Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

निवडणूक आयुक्त हे पंतप्रधानांचे गुलाम: उद्धव ठाकरेंचा घणाघात

Date:

मुंबई-मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चिडलेले आहात. देशातील असा कोणताही पक्ष नसेल ज्यावर असा आघात झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असतील तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. अगदी त्याच पद्धतीने संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही जोरदार प्रहार केले.

ते म्हणाले,’ ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो.

मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला त्यावेळी चिन्ह दिलं गेलं.जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, एक न्यायमूर्ती देखील राज्यपाल झाल्याचा दाखला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. चोरांना धडा शिकवणारच.
  • ज्यांनी शिवसेनेकडून नाव, धनुष्यबाण चोरलंय, त्यांनी माहिती नाही की, त्यांनी मधमाशीच्या पोळ्यावर हात मारलाय. या मधमाशीचा चावा काय असतो, हे लवकरच त्यांना कळेल.
  • सरकारी यंत्रणा भाजपच्या गुलाम झाल्या आहेत. निवडणूक आयुक्तही गुलाम झाले आहेत. गुलाम झालेल्या यंत्रणा अंगावर सोडून शिवसेना संपवणे शक्य होणार नाही.
  • निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर राज्यपाल होऊ शकतील. असे गुलाम भाजपने पाळलेत. मात्र, माझे या गुलामाला आव्हान आहे, ते शिवसेना कुणाची?, हे ठरवू शकत नाहीत.
  • गद्दारांना आज केवळ शिवसेना नाव हवय, बाळासाहेब ठाकरेंचं नाव हव आहे. पण, शिवसेनेच कुटुंब नकोय.
  • एक दिवस असा होता जेव्हा मोदींचे मुखवटे घालून प्रचार केला जायचा. मात्र, आज मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून यावे लागत आहे. आज महाराष्ट्रात मोदी चालत नाही. मोदींच्या नावावर आज महाराष्ट्रात मते मिळत नाहीत. हा महाराष्ट्राचा विजय आहे.
  • रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काय झालं? रावण उताणा पडला. आता ज्या चोरांनी शिवधनुष्य चोरलेय. तेदेखील उताणे पडल्याशिवाय राहणार नाही.
  • शिवसेनेविरोधात केवळ कटकारस्थाने चालू आहेत. उद्या आपले मशाल हे निवडणूक चिन्हदेखील ते गोठवू शकतात.
  • लढाई आता सुरू झालीये. ही चोरी आपण त्यांना पचू द्यायची नाहीये. तुम्ही शिवधनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येईल. हिंमत असेल तर निवडणुकीत समोरासमोर या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, शिवसैनिकांनो आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.
  • शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मी खचलेलो नाही. कारण शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. या गद्दारांच्या छाताडावर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे.
  • उद्या फेसबूक लाईव्ह घेऊन मी निवडणूक आयोगासमोर आपण काय-काय मांडले, निवडणूक आयोगाने कसा पक्षपाती निर्णय दिला, याची माहिती देणार आहे.

तत्पूर्वी मातोश्रीसमोर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरीला गेले आहेत. त्या चोराला आम्ही पकडले आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीत समोर या. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येऊ. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.

शिवसेना फक्त नाव नाही. शिवसेना फक्त धनुष्यबाण नाही. भले त्यांनी आमचे धनुष्यबाण चोरले असतील. पण आजही लाखो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याने सावध राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नाहीत. अशी तिखट टीकाही उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे नाव चोरले जाऊ शकते, पण ‘शिवसेना’ चोरता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर जमून शक्तिप्रदर्शन केले. दादर येथील शिवसेना भवनाजवळही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी बोलावली आहे.

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा मोठा जमाव पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर येऊन संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसैनिकांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, अंधेरीसह संपूर्ण मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांना ते धडा शिकवतील.

27 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसैनिकांना मातोश्री सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त पक्षातर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमापूर्वी उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. माजी राज्यमंत्री रमेश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अंधेरी (पूर्व) येथे उत्तर भारतीय समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यापूर्वी त्यांनी गेल्या रविवारी गोरेगावमध्ये उत्तर भारतीय समाजातील लोकांची बैठक घेतली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल करणार: प्रशांत जगताप

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश...

पै.सिकंदर शेखने पटकावले ५ लाखाचे बक्षीस

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ संपन्न पुणे- येथील बालेवाडी...

“शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश...