पुणे- विविध विकासकामांच्या नावाने होणाऱ्या शहर खुदाई ने शहर आणि उपनगरात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहने आणि वाहन चालक य दोहोंची अवस्था दयनीय बनली आहे, शहरात महापालिकेत आयुक्तांची प्रशासकीय राजवट आहे , आयुक्तांनी तातडीने युद्धपातळीवर यावर काटेकोर कारवाई करणे अपेक्षित आहे असे पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले आहे.
संदीप खर्डेकर यांनी या पत्रात असे म्हटले आहे कि,’24×7, पुणे मेट्रो यासह विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी झाली आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे. काल आपण त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा दिला आहे.प्रशासनाकडून काहीतरी होईल अशी थोडी आशा वाटली म्हणून हा पत्र प्रपंच करत आहे . वानगी दाखल फक्त कर्वेनगर व एरंडवण्यातील काही उदाहरण देत आहे.अलंकार पोलीस स्टेशन जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, k52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे.यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणकेला मार बसला आहे.24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी.यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.मनपा च्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे. खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको असे सर्वांचेच मत झाले आहे.तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा. अजून पुण्यात मोठा पाऊस झालेला नाही. त्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही.आपण योग्य कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे.