पुणे-काल कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार दाभेकर यांच्या माघारी नंतर आज आपच्या उमेदवाराने आणि त्यापाठोपाठ संभाजी ब्रिगेड च्या उमेदवाराने माघार घेतल्याने बहुरंगी लढत आता रस्सीखेच दर्शविणारी होईल कि काय ? असे वाटत असताना या निवडणुकीच्या निकालानंतरच किंग कोण ? आणि किंगमेकर कोण ? हे ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आज माघारीच्या अखेरच्या दिवशी कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत खालील १२ उमेदवार प्रत्यक्षात रिंगणात उरले आहेत .
1) हेमंत रासने (भाजपा ) ,2)रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस ) 3)आनंद दवे(अपक्ष ) 4)तुकाराम डफळ 5)बलदेवसिंग कोचर 6)रविंद्र वेदपाठक 7) अनिल हतागळे 8)अभिजित बिचुकुले 9)अमोल तुजारे 10)अजित इंगळे 11)सुरेश ओसवाल 12)खिसाल जलाल जाफरी 13)चंद्रकांत मोटे14)रियाज सय्यद 15) संतोष चौधरी 16)हुसेन नसरुद्दिन शेख