Home Blog Page 1401

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजना याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

अमृत संस्थेचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, यासाठी व्यवस्थापकीय संचालक या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाव्यतिरिक्त उर्वरित मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावे. संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी उद्योग, व्यवसाय, नोकरी, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविण्यात याव्यात. यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन, कौशल्य विकासाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देणे, आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार प्रोत्साहन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविणे तसेच कृषिपूरक उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण व इतर विभागाच्या योजनांशी रुपांतरण करुन योजना राबविण्यात याव्यात, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, नियोजन विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, कामगार विभागाचे उपसचिव दीपक पोकळे, कामगार विभागाचे श्रीराम गवई, उदय लोकापाली यावेळी उपस्थित होते.

महागाई , बेरोजगारीने हैराण देशाच्या परिस्थितीबद्दल हिंदू महासंघ विचारणार पंतप्रधानांना जाब !

१३ ऑगस्ट रोजी हिंदू महासंघाची पहिली जाहीर सभा
पुणे :
देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,वाढलेले कर्ज,बेरोजगारी, प्रत्येक पावलावर देशाचा होणारा अपमान,अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रातील  राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी हिंदू महासंघाने  पुण्यात  जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
दि.रविवार,दि.१३ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कुल(टिळक रस्ता,पुणे)च्या गणेश सभागृहात  सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे.हिंदू महासंघाची ही पहिलीच जाहीर सभा आहे.हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे हे या जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत.हिंदू महासंघाने आज प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

देशाची मान खाली जात आहे… 

 ‘मै देश झुकने नही दूंगा,बिकने नही दूंगा’ असे सद्याच्या राज्यकर्त्यांनी सांगितले होते.पण, देश प्रत्येक पावलावर देशाला मान खाली घालायला लागली आहे.देश बदलायला म्हणून आले  होते आणि स्वतःच बदलले.आता राज्यकर्ते  बुलेट ट्रेन, १५ लाख, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पादन,नवीन कॉलेजेस,स्मार्ट सिटी, घसरता रुपया,पेट्रोलचे भाव,२ कोटी नोकऱ्यां यावर बोलत नाहीत.काश्मीर,चीन,पंजाब,अमेरिका,कैराणा,मेवात,हिमाचल,दिल्ली प्रत्येक पावलावर या राज्यकर्त्यांनी देशाचा अपमान केला आहे. हिंदूची मान खाली जात आहे,देशाची शान जात आहे.अशा परिस्थितीत जाब विचारण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
नुकतीच काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावरून हिंदू महासंघाने भाजपला आणि मोदी सरकारला पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत धारेवर धरले होते.या पत्रकार परिषदेला युथ ऑफ पनून काश्मीर’ संघटनेचे अध्यक्ष राजेश कौल खासकरून उपस्थित होते.याच परिषदेत १३ ऑगस्ट ला होणाऱ्या मेळाव्याची आणि जाहीर सभेची घोषणा करण्यात आली होती.त्यामुळे पुण्यात सभेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.   
हिंदू महासंघाच्या वतीने संस्थापक आनंद दवे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारीने निवडणूक लढवली होती.भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभवही झाला होता. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केलेली असताना हिंदुत्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यावर होणारी हिंदू महासंघाची सभा महत्वपूर्ण मानली जात आहे. 

कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता-यशवंतभाऊ भोसले यांचे प्रतिपादन

कामगारांना सशक्त बनवणाऱ्या कायद्यांसाठी प्रयत्नशील

पुणे : “कामगार हा कंपनीचा कणा असतो. देशाच्या प्रगतीसाठी उद्योग चालवले जात असतील, तर कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. कामगार कायद्यांमधील बदल, खाजगीकरण यामुळे कामगार देशोधडीला लागत आहे. अनेक कंपन्या वेतन देताना, करार करताना कामगारांची पिळवणूक करत आहेत. त्यामुळे कामगारांना सशक्त बनवणारे कामगार कायदे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले. कामगार चळवळ अधिक सक्षम व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या ५२ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात भोसले होते. डहाणूकर कॉलनीतील युनियनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत खुरपे होते. यावेळी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे प्लांट हेड राजेंद्र कुलकर्णी, संचालक (एचआर) अजित तलरेजा, प्रमुख (एचआर) शिवांभर सिंग, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, उपाध्यक्ष बापू सरोदे, डॉ. दत्ता कोहिनकर आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त, २५ वर्षे सेवा बाजवलेल्या आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “खाजगीकरणामुळे २००४ मध्ये किर्लोस्कर कमिन्समध्ये २२०० कामगार कायमस्वरूपी तत्वावर होते. आज केवळ ४९५ कामगार या सेवेत आहेत. कामगारांच्या मुलांना सेवेत सामावून घ्यावे. महागाई वाढली, पण पगार जेमतेम असल्याने गरीब व श्रीमंत दरी वाढली. ही स्थिती अशीच राहिली, तर समाजात स्तोम माजेल. किर्लोस्कर कमिन्स कंपनीला मोठा इतिहास, परंपरा आहे. त्यानुसार कामगारांचे हित जपण्याला कंपनीने प्राधान्य द्यावे आणि कामगारांच्या कराराचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.”
“कामगारवर्गाला गुलामगिरीच्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. कामगारांना दिलेले स्वातंत्र्य, हक्क अबाधित ठेवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. मालक, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील समन्वय व सौहार्दाचे वातावरण सर्वांसाठी पोषक असते. त्यामुळे कामगारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना चांगल्या सोयीसुविधा, वेतन कंपन्यांकडून मिळाले पाहिजे,” असेही भोसले यांनी नमूद केले. भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंपनीचे प्लांट हेड कुलकर्णी व एचआर संचालक अजित तलरेजा यांनी येत्या १५ दिवसांत करार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 
श्रीकांत खुरपे म्हणाले, “कामगारांच्या हितासाठी संघटन महत्त्वपूर्ण असते. व्यवस्थापन व कामगार यांच्यात सौहार्द राहावे यासाठी युनियन गरजेची आहे. दोन्ही बाजूनी पारदर्शीपणा व प्रामाणिकपणा जपायला हवा. कामगारांचा आणि कंपनीचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्यासाठी परस्परांना साथ देण्याची आवश्यकता आहे.”
महेंद्र बालवडकर म्हणाले, “वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ३०७ कामगारांनी रक्तदान केले. सेवानिवृत्त कामगार, सेवेची २५ वर्षे पूर्ण केलेले कामगार व विशेष प्राविण्य मिळवलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. कामगार व कंपनी यांच्यातील करार लवकरात लवकर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
अधिक तलरेजा म्हणाले, “या प्लांटमध्ये चांगले वातावरण आहे. आधुनिकीकरण आले, तरी येथील संस्कृती टिकून आहे. कामगारांमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे. ६२ वर्षात कंपनीच्या यशात कामगारांचे महत्त्व आहे. युनियनने सामाजिक दायित्व जपले आहे, ही आनंदाची बाब आहे. नवे तंत्र आले तर कामगारांचे महत्त्वाचे कमी होणार नाही.”

नीलेश कथोरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय भिलारे यांनी आभार मानले.

संसदेतील फ्लाईंग किस प्रकरणी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधींविरोधात आंदोलन

‘राहुल गांधी माफी मांगो’ अश्या घोषणांनी मंत्रालय परिसर दुमदुमला

मुंबई
‘राहुल गांधी हाय हाय, महिलांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो, महिलांओ का ये अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘राहुल गांधी माफी मांगो’ अश्या घोषणा देत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने संसदेत फ्लाईंग किस केल्याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर यांच्या नेतृत्वात मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्याजवळ आज भव्य आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे की, रोड रोमिओ आणि त्यांच्यात काहीही फरक नाही. त्यांनी देशातील महिलांची माफी मागावी अशी तीव्र भावना
भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. मोर्चात शेकडो महिला निषेधाचे बॅनर घेवुन सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधींच्या विरोधातील घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून गेला. या आंदोलनात स्वप्ना म्हात्रे, शलाका साळवी, बिंदू त्रिवेदी, श्रीकला पिल्ले, राजेश्री शिरवडकर, समिता कांबळे, रिटा मकवाना यांच्यासह भाजपा महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मुंबई भाजपाच्या वतीने मंगळागौर स्पर्धा:पहिले बक्षिस ३ लाख ५१ हजार तर दुसरे बक्षिस २ लाख ११ हजार

  • मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट, सायंकाळी ६ वा. पर्यंत

मुंबई-
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेत आधुनिकतेसोबत परंपरेचा सुरेख गोफ विणणाऱ्या मंगळागौर स्पर्धेचे भव्य आयोजन मुंबई भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे, अशी घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील एकमेव भव्य आयोजनाच्या स्पर्धेत महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.

यावेळी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, भाजप हा पक्ष हिंदू सण जोपासणारा, वाढवणारा पक्ष आहे. तो आमचा आत्‍मा आहे. याच अनुषंगाने रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून सख्यांसोबत खेळ, गाणी आणि गप्पा याचा आनंद महिलांना घेता यावा हाच या मागचा हेतू आहे. महिलांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविता यावे यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत याकरिता हा उपक्रम घेण्यात येत आहे असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा महाराष्ट्र महिला अध्यक्ष चित्राताई वाघ, आ. मनिषाताई चौधरी, आ. भारतीताई लव्हेकर, आ. विद्याताई ठाकूर भाजपा मुंबई महिला अध्यक्ष शितल गंभीर, सरचिटणीस रितू तावडे, राजेश्री शिरवडकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.

स्पर्धेसाठी अटी आणि नियम

एका गटात जास्तीत जास्त १४ महिला स्पर्धकांचा सहभाग असेल. सादरीकरणासाठी प्रत्येक गटाला १० ते १२ मिनिटे मिळतील. मिनिटाच्या आत सादरीकरण केल्यास बोनस गुण दिले जातील. स्पर्धेसाठी मराठी पारंपारिक वेशभूषा अनिवार्य आहे. स्क्रीनिंग राऊंड १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत होईल तर अंतिम फेरी ३ सप्टेंबर २०२३ रोजी होईल.अधिक माहितीसाठी 8591244742 या क्रमांकावर संपर्क करावा. ऑनलाइन नोंदणी करता https://forms.gle/JPUWJ1c8poPU1HZr9 या लिंकवर जावून गुगल फॉर्म भरावा.

फ्लाइंग कीस वर आक्रमक होणाऱ्या स्मृती इराणी मणिपूरमध्ये अत्याचार होताना काय करत होत्या .. सुषमा अंधारे

राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपाच्या महिला खासदारांकडे पाहून फ्लाइंग किस केल्याचा आरोप करत भाजपासह एनडीएतील खासदारांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. एकीकडे मणिपूर प्रश्नावरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत असताना राहुल गांधींच्या कथित फ्लाइंग किसचा उल्लेख करत भाजपा काँग्रेसवर टीका करत आहे. राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका करण्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आघाडीवर आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा हा भाजपामधल्यात लोकांचा स्थायी भाव आहे. स्मृती इराणी या तशाच आक्रस्ताळेपणाने काम करत आहेत. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस केलं म्हणत इराणी यांनी त्याचा घाणेरडा, गलिच्छ आणि विकृत अर्थ काढला. त्यामुळे आम्हाला त्यांची कीव कराविशी वाटते. ज्या पद्धतीने त्या आक्रमक होत आहेत ते पाहून वाटतं की, इतक्या दिवसांत त्या मणिपूरप्रश्नी अशा आक्रमक का झाल्या नाहीत. अशा आक्रमक होत त्यांनी मणिपूरप्रश्नी प्रश्न उपस्थित केले असते तर आज विरोधकांवर अविश्वास प्रस्ताव आणायची वेळ आली नसती. तुम्ही तब्बल ८० दिवस मूग गिळून गप्प बसलात. अविश्वास ठरावाची वेळ आली तेव्हा तुम्हाला उपरती सुचते हे सगळं चमत्कारिक आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाला त्यांच्या निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यावरून प्रश्न विचारायला हवेत. ज्या गोष्टींचा जाहिरनामा यांनी निवडणुकीआधी प्रसिद्ध केला होता, त्यावर भाजपाने लोकसभेत बोलणं अपेक्षित आहे. स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर याच स्मृती इराणी किती आक्रमक झाल्या होत्या, ते आपण पाहिलंच आहे.

अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा-उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10 :- राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागांनी नियोजनबद्ध काम करुन करसंकलन वाढवावे. अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावलं पुढं राहून काम करावं. त्यासाठी महसुलवाढीच्या नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित महसुलवाढीसंदर्भातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला तसेच राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, ऊर्जा, उद्योग, महसुल विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधीतांना महसूलवाढीसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले. करसंकलनात वाढ करण्यासाठी आलेल्या सूचना तसेच उपाययोजनांचा अभ्यास करुन शिफारस करण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात यावी, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उद्योग (खनिकर्म) विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, राज्य कर आयुक्त राजीव मित्तल, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैला ए., राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, नोंदणी महानिरिक्षक हिरालाल सोनावणे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी महसुलवाढ आवश्यक आहे. मात्र, याचा बोझा नागरिकांवर न टाकता करचोरी रोखून महसुलवाढीवर भर देण्यात यावा. राज्याला महसुल मिळवून देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच कार्यालयात करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. करदात्यांची गैरसोय दूर करावी. परिवहन विभागाने वाहनचालक परवाना देण्याच्या कार्यप्रणालीतील उणीवा दूर कराव्यात. चुकीच्या पद्धतीनं वाहनचालक परवाना दिल्याने अपघात होतात. हे रोखण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात वाहन चाचणी तसेच चालक परीक्षा घेण्यासाठी अद्ययावत यंत्रणा विकसित करण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. ही बाब परीक्षार्थींवर अन्याय करणारी असून एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पाचशेहून अधिक रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास, सुधारणा, सुशोभिकरणाची मोहिम सुरु केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील एसटी स्थानकांचा पुनर्विकास केला जावा आणि पहिल्या टप्यात किमान 50 एसटी स्थानकांचे सुशोभिकरण करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर मतदान, राष्ट्रवादीचे 2 व्हीप; 1 समर्थनार्थ, दुसरा विरोधात,

मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. तसेच यावर लगेचच मतदान हाईल. या मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपल्या खासदारांना व्हीप जारी केले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील दोन व्हीप जारी केले आहेत.

यात शरद पवार गटाकडून एक तर अजित पवार गटाकडून दुसरा व्हीप जारी करण्यात आला आहे. यातील एका व्हीपमध्ये प्रस्तावाचे समर्थन तर एका व्हीप मध्ये प्रस्तावाला विरोध करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लोकसभेत काय होणार? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अविश्वास प्रस्तावार मतदान करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर सर्व पक्षांनी व्हीप जारी केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी तर अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे यांनी व्हीप जारी केला आहे. यात अजित पवार गटातून तटकरे हे एकमेव सदस्य आहेत. तर शरद पवार गटात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल हे चार सदस्य आहेत.

एकमेकांच्या विरोधात व्हीप

शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांविरोधात हे व्हीप जारी करण्यात आले आहे. मात्र, यातील अधिकृत व्हीप कोणता या बाबतचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत. मात्र, त्या आधीच दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येत आहे.

गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. मात्र, या व्हीपमुळे दोन्ही गटाकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

शासनाच्या नियमानुसार फूड पॅकेजिंग हवे : दिलीप संगत

‘एमएफडीए’च्या ‘ चर्चासत्रात पॅकेजिंगचे महत्व यावर मार्गदर्शन

पुणे दि.
आपल्या प्रॉडक्टचे दमदार मार्केटिंग होण्यासाठी त्याचे पॅकिंगही शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून तेवढेच आकर्षक पाहिजे. कारण उत्तम पॅकिंग केलेल्या प्रॉडक्टसला ग्राहकांकडून जशी वाढती मागणी आहे. तशी व्यवसाय वाढीसाठी ‘फॉसकॉस – एफएसएसएआय’ च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रॉडक्टबद्दलची इत्यंभूत माहिती पॅकिंग आणि लेबलवर देणे आता व्यावसायिकांना अनिवार्य आहे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सहआयुक्त दिलीप संगत यांनी केले.
मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशन, पुणेतर्फे आयोजित ‘जाणून घ्या पॅकेजिंगचे महत्व’ याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे यांच्यासह फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी, मधुरा पाटणकर, असोसिएशनचे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी,केदार चितळे, योगेश अगरवाल,सचिन गाडवे,दिलीप बुधानी,अमित अग्रवाल,प्रशांत डाटा,दिनेश अगरवाल,मकरंद गाडवे, कैलास झंवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिलीप संगत यांनी ‘फॉसकॉस – एफएसएसएआय ‘बाबत तसेच परवाना/नोंदणी, अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी कायदयाचे पालन किती महत्वाचे आहे याकडे लक्ष वेधले. प्रॉडक्ट पॅकिंग , लेबलवर कुठल्याही परिस्थितीत ग्राहकांची दिशाभूल करणारा मजकूर अजिबात नसावा. असे स्पष्ट करून दिलीप संगत म्हणाले, अन्न पदार्थ कोणता, घटक पदार्थ काय , पोषक तत्व, किती ऊर्जा, फॅट्स तसेच शाकाहारी , मांसाहारी अन्नपदार्थ याचे चिन्ह,वजन, बॅच, लॉट नंबर, उत्पादन तारीख,पदार्थ वापरण्याची अंतिम मुदत यासह जे जे नियम शासनाने दिलेले आहेत.त्यानुसार प्रॉडक्टचे पॅकेजिंग असणे बंधनकारक असून त्यावर कस्टमर केअर क्रमांकही नमूद असावा, असेही ते म्हणाले. तर फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी यांनी फुड प्रोसेसिंग, क्वालिटी, फॅट्स,स्टॅंडर्ड, लॅब तपासणी यासह पॅकिंगबाबत शासनाची नियमावली व एफएसएसएआयचा नवा कायदा यावर सविस्तर माहिती दिली. मधुरा पाटणकर यांनी फूड पॅकेजिंग आणि लेबलिंग यावर मार्गदर्शन करताना ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. पॅकेजिंगचे विविध प्रकार, त्यांची मानांकने , पॅकेजिंग मटेरियल, वाहतुक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे यांनी व्यवसाय वाढवायचा असेल तर ब्रॅण्डिंग, पॅकेजिंगसाठी अपडेट राहणे आवश्यक आहे. तरच भारतीय बाजारपेठांमध्ये परदेशी कंपन्यांचा शिरकाव रोखला जाईल. असे नमूद केले. यावेळी सुरेंद्र नाशिककर, अमित गुरव यांनीही अन्न पदार्थांची प्रयोगशाळा चाचणी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित चौधरी, ऋषभ बुधानी, भरत पुरोहित यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव अमित अग्रवाल यांनी केले तर मकरंद गाडवे यांनी आभार मानले.

महाज्योती तर्फे पीएचडी संशोधकांना २४ कोटी रुपयांची अधिछात्रवृत्ती वितरीत

पुणे, दि. १० : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी सन २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि सन २०२२ मध्ये निवड झालेल्या १ हजार २३६ विद्यार्थ्यांना एकूण २४ कोटी १७ लाख ८७ हजार ७४९ रुपये इतकी इतकी अधिछात्रवृत्ती वितरित करण्यात आल्याची माहिती महाज्योतीने दिली आहे.

लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा या हेतूने महाज्योतीतर्फे पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती सोबत घारभाडे व आकस्मिक निधी देखील देण्यात येतो. अधिछात्रवृत्तीमुळे निश्चिंत होऊन संशोधनाचे कार्य करता येत असून संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ खरेदी, अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात.

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. योजनेच्या शर्तीनुसार नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतात. पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संशोधन कार्यात करिअर घडविण्याचे आवाहनही महाज्योतीतर्फे प्रकल्प व्यवस्थापकांनी केले आहे.
0000

जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. 10: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे, नोकरीविषयक वेतन, भत्ते, निवृत्तीबाबतचे लाभ तसेच जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली महसूलविषयक प्रकरणे, तसेच अन्य दिवाणी प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व महानगरपालिका, नगरपरिषदा यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.

लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. लोकन्यायालयातील निवाड्यावर अपील नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस. पाटील यांनी केले आहे.
000

स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

पुणे दि.१०: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी ८ वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

महात्मा गांधींच्या पणतूंंना प्रत्यक्षात पुण्याच्या पोलीस ठाण्यात जावे लागले ..पण संभाजी भिडेंवर अद्याप कारवाई नाहीच ..

 संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, तुषार गांधींची डेक्कन पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार

पुणे : पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली.मागील काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली. यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अ‍ॅड. असीम सरोदे, अन्वर राजन हेदेखील उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी यापूर्वी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दलदेखील विधान केले. पण आता महात्मा गांधी यांच्या आईबद्दल केलेले विधान ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे. त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी कडक पावलं उचलू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे.

“तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कडक शब्दात सांगितलं आहे की या तक्रारीची दखल घेऊन तपास करु योग्य कारवाई करु. न्यायावर आमचा विश्वास आहे. मात्र त्यांचे पाय कोणी बांधून ठेवले आहेत का?, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. त्यामुळे न्यायालयाच्या दरवाज्यात जाण्यासाठीची पहिली पायरी तक्रार देऊन ओलांडली आहे,” असं तुषार गांधी म्हणाले.

गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेआब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेआब्रू आहे. त्यामुळे बेआब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलं आहे. एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचं. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.

एपीएल अपोलोच्या एसजी स्पोर्ट्सने सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये एक फ्रंचाईझी टीम संपादित केली

·        

या संघाचे नाव एसजी स्पीड रेसर्स (SG Speed Racers) असेल आणि हा संघ दिल्लीचा असेल.

·        भारतातील क्रीडा चैतन्याला उत्तेजन देणे आणि उभरत्या खेळाडूंना जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे एसजी स्पोर्ट्सचे (SG Sports) ध्येय आहे.

·        ऑक्टोबर २०२३ मध्ये चालू होणाऱ्या लीगच्या या पदार्पणाच्या म्हणजेच पहिल्या हंगामात टीम एसजी स्पीड रेसर्स (SG Speed Racers) सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी लढेल.

पुणेऑगस्ट १०२०२३: बुद्धीबळापासून ते आता रेसिंगपर्यंत; एपीएल अपोलोचे (APL Apollo) एसजी स्पोर्ट्स (SG Sports)पुन्हा एकदा एका दुसऱ्या लीगला हलवून टाकण्यासाठी सज्ज झाले आहे. यावेळी ते हृदयाचे ठोके वाढवणारे, खऱ्या खुऱ्या अॅक्शननी आणि तीव्र स्पर्धेने भरलेले असेल. टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगमध्ये एसजी अल्पाइन वॉरिअर्स या संघाच्या फ्रँचाइझीच्या अनोख्या अनुभवानंतर आता एसजी स्पोर्ट्सने (SG Sports)सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये (CISRL) एसजी स्पीड रेसर्सच्या (SG Speed Racers)फ्रेंचाइझीसह एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (FMSCI) च्या सहभागीदारीने ही लीग चालू होत आहे. ही भारतातील पहिली फ्रँचाइझीवर आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग आहे, जी जगभरातील चालकांना वेगवेगळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या श्रेणीमध्ये स्पर्धा करण्यासाठी एकत्र आणत  आहे.

          एपीएल अपोलो (APL Apollo) हे देशातील अग्रणी असे क्रमांक एकचे स्ट्रक्चरल स्टील ट्यूबिंग ब्रॅंड असून त्यांचा देशांतर्गत बाजारपेठेतील बाजारहिस्सा जवळपास ५५% आहे. आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटलची सलग तीन वर्षे मुख्य प्रायोजक असल्यामुळे एपीएल अपोलो (APL Apollo) दीर्घ काळापासून क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे.

          एपीएल अपोलो समूहाचे (APL Apollo) प्रमुख व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संजय गुप्ता यांना खेळाची प्रचंड आवड आहे. येत्या काही वर्षात क्रीडा क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड शक्यता असल्या त्यांचा अंदाज आहे. नवोदित उभरत्या खेळाडूंनी पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी एक मजबूत व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करवून भारतातील क्रीडा जगतामध्ये क्रांती आणणे ही एसजी स्पोर्ट्सची (SG Sports) स्वप्नदृष्टी आहे. 

ब्रँडिंग अॅक्टिव्हिटी आणि जागतिक एक्सपोजर यांच्या माध्यमातून भारतीय क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू यांच्या क्षमता वाढवण्यावर कंपनीचा विश्वास आहे.

          यावेळी बोलताना एपीएल अपोलो समूहाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संजय गुप्ता म्हणाले, सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमधील (CISRLएका संघाच्या संपादनासह आम्ही सुपरक्रॉसच्या रोमांचकारी जगात प्रवेश करत असल्याने आजचा दिवस म्हणजे एसजी स्पोर्ट्ससाठी (SG Sports) एक महत्त्वाचा व रोमांचकारी असा टप्पा आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणण्याचा आमचा वारसा आम्हाला सुपरक्रॉसला संपूर्ण भारतभर विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करून चालना देत आहे. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा आणि एफएमएससीआय (FMSCI) च्या अढळ पाठिंब्याच्या बळावर आम्ही जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील अश्या उत्कृष्ट व प्रतिभावान चालकांची एक नवीन पिढीच जोपासण्याचे स्वप्न पाहत आहोत. ही संधी दिल्याबद्दल आम्ही सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे (CISRLआभारी आहोत. भारतातील सुपरक्रॉसच्या विकासाचा वेग वाढवण्याची आणि जो जगभरात एक मानक ठरेल आणि जतन केला जाईल असा कायमस्वरूपी क्रीडा वारसा ठेवण्याची आम्ही आकांक्षा करतो.

          एसजी स्पोर्ट्स (SG Sports) सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा(CISRL)एक भाग बनल्याबद्दल आनंद व उत्साह व्यक्त करताना सुपरक्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक आणि संचालक श्री. वीर पटेल म्हणाले, सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसोबत (CISRL) एसजी स्पोर्ट्स ची भागीदारी जाहीर करताना आम्ही आनंदी व रोमांचित झालो आहोत. एपीएल अपोलो समूहाची एक धोरणात्मक शाखा म्हणून एसजी स्पोर्ट्स (SG Sports) क्रीडा उद्योग क्षेत्रावर लक्षणीय प्रभाव पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला विश्वास आहे कीही भागीदारी सुपर क्रॉस रेसिंगच्या परिसंस्थेला अजून समृद्ध करेल आणि देशभरातील लाखो युवा खेळाडूंना प्रेरणा देईल.

          सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा (CISRL)पहिला म्हणजेच उद्घाटनीय हंगाम ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होण्यासाठी सज्ज आहे. या चैतन्यपूर्ण, ऊर्जावान व शक्तिशाली रेसिंग लीगमध्ये सर्वोत्तम सन्मान मिळविण्यासाठी आठ टीम फ्रँचायझी जोमाने तयारी करीत आहेत. ही लीग श्वास रोखून ठेवणारे चित्त थरारक कौशल्यांचे प्रदर्शन, तीव्र स्पर्धा आणि उत्साहवर्धक अॅक्शन्स अनुभवेल; जे संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना आणि क्रीडाप्रेमींना भुरळ घालतील.

          एसजी स्पोर्ट्सच्या (SG Sports) सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमधील (CISRL)समावेशाबाबत भाष्य करताना एफएमएससीआयच्या सुपरक्रॉस रेसिंग कमिशनचे चेअरमन श्री. सुजीत कुमार म्हणाले, “एसजी स्पोर्ट्स (SG Sports) ही सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमधील (CISRL)एक उल्लेखनीय जोड आहे. एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेडनी सिएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसोबत (CISRL) केलेली ही भागीदारी आपल्या देशातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या त्यांच्या अढळ वचनबद्धतेलाच दर्शवते. खेळांचे संवर्धन करून लाखो तरुणांना त्यात समाविष्ट करून घेण्याची त्यांची स्वप्नदृष्टी ही आपल्या देशातील सुपरक्रॉसच्या विकासाच्या आमच्या मिशनशी सुसंगत आहे. आम्ही एसजी स्पोर्ट्सचे मनापासून स्वागत करतो आणि रेसिंग ट्रॅक वरील त्यांच्या आकर्षक कामगिरीचे साक्षीदार होण्याची आतुरतेने आकांक्षा करतो.”

मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर आता दररोज शिवविचारांचा जागर

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी –कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली.गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.