मुंबई-”आधी कायद्याचे भय उद्योजकांना दाखवून त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान झाले अशी अप्रत्यक्ष टीका काॅंग्रेसवर करून मागच्या आठ, नऊ वर्षांपासून आम्ही ऐतिहासिक सुधारणा करतोय. त्याचे प्रभावही दिसून येत आहे. आम्ही जाॅब क्लस्टर्सच्या पाठिशी उभे आहोत. व्यावसायिकांना विश्वास देण्यासाठी आम्ही विवादाऐवजी जनविश्वास योजना आणली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
दाऊदी बोहरा समाजाच्या अल जामीया – तुस – सैफीया या संकुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. ”मी दाऊदी बोहरा परिवरातीलच असून मला तुमचे प्रेम मिळते, आपले जूने नाते आहे” अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पीएम मोदी यांचे बोहरा समाजातर्फे यावेळी स्वागत करण्यात आले.

मी बोहरा समाजाच्या परिवारातील सदस्य–माझे आणि दाऊदी समाजाचे नाते प्रेमाचे
पीएम मोदी म्हणाले, मी तुमच्या परिवाराचा सदस्य आहे. तुम्ही दाखवलेल्या चित्रफितीत माननिय मुख्यमंत्री, माननिय पंतप्रधान असा उल्लेख केला. तो करू नये मी तुमच्या परिवारातील असून चार पिढ्यांपासून मी आपल्या परिवारासोबत आहे. आज तुमच्यासोबत येऊन मी आनंदीत झालो.पीएम मोदी म्हणाले, कोणत्याही समाजाची ती ओळख असते की, वेळेसोबत परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर दाऊदी बोहरा समुदाय प्रत्येकवेळी उभा राहीला आहे. आज येथील शिक्षण संस्थेचा विस्तार याचेच एक द्योतक आहे. मी संस्थांशी जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो की, दीडशे वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाले आहे. मी तुमचे अभिनंदन करतो.पीएम मोदी म्हणाले, माझे आणि दाऊदी बोहरा समाजाचे नाते जूने आणि प्रेमाचे आहे. मी जगात कोठेही गेलो तर तेथे मला या समाजाचे प्रेमच मिळाले आहे. कुपोषण, जलसंरक्षण अभियानापर्यंत समाज आणि सरकार कसे एकदुसऱ्याची शक्ती बनते याची मी अनुभुती घेतली आहे. मी गुजरातेतून दिल्लीला गेलो त्यानंतर तुम्ही गादी संभाळली. आजही तुमचे प्रेम मला मिळते.पीएम मोदी म्हणाले, मला समाजाने दिलेला स्नेह माझ्यासाठी अनमोल आहे. मी देशातच नव्हे तर जगात कोठेही माझे बोहरा भाऊ – बहिण मला कोणत्याही परिस्थितीत भेटतात. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी भारताबद्दलची चिंता आणि प्रेम दिसून येते. तुमचे प्रेम मला वारंवार आपल्यापर्यंत खेचून आणते. मला माहीतेय की, मुंबई शाखेच्या रुपास अल जमया सैफीयाचा जो विचार होत आहे याचा सयद्दना अब्दुल कादीर रहेमुद्दीन यांनी स्वप्न पाहीले होते. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता, त्याकाळी त्यांनी शिक्षणाबाबत स्वप्न पाहीले ही बाब महत्वाची होती.
पीएम मोदी म्हणाले, जेव्हाही समाजातील लोक सुरत, मुंबईला येतील तेव्हा एकदा तरी दांडी येथे यावे. कारण महात्मा गांधींची दांडीयात्रा आझादीचा एक टर्निंग पाईंट होता. परंतु, माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ही की, मीठाच्या सत्याग्रहाआधी महात्मा गांधी बोहरा समाजातील व्यक्तीच्या घरी थांबले होते.

पीएम मोदी म्हणाले, सयद्दना साहेबांना मी माझ्या मनातील इच्छा व्यक्त केली. त्यांनी एका क्षणात समुद्रासमोरील मोठा बंगला मला दिला आणि आज तेथे दांडीयात्रेच्या स्मृतीचे मोठे स्मारक बनले आहे. सयद्दना साहेबांच्या आठवणी दांडीयात्रेसोबत अमर झाली आहे.
पीएम मोदी म्हणाले, गत आठ वर्षांत अनेक विद्यापीठे उघडली. प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल काॅलेज उघडत आहोत. 2004 ते 2014 145 मेडीकल काॅलेज उघडले. 2014 ते आतापर्यंत आमच्या सत्ताकाळात 260 पेक्षा जास्त मेडीकल काॅलेज उघडण्यात येत आहेत. देशात प्रत्येक आठवड्याला एक विद्यापीठ आणि दोन महाविद्यालये उघडली. ही गती या गोष्टीची साक्षीदार आहे की, भारत विश्वाला भविष्याची दिशा देणारे विद्यापीठ बनेल.पीएम मोदी म्हणाले, शिक्षणव्यवस्थेत स्थानिक भाषेला महत्व दिले जात आहे हे आमच्या सरकारचे धोरण आहे. गुलामीच्या काळात इंग्रजीलाच शिक्षणाची भाषा बनवली होती. यात मागास, दलित, कमजोर वर्गाचे नुकसान झाले. त्यांना भाषेच्या आधारावर स्पर्धेतून बाहेर काढले जात होते. पण आता तसे होणार नाही. स्थानिक भाषेतून तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मिळणार आहे.