिसे हे कोकणातील नाणार रिफायनरीविरोधात सातत्याने बातम्या लिहित होते, म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली असा आरोप केला जात आहे.

राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसले” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

पत्रकार वारिसेंच्या हत्याऱ्यांना राणेंनी पोसले:विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई:

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.​​​​​​नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.

राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.​​​​​नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा असाही पुढाकार

पुणे ‘

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी भाजपा पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून विवर ॲंड वेवझ् ऑफ महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि अति दुर्गम भागातील विणकर आपल्या कलाकुसरी सादर केल्या आहेत. या सर्व विणकर बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील त्यापैकी एका विचाराने तयार केलेला खादी शर्ट परिधान करून कार्यक्रमास उपस्थिती लावली.

आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक मिलिंद साठे यांचे निधन

पुणे-

आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक मिलिंद साठे यांचे निधन

आर्ट इंडिया फाउंडेशन संस्थापक, इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (वय 60 वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री (10 फेब्रुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.

मिलिंद साठे यांची अलिकडच्या काळातील ओळख त्यांच्या चित्रकलाविषयक सामाजिक उपक्रमांमुळे होती. इंडिया आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांची प्रदर्शने भरविली, तसेच स्थानिक, युवा, होतकरू चित्रकारांना त्यांच्या कलाकृतिंचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये कलाविषयक जाणीव आणि दृष्टिकोन वाढावा यासाठी ‘खुला आसमान’ आणि ‘अरमान’ हे दोन प्रमुख उपक्रम राबविले.

त्यांचा ‘खुला आसमान’ हा मुलांमधल्या चित्रकलेतल्या सर्जकतेला, सकारात्कतेला आणि अभिव्यक्तिला संधी देणारा प्लॅटफॉर्म आहे. ‘अरमान’ या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विशेष गरजा असलेल्या समाजघटकांचे आयुष्याशी चालू असलेले संघर्ष आणि परिस्थितीला हार न जाता जपलेली सकारात्मकता याबद्दलच्या आश्वासक गोष्टींचा संग्रह आहे.

त्यांनी आदिवासी आणि दुर्गम भागातली मुले, कॅन्सरपीडित मुले (टाटा कॅन्सर संशोधन केंद्राबरोबर) आणि थॅलासेमिया आजार झालेली मुले (रेड क्रॉसबरोबर) यांच्यासाठी चित्रकलाविषयक  आश्वासक उपक्रमांचे आयोजन केले होते.

‘सीएसआर वर्ल्ड’ या त्यांच्या प्लॅटफॉर्ममार्फत त्यांनी एका बाजूला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरीकडे चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय  घालून द्यायचा प्रयत्न केला.

मिलिंद साठे  यांचे शिक्षण ज्ञान प्रबोधिनी, फर्ग्युसन महाविद्यालय, दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज आणि सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या संस्थांमध्ये झाले. लिंक सॉफ्टवेअर आणि न्यू मीडिया व्हेंचर्स या त्यांच्या स्वतःच्या दोन कंपन्यांमार्फत आयटी क्षेत्रात गेली 25 वर्ष उद्योजक म्हणून ते कार्यरत होते. प्रवास, सायकलिंग, फोटोग्राफी, इतिहास आणि संवादमाध्यमे यामध्ये त्यांना सखोल आणि सक्रिय रस होता. त्यांच्या पश्चात पत्नी रुबी हॉल क्लिनिक अतिदक्षता विभागाच्या संचालिका डॉ. प्राची साठे, मुलगा, वडील, बहीण असा परिवार आहे.

आप पाठोपाठ ब्रिगेडचीही माघार..कसब्याच्या रिंगणात आता १६ उमेदवार..किंग कोण,आणि किंगमेकर ठरणार ?

पुणे-काल कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार दाभेकर यांच्या माघारी नंतर आज आपच्या उमेदवाराने आणि त्यापाठोपाठ संभाजी ब्रिगेड च्या उमेदवाराने माघार घेतल्याने बहुरंगी लढत आता रस्सीखेच दर्शविणारी होईल कि काय ? असे वाटत असताना या निवडणुकीच्या निकालानंतरच किंग कोण ? आणि किंगमेकर कोण ? हे ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आज माघारीच्या अखेरच्या दिवशी कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत खालील १२ उमेदवार प्रत्यक्षात रिंगणात उरले आहेत .

1) हेमंत रासने (भाजपा ) ,2)रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस ) 3)आनंद दवे(अपक्ष ) 4)तुकाराम डफळ 5)बलदेवसिंग कोचर 6)रविंद्र वेदपाठक 7) अनिल हतागळे 8)अभिजित बिचुकुले 9)अमोल तुजारे 10)अजित इंगळे 11)सुरेश ओसवाल 12)खिसाल जलाल जाफरी 13)चंद्रकांत मोटे14)रियाज सय्यद 15) संतोष चौधरी 16)हुसेन नसरुद्दिन शेख

आधी कायद्याचे भय दाखवून उद्योजकांना त्रास दिला जायचा:PM मोदींची काॅंग्रेसवर टीका

0

मुंबई-”आधी कायद्याचे भय उद्योजकांना दाखवून त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान झाले अशी अप्रत्यक्ष टीका काॅंग्रेसवर करून मागच्या आठ, नऊ वर्षांपासून आम्ही ऐतिहासिक सुधारणा करतोय. त्याचे प्रभावही दिसून येत आहे. आम्ही जाॅब क्लस्टर्सच्या पाठिशी उभे आहोत. व्यावसायिकांना विश्वास देण्यासाठी आम्ही विवादाऐवजी जनविश्वास योजना आणली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

दाऊदी बोहरा समाजाच्या अल जामीया – तुस – सैफीया या संकुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. ”मी दाऊदी बोहरा परिवरातीलच असून मला तुमचे प्रेम मिळते, आपले जूने नाते आहे” अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पीएम मोदी यांचे बोहरा समाजातर्फे यावेळी स्वागत करण्यात आले.

मी बोहरा समाजाच्या परिवारातील सदस्यमाझे आणि दाऊदी समाजाचे नाते प्रेमाचे

पीएम मोदी म्हणाले, मी तुमच्या परिवाराचा सदस्य आहे. तुम्ही दाखवलेल्या चित्रफितीत माननिय मुख्यमंत्री, माननिय पंतप्रधान असा उल्लेख केला. तो करू नये मी तुमच्या परिवारातील असून चार पिढ्यांपासून मी आपल्या परिवारासोबत आहे. आज तुमच्यासोबत येऊन मी आनंदीत झालो.पीएम मोदी म्हणाले, कोणत्याही समाजाची ती ओळख असते की, वेळेसोबत परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर दाऊदी बोहरा समुदाय प्रत्येकवेळी उभा राहीला आहे. आज येथील शिक्षण संस्थेचा विस्तार याचेच एक द्योतक आहे. मी संस्थांशी जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो की, दीडशे वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाले आहे. मी तुमचे अभिनंदन करतो.पीएम मोदी म्हणाले, माझे आणि दाऊदी बोहरा समाजाचे नाते जूने आणि प्रेमाचे आहे. मी जगात कोठेही गेलो तर तेथे मला या समाजाचे प्रेमच मिळाले आहे. कुपोषण, जलसंरक्षण अभियानापर्यंत समाज आणि सरकार कसे एकदुसऱ्याची शक्ती बनते याची मी अनुभुती घेतली आहे. मी गुजरातेतून दिल्लीला गेलो त्यानंतर तुम्ही गादी संभाळली. आजही तुमचे प्रेम मला मिळते.पीएम मोदी म्हणाले, मला समाजाने दिलेला स्नेह माझ्यासाठी अनमोल आहे. मी देशातच नव्हे तर जगात कोठेही माझे बोहरा भाऊ – बहिण मला कोणत्याही परिस्थितीत भेटतात. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी भारताबद्दलची चिंता आणि प्रेम दिसून येते. तुमचे प्रेम मला वारंवार आपल्यापर्यंत खेचून आणते. मला माहीतेय की, मुंबई शाखेच्या रुपास अल जमया सैफीयाचा जो विचार होत आहे याचा सयद्दना अब्दुल कादीर रहेमुद्दीन यांनी स्वप्न पाहीले होते. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता, त्याकाळी त्यांनी शिक्षणाबाबत स्वप्न पाहीले ही बाब महत्वाची होती.

पीएम मोदी म्हणाले, जेव्हाही समाजातील लोक सुरत, मुंबईला येतील तेव्हा एकदा तरी दांडी येथे यावे. कारण महात्मा गांधीं​​​​​ची​ दांडीयात्रा आझादीचा एक टर्निंग पाईंट होता. परंतु, माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ही की, मीठाच्या सत्याग्रहाआधी महात्मा गांधी बोहरा समाजातील व्यक्तीच्या घरी थांबले होते.

पीएम मोदी म्हणाले, सयद्दना साहेबांना मी माझ्या मनातील इच्छा व्यक्त केली. त्यांनी एका क्षणात समुद्रासमोरील मोठा बंगला मला दिला आणि आज तेथे दांडीयात्रेच्या स्मृतीचे मोठे स्मारक बनले आहे. सयद्दना साहेबांच्या आठवणी दांडीयात्रेसोबत अमर झाली आहे.

पीएम मोदी म्हणाले, गत आठ वर्षांत अनेक विद्यापीठे उघडली. प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल काॅलेज उघडत आहोत. 2004 ते 2014 145 मेडीकल काॅलेज उघडले. 2014 ते आतापर्यंत आमच्या सत्ताकाळात 260 पेक्षा जास्त मेडीकल काॅलेज उघडण्यात येत आहेत. देशात प्रत्येक आठवड्याला एक विद्यापीठ आणि दोन महाविद्यालये उघडली. ही गती या गोष्टीची साक्षीदार आहे की, भारत विश्वाला भविष्याची दिशा देणारे विद्यापीठ बनेल.पीएम मोदी म्हणाले, शिक्षणव्यवस्थेत स्थानिक भाषेला महत्व दिले जात आहे हे आमच्या सरकारचे धोरण आहे. गुलामीच्या काळात इंग्रजीलाच शिक्षणाची भाषा बनवली होती. यात मागास, दलित, कमजोर वर्गाचे नुकसान झाले. त्यांना भाषेच्या आधारावर स्पर्धेतून बाहेर काढले जात होते. पण आता तसे होणार नाही. स्थानिक भाषेतून तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मिळणार आहे.

एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध

मुंबई, दि. १० : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १८ जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सव उत्कृष्ट देखावे स्पर्धा गौरी सजावट व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुणे- शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट देखावे स्पर्धा गौरी सजावट स्पर्धा व सेल्फी विथ नवदुर्गा स्पर्धा या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की , “गणेशोत्सव हि पुण्याची ओळख आहे . आज संपूर्ण जगभरात साजरा होणारा गणेशोत्सव सर्वप्रथम पुण्यातून साजरा झाला होता. आपल्या पुण्यनगरीची संस्कृती जपणारे विविध गणेशोत्सव मंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दरवर्षी राबवत असणारा उत्कृष्ट देखावे स्पर्धा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, या पुढील काळात देखील निरंतर सुरू राहावा, अशी माझी देखील इच्छा आहे. गणेशोत्सवाचे दिवसेंदिवस होत असलेले व्यापक स्वरूप हे पुण्यनगरीच्या सांस्कृतिक व पर्यटन विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या होत असलेल्या बदलांचा स्वीकार करत, याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल, असा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छितो.
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यनगरीतील गणेशोत्सव उत्साहात साजरा करत विविध सामाजिक उपयोगी संदेश देणारे देखावे उभे करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने दरवर्षी बक्षीस दिले जातात. यावर्षी देखील विविध सामाजिक उपक्रमांवरील देखाव्यांना बक्षीसे देण्यात आली. यात पुणे शहर कसबा विधानसभेतील जय जवान मित्र मंडळ, नाना पेठ, पुणे यांच्या “सामाजिक” या जिवंत देखाव्याने प्रथम क्रमांक मिळवला तर नवजवान मित्र मंडळ, सदाशिव पेठ यांनी (ऐतिहासिक) जिवंत देखावा ३५ कलाकार असणारा परिणामकारक देखावा सादर केला यास द्वितीय क्रमांक मिळाला, संगम तरुण मित्र मंडळ, कोथरूड यांनी साकारलेल्या अफजल खानाचा वध (जिवंत देखावा) याने तृतीय क्रमांक पटकावला.गवळीवाडा तरुण मंडळ (खडकी) व श्रीकृष्ण मंडळ (डेक्कन चौक) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला.

या बक्षीस वितरण समारंभासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,निलेश लंके,चेतन तुपे,संदीप बालवडकर,प्रदीप देशमुख,निवृत्ति बांदल , रवींद्र मालवदकर , सुषमा सातपुते , महेश हांडे यांसह मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ज्युदो मध्ये महाराष्ट्राला महिलांचे उपविजेतेपद

0

परिज्ञा कस्तुरेला रौप्य तर समीक्षा शेलारला कांस्य

भोपाळ-
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ज्युदोच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या गटात सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले आणि कौतुकास्पद कामगिरी केली. आज परिज्ञा कस्तुरे हिने रौप्य तर समीक्षा शेलार हिने कांस्यपदकाची कमाई केली.
६३ किलो खालील गटात मुंबईची खेळाडू प्रतिज्ञा हिला चुरशीच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या हिमांशी टोकस हिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ६३ किलो वरील गटात समीक्षा हिला उपांत्य फेरीत मध्य प्रदेशच्या नंदिता कुमारी विरुद्ध हार पत्करावी लागली होती. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत तिने हरियाणाच्या नित्याकुमारी हिचे आव्हान मोडून काढले आणि पदकावर आपले नाव कोरले.

तलवारबाजी मध्ये महाराष्ट्राचा गोल्डन समारोप; पदार्पणात पटकावली चॅम्पियनशिप

0

तलवारबाजीत महाराष्ट्राला एकूण ४ सुवर्ण, ३रौप्य, २ कांस्य

जबलपूर:महाराष्ट्र पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत शुक्रवारी तलवारबाजी स्पर्धेत गोल्डन डबल धमाका उडवला. महिला संघाने इप्पी गटाच्या सांघिक मध्ये सुवर्णपदक पटकावले. अनुजा लाड, माही अरदवाड, गायत्री कदम आणि जान्हवी जाधव यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्र संघाने फायनल मध्ये यजमान मध्य प्रदेश टीमला धूळ चारली.
तसेच निखिल वाघ, हर्षवर्धन औताडे, आदित्य वाहुळ आणि श्रेयस जाधव यांनी सर्वोत्तम कामगिरी सेबरच्या सांघिक गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. संघाने फायनल मध्ये जम्मू कश्मीर चा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय खेळाडू निखिल वाघ, श्रेयस जाधव, अनुजा लाड, माही, कशिश, जान्हवी यांनी महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया च्या पदार्पणात तलवारबाजी खेळ प्रकारात जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या तलवारबाजी मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत नऊ पदकांची कमाई केली. यामध्ये ४ सुवर्ण, ३रौप्य, २ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र संघाने मुख्य प्रशिक्षक स्वप्निल तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे या संपादन केले.

पदार्पणात सोनेरी यश कौतुकास्पद : चंद्रकांत कांबळे
आंतरराष्ट्रीय फेन्सर यांनी पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या तलवारबाजी खेळ प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंची तलवारबाजी मधील पदार्पणातील ही कामगिरी कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी प्रचंड मेहनतीतून आपले वर्चस्व अबाधित ठेवत महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले, अशा शब्दात पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे यांनी महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे खास कौतुक केले.

भरीव निधी मिळाल्याने महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई-नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.यावेळी ते बोलत होते .

श्री. शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून  भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे. ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास आले आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या धावतील.

रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री यांचे योगदान महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा लाभ व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले.

वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी

  • आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवास हे वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
  • वंदे भारत एक्सप्रेमसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसिंल्ड रोलर पडदे, ‘आधुनिक मिनी-पॅन्ट्री’ आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी ‘इमरजन्सी टॉक-बॅक’ युनिट कार्यान्वित
  • उत्तम उष्णता वायुविजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यांसह वातानूकुलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा
  • इंटेलिजेंट वातानूकुलित प्रणाली हवामान परिस्थितीनुसार कूलिंग समायोजन
  • स्वदेशात तयार झालेली सेमी-हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन सेट,१६० किमी प्रति तास वेग गाठण्याची वेळ १२९ सेकंद
  • प्रवाशांसाठी ३.३ (राइडिंग इंडेक्स) सह उत्तम आरामशीर प्रवास
  • स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे
  • एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विहंग सीट्स
  • GSM/GPRS द्वारे नियंत्रण केंद्र / देखभाल कर्मचाऱ्यांना एअर कंडिशनिंग, कम्युनिकेशन आणि फीडबॅकचे निरीक्षण करण्यासाठी कोच नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली
  • जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यासह उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्रेसरचा वापर करून उत्तम उष्णता वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रण
  • वातानुकूलित हवेच्या ध्वनीरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट
  • दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय
  • टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट
  • ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल
  • प्रत्येक कोचमध्ये ३२ प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम
  • उत्तम ट्रेन नियंत्रण व्यवस्थापनासाठी स्तर –।। संरक्षा एकीकृत प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रासह कवच प्रणाली (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) सुरू
  • प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था,अग्निशमन सुरक्षा उपाय
  • ४ प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेरे
  • सर्व डब्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम व इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम यांसारखे उत्तम
  • प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या
  • इमर्जन्सी टॉक ‌‌बॅक युनिट्स
  • व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद
  • अंडर- स्लंग इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी उत्तम फ्लड प्रूफिंग ज्यात ६५० मिमी पूर पाण्यामध्ये काही होणार नाही

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये

  • मुंबई ते सोलापूर अशी धावणारी ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन
  • आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडणार
  • सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी
  • या मार्गावर सध्या कार्यान्वित असलेल्या सुपरफास्ट ट्रेनला ७ तास ५५ मिनिटे लागतात, तर वंदे भारतला ६ तास ३० मिनिटे लागणार, यामुळे प्रवाशांचा दीड तास वाचणार
  • जागतिक वारसाला तीर्थक्षेत्र,टेक्सटाईल हबशी जोडणार
  • पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक हब पुणे यांना चालना मिळणार
  • भोर घाटातील खंडाळा लोणावळा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन

मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये

  • ही देशातील १० वी वंदे भारत ट्रेन
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी
  • आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी जसे की नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला जोडले जाणार
  • थळ घाट म्हणजे कसारा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन