Home Blog Page 1409

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.6:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही श्री.पवार म्हणाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार आहे. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही संतांची शिकवण आहे. अशा पद्धतीने विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. म्हणून या शिबिराला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले, असेही श्री.भुजबळ म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले,  कोविडच्या निमित्ताने आरोग्यसेवेचे महत्त्व लक्षात आले.   आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बऱ्याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते आणि नागरिकांना फायदाही होतो, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्मापलीकडे नाती जपली असेही श्री.पाटील म्हणाले.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, माणसात आणि सेवेत देव आहे असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असल्याने त्यांची सेवा महत्त्वाची आहे. शिबिराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने त्याचा अनेकांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.  प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिबिरांची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री श्री.महाजन यांनीदेखील शिबिराला भेट देऊन नियोजनाची माहिती घेतली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणीनंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अमित शहा यांच्या सर्व बैठका रद्द, तातडीने दिल्लीला जाणार; शिंदे-फडणवीस-अजितदादांसोबत चर्चा

डब्ल्यू मेरियट हॉटेलला बैठका

पुणे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले होते. त्यानुसार आज दुपारी एका शासकीय कार्यक्रमानंतर अमित शहा दिवसभर काही महत्त्वाच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला असून अमित शहा यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.पूर्वीच्या नियोजनुसार रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आज रविवारी दुपारी होणार आहे. त्यानंतर त्यांचा इतर सर्व वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल केला गेला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या आज दुपारनंतर होणाऱ्या नियोजित बैठका अचानक रद्द झाल्याने या बैठका आज सकाळपासूनच सुरू झाल्याची माहिती आहे. पूर्वी नियोजनानुसार, सहकार विभागाचा कार्यक्रम संपवून अमित शहा डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. त्या ठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शहा तातडीने दिल्लीला जाणार आहे. यामुळे या बैठका सकाळी 11 वाजताच सुरु झाल्या आहेत. अमित शहा यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार डब्ल्यू मेरियट हॉटेलला दाखल झाले आहेत. या चारही नेत्यांमध्ये बैठक झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

अमित शहांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्याविषयीच बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

‘इंडिया’च्या बैठकीच्या तयारीसाठी तिन्ही पक्षांतील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट.

मुंबई-

काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

वरळीच्या नेहरू सेंटर येथे यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणारी इंडियाची ही तिसरी बैठक आहे. मुंबईतील बैठक चांगली व्हावी यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यांच्यासह महत्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती देण्यात येईल, सरकारी व्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते सरकारशी संवाद साधतील. देशात मागील ९ वर्षांपासून सुरु असलेल्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे. पाटणा व बंगळुरूतील बैठक यशस्वी पार पडल्यानंतर मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे.

मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीत तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. संजय निरूपम हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्यांना भ्रष्ट्चारी म्हणणाऱ्या भाजपाचा भ्रष्ट चेहरा आम्ही उघड करणार आहोत. शिंदे सरकारमध्ये भाजपाचे अनेक मंत्री भ्रष्टचारी आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे, लवकरच त्यांचा पर्दाफाश केला जाईल. जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात व दोन दिवसातच त्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेता, हे कसे काय ? भाजपाकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल पटोले यांनी विचारला.

‘जीएसटी’मुळे राज्यांची, देशाची आर्थिक स्थिती सुधारली -सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात महाराष्ट्राचा वाटा जवळपास २० टक्के आहे. दरवर्षी दोन लाख १७ हजार कोटी इतका जीएसटी महाराष्ट्रातून भरला जातो. त्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे असून, जास्तीस्त जास्त जीएसटी संकलित करण्यासाठी पुढाकार घेऊन सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे वने, मत्स्योत्पादन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि ‘आयसीएआय पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. जवळपास ४५० सीए सभासद या परिषदेत सहभागी झाले आहेत.
यावेळी ‘आयसीएआय’च्या जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रणव आपटे, सीए मौशमी शहा, सीए सचिन मिणियार, सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कर व्यवस्थेत सुलभता, सहजता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘एक देश एक कर’ अंतर्गत जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीत, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यात सनदी लेखापालांनी सुरुवातीपासून महत्त्वाचे योगदान दिले. जीएसटी कौन्सिलच्या गेल्या ५० बैठकांतून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जीएसटीनंतर प्रत्येक राज्याचे उत्पन्न वाढले असून, वाढीचा दर १४ टक्क्यांवर गेला आहे. राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.”
“करदाते, सनदी लेखापाल आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. ब्रिटनला आपण मागे टाकले असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल. देशासाठी योगदान देणारा आणि आर्थिक विकासात भर घालणारा सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कौतुक केलेले आहे. तेव्हा आपण कर व्यवस्था अधिकाधिक सहज व सोपी करण्यात आणि कर संकलनात असेच योगदान देत राहावे,”  असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
जीएसटी कायद्यातील नवे बदल’ याविषयी सीए उमेश शर्मा यांच्यासह इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन सत्र झाले. सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी वस्तू व सेवा करावरील परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सीए मौशमी शहा यांनी सूत्रसंचालन केले. सीए यशवंत कासार यांनी आभार मानले. 

CARS24 : महाराष्ट्रातील वापरलेल्या कार बाजारपेठेमध्ये आघाडीवर


●   CARS24ने २०२३ च्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्रात वापरलेल्या कारच्या विक्रीत ७०% अशी लक्षणीय वाढ अनुभवली आहे

●   WagonR, Baleno, Honda City, Grandi10, Elite i20  हे पुणे आणि मुंबईतील सर्वाधिक विकले जाणारे पर्याय आहेत.

●   Hyundai आणि Volkswagen सह Maruti च्या पलीकडे जाऊन खरेदीदार विविध ब्रँड्सचा विचार करत असल्याचे पुण्याच्या कार बाजारपेठेमध्ये झालेल्या बदलावरुन दिसून येत आहे

पुणे: भारतातील प्रख्यात ऑटो टेक कंपनी CARS24 महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव्ह बाजारपेठेवर एक महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण करत असून २०२३ च्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत वापरलेल्या कारच्या विक्रीत उल्लेखनीय ७० टक्के वाढ झाल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. कार खरेदी आणि विक्री व्यवहारांच्या अखंड सुविधेसह एक भरीव ग्राहक आधार पुरवत आणि विविध प्रकारच्या वाहनांची देवाणघेवाण सुलभ करत CARS24 ने महाराष्ट्रातील पूर्व-मालकीच्या कार्ससाठी सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून स्वत:ला ठामपणे प्रस्थापित केले आहे.

महाराष्ट्रात २०१५ मध्ये कामकाजाला सुरुवात केल्यापासून, CARS24 ने राज्यभरातील १८ शहरांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी आपली पोहोच वाढवत उल्लेखनीय वाढ केली आहे. महाराष्ट्रातील लोकांना  वापरलेल्या कार्सची व्यावहारिकता, परवडणारी क्षमता आणि विश्वासार्हतेची चांगली जाण आहे.  विशेषतः जेव्हा CARS24 सारख्या विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली जाते तेव्हा हे दिसून येते. शिवाय, झिरो-डाउन पेमेंट फायनान्सिंग पर्यायांच्या वाढत्या लोकप्रियतेने पूर्व-मालकीच्या वाहनांच्या वाढत्या मागणीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे या प्रदेशात कंपनीचा वेगाने विस्तार होत आहे.

महाराष्ट्रातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या वाढीला सरकारच्या मुंबई-जयपूर एक्स्प्रेस वेसह रस्ते पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे पाठबळ मिळाले आहे. जोडीला, रस्त्यांच्या कामासाठी तिसरी एजन्सी स्थापन करण्याची राज्य सरकारची योजना आणि सहा नवीन आरओबीज (रोड ओव्हरब्रिज) चे सादरीकरण यामुळे या विकासाला हातभार लागत आहे. परिणामी, CARS24 हा महाराष्ट्रातील ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रात एक सुस्थापित आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

महाराष्ट्रातील झपाट्याने होत असलेल्या विकासाबाबत बोलताना CARS24 चे सह-संस्थापक, गजेंद्र जांगिड म्हणाले, “महाराष्ट्राची वाहन बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आमच्या ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला आनंद देतो. कार खरेदी आणि विक्रीचा अनुभव पुन्हा परिभाषित करण्याची आमची बांधिलकी या कामाला अखंड आणि तणावमुक्त बनवते. त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही आमच्या कडून असलेल्या अपेक्षांना अधिकाधिक खरे उतरत राहू आणि आमच्या ग्राहकांना अचंबित करत राहू.”

CARS24 द्वारे पुरविण्यात आलेल्या नवीनतम डेटावरुन महाराष्ट्रातील मजबूत अशा वापरलेल्या कार बाजारपेठेतील आकर्षक माहिती प्रकट होते. विविध शहरांमध्ये दिसून आलेल्या खरेदी पद्धती स्थानिक मागणी आणि ग्राहकांच्या पसंतींच्या प्रभावावर प्रकाश टाकतात.

महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल लँडस्केपमध्ये लक्षणीय बदल होत आहे कारण कार खरेदीदार प्रबळ Maruti मॉडेल्सच्या पलीकडे विविध ब्रँड्सचा शोध घेत आहेत. पर्यायांमध्ये बदल होत Hyundai Grand i10, Honda City, आणि Volkswagen Polo सारख्या मॉडेल्सने लक्षणीय लोकप्रियता मिळवली आहे. महाराष्ट्रातील कार खरेदीदार दैनंदिन प्रवासासाठी आणि कौटुंबिक गरजांसाठी आरामदायी आणि विश्वासार्ह वाहने शोधत व्यावहारिकतेला प्राधान्य देतात. परवडणारी क्षमता, विश्वासार्हता आणि कार्यप्रदर्शन त्यांच्या निवडींवर प्रभाव टाकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. Maruti अव्वल स्थानावर असताना, इतर ब्रँडची वाढती मागणी या प्रदेशात त्यांची वाढती लोकप्रियता दर्शवते.

पुणे आणि मुंबईमध्ये, Maruti Wagon-R, Celerio, Baleno, and Swift, Hyundai Creta, Grand i10, Elite i20, आणि Honda City यांसारख्या प्रख्यात मॉडेल्सचे बाजारपेठेमध्ये वर्चस्व आहे. The Renault Kwid आणि Volkswagen Polo देखील या शहरांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहेत. उलट नागपूरने Maruti Wagon-R and Swift आणि जोडीला Hyundai Grand i10 बाबत स्पष्ट कल दाखवला आहे. नाशिकमध्ये, Maruti Wagon-R, Baleno, Swift, आणि Volkswagen Polo यांचा सर्वाधिक मागणी असलेल्या पर्यायांमध्ये समावेश आहे.

पुण्यात, Maruti ने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत शहरातील सर्वाधिक कार विक्रीची नोंद करून आपला अग्रक्रम कायम ठेवला आहे. Wagon-R VXI 1.0  पेट्रोल व्हेरियंट हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय असून राज्यातील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत परवडणारी किंमत, व्यावहारिकता, इंधन कार्यक्षमता आणि आटोपशीर आकारामुळे त्याला पसंती मिळत आहे.

महाराष्ट्रातील वाढत असलेल्या मोठ्या कार उत्साही बाजारपेठेत एसयूव्हीज आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीज ची मागणी वाढत आहे. Hyundai Creta, Tata Nexon, Maruti Brezza, आणि Kia Seltos हे लोकप्रिय पर्यायांमध्ये आघाडीवर आहेत. ते मजबूत कामगिरी, स्टायलिश अपील आणि प्रभावी मायलेज देतात. ग्राहक या एसयूव्ही कडे त्यांची परवडणारी क्षमता, प्रगत वैशिष्ट्ये आणि लक्षवेधी डिझाईन्समुळे आकर्षित होतात. त्यामुळे हे पर्याय प्राधान्य असलेले पसंतीचे बनले आहेत.  

याव्यतिरिक्त, स्लीक सेदान राज्यातील कारप्रेमी लोकांना मोहित करत आहेत. रस्त्यांवर एसयूव्हीचे वर्चस्व असूनही, Maruti Swift Dzire आणि Ciaz  सारख्या सेदान संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवत आहेत. Hyundai Verna, New Elantra, आणि Honda Civic या पुण्यातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सेदान आहेत, ज्या त्यांच्या शैली आणि कामगिरीसाठी ओळखल्या जातात. Volkswagen Ameo आणि  Skoda Rapid सारख्या इतर स्पर्धकांनी पुण्याच्या चमकत्या कार बाजारपेठेमध्ये भर घातली आहे. सेदानच्या मागणीचे श्रेय त्यांचे कालातीत आकर्षण, अभिजातता आणि आकर्षक शैली यांना दिले जाऊ शकते. स्लीक प्रोफाइल, आलिशान इंटीरियर आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सेदान आरामशीरपणा, कामगिरी आणि प्रतिष्ठेचा परिपूर्ण समतोल शोधणाऱ्या विवेकी चालकांना आकर्षित करतात.

महाराष्ट्रातील कार खरेदीदारांमध्ये कार साठी वित्तपुरवठा ही गोष्ट वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली असून अनेकांनी थेट वाहन खरेदी करण्यासाठी हा पर्याय निवडला आहे. या ट्रेंडला CARS24 वर झीरो डाउनपेमेंट पर्यायाच्या उपलब्धतेमुळे आणखी मदत मिळाली आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनातील सोयी वाढल्या आहेत. या प्रवाहाला डेटाचे पाठबळ असून त्यावरून असे दिसून येते की बहुतेक कर्जे पगारदार व्यावसायिकांनी घेतली आहेत. या कर्जांसाठी सरासरी ईएमआय रक्कम ११,५०० रुपये आहे आणि त्यासाठी निवडलेला वित्तपुरवठा कालावधी ६ वर्षे आहे. हा कल अधिक लवचिकता आणि या भागातील खरेदीदारांसाठी पेमेंट ओझे कमी करण्यास अनुमती देतो. चालू वर्षात कार खरेदी करणार्‍या मिलेनियल्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि या ट्रेंडमध्ये वित्तपुरवठा पर्यायांची उपलब्धता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यातील बहुसंख्य खरेदीदार ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. यावरून तरुण ग्राहकांमध्ये कारच्या मालकीची वाढती पसंती दिसून येते. पुण्यासारख्या शहरांमध्ये पूर्व-मालकीच्या कार विक्रीत झालेली उल्लेखनीय वाढ ऑटोमोटिव्ह बाजारपेठेमध्ये नॉन-मेट्रो शहरांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.

CARS24 अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, आणि सोलापूर यासह महाराष्ट्रातील १८ शहरांमध्ये कार्यरत असून त्याचा या प्रदेशात चांगला परिणाम झाला आहे.

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर आणि आर. बाल्की दिग्दर्शित  “घूमर” चा बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँच !

अखेर प्रतीक्षा संपली असून “घूमर” या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय. “घुमर ” च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक आर. बाल्की आणि अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका “घूमर” मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील स्पोर्ट्स चित्रपटाच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडणार आहे.
या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते आणि जेव्हा तो पॅराप्लेजिक खेळाडू ला ट्रेन करताना दिसतोय जी भूमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे.  पुन्हा एकदा  र्दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनाची जादू या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.
अभिषेक आणि सैयामीचे दमदार परफॉर्मन्स त्यांच्या मनातील वेदना, खेळासाठी दृढनिश्चय आणि आशा अनेक लक्षवेधी क्षणाची पर्वणी यातून अनुभवयाला मिळणार असून दिग्दर्शक आर. बाल्की यांची अनोख्या शैली तून “. घुमर ” ची कथा गुंफली गेली आहे. 
“घूमर” च्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचं कळतंय. ” घूमर” हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला आगामी भारतीय चित्रपट असून त्यांनी  “चीनी कम,” “पा,” आणि “पॅड मॅन” सारख्या प्रशंसित चित्रपटाच दिग्दर्शन देखील केलं आहे.
‘घूमर’ मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत आहेत दिसणार असून शबाना आझमी आणि अंगद बेदी देखील यात अनोख्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात एक ट्विस्ट म्हणून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची खास एंट्री असणार आहे. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास यांच्याही या चित्रपटातून पदार्पण होत आहे.
 आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित आहे “घूमर”  18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
https://youtu.be/jzWBHYWICLM

नितीन देसाई यांचे आत्महत्येची ‘न्यायालयीन चौकशी’ व्हावी.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी.

पुणे – महाराष्ट्रातील नामवंत, मनस्वी व जेष्ठ कला दिग्दर्शक स्व नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्ये पुर्वी आपल्या ॲाडीओ क्लिप च्या माध्यमातुन एक प्रकारे आत्महत्येस कारणीभुत ठरणारी परिस्थितीच एक प्रकारे विषद केली आहे हे धक्का दायक व व्यवस्थेपुढे हतबलता विषद करणारी घटना असुन, महाराष्ट्राच्या सांस्कृतीक अस्मितेला खच्ची करणारी आहे. त्यामुळे या आत्महत्येची व ११ ॲाडीओ क्लीप व त्यांचे फोनची सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. ते म्हणाले,’ महाराष्ट्रातील एक मराठी कलावंत मेहनतीने व स्वकर्तुत्वाने पुढे येऊन स्वतःचे हिंमतीवर यशस्वी वाटचाल करीत स्वतःचा स्टुडीओ ऊभा केला. मात्र अचानक त्यांना व त्यांचे स्टुडिओत येणारे काम बंद झाले व पर्यायाने त्यांचे वरील कर्जाचा बोजा वाढत गेला. एडलवाईज या शेअर मार्केट मधील गुंतवणुक कंपनीने त्यांना कर्ज दिल्याचे पुढे आले आहे..! एखादी पतसंस्था, कोणत्याही उद्योजकास मोठे कर्ज देते तेंव्हा त्याचे ‘उत्पन्नाचे स्त्रोत’ तपासते, मात्र त्यांची कर्ज थकबाकी वाढतांना… त्यांचे स्टुडिओत येणारी कामे कां अचानक बंद झाली(?) हे पहाणे व त्या विषयी हालचाली करणे एजलवाईज कंपनीचे काम नव्हते काय..? हा प्रश्न ही समोर येतो. काही वेळा व काही ठीकाणी एखादी पत-संस्था, मोक्याची जागा वा उद्योग हस्तगत करण्यासाठी, काही पतसंस्थाना व सुत्रधारांना हाताशी धरून ते ऊद्योग एनपीए वा बुडीत टाकुन कर्ज वसुलीच्या नोटीसा वा लिलाव निवडक माध्यमात देऊन.. ते उद्योग वा जागा गिळंकृत करण्याची कारस्थाने नाकारु शकत नाही..! त्यामुळे कदाचित नितीन देसाईंनी हे आत्महत्येचे पाऊल ऊचलले नसते तर एडलवाईज कडुन कथित लिलाव नोटीस द्वारे त्यांचा ‘एनडी स्टुडीओ’ हस्तगत करण्याची.. कुठली योजना होती काय..(?) हे देखील पुढे आले पाहीजे..! दिवंगत नितीन देसाई यांनी शेवटच्या काळात काही प्रयत्न केले काय (?) कुणाशी फोन वा संपर्क करण्याचे प्रयत्न केले काय..(?) हे देखील पुढे आले पाहीजे..! त्यामुळे स्व नितीन देसाई यांचे फोन व रेकॅार्ड तातडीने सर्वोच्च न्यायायालयाचे देखरेखी खाली कस्टडी मध्ये घेऊन, सखोल चौकशी करावी व महाराष्ट्राच्या कर्तबगार मराठी कलावंताचे जीवन संपवण्यासाठी कोण कारणीभुत आहेत(?) त्या खुन्यांना उघडे केले पाहीजे व त्यांचेवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील जस्टीस चंद्रचूड महाराष्ट्राचे असल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.

पुणे मेट्रो स्टेशन पासून शेअर ए रिक्षा सेवा पुरवणार :- बाबा कांबळे

पुणे -शहरामध्ये मेट्रो ते फिडर शेअर ए रिक्षा सेवा सर्वेक्षण सुरू सुरू करण्यात आले असून पुणे आरटीओ वाहतूक शाखा मेट्रो मनपा व परीक्षा संघटना ग्राहक संघटना प्रतिनिधी एकत्र येऊन पुणे शहरातील सिविल कोर्ट शिवाजीनगर खडकी पुणे स्टेशन आदी विविध भागांमध्ये मेट्रो स्टेशन वरती शेअर ए रिक्षा सुरू करण्यासंदर्भामध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे, वन आज ते सिविल कोर्ट सिविल कोर्ट ते पिंपरी पर्यंत मेट्रो लाईन सुरु झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या हस्ते नुकताच मेट्रोचे उद्घाटन झाले आहे, मेट्रो ने प्रवासी वाढल्यामुळे मेट्रो ते अंतर्गत रस्त्यावर जाण्यासाठी एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी साठी नागरिकांना वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुणे प्रशासनाने शेअर ए रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाला रिक्षा संघटनाने देखील उत्तम प्रतिसाद देत शेअर ए रिक्षाला मान्यता दिली आहे, मेट्रो स्टेशन ते फिडर सर्विस साठी परीक्षा हा उत्तम पर्याय असून रिक्षा चालक-मालकांच्या वतीने मेट्रो स्टेशन पासून अंतर्गत विभागात जाणाऱ्या प्रवाशांना शेर रिक्षा मीटर रिक्षाच्या माध्यमातून उत्तम असे सेवा देऊ या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे,

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दहा टीम तैनात करण्यात आल्या होत्या तसेच रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मेट्रो स्टेशनवरून रिक्षात मीटर टाकून शेअर ए पॉइंट पर्यंत मीटरने किती पैसे होतात त्याचा सर्वे करण्यात आला, तीन प्रवाशांनी एकत्र येऊन शेअर ए रिक्षाने प्रवास करायचा व मीटरने जेवढे पैसे होतात त्यापेक्षा 30 टक्के अधिक रक्कम बेड करायची अशा प्रकारची ही सेवा आहे, रोज प्रवास करणारे कामगार कष्टकरी हातावर पोट असणारे घटक यांना ही सेवा अत्यंत उपयुक्त असून कमी पैशांमध्ये चांगला प्रवास करण्याची त्यांना या निमित्ताने संधी उपलब्ध होणार आहे,

याबरोबरच ज्यांना मीटरने प्रवास करायचा आहे त्यांना मीटरची व्यवस्था त्या ठिकाणी असणार ते मीटरने प्रश्नल रिक्षाने प्रवास देखील करू शकतात, मीटर रिक्षा व शरीरापेक्षा अशा दोन्ही पर्या मेट्रो स्टेशन वरती उपलब्ध करण्यात येणार आहे असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले,

पुणे रिक्षा फेडरेशनच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, सत्य सेवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे मोहम्मद शेख, संजय शिंदे, आदी व्यक्तीने सर्वेक्षण मध्ये सहभाग घेतला,

खडकी मेट्रो स्टेशन ते खडकी बाजार खटके मेट्रो स्टेशन ते औंध, शिवाजीनगर ते दगडूशेठ हलवाई गणपती शिवाजीनगर ते वाकडेवाडी, सिविल कोर्ट मॅटर स्टेशन ते फडके हौदे चौक, पुना स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुणे कॅम्प पुणे स्टेशन ते येरवडा पुणे स्टेशन ते ताडीवाला रोड, सह एकूण दहा मीटर स्टॅन्ड वरती हा सर्व करण्यात आला.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे: महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नऱ्हे येथील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. श्री.मुनगंटीवार म्हणाले, शिवसंग्रहालय भव्यदिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित व्हावे, त्यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य यानिमित्ताने पोहोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडित ८८ हजार वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्हावे आणि त्यांच्या विचारावर आधारित कृती करण्याची ऊर्जा नागरिकांना मिळावी यासाठी हे आयोजन आहे. यानिमित्ताने सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्या (पीएएस) माध्यमातून दररोज ९.४५ वाजता मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत दिनविशेष आणि त्यांचे विचार प्रसारित करण्यात येणार आहेत.

शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित १२ टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात येणार आहेत. येत्या ९ ऑगस्टला शहाजी महाराजांवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येईल. रिझर्व बँकेच्या माध्यमातून सोने, चांदी आणि तांब्याची ‘होन’ मुद्रा तयार करण्यात येईल. छत्रपतींची वाघनखे देण्याची विनंती ब्रिटिश म्युझिअमने मान्य केली आहे, जगदंबा तलवारही परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली.
0000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक

मुंबई, : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा श्री. सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश काल श्री. सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवं आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.

श्री. सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले होते. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम मध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशेचा किरण ठरला आहे.

ढोल-ताशाच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करु!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

पुणे-गणेशोत्सव जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी सरावाला परवानगी मिळत नसल्याने, संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांसंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात ढोल ताशा पथकासारख्या पारंपरिक वाद्यांना सर्वांचीच पसंती असते. अनेक वादक यासाठी अनेक महिने सराव करत असतात. त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करु, अशी ग्वाही दिली. तसेच, लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे देखील परवानगी मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे यावेळी आश्वस्त केले.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात लोकसहभागातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यात ढोल ताशा पथकांनाही प्राधान्य देणार असून, महासंघाने यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांनी कर्वेनगर डीपी रोड येथे सरावाला परवानगी मिळावी, तसेच विसर्जन मिरवणुकीवेळी रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना लक्ष्मी रोड प्रमाणेच कुमठेकर रोड आणि टिळक रोड येथे परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.

आयुक्त साहेब शहरात तुमचे नाही तर खड्ड्यांचे साम्राज्य, जागे कधी होणार ? खर्डेकरांचा सवाल

पुणे- विविध विकासकामांच्या नावाने होणाऱ्या शहर खुदाई ने शहर आणि उपनगरात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहने आणि वाहन चालक य दोहोंची अवस्था दयनीय बनली आहे, शहरात महापालिकेत आयुक्तांची प्रशासकीय राजवट आहे , आयुक्तांनी तातडीने युद्धपातळीवर यावर काटेकोर कारवाई करणे अपेक्षित आहे असे पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले आहे.

संदीप खर्डेकर यांनी या पत्रात असे म्हटले आहे कि,’24×7, पुणे मेट्रो यासह विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी झाली आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे. काल आपण त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा दिला आहे.प्रशासनाकडून काहीतरी होईल अशी थोडी आशा वाटली म्हणून हा पत्र प्रपंच करत आहे . वानगी दाखल फक्त कर्वेनगर व एरंडवण्यातील काही उदाहरण देत आहे.अलंकार पोलीस स्टेशन जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, k52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे.यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणकेला मार बसला आहे.24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी.यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.मनपा च्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे. खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको असे सर्वांचेच मत झाले आहे.तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा. अजून पुण्यात मोठा पाऊस झालेला नाही. त्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही.आपण योग्य कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे.

‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा बदल शक्य झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉनक्लेव्ह’चे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्थेत करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित  करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, सीआयआयचे  महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नंदकुमार उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे. राज्याने जीएसटी संकलनात अव्वल स्थान गाठले आहे. 2.7 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन यंदा राज्यात झाले आहे. देशाच्या एकूण संकलनात हे प्रमाण 15 टक्के आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत विकसित करण्याचे ठरविले आहे. हे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचाही वाटा असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राज्याची अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये प्रसिद्ध उद्योजकांचा समावेश आहे. ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास कसे नेता येईल, यासाठी सर्वांगाने प्रयत्न करण्यात येत आहे.

नागपुरात नवीन विमानतळाच्या कामकाजाला लवकरच सुरुवात होईल. दोन धावपट्ट्या आणि देखणे प्रवासी आणि कार्गो टर्मिनल असेल. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हब’ नागपुरात झाल्यास शासनाचा पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात पावसाचा जोर ओसरला, उद्या सायंकाळपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही

नाशिक पुणे सातारा आणि मराठवाड्यातील काही भागांतही घाट भागात अंशतः ढगाळ आकाश.
घाट भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता.
इतर ठिकाणी हलके ते मोड.

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून काल संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील हवामानाची सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४७६ क्युमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ५१०१.०२क्युमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८क्युमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग

धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत २४ क्युमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१ क्युमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १४१क्युमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्युमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २४३ क्युमेक्स विसर्ग

कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३९ क्युमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ४७ क्युमेक्स विसर्ग

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठीदुपारी ३:१५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४.५ मीटर पर्यंतसमुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळीओलांडलेली आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करतेतसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणिअधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टलच्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.आपत्ती संबंधित माहिती व मदतीसाठीनागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्यासोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077(टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ई- मेल: controlroom@maharashtra.gov.in

अधिवेशन संपताच शनिवारी सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहूनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

मुंबई:- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती, अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने अजितदादांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला