पुणे-‘महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देणारी ही निवडणूक असून कसब्यातील लोक हे धंगेकर यांनाच लोकमान्यता देतील व टिळकांच्या विचारधारेचा वारसा तेच पुढे नेतील’ असा विश्वास माजी मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ दत्तवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीनही पक्षांच्या संयुक्त जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, उमेदवार रविंद्र धंगेकर,माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर अंकुश काकडे, दिप्ती चवधरी, रामहरी रूपनवर आदी यावेळी व्यासपीठावर होते.
देशमुख पुढे म्हणाले, दत्तवाडी या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना मालकी हक्क देण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या विचारधारेने केले आणि हीच विचारधारा जोपासण्याचे काम धंगेकर करीत आहेत. परिवर्तन करताना कसब्यातील जनता याचा निश्चित विचार करेल. लातूर शहरात लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला असून कसबा व लातूरचे असलेले नाते दृढ करण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार वंदना चव्हाण, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, शिवसेनेचे अशोक हरनावळ, रामहरी रुपनवर, अंकुश काकडे आदींची यावेळी भाषणे झाली.
दीपक म्हस्के यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. माजी नगरसेविका प्रिया गदादे यांनी आभार मानले. सभेस नागरिकांची मोठी गर्दी होती.
कोपरा सभांना मोठा प्रतिसाद
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात जो निर्णय दिला त्यामुळे प्रचंड नाराज व अस्वस्थ झालेले सच्चे शिवसैनिक या निवडणुकीत त्वेषाने मतदान घडवून आणतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यास निवडून आणतील अशा तीव्र भावना कोपरा सभा मधील विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच धंगेकर हे सच्चे कार्यकर्ते असल्यामुळे जनमाणसात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आता भाजपाचा हा बालेकिल्ला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या भुईसपाट होईल. असे मत व्यक्त होत राहिले.
कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांना सुरुवात झाली. त्यात अनेक वक्त्यांनी हा सूर आळवला. पहिल्या दिवशी दिनांक. १७ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कामगार मैदान, सायंकाळी ६:०० वाजता पवळे चौक आणि सायंकाळी ७:०० वाजता खजिना विहिर चौक येथे कोपरा सभा झाल्या.
कामगार मैदान येथील कोपरा सभेत निखील रांजणकर, चंद्रकांत मिठापल्ली, राजू शेख, राजेंद्र आलमखाने, मनिष आंदे, प्रशांत मिठापल्ली, राजेंद्र पडवळ, संतोष जोशी, संदीप आटपाळकर, पवळे चौक कोपरा सभेत दत्ता सागरे, राजू शेख, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, राजेंद्र आलमखाने, शब्बीर शेख, इसाक शेख, साजीद तांबोळी, राजेंद्र देशमुख, हनमंत दगडे, नागेश खडके, मयूर भोकरे, पल्लवीताई जावळे, वनिताताई जगताप, संतोष जोशी आणि खजिना विहीर चौक कोपरा सभेत सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, निताताई परदेशी, संगीता तिवारी, रोहन पायगुडे, फईम शेख, दादा बलकवडे, संतोष जोशी, अजिंक्य पालकर आदींनी भाषणे केली. याचे संयोजन राजूभाई शेख, राजेंद्र आलमखाने, ओम कासार, गणेश भंडारी यांनी केले.