पाचही वर्षे धरणे हाउसफुल्ल पण पुण्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी दैना …
पुणे – महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे, येत्या गुरूवारी ( दि. 23 ) रोजी कसबा विधानसभा मतदारसंघात पाणी पुरवठा बंद असणार आहे.या शिवाय, वारजे आणि रामेटेकडी तसेच स्वारगेट आणि परिसरातही पाणी बंद असणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( दि.24) रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणी बंद असलेला भाग –
पर्वती एलएलआर टाकी दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ. बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर:- वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम , साळुंखे विहार रोड.
वारजे जलशुध्दीकरण प्रकल्प –
अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर. कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.
जुना होळकर जलशुद्धीकरण – एचई फॅक्टरी, एमईएस
रामटेकडी परिसर :- ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा आणि परिसर