Home Blog Page 1403

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

पुणे, दि.१८: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी सुरुवातीला जुन्नरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘शिवजन्मभूमी जुन्नर’ या सेल्फी पॉईंटचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये तत्कालीन गवताची घरे, लोहारकाम, कैकाडी, कुंभारकाम आदी व्यवसाय, आदिवासी तरपा नृत्य, वासुदेव, गोंधळी परंपरा, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या गावामध्ये बनविण्यात आलेली शिवकालीन बाजारपेठ आकर्षण उपस्थितांचे आकर्षण बनून राहिली. यामध्ये मंत्री लोढा यांनी बांबूची टोपली खरेदी केली. यावेळी तसेच http://www.hindaviswarajya.info/ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी आदिवासी तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत फेर धरला.

यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी शरद बुट्टे पाटील क्रीडांगण येथे बचत गट प्रदर्शन, महाशिवआरती कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी भेट दिली.

आता उद्धव ठाकरेंच्या आमदारांची कोंडी करणार एकनाथ शिंदेंचा व्हीप

व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई-उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेले लचांड काही केल्या कमी होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ठाकरे गटातील आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हीप लागू होणार आहे, तो जर त्यांनी पाळला नाही तर त्यांची आमदारकी जावू शकते, असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे आता होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदित्य ठाकरेंनाही भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप लागू होणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडे 4 खासदार आहेत. त्यापैकी काही आमदार आणि खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 14 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. जर व्हीपची अमंलबजावणी केली नाही, तर निलंबनाची कारवाई होणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनात दोन वर्षे आराम केला. तो यापुढेही करावा, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प, राजधानी दिल्लीपासून 150 किमी अंतरावर

0

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली- उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प हरियाणामध्ये, राजधानी दिल्लीपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर, उत्तर दिशेला असलेल्या गोरखपूर शहरात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.  या संदर्भात आज माहिती देतांना ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक महत्वाची कामगिरी म्हणजे, देशाच्या इतर भागातही अणूऊर्जेचे प्रकल्प उभारले जात आहेत. पूर्वी हे प्रकल्प केवळ देशाच्या दक्षिण भागातच म्हणजे तामिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा पश्चिमेत महाराष्ट्रात होत असत, मात्र आता ते इतर भागातही होणार आहेत.

भारताच्या आण्विक ऊर्जा क्षमता वाढवण्याची क्षमता वाढवण्याच्या आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमानुसारच हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने, गेल्या आठ वर्षात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. 10 अणूभट्टया स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने सामूहिक मंजुऱ्या दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सरकारच्या अणूऊर्जा विभागालाही अणुउर्जा प्रकल्प उभारण्यासाठी स्त्रोतांकरिता   सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत संयुक्त प्रकल्प उभारण्याबद्दल मंजूरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देशाची भविष्यातील ऊर्जाविषयक गरज भागवण्याची क्षमता असून, हे भविष्यातील एक उत्तम आणि आशादायी क्षेत्र आहे, असे ते पुढे म्हणाले.

गोरखपूर हरियाणा अणू विद्युत प्रकल्पाची (GHAVP) क्षमता, प्रत्येकी 700 मेगावॉटचे दोन युनिट्स इतकी असणार आहे. त्यासाठी भारतीय बनावटीचे, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) बनवण्याचे काम हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात गोरखपूर गावात सुरू आहे. आतापर्यंत यासाठीच्या एकूण 20,594 कोटी रुपये ह्या मंजूर निधीपैकी 4,906 कोटी रुपये निधी खर्च (आजवरची एकूण वित्तीय प्रगती 23.8% इतकी) करण्यात आला आहे.

‘शिवसेना आमच्या ठाकरेंची :नाही गद्दारांच्या बापाची’निवडणूक आयोगाच्या …..

पुण्यात जोरदार निदर्शेने, महापालिका निवडणुका लांबविण्याच्या कृत्यामागेही आयोगाचा हाथ असल्याचा संशय

पुणे – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निशेधार्थ पुणे शहर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्षने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची : नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत


पुणे दि. १८-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.शाह यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सीआरपीएफचे सहायक कमांडट सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आगमन झाले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले.

मुलींच्या वसतिगृहात जाण्यास रोखल्याने डिलिव्हरी बॉयची सुरक्षारक्षक- मॅनेजरला मारहाण

पुणे-

मुलींच्या पीजी वस्तीगृहात बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अडवण्याचा प्रयत्न केल्याने टोळक्याने मॅनेजरसह वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकास बेदम मारहाण केली. हा तरुण जेवणाचे पार्सल पोहचवण्यास गेला होता. पुण्यातील वडगावशेरी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

गणेश बाळासाहेब साबळे (वय 27) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रोहन बाळू व त्याच्यासह इतर सहा अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गणेश साबळे हे वडगावशेरी येथील ‘स्मार्ट लिव्ह इन पीजी’ (मुलींचे पीजी वसतिगृह) येथे मॅनेजर म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी एक डिलिव्हरी बॉय जेवणाचे पार्सल देण्यास आला होता. तो जबरदस्तीने मुलींच्या वसतिगृहात जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यास तेथील सुरक्षारक्षक दीपक मंडल याने अडवले. त्यावेळी तक्रारदार मॅनेजर तेथे आले असता, आरोपीने सुरक्षारक्षकास शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे मॅनेजर गणेश साबळे यांनी कानशिलात देवून आरोपीस तेथून जाण्यास सांगितले, याचा राग मनात धरून आरोपीने काही वेळाने त्याच्यासोबत सहा अनोळखी मुले घेऊन आला. त्यांनी पीजी वस्तीगृहाच्या पार्किंगमध्ये संगनमताने लाकडी दांडक्याने, हाताने मारहाण केली. यात मॅनेजरच्या डोक्याला व कानामागे दुखापत झाली. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम आळेकर करत आहेत.

कसब्याच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करणार-    रवींद्र धंगेकर

पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघ गेली ३० वर्षे विकासापासून वंचित राहिला आणि त्यास भाजपच जबाबदार आहे. कसब्याचा विकास आणि मतदारसंघातील नागरिक हे केंद्रबिंदू मानून कसब्याच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट मी तयार करणार असून त्यामध्ये स्थानिक नागरिक, गणेश मंडळे, प्रभागातील सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, आर्किटेक्ट आणि टाऊन प्लॅनिंगचे तज्ञ यांचा सहयोग घेणार आहेत. विकासाचा हा ब्ल्यू प्रिंट समोर ठेवून निर्धारित वेळेत कसब्याच्या विकासाची कामे पूर्ण करून घेण्यासाठी व त्यासाठी भरीव विकासनिधीची तरतूद करून घेण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. असे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पदयात्रा संपल्यानंतर ते नागरिकांशी बोलत होते.

प्रभाग क्र. १७, रविवार पेठ-रास्ता पेठ येथून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरेश कांबळे यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि मित्र पक्षांचे झेंडे, धंगेकरांच्या कार्याचे फलक, फटाक्यांचा दणदणदणाट याबरोबरच ‘धंगेकर जिंदाबाद’, ‘महाविकास आघाडी जिंदाबाद’ या घोषणांसह पदयात्रेला प्रारंभ झाला.

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांसमवेत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार आनंतराव गाडगीळ, लता राजगुरू, शिवा भोकरे, दिलीप पवार, जयसिंग भोसले, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, मंगेश निरगुडकर, अरुण मालेगावकर, राजू शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शांतीलाल सुरतवाला, दत्ता सागरे, गणेश नलावडे, राजेंद्र मुळे, प्रसाद गावडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, युवराज पारीख, गणेश शिंदे, योगेश हेंगरे, निलेश राऊत आदी नेते, पदाधिकारी व  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ही पदयात्रा पुढे क्रांतीचौक मार्गे- गौरी आळी- नेहरू चौक- सुभानशहा दर्गा- सतरंजीवाला चौक- तांबोळी मशीद- गोविंद हलवाई चौक- वीरेंद्र किराड ऑफिस- हमजेखान चौक मार्गे जाऊन गोकुळ वस्ताद तालीम येथे समाप्त झाली.

लोहियानगरमध्ये भव्य पदयात्रा

कसबा मतदार संघातील लोहिया नगर, टिंबर मार्केट हा दाट वस्तीचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची सत्ता असूनदेखील या भागातील विकासाकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे. खासदार, आमदार सत्तेत असूनदेखील विकास करु शकत नाही, त्यामुळे येथील जनता भाजपाला वैतागली आहे. भाजपावरील रोष म्हणून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदार एकहाती विजयी करतील. आमच्या भागातील थेट समस्या मांडणारा नेता आज आम्हाला मिळाला, असल्याच्या भावना नागरिकांनी आज लोहियानगर एकबोटे कॉलनी परिसरात पदयात्रेच्या वेळी व्यक्त केल्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व समविचारी पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र  धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेची सुरुवात प्रभाग क्रमांक 19 मधील माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या कार्यालयापासून झाली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आणि अविनाश बागवे यांच्या हस्ते उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी धंगेकर यांचे औक्षण केले. पदयात्रेच्या प्रारंभी जेसीबीमधून धंगेकर यांच्यावर पुष्पवृष्टी करुन जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतषबाजी.. बँडपथकाचा दणदणाट…आणि घोषणांनी सारा परिसर दुमदुमन गेला होता. पदयात्रेमध्ये धंगेकर यांच्या समवेत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, कमलताई व्यवहारे, अविनाश बागवे, रफिक शेख, यासीर बागवे, विठ्ठल थोरात, जुबेर दिल्लीवाला, तौफिक मुलानी, अरुण गायकवाड,  सुनिल बावकर, दयानंद अडागळे, सुरेखा खंडागळे, चेतन अगरवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नलावडे, शांतीलाल मिसाळ, युसुफ शेख, संजय  गायकवाड, विक्रम मोरे, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयाताई मोहिते, अनिल खैरे,  अनिल डांगी, मनोज यादव, कमलाकर बनसोड, रुपेश रुपवार, अनिकेत थोरात, सागर पेताडे अशा नेते, पदाधिकारी व  कार्यकर्ते तसेच महिलांचा यावेळी लक्षणीय सहभाग होता.

टिंबर मार्केट असोसिएशनच्या वतीने गणेश ओसवाल, अशोक राठोड, मोहन राठोड आणि सुरेश जैन यांनी धंगेकर यांचा शाल व श्री फळ देऊन स्वागत व सत्कार केला. त्याचबरोबर टिंबर मार्केट भागातील अनेक व्यापार्‍यांनी धंगेकर यांचे जोरदार स्वागत व सत्कार केला. टिंबर मार्केट व लोहिया नगर, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी परिसरातील विविध गणेश मंडळ, सामाजिक संस्था, महिला नवरात्री महोत्सव, ज्येष्ठ नागरिक संघटनांनी धंगेकर यांचे स्वागत केले. तसेच या भागातील महिलांनी त्यांचे औक्षण करुन त्यांना पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर या परिसरातील अनेक मुस्लिम भगिनींनी त्यांचे स्वागत केले. अखिल एकबोटे कॉलनी गणपती ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे युसूफभाई शेख यांच्या वतीने धंगेकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. धंगेकर यांचा विजय असो, अशा घोषणा देत लोहिया नगर भागातील नागरिकांनी धंगेकर यांना खांद्यावर घेऊन त्यांचा जयघोष केला.  प्रभाग क्रमांक 19 मधील रमेश बागवे यांच्या कार्यालयापासून सुरु झालेली पदयात्रा राममंदीर, सुर्यकिरण मंडळ, अंजुमन चौक, लोहिया नगर, कल्याणकर पुल, भावसार मंगल कार्यालय मार्गे औंदुबर तरुण गणेश मंडळ येथे समारोप झाला.

कसब्यातील लोक धंगेकर यांनाच लोकमान्यता देतील-  अमित देशमुख

पुणे-‘महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देणारी ही निवडणूक असून कसब्यातील लोक हे धंगेकर यांनाच लोकमान्यता देतील व टिळकांच्या विचारधारेचा वारसा तेच पुढे नेतील’ असा विश्वास माजी मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ दत्तवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीनही पक्षांच्या संयुक्त जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, उमेदवार रविंद्र धंगेकर,माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर अंकुश काकडे, दिप्ती चवधरी, रामहरी रूपनवर आदी यावेळी व्यासपीठावर होते.

देशमुख पुढे म्हणाले, दत्तवाडी या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना मालकी हक्क देण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या विचारधारेने केले आणि हीच विचारधारा जोपासण्याचे काम धंगेकर करीत आहेत. परिवर्तन करताना कसब्यातील  जनता याचा निश्चित विचार करेल. लातूर शहरात लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला असून कसबा व लातूरचे असलेले नाते दृढ करण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार वंदना चव्हाण, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, शिवसेनेचे अशोक हरनावळ, रामहरी रुपनवर, अंकुश काकडे आदींची यावेळी भाषणे झाली.

दीपक म्हस्के यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. माजी नगरसेविका प्रिया गदादे यांनी आभार मानले. सभेस नागरिकांची मोठी गर्दी होती.

कोपरा सभांना मोठा प्रतिसाद

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात जो निर्णय दिला त्यामुळे प्रचंड नाराज व अस्वस्थ झालेले सच्चे शिवसैनिक या निवडणुकीत त्वेषाने मतदान घडवून आणतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यास निवडून आणतील अशा तीव्र भावना कोपरा सभा मधील विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच धंगेकर हे सच्चे कार्यकर्ते असल्यामुळे जनमाणसात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आता भाजपाचा हा बालेकिल्ला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या भुईसपाट होईल. असे मत व्यक्त होत राहिले.

कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांना सुरुवात झाली. त्यात अनेक वक्त्यांनी हा सूर आळवला. पहिल्या दिवशी दिनांक. १७ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कामगार मैदान, सायंकाळी ६:०० वाजता पवळे चौक आणि सायंकाळी ७:०० वाजता खजिना विहिर चौक येथे कोपरा सभा झाल्या.

कामगार मैदान येथील कोपरा सभेत निखील रांजणकर, चंद्रकांत मिठापल्ली, राजू शेख, राजेंद्र आलमखाने, मनिष आंदे, प्रशांत मिठापल्ली, राजेंद्र पडवळ, संतोष जोशी, संदीप आटपाळकर, पवळे चौक कोपरा सभेत दत्ता सागरे, राजू शेख, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, राजेंद्र आलमखाने, शब्बीर शेख, इसाक शेख, साजीद तांबोळी, राजेंद्र देशमुख, हनमंत दगडे, नागेश खडके, मयूर भोकरे, पल्लवीताई जावळे, वनिताताई जगताप, संतोष जोशी आणि खजिना विहीर चौक कोपरा सभेत सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, निताताई परदेशी, संगीता तिवारी, रोहन पायगुडे, फईम शेख, दादा बलकवडे, संतोष जोशी, अजिंक्य पालकर आदींनी भाषणे केली. याचे संयोजन राजूभाई शेख, राजेंद्र आलमखाने, ओम कासार, गणेश भंडारी यांनी केले.

निवडणूक आयुक्त हे पंतप्रधानांचे गुलाम: उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई-मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चिडलेले आहात. देशातील असा कोणताही पक्ष नसेल ज्यावर असा आघात झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असतील तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. अगदी त्याच पद्धतीने संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही जोरदार प्रहार केले.

ते म्हणाले,’ ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो.

मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला त्यावेळी चिन्ह दिलं गेलं.जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, एक न्यायमूर्ती देखील राज्यपाल झाल्याचा दाखला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. चोरांना धडा शिकवणारच.
  • ज्यांनी शिवसेनेकडून नाव, धनुष्यबाण चोरलंय, त्यांनी माहिती नाही की, त्यांनी मधमाशीच्या पोळ्यावर हात मारलाय. या मधमाशीचा चावा काय असतो, हे लवकरच त्यांना कळेल.
  • सरकारी यंत्रणा भाजपच्या गुलाम झाल्या आहेत. निवडणूक आयुक्तही गुलाम झाले आहेत. गुलाम झालेल्या यंत्रणा अंगावर सोडून शिवसेना संपवणे शक्य होणार नाही.
  • निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर राज्यपाल होऊ शकतील. असे गुलाम भाजपने पाळलेत. मात्र, माझे या गुलामाला आव्हान आहे, ते शिवसेना कुणाची?, हे ठरवू शकत नाहीत.
  • गद्दारांना आज केवळ शिवसेना नाव हवय, बाळासाहेब ठाकरेंचं नाव हव आहे. पण, शिवसेनेच कुटुंब नकोय.
  • एक दिवस असा होता जेव्हा मोदींचे मुखवटे घालून प्रचार केला जायचा. मात्र, आज मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून यावे लागत आहे. आज महाराष्ट्रात मोदी चालत नाही. मोदींच्या नावावर आज महाराष्ट्रात मते मिळत नाहीत. हा महाराष्ट्राचा विजय आहे.
  • रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काय झालं? रावण उताणा पडला. आता ज्या चोरांनी शिवधनुष्य चोरलेय. तेदेखील उताणे पडल्याशिवाय राहणार नाही.
  • शिवसेनेविरोधात केवळ कटकारस्थाने चालू आहेत. उद्या आपले मशाल हे निवडणूक चिन्हदेखील ते गोठवू शकतात.
  • लढाई आता सुरू झालीये. ही चोरी आपण त्यांना पचू द्यायची नाहीये. तुम्ही शिवधनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येईल. हिंमत असेल तर निवडणुकीत समोरासमोर या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, शिवसैनिकांनो आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.
  • शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मी खचलेलो नाही. कारण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. या गद्दारांच्या छाताडावर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे.
  • उद्या फेसबूक लाईव्ह घेऊन मी निवडणूक आयोगासमोर आपण काय-काय मांडले, निवडणूक आयोगाने कसा पक्षपाती निर्णय दिला, याची माहिती देणार आहे.

तत्पूर्वी मातोश्रीसमोर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरीला गेले आहेत. त्या चोराला आम्ही पकडले आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीत समोर या. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येऊ. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.

शिवसेना फक्त नाव नाही. शिवसेना फक्त धनुष्यबाण नाही. भले त्यांनी आमचे धनुष्यबाण चोरले असतील. पण आजही लाखो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याने सावध राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नाहीत. अशी तिखट टीकाही उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे नाव चोरले जाऊ शकते, पण ‘शिवसेना’ चोरता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर जमून शक्तिप्रदर्शन केले. दादर येथील शिवसेना भवनाजवळही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी बोलावली आहे.

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा मोठा जमाव पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर येऊन संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसैनिकांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरीसह संपूर्ण मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांना ते धडा शिकवतील.

27 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसैनिकांना मातोश्री सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त पक्षातर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमापूर्वी उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. माजी राज्यमंत्री रमेश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अंधेरी (पूर्व) येथे उत्तर भारतीय समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यापूर्वी त्यांनी गेल्या रविवारी गोरेगावमध्ये उत्तर भारतीय समाजातील लोकांची बैठक घेतली होती.

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

0

मुंबई, दि. 18 : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.

            शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

            राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

            सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.  

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय

            राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

            संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

            दिनांक 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री. बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

            सन 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले.  सन 1982 ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

            सन 1989 साली श्री. बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

            सन 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

            सन 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

            सन 2003 साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

            आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री. बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

            सन 2009 ते 2014 या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन 2014 ते 2019 या काळात 16 व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी  (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

            सन 2019 साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक 14 जुलै 2021 रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

            नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून तिसरा ई-लिलाव 22 फेब्रुवारी 2023 रोजी

0

भारतीय अन्न महामंडळाने तिसऱ्या ई-लिलावात देशातील 620 डेपोच्या माध्यमातून 11.72 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध केला

भारतीय अन्न महामंडळातर्फे, तिसर्‍या ई-लिलावात, देशभरातील 620 डेपोमधून सुमारे 11.72 लाख मेट्रिक टन  गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तिसर्‍या ई-लिलावासाठी, 17 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 10:00 वाजेपर्यंत एम जंक्शनच्या ई-पोर्टलवर नोंदणी केलेल्या बोलीधारकांना 22 फेब्रुवारी 2023 रोजी ई-लिलावात सहभागाई होण्याची परवानगी दिली जाईल. बयाणा रक्कम जमा करण्याची आणि अपलोड करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 2:30 पर्यंत आहे. तिसरा ई-लिलाव 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होईल.

केंद्र सरकारने देशभरात खुल्या बाजारात विक्री योजनेद्वारे गव्हाच्या विक्रीसाठी सुधारित राखीव किंमत ठेवली आहे. आता एफएक्यू गव्हाची राखीव किंमत देशभरात 2150 रुपये प्रति क्विन्टल युआरएस गव्हाची किंमत 2125 रुपये प्रति क्विंटल असेल. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती आणखी खाली आणण्यासाठी देशभरात कमी समान राखीव किमतीत गहू उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन राखीव किमती गव्हाच्या तिसऱ्या ई-लिलावाद्वारे विक्री पासून लागू झाल्या आहेत, जो बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात होणार आहे.

देशात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी, मंत्रिगटाने केलेल्या शिफारशीनुसार, भारतीय अन्न महामंडळ 30 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा केंद्रीय साठ्यातून खुल्या बाजारात विक्री योजना अंतर्गत विविध मार्गांने बाजारात आणत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या ई-लिलावादरम्यान एकूण 12.98 लाख मेट्रिक टन  गहू विकण्यात आला, ज्यापैकी बोलीदारांनी 8.96 लाख मेट्रिक टन आधीच  उचलला आहे, परिणामी गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी झाल्या आहेत.

देशभरात एकसमान राखीव किंमतीमध्ये सुधारणा करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेमुळे देशभरातील ग्राहकांना फायदा होईल आणि गहू आणि पिठाच्या किमती आणखी कमी होतील.

प्राप्तिकर विभागाचे बड्या माध्यम कंपनीवरील छाप्यांवर स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली-

प्राप्तिकर कायदा, 1961 (अधिनियम) च्या कलम 133A अंतर्गत एक सर्वेक्षण कारवाई दिल्ली आणि मुंबई येथे एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय मीडिया कंपनीच्या समूह संस्थांच्या व्यवसाय परिसरात करण्यात आली. हा समूह इंग्रजी, हिंदी आणि इतर विविध भारतीय भाषांमध्ये आशय  विकसित करण्याच्या, जाहिरात विक्री आणि बाजार समर्थन सेवा इ. व्यवसायात गुंतलेला आहे.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) आशयाचा  पुरेसा वापर असूनही, विविध समूह संस्थांनी दर्शविलेले उत्पन्न/नफा भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नाही. सर्वेक्षणादरम्यान, विभागाने संस्थेच्या कार्याशी संबंधित अनेक पुरावे गोळा केले जे दर्शवितात की समूहाच्या परदेशी संस्थांद्वारे भारतात उत्पन्न म्हणून जाहीर न केलेल्या काही रेमिटन्सवर (मिळकतीवर) कर भरला गेलेला नाही.

सर्वेक्षण कारवाईत असेही दिसून आले आहे की दुय्यम कर्मचार्‍यांच्या सेवांचा वापर केला गेला आहे ज्यासाठी भारतीय कंपनीने संबंधित परदेशी कंपनीला प्रतिपूर्ती केली आहे. असा रेमिटन्स देखील रोखून धरलेल्या कराच्या अधीन होता जो भरला गेला नाही. तसेच, सर्वेक्षणात ट्रान्सफर प्राइसिंग डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात अनेक तफावती आणि विसंगती देखील समोर आल्या आहेत. अशा विसंगती संबंधित कार्य पातळी, मालमत्ता आणि जोखीम (एफएआर) विश्लेषण, बाजारभावानुसार किंमत (ALP) निर्धारित करण्यासाठी लागू असलेल्या तुलनात्मक गोष्टींचा चुकीचा वापर आणि अपुरे महसूल वाटप, इत्यादींशी संबंधित आहेत.

सर्वेक्षण कारवाईत कर्मचाऱ्यांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांद्वारे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत ज्यांची योग्य वेळी तपासणी केली जाईल. हे सांगणे उचित होईल की केवळ वित्त, आशय  विकास आणि इतर उत्पादनाशी संबंधित कार्ये करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाब प्रामुख्याने नोंदवले गेले ज्यांची भूमिका महत्त्वाची होती. जरी विभागाने केवळ महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली असली तरीही, असे आढळून आले की, कागदपत्रे/करारपत्रे तयार करण्याच्या संदर्भात वेळकाढूपणा करण्याचे डावपेच वापरले गेले. समूहाची अशी भूमिका असूनही, नियमित  माध्यम/वाहिनी उपक्रम चालू राहतील अशा पद्धतीने सर्वेक्षण कारवाई करण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट

0

नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

 श्री. शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी यावेळी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

   श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे, प्रा.आगलावे, विलास गजघाटे, भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

‘क्रेन इंडिया’तर्फे पुण्यात बाणेरमधील एमएजाइल येथे अभियांत्रिकी रचना केंद्र व प्रादेशिक मुख्यालयाचे उद्घाटन

पुणे – क्रेन (NYSE CR) कंपनीने नुकतेच येथील बाणेर परिसरातील एमएजाइल येथे आपले नवे कार्यालय सुरू केले आहे. ‘क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे आयोजित कार्यक्रमात या कार्यालयाचे उद्घाटन ‘क्रेन इंडिया’चे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्ते नुकतेच झाले.

‘क्रेन’चे पुण्यातील नवे कार्यालय प्रशस्त २५,००० चौरस फुटांवर वसलेले असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. तेथून क्रेन इंडियाचे मुख्यालय, कंपनीविषयक कामकाज, विक्री विभाग, क्रेन कंपनी इंडिया सोर्सिंग, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी व इंजिनिअरिंग डिझाईन सेंटर यांचे कामकाज चालणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना ‘क्रेन इंडिया डिझाईन सेंटर’चे संचालक हर्षद कर्वे म्हणाले, की आमच्या अभियांत्रिकी रचना केंद्राने क्रेनला एकस्वक्षम (पेटंटेबल) नवी उत्पादने बाजारात आणण्यासाठी तसेच मूल्य अभियांत्रिकीद्वारे खर्चाचा पुरेपूर वापर करण्यासाठी सक्षम बनवले आहे. आता नव्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्याने तसेच जलद प्रारुपीकरण व इलेक्ट्रॉनिक्स रचना, विकास व चाचण्या यासाठी आधुनिक प्रयोगशाळा मिळाल्याने आम्हाला अभिनव, अद्ययावत व उच्च अभियांत्रिकीयुक्त उत्पादनांचा विकास करणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित

0

मुंबई, दि. 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती या समितीचे सदस्य असतील.

आजवरच्या पारंपरिक मासेमारीचा भर सागरी मासेमारीवर राहिला आहे. मात्र देशांतर्गत विविध जलाशयात मत्स्यपालन, मत्स्योत्पादन हा विषय दुर्लक्षित राहिला होता. केंद्र सरकारसोबतच राज्य शासनाने देखील गोड्या पाण्यातील मत्स्यपालनावर भर देण्याचे ठरवले आहे. या क्षेत्रात रोजगार, व्यवसाय आणि मत्स्योत्पादनाच्या निर्यातीस मोठा वाव असून त्याबाबत नवीन धोरण बनविणे आवश्यक आहे. तसेच मासेमारी अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तातडीने याविषयी धोरण निर्मितीसाठी आणि अधिनियमात सुधारणा सुचविण्याकरिता तज्ज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.

मत्स्यव्यवसाय आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतील. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव, केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक, नागपूरच्या म्हापसू मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु, रत्नागिरीच्या मत्स्यमहाविद्यालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक/प्राध्यापक, लातूरच्या उदगीर येथील मत्स्यमहाविद्यालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक, भंडाऱ्याचे डॉ. उल्हास फडके, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय राज्यस्तरीय संघाचे प्रतिनिधी यामध्ये सदस्य असतील. याशिवाय वासुदेवराव सुरजुसे, रविकिरण तोरसकर, रणजीत रासकर, शहाजी पाटील, शंकर वाघ, दिलीप परसने, डॉ. केतन चौधरी या समितीमध्ये सदस्य असतील. मत्स्यव्यवसाय सहआयुक्त हे या समितीत सदस्य सचिव असतील.

ही समिती वेळोवेळी बैठका घेऊन सहा महिन्याच्या आत भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय धोरणातर्गंत नियमित शासन निर्णय आणि परिपत्रक तसेच भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणी संबंधातील शासन निर्णय आणि परिपत्रक यांचा अभ्यास करुन महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल आणि सुधारित धोरण मसुदा शासनास सादर करणार आहे.