Home Blog Page 1400

सत्तापिसाट आणि धर्मपिसाट झालेल्या भाजपचा पराभव होणे गरजेचे-कॉ. अजीत अभ्यंकर

पुणे-कसबापेठ विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मागील अनेक वर्षे भाजपला‌ साथ‌ दिली. मात्र, भाजपने या मतदार संघातील मतदारांचा परिवारातील म्हणून केवळ वापर केला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजीत अभ्यंकर यांनी केला. सत्तापिसाट आणि धर्मपिसाट झालेल्या भाजपचा पराभव होणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

      कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॉ. अभ्यंकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेना व सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. अभिजीत वैद्य, घरकामगार संघटनेच्या सचिव सरस्वती भांदिर्गे उपस्थित होते.

      कॉ. अभ्यंकर म्हणाले, राज्यपाल, पोलीसांपासून ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वच घटनात्मक यंत्रणा या सत्तेच्या आधीन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेले सत्तांतर हे सूडाच्या राजकारणाचे एक उदाहरण आहे. या सर्वांमधून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला जात आहेच.  महाराष्ट्राच्या विकासाला आणि जनतेलाच ओलीस धरण्यात येत आहे.

      या पार्श्वभूमीवर पुण्यात कसबा मतदारसंघात होत असणाऱ्या निवडणूकीत देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याचे सर्व मंत्रिमंडळ आपल्या जबाबदाऱ्या आणि कामे सोडून उतरले आहेत. त्यातून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.

      डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, न्यायव्यवस्था झाली रखेल, हे अण्णाभाऊंनी पूर्वी म्हंटले आहे. त्याची प्रचिती आज‌ देशात व राज्यातील जनतेला येत आहे. लाचार तो वजीर अशी परिस्थिती आज आहे. लोकशाही, संविधान व प्रशासन या संकल्पना उध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कसबा मतदार संघाला मोठा इतिहास आहे. अनेक थोर समाजवादी नेते घडले. अनेक समाजिक संस्था व संघटनांचा उदय झाला, या सर्वांनी सुरूंग लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या मतदार संघात सातत्याने भाजपचा विजय होतो, हा भ्रम दूर झाला पाहिजे. ही पोटनिवडणुक हा भ्रम दूर करणारी आणि २०२४ च्या परिवर्तनाची सुरूवात असेल.

      सरस्वती भांदिर्गे म्हणाल्या, मोदींचे सरकार आल्यापासून आमच्या घरेलू कामगारांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्हाला महागाईचे‌ चटके बसलेले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात प्रचारात उतरत आहोत. पाच हजार घर कामगार महिला घरोघरी पत्रके वाटप करत आहेत.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कसब्याच्या निवडणुकीत धंगेकर यांचा विजय निश्चित- अजित पवार

पुणे-आपल्या ३२ वर्षाच्या राजकीय आयुष्यात प्रथमच पुण्यातील या पोटनिवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचे दिसत असून महाविकास आघाडीचे धंगेकर शंभर टक्के विजयी होतील असा ठाम विश्वास राज्यातील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारवाडा येथून निघालेल्या दुचाकी रॅलीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी अजितदादांबरोबर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

      उत्तरोत्तर रंगत चाललेली व दुरंगी लक्षवेधी लढत ठरलेली ही निवडणूक महाविकास आघाडी व भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतीश्तेची केली असून आजचा (सोमवार) पुण्यातील दिवस व्हिआयपींच्या वर्दळीमुळे गजबजून निघाला. महाविकास आघाडीतील हे दोन्ही दिग्गज उघड्या जीपमध्ये एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आले होते. उमेदवार धंगेकर व माजी आमदार मोहन जोशी हेदेखील या जीपमध्ये प्रमुख नेत्यांबरोबर सहभागी झाले होते. रॅलीच्या प्रारंभी अजितदादा व बाळासाहेब थोरात यांच्या जीपच्या पाठीमागे खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार कमल ढोलेपाटील दुसऱ्या जीप मध्ये सहभागी झाले होते. तर महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते दुचाकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अजितदादांनी आपल्या उजव्या हातामध्ये पंजा हे निवडणूक चिन्ह असलेला फलक बांधून नागरिकांना ते अभिवादन करत होते. फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी शनिवारवाड्यापासून सुरु झालेल्या या रॅलीने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. लालमहाल पासून ही रॅली जेव्हा फडके हौद चौकात आली तेव्हा दीडशे फुटांचा भव्य हार क्रेनच्या सहाय्याने  अजितदादा पवार यांच्या गळ्यात घालण्यात आला. याप्रसंगी प्रचंड टाळ्या, शिट्ट्या व ‘एकच वादा अजितदादा’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

      कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड असल्याने व पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या परिसरातून ही रॅली जात असल्याने पुणेकर जनता तसेच व्यापारी, दुकानदार, सामान्य नागरिक यांनी रॅली पाहायला प्रचंड गर्दी केली होती. अजितदादांना व बाळासाहेब थोरात यांना ठिकठिकाणी थांबून त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरु होती. फडके हौद चौकातून ही रॅली पुढे अपोलो टॉकीज, हिंदमाता चौक, लोहियानगर पोलीस चौकी, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट, एस,पी. कॉलेज, टिळक रोड, गांजवे चौक, अलका टॉकीज चौक, रमणबाग, आप्पा बळवंत चौक येथून सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीची समाप्ती झाली.

संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

पुणे: भाजपा व महायुतीच्या विजयासाठी कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आज विजयाचा संकल्प करण्यात आला. कसबा पेठ मतदार संघातील 9 ते 10 हजार कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केले होते. या विजय संकल्प मेळाव्याने कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील भाजपच्या विजयाची गुढी उभारली.

भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, पतित पावन संघटना, लहुजी शक्ती सेना महायुतीचे कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, उमेदवार हेमंत रासने, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे, रिपाइंचे परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक शंकर पवार, अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, अजय खेडेकर, योगेश समेळ, सम्राट थोरात, गायत्री खडके, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, राजेश येनपुरे, सुलोचना कोंढरे, मनीषा लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हा विजय संकल्प मेळावा विजयाची नांदी ठरला आहे. याच्या यशस्वी आयोजनाबद्दल या मेळाव्याचे संयोजक भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज विजय संकल्प मेळावा आयोजित करून संजय नाना काकडे यांनी कसबा पेठ मतदार संघातील भाजपचा विजय निश्चित केला आहे.

लोकसभेत ज्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. महाराष्ट्रात ज्यांचं अस्तित्व नगण्य राहिले आहे. अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊन फायदा काय होणार असा सवाल करून चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे गल्ली ते दिल्ली सरकार असल्याने विकासाची गंगा तळागाळात नेण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा असे आवाहन केले.

केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार वेगाने विकासाचे निर्णय घेत आहे. कसबा मतदार संघातील वाड्यांचे प्रश्न आणि इतर सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्रातील व राज्यातील सरकार मदत करेल. हे काम विरोधी पक्ष करणार नाही. त्यामुळे आपला आमदार हा भाजपाचा असेल तर विकासाची गती अधिक राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, विकासाला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पायाभूत सुविधा वेगाने होत आहेत. मेट्रो, रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी दूरदृष्टीकोनातून प्रयत्न मोदी, शिंदे व फडणवीस सरकार करीत आहे. कसबा मध्ये विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा.

Quote
“आपण प्रत्येक जण कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील आहात. आपण प्रत्येकाने सात ते आठ लोकांना मतदानासाठी घेऊन जायचं आहे. असे झाल्यास केवळ आज उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना 70 ते 80 हजार मतदान मिळेल. याबरोबरच प्रत्येक नगरसेवकाने देखील ही निवडणूक महापालिकेची निवडणूक समजून काम करावे. यापद्धतीने काम झाल्यास भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवार गेली 20 वर्षे नगरसेवक आहे. इतक्या वर्षात त्यांनी केलेली विकासाची पाच कामे सांगता येत नाहीत. ही निवडणूक विधानसभेची आहे, राज्याची आहे. त्यामुळे मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकासाची कामे लक्षात ठेवून भाजपाला मत द्यावे.”
– संजय काकडे (उपाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र)

कसबा मतदार संघाच्या विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करण्यासाठी मला मत द्या, अशी विनंती उमेदवार हेमंत रासने यांनी केली.

माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णू कसबे, शैलेश टिळक, माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भोईराज मित्र मंडळ, परीट समाज, मुस्लिम महिला संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी मुलांना अचानक एक तास अगोदर शाळेतून सोडले

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज कसबा मतदारसंघातील गुजराती हायस्कूल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चार वाजता बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शाळा प्रशासनाने मुलांना साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोडल्याची घटना घडली आहे.आमच्या प्रत्येक वर्गात येऊन शिक्षकानी सांगितले की, आज आपल्या शाळेत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला साडेतीन वाजता सोडण्यात येणार आहे. आणि त्यानंतर काहीच वेळात सोडण्यात आले. आमची शाळा रोज १२ वाजता भरते आणि पाच वाजता सुटते. पण, आज अचानक शाळा सोडल्याने आम्ही रिक्षावाले काकांची वाट पाहत आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमुळे एक तास लवकर शाळा सोडल्याने काही मुलांना आनंद झाला. लवकर घरी जायला मिळाले, पण काही मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणावर शाळा प्रशासनाने उत्तर देणे टाळले.

“माझा विनायक मेटे करण्याचा डाव”, अशोक चव्हाणांचं खळबळजनक विधान!

0

नांदेड-“सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,” असं खळबळजनक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यांच्या अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. संबंधित आरोप करताना अशोक चव्हाणांनी कोणचंही नाव घेतलं नाही. पण संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. ते नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

“पण जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारखा डुप्लीकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची जी चढाओढ चालली आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही. दुर्दैवाने माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी या घटनेचा उल्लेख करत आहे. पण हा प्रयत्न अतिशय केवीलवाणा आहे. लोकांची मनं जिंकता येत नाहीत. म्हणून हा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे, हे दुर्दैव आहे,” असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्रीसाहेब, प्रशासक आमची पिळवणूक करतंय

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

पुणे-कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी लढत द्यायची असून या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहर आणि जिल्हा जाहिरात व्यावसायिकांची बैठक घेतली . या बैठकीत जाहिरात व्यावसायिकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासक आमची पिळवणूक करत आहेत असे सांगितले .२०१८ मध्येच आयुक्तांनी मुख्यसभेला डावलून होर्डिंग व्यावसायिकांकडून ८२ रुपये चौरस फुटाचा दर २२२ रुपये केला आणि त्यांची वसुली २०१३ पासून केली.आणि आता २८ डिसेंबर २०२२ रोजी प्रशासक विक्रम कुमार यांनी तर कडी केली. त्यांनी हा दर ५८० रुपये चौरस फुट केला . साहेब सांगा हो कसं जगायचं आम्ही ? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आला . आणि त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले आणि आपण तुमच्या अडचणी समजून घेऊ शकतो तुम्हाला निश्चित न्याय देऊ मात्र आता आचार संहिता असल्याने बोलता येत नाही . पण तुमची अडचण निश्चित सोडवू असे आश्वासन दिले .

हेमंत रासने यांच्या पदयात्रेत पंकजा मुंडे यांचा सहभाग

पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या पदयात्रेला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. पालखी चौक येथून सुरू झालेली प्रचार यात्रा वटेश्वर, गाडीखाना, शिवाजी महाराज रस्त्याने आंग्रे वाडा येथे समाप्त झाली. समारोपप्रसंगी मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या.

उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, कसब्याचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, स्थानिक नगरसेवक सम्राट थोरात, आरती कोंढरे, अजय खेडेकर , विजयालक्ष्मी हरिहर, तेजेंद्र कोंढरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते

आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो त्यामुळे कार्यकर्ता अलर्ट राहतो कधी कधी मते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता या नेता या नात्याने या ठिकाणी प्रचाराला आली आहे, असे मुंडे म्हणाल्या.

मुंडे पुढे म्हणाल्या ‘कसब्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे त्यामुळे विजय निश्चित आहे. पक्षासाठी पक्षाच्या जन्मापासून आयुष्य वेचलेले खासदार गिरीश बापट हे पक्षाच्या निवडणुकीत सहभाग घेऊन हेमंत रासने आशीर्वाद दिला आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी

0

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला

पालघर दि 20 : मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे प्रथमच सदर योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे
महा – मत्स्य अभियानांतर्गत सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन सातपाटी येथे करण्यात आले होते त्यावेळी श्री.रूपाला बोलत होते
. यावेळी वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी बांधवांना 7% दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मच्छीमार बांधवांनाही 7 % दराने कर्ज देण्यात येणार आहे या योजनेचा सर्व मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. रूपाला यांनी केले.
मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढच्या पिढीला सुद्धा मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.रूपाला यांनी केले.

पालघर जिल्ह्यामध्ये मच्छी मार्केट उभारले जाणार

मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मत्स्य उत्पादन विक्री करण्यासाठी मच्छीमार बांधवांना हक्काची बाजारपेठ आवश्यक असल्याने पालघर जिल्ह्यामध्ये सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार असल्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तसेच डिझेल परतावा मिळण्यासाठी विलंबही होतो. डिझेल परतावा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यामध्ये याविषयी कायदा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासन मच्छीमारांच्या हितासाठी कायदा ही करेल असे प्रतिपादन. श्री मुनगंटीवार यांनी केले.
वाढवून बंदराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले

धंगेकर यांचे काम  आणि  महाविकास आघाडीची एकत्रित ताकद यामुळे विजय निश्चित- जयंत पाटील

पुणे-  जनसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम भाजपा करीत असून जनतेवर दहशत निर्माण करुन लोकशाही धोक्यात आणली जात आहे. माध्यमांची मुस्कटदाबी, एजन्सीचा गैरवापर यासह महागाईने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहेत. अनेकांवर खोटे आरोप करुन इडीच्या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपाकडून दुसर्‍यांच्या पक्षावर दरोडा टाकला जात आहे, भाजपा कोणालाही तोंड वर काढू देत नसल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होणार असून कसब्यात बदल निश्चित होणार आहे. कसब्यातला हाच बदल देशात घडणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने घरोघरी जाऊन प्रचार करा, अशा सुचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सोमवारी केल्या.

      काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र  धंगेकर यांच्या प्रचारार्थ संत सावता माळी भवन येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधी मंडळ कॉंग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी उपमहापौर दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार कमलताई ढोलेपाटील, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, रमेश अय्यर, जयंत किराड, गणेश नलावडे, प्रविण करपे, प्रदीप देशमुख, शानी नौशाद, संगीता पवार, लेखा नायर, शांतीलाल मिसाळ, दीपक जगताप, मृणालिनी वाणी, शिल्पा भोसले, सारिका पारिख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      पाटील म्हणाले, भाजपाला पराजयाचा मोठा धोका वाटत असल्याने त्यांचे वरिष्ठ नेते तळ ठोकून आहे. भाजपाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले असून त्यांचे जगणे अवघड केले आहे. गेल्या आठ वर्षात तीन हजारहून जास्त लोकांवर त्यांनी धाडी टाकल्या आहेत. बीबीसीसारख्या माध्यमांवर धाडी टाकून माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. आपल्याला हवे तेच माध्यमात प्रसिद्ध करुन भाजपा खोटेपणा दाखवत आहे. हा त्यांचा खोटेपणाचा भुरखा नागरिक फाडून काढणार आहे. कसबा विधानसभेतील मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे त्यांच्या विकास कामातून लोकप्रिय आहे.  तिन्ही पक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित होणार आहे. मात्र तरीदेखील कार्यकर्त्यांनी गाफील न राहता घरोघरी जाऊन काम करा. हा आपला विजय देशात पुढे नेणार आहे. बुथ कमिटीचे अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष यांनी घरे वाटून शेवटच्या दिवसांपर्यंत काम करा. कसब्यातील विजय देशात गुणगाण करणारा राहणार असल्याने ताकदीने काम करा यश दूर नाही, असे यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला.

      बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपाचा एकधोरणी कार्यक्रम, हुकूमशाही व महागाईला कंटाळलेला आहे. जनसामान्य भाजपाच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अनुकूल आहे.  कसब्यातील प्रत्येक नागरिक सर्वसामान्यांची निवडणूक असल्याची समजून रविंद्र धंगेकर यांचे काम करीत आहे. त्यामुळे हा विजय सर्वसामान्यांचा असणार आहे. भाजपाने जनतेची फसवणूक केली असल्याने या निवडणूकीवर त्याचा परिणाम होणार असून येत्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा महापौर असणार आहे. त्यामुळे निवडणूक स्वतःची समजून काम करा. या निवडणूकीवर महापालिकेची निवडणूक अवलंबून असून पुढील अनेक संधी या निवडणूकीवर आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका, कसबा मतदारसंघातील कोपरान कोपरा पिंजून काढा. भाजपाचे मतदेखील महाविकास आघाडीलाच राहणार आहे. असे यावेळी थोरात यांनी सांगितले.

      मोहन जोशी म्हणाले, महाविकास आघाडी पहिल्या दिवशीपासून रविंद्र धंगेकर यांचे काम जोमाने करीत आहे. मतदारसंघातील बैठका, सभा, कोपरा सभा, रॅलीला उर्त्स्फूत सहभाग आहे. महाविकास आघाडीचे नियोजन, समन्वय चांगले असल्याने विजय निश्चित होणार आहे. तिन्ही पक्षांचा कार्यकर्ते, पदाधिकार्‍याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडीचा प्रचार यंत्रणेत सहभाग आहे.  राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने  काम करीत आहे. शेवटच्या घटकांपर्यंत काम सुरु असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

      प्रशांत जगताप म्हणाले, कसबा मतदार संघात बदल होणार आहे. रविंद्र धंगेकर हे आपल्या कामातून लोकप्रिय आहेत. बहुजन समाजापासून व्यापारीवर्ग, ब्राम्हण समाजदेखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे यश दूर नाही. रविंद्र माळवदकर, कमलताई ढोले पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. गणेश नलावडे यांनी प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. अजिंक्य पालकर यांनी आभार मानले.

कसब्यात पुन्हा पाणी रे पाणी ……

पाचही वर्षे धरणे हाउसफुल्ल पण पुण्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी दैना …

पुणे – महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे, येत्या गुरूवारी ( दि. 23 ) रोजी कसबा विधानसभा मतदारसंघात पाणी पुरवठा बंद असणार आहे.या शिवाय, वारजे आणि रामेटेकडी तसेच स्वारगेट आणि परिसरातही पाणी बंद असणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( दि.24) रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी बंद असलेला भाग –
पर्वती एलएलआर टाकी दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ. बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर:- वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम , साळुंखे विहार रोड.

वारजे जलशुध्दीकरण प्रकल्प –
अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर. कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.

जुना होळकर जलशुद्धीकरण – एचई फॅक्‍टरी, एमईएस

रामटेकडी परिसर :- ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा आणि परिसर

….तेव्हा कुठे होते चेअरमन रासने ,कसब्याच्या पाण्यासाठी बापटांना धडकावे लागले होते आयुक्तांच्या बंगल्यावर …

कसब्यात एकही उमेदवार पसंत नाही NOTA चे बटन दाबण्याकडे कल वाढतो आहे. का वाढतो आहे ते घ्या जाणून

40 वर्षात प्रथमच केला होता गिरीश बापट यांनी कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग .

भाजपाला मतदान केले पण आता NOTA चे बटन दाबणार ,काहीजणांचा निर्धार

पुणे – बापटांच्या उजव्या डाव्या बाजूला बसून आता बापटांच्या आजारपणाचा फायदा लाटून सह्नुभूतीने मते मिळवू पाहणारे महापालिकेचे तब्बल ५ वर्षे पदाधिकारी म्हणून वावरलेले दोन महारथी तेव्हा कुठे होत्या .. जेव्हा खासदार असून हि बापट यांना कसब्यातील पाणी प्रश्नासाठी विभागीय आयुक्तांच्या बैठकीतून निषेध व्यक्त करत बाहेर पडावे लागले ,आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देऊन आयुक्तांच्या बंगल्यातील पाण्याचे प्रेशर तपासावे लागले .. तेव्हा आज कसब्याची आमदारकी लढविणारे महापालिकेचे पदाधिकारी हेमंत रासने होते तरी कुठे असा सवाल कसब्यातील नागरिक करू लागले आहे. पाच हि वर्षे तुडुंब पाऊस , धरणे हाऊस फुल असताना पंचतारांकित हॉटेल्स आणि काही ठिकाणी पाणी मुबलक दिले जात असताना कसब्याच्या पाणी प्रश्नासाठी स्थायी समिती अध्यक्ष , महापौर का लढले नाहीत ? तेव्हा खासदारांनाच जावे लागेल , आणि ते दिल्लीला गेले कि तेव्हाच किंवा अधिवेशनाच्याच वेळेत कसब्यात का पाणीपुरवठा कमी दाबाने कमी वेळ होत होता ? अशा प्रश्नांची उत्तरे द्याल काय असे विचारले जाऊ लागले आहे. भाजपच्या उमेदवाराला रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या खासदार बापट यांचा प्रचारासाठी सहारा घ्यावा लागला , त्यांच्या आजारपणाचे भांडवल करून सहानुभूती मिळवू पाहणारे त्यांचे उमेदवार कसब्यात पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष असूनही तेथील पाण्याच्या समस्येसाठी खुद्द खासदारांना आयुक्तांच्या बंगल्यावर धाड मारून त्यांना जाब विचारावा लागला तेव्हा ते म्हणाले, आयुक्तांवर प्रेशर आहे .. कुणाचे प्रेशर होते तर महापालीकेतल्याच पदाधिकाऱ्यांचे … ?तेव्हा याच नेत्यांवर कुरघोडी म्हणून कसब्याचे पाणी ज्यांनी पळविले आता त्याच नेत्यांच्या आजारपणाचा फायदा लाटून कोणी कोणी आमदार होऊ पाहत आहेत काय ? असा सवाल देखील केला जातो आहे . जेव्हा बापट कसब्याच्या पाणी प्रश्नावरून आयुक्त विक्रमकुमार यांच्या बंगल्यावर गेले तेव्हाअवघे २/३ नगरसेवक त्यांच्याबरोबर होते आहे . महत्वाचे हे दोन पदाधिकारी त्यांच्या समवेत का नव्हते ? त्यांना कसब्यातल्या नागरिकांना पाणी व्यवस्थित पुरवावे असे का वाटले नाही ? कि बापटांवर च कुरघोडी चे राजकारण ते करत होते ? असे सवाल करत आता कसब्यात एकही उमेदवार पसंत नाही NOTA चे बटन दाबण्याकडे कल वाढतो आहे.

सुमारे वर्षापूर्वी कसब्याच्या पाणी प्रश्नासाठी खासदार असूनही .. बापटांना लढावे लागले आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित झाली

नैतिकता व चारित्र्याच्या अधिष्ठानामुळेच रयतेच्या राज्याची उभारणी – श्री. राजेंद्र घाडगे यांचे प्रतिपादन

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२२:छत्रपती शिवाजी महाराज यांनी नैतिकता व चारित्र्याचे अधिष्ठान देत जातीधर्माऐवजी माणुसकीच्या मूल्यांवर हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे हे स्वराज्य खऱ्या अर्थाने रयतेचे ठरले असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व लेखक श्री. राजेंद्र घाडगे यांनी रविवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री. राजेंद्र घाडगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता श्री. विवेक मुंडे (महापारेषण) यांची उपस्थिती होती.

श्री. घाडगे म्हणाले की, स्वराज्य उभारणी म्हणजे केवळ लढाया किंवा राज्याचा भौगोलिक विस्तार नव्हता. तर स्वराज्य हे प्रत्येकासाठी, सर्व रयतेसाठी स्वाभिमानाने, सुखाने व स्वकर्तृत्वाने जगण्यासाठी होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, सर्वसामान्य रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर केली. स्वराज्यापूर्वी रयतेची स्थिती अतिशय दीन होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व शून्यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले व त्याची व्यवस्थित घडी बसविली. व्यवस्थापनाचे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने गुरू आहेत. स्वराज्य उभारणीसाठी केलेल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी नवीन विचार व आत्मविश्वास दिला.

यावेळी श्री. महेश कारंडे यांनी गीते व श्री. शहाजी साठे यांनी पोवाडा सादर केला. त्यांना शुभम ताठे व आदित्य केळकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर अहिवळे तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. तुकाराम डिंबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा काळ हा देशाचा पुनर्निमाण काळ – तेजस्वी सूर्या

पुणे, दि. २० फेब्रुवारी, २०२३ : भारताचा शेजारी पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या वाटेवर असून विदारक परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ सालापासून आपल्या देशाचा पुनर्निमाण काळ सुरू झाला आहे. अर्थसंकल्पातील अनेकविध तरतुदी, पायाभूत सोयीसुविधा, हरित ऊर्जेला देण्यात येत असलेले अनन्यसाधारण महत्त्व, २०१४ ते २०२३ दरम्यान दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा होत असलेला विकास हे याचेच द्योतक आहे. आपली पिढी ही खऱ्या अर्थाने याची साक्षीदार असून या काळात आपली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज पुण्यात केले.

शहरातील उद्योजकांशी तेजस्वी सूर्या यांनी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मरिएट येथे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढील २५ वर्षे ही देशनिर्माणाच्या या प्रक्रियेतील सुवर्णकाळ असणार असून आपली पिढी लवकरच देशाला ‘सुपर पॉवर’ झालेला पाहू शकेल, असा विश्वास देखील त्यांनी या वेळी व्यक्त केला. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना आणि केंद्र सरकारने केलेल्या कामावर प्रकाश टाकत सूर्या म्हणाले, “मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल हा मोदी सरकारच्या यशाचा गाभा असून त्यांनी अंगीकारलेल्या वित्तीय सुज्ञतेची दखल ही जगाने घेतली आहे. आमचे सरकार हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यापद्धतीने धोरणात्मक बदल करण्यावर भर देत आहे आणि म्हणूनच नजीकच्या भविष्यात आशादायी, सकारात्मक वृद्धीचे चित्र आपल्याला दिसेल.”

आज नागरिकांसोबतच देशातील अनेक राज्य सरकारांना खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे महत्त्व पटले असून, केंद्र अथवा राज्य सरकार हे केवळ सुविधा पुरविणारे ‘फॅसिलिटेटर’ आहेत याची त्यांना जाणीव झाली आहे. हा एक मोठा बदल असल्याचेही सूर्या यांनी या वेळी नमूद केले. २०११- १२ सालापर्यंत कोणतेही राज्य सरकार गुंतवणूकदारांच्या परिषदांचे आयोजन करीत नसत कारण त्यांना त्याचे महत्त्व माहित नव्हते. मात्र, आज परिस्थिती बदलली असून पंजाब, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केरळ सारखी राज्ये देखील अशा प्रकारच्या परिषदा भरवित आहेत, असेही सूर्या म्हणाले.      

प्रत्येक आठवड्याला देशात एक नवे विद्यापीठ स्थापन होत आहे. मागील ७० वर्षांत वाढल्या नाहीत एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयातील जागा मागील ८ वर्षांत केंद्र सरकारने प्रयत्नपूर्वक वाढविल्या आहेत. आजवर ७० वर्षांत देशात केवळ ७० विमानतळे उभारण्यात आली होती. मागील ८ वर्षांत आम्ही ७० विमानतळे उभारली आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार पायाभूत सुविधांची उभारणी, स्टार्ट अप्स, सुलभ व डिजिटल प्रक्रिया यांसारख्या अनेक गोष्टींकडे लक्ष देत असल्याचे सूर्या यांनी सांगितले.

लहानपणापासून स्वामी विवेकानंद यांच्या कार्याने प्रभावित होऊन सेवाभावी वृत्तीने मी राजकारणात सक्रीय झालो. हे काम अवघड असले तरी जनतेचे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी बहुमूल्य आहेत, असे सांगत तेजस्वी सूर्या म्हणाले की, मागील दीड वर्षांच्या काळात पक्षाच्या कार्यासाठी मी तब्बल २ लाख किमी इतका प्रवास केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे सांगण्याचा एकदा योग आला, तेव्हा तुझ्या वयाचा असताना याही पेक्षा जास्त प्रवास केला होता हे त्यांचे उत्तर ऐकून मी अवाक झालो, अशी आठवण देखील तेजस्वी यांनी सांगितली.    

भाजपाचे पक्षश्रेष्ठी दिवस रात्र, सुट्टी आणि इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अविरत कार्यरत असतात त्यामुळे सामान्य कार्यकर्ता आळशी असला तरी सक्रिय होतोच असेही सूर्या यांनी मिश्कीलपणे सांगितले. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तेजस्वी यांनी उत्तरे दिली. सोमेंदू कुबेर यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे आभार मानले.  

कसबापेठ मतदारसंघात 15 हजार 914 फोटो नसलेले मतदार

पुणे((PRAB))-कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची तब्बल 15 हजार 914 मतदारसंख्या असून या मतदारांच्या नावे बोगस मतदान होण्याची भीती राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे.       पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदारसंख्या असलेला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 75 हजार 428 इतकी आहे. 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार, 1 लाख 38 हजार 550 स्त्री मतदार आणि 5 तृतीयपंथी मतदार याप्रमाणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे.

       मतदारयादीत वय 80 च्या वरील मतदारांची संख्या 19 हजार असून जेष्ठ मतदारांना पोस्टल टपाली मतदानाचा अधिकार असून त्यासाठी अत्यल्प प्रतिसाद प्रशासनाला मिळाला त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची तब्बल 15 हजार 914 मतदारसंख्या असल्याने बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.       

कसबापेठ मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक होत आहे. धंगेकर विरुद्ध रासने अशी प्रमुख लढत मानली जात असल्याने अटीततटीत वैयक्तिक तुलनात्मक दृष्ट्या कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या नावाला मतदारसंघात पाठींबा व पसंती मिळत असल्याचे चित्र असल्याने भाजपकडून सदरील लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी पक्षीय असल्याचे स्पष्टीकरण द्यावे करावे लागत आहे. वैयक्तीक उमेदवारांच्या नावाऐवजी दोन राजकीय पक्षांची लढत असल्याचे बिंबवले जात आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तुलनेने जास्त असल्याने सदरील मतदारांच्या नावे अन्य कोणतीही असंबंधित व्यक्ती ती स्वतः मतदार आहे म्हणून मतदान बोगस करू शकते अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.        

मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची ४६८ पानांची यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये सदरील मतदारांची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघात मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण सरासरी 62 ते 70 टक्के मतदान होत असते.मात्र पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण तुलनेने अत्यल्प होत असते त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होत असतो. या मतदारसंघात चुरशीच्या निवडणुकीमुळे एकएका मताला महत्व असल्याने बोगस मतदानाची भीती व्यक्त केली जात आहे.        

मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची योग्य पडताळणी केल्याशिवाय मतदान करू देऊ नये अशाप्रकारच्या सूचना पोलिंग एजंटला देण्यात येणार असल्याचे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी म्हंटले आहे. ही निवडणूक खूप गांभीर्याने महाविकास आघाडी आणि भाजप युतीने घेतली असून भाजपने प्रदेश पातळीवरुन संपूर्ण राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारणीला कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार शोध मोहीमेसाठी कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिचयाचे मतदारांचा शोध घेण्याच्या सुचना राज्यभरातील जिल्हा तसेच मंडळ कार्यकारणीला देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून किमान काही प्रमाणात अर्ज भरुन दिले जावेत असा फतवा काढण्यात आला असून परिचयाच्या मतदारांशी स्वत: संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.      

 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्र आहेत यामधील 30 मतदान केंद्रावर प्रत्येक निवडणुकीत अत्यल्प मतदान होत असते. एकूण मतदारसंख्येतील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची 15 हजार 914 मतदारसंख्या तर 80 वयापेक्षा जास्त वय असणारे 19 हजार मतदार असून त्यांनी टपाली मतदानास प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे या 34 हजार 914 मतदारांचे मतदानाला फार महाते आलेले आहे. 2 लाख 75 हजार 428 एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत सरासरी कमाल 60 टक्के मतदान झाले तर 1 लाख 65 हजार 256 इतके मतदान होऊ शकते तर किमान 40 टक्के मतदान झाले तर 1 लाख 10 हजार 171 इतके मतदान होऊ शकते.          

कमी मतदान झाल्यावर कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसणार हे सर्व जाणून आहेत. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढवणे देखील आवश्यक आहे. प्रमुख पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना पालिका निवडणुकीत त्यांच्या प्रभागात हमखास मतदान देखील काही प्रमाणात होत असते त्यातुलनेत 40 टक्के मतदान झाल्यास विजयी उमेदवाराच्या मताधिक्यावर परिणाम होणार आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली असून वरिष्ठ नेते राजकीय प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले आहेत यावरूनच या निवडणुकीतील चुरस किती आहे हे मतदारांना दिसून येत आहे.

   

१५ कसबा पेठ मतदारसंघ– मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची यादी- खालील लिंकवर पहा-:https://cdn.s3waas.gov.in/s3ffeabd223de0d4eacb9a3e6e53e5448d/uploads/2021/07/2021070548.pdf

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे,दि.२० :- जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भेट दिली. माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी आरती भोसले, माध्यम संनियंत्रण समन्वयक डॉ.पुरुषेात्तम पाटोदकर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.किरण मोघे, निवडणूक तहसीलदार रुपाली रेडेकर, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.

माध्यम कक्षाद्वारे पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे आदींवरील निवडणूक विषयक मजकूर, विविध माध्यमातील निवडणूक विषयक वृत्तांच्या नोंदी, निवडणूक विषयक बातम्यांना मिळालेली प्रसिद्धी, समाज माध्यमातील निवडणूक विषयक मजकूर आदींचे श्री.देशपांडे यांनी अवलोकन केले आणि त्याविषयी माहिती घेतली.

इलेक्ट्रॉनिक माध्यमामधील निवडणूक विषयक मजकूरावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या यंत्रणेची त्यांनी पाहणी केली व त्याविषयी समाधान व्यक्त केले. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमार्फत प्रमाणिकरण करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती यावेळी डॉ.पाटोदकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. प्रसृत करण्यात आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रातून मिळालेली प्रसिद्धी याची माहिती डॉ.मोघे यांनी दिली. माध्यम कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
000