पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघ गेली ३० वर्षे विकासापासून वंचित राहिला आणि त्यास भाजपच जबाबदार आहे. कसब्याचा विकास आणि मतदारसंघातील नागरिक हे केंद्रबिंदू मानून कसब्याच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट मी तयार करणार असून त्यामध्ये स्थानिक नागरिक, गणेश मंडळे, प्रभागातील सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, आर्किटेक्ट आणि टाऊन प्लॅनिंगचे तज्ञ यांचा सहयोग घेणार आहेत. विकासाचा हा ब्ल्यू प्रिंट समोर ठेवून निर्धारित वेळेत कसब्याच्या विकासाची कामे पूर्ण करून घेण्यासाठी व त्यासाठी भरीव विकासनिधीची तरतूद करून घेण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. असे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पदयात्रा संपल्यानंतर ते नागरिकांशी बोलत होते.
प्रभाग क्र. १७, रविवार पेठ-रास्ता पेठ येथून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरेश कांबळे यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि मित्र पक्षांचे झेंडे, धंगेकरांच्या कार्याचे फलक, फटाक्यांचा दणदणदणाट याबरोबरच ‘धंगेकर जिंदाबाद’, ‘महाविकास आघाडी जिंदाबाद’ या घोषणांसह पदयात्रेला प्रारंभ झाला.
या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांसमवेत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार आनंतराव गाडगीळ, लता राजगुरू, शिवा भोकरे, दिलीप पवार, जयसिंग भोसले, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, मंगेश निरगुडकर, अरुण मालेगावकर, राजू शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शांतीलाल सुरतवाला, दत्ता सागरे, गणेश नलावडे, राजेंद्र मुळे, प्रसाद गावडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, युवराज पारीख, गणेश शिंदे, योगेश हेंगरे, निलेश राऊत आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ही पदयात्रा पुढे क्रांतीचौक मार्गे- गौरी आळी- नेहरू चौक- सुभानशहा दर्गा- सतरंजीवाला चौक- तांबोळी मशीद- गोविंद हलवाई चौक- वीरेंद्र किराड ऑफिस- हमजेखान चौक मार्गे जाऊन गोकुळ वस्ताद तालीम येथे समाप्त झाली.
लोहियानगरमध्ये भव्य पदयात्रा
कसबा मतदार संघातील लोहिया नगर, टिंबर मार्केट हा दाट वस्तीचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची सत्ता असूनदेखील या भागातील विकासाकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे. खासदार, आमदार सत्तेत असूनदेखील विकास करु शकत नाही, त्यामुळे येथील जनता भाजपाला वैतागली आहे. भाजपावरील रोष म्हणून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदार एकहाती विजयी करतील. आमच्या भागातील थेट समस्या मांडणारा नेता आज आम्हाला मिळाला, असल्याच्या भावना नागरिकांनी आज लोहियानगर एकबोटे कॉलनी परिसरात पदयात्रेच्या वेळी व्यक्त केल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व समविचारी पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेची सुरुवात प्रभाग क्रमांक 19 मधील माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या कार्यालयापासून झाली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आणि अविनाश बागवे यांच्या हस्ते उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी धंगेकर यांचे औक्षण केले. पदयात्रेच्या प्रारंभी जेसीबीमधून धंगेकर यांच्यावर पुष्पवृष्टी करुन जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतषबाजी.. बँडपथकाचा दणदणाट…आणि घोषणांनी सारा परिसर दुमदुमन गेला होता. पदयात्रेमध्ये धंगेकर यांच्या समवेत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, कमलताई व्यवहारे, अविनाश बागवे, रफिक शेख, यासीर बागवे, विठ्ठल थोरात, जुबेर दिल्लीवाला, तौफिक मुलानी, अरुण गायकवाड, सुनिल बावकर, दयानंद अडागळे, सुरेखा खंडागळे, चेतन अगरवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नलावडे, शांतीलाल मिसाळ, युसुफ शेख, संजय गायकवाड, विक्रम मोरे, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयाताई मोहिते, अनिल खैरे, अनिल डांगी, मनोज यादव, कमलाकर बनसोड, रुपेश रुपवार, अनिकेत थोरात, सागर पेताडे अशा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिलांचा यावेळी लक्षणीय सहभाग होता.
टिंबर मार्केट असोसिएशनच्या वतीने गणेश ओसवाल, अशोक राठोड, मोहन राठोड आणि सुरेश जैन यांनी धंगेकर यांचा शाल व श्री फळ देऊन स्वागत व सत्कार केला. त्याचबरोबर टिंबर मार्केट भागातील अनेक व्यापार्यांनी धंगेकर यांचे जोरदार स्वागत व सत्कार केला. टिंबर मार्केट व लोहिया नगर, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी परिसरातील विविध गणेश मंडळ, सामाजिक संस्था, महिला नवरात्री महोत्सव, ज्येष्ठ नागरिक संघटनांनी धंगेकर यांचे स्वागत केले. तसेच या भागातील महिलांनी त्यांचे औक्षण करुन त्यांना पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर या परिसरातील अनेक मुस्लिम भगिनींनी त्यांचे स्वागत केले. अखिल एकबोटे कॉलनी गणपती ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे युसूफभाई शेख यांच्या वतीने धंगेकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. धंगेकर यांचा विजय असो, अशा घोषणा देत लोहिया नगर भागातील नागरिकांनी धंगेकर यांना खांद्यावर घेऊन त्यांचा जयघोष केला. प्रभाग क्रमांक 19 मधील रमेश बागवे यांच्या कार्यालयापासून सुरु झालेली पदयात्रा राममंदीर, सुर्यकिरण मंडळ, अंजुमन चौक, लोहिया नगर, कल्याणकर पुल, भावसार मंगल कार्यालय मार्गे औंदुबर तरुण गणेश मंडळ येथे समारोप झाला.