मुंबई:
“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.
“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.
“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.