- मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट, सायंकाळी ६ वा. पर्यंत
मुंबई-
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेत आधुनिकतेसोबत परंपरेचा सुरेख गोफ विणणाऱ्या मंगळागौर स्पर्धेचे भव्य आयोजन मुंबई भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे, अशी घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील एकमेव भव्य आयोजनाच्या स्पर्धेत महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
यावेळी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, भाजप हा पक्ष हिंदू सण जोपासणारा, वाढवणारा पक्ष आहे. तो आमचा आत्मा आहे. याच अनुषंगाने रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून सख्यांसोबत खेळ, गाणी आणि गप्पा याचा आनंद महिलांना घेता यावा हाच या मागचा हेतू आहे. महिलांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविता यावे यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत याकरिता हा उपक्रम घेण्यात येत आहे असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा महाराष्ट्र महिला अध्यक्ष चित्राताई वाघ, आ. मनिषाताई चौधरी, आ. भारतीताई लव्हेकर, आ. विद्याताई ठाकूर भाजपा मुंबई महिला अध्यक्ष शितल गंभीर, सरचिटणीस रितू तावडे, राजेश्री शिरवडकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.
स्पर्धेसाठी अटी आणि नियम
एका गटात जास्तीत जास्त १४ महिला स्पर्धकांचा सहभाग असेल. सादरीकरणासाठी प्रत्येक गटाला १० ते १२ मिनिटे मिळतील. मिनिटाच्या आत सादरीकरण केल्यास बोनस गुण दिले जातील. स्पर्धेसाठी मराठी पारंपारिक वेशभूषा अनिवार्य आहे. स्क्रीनिंग राऊंड १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत होईल तर अंतिम फेरी ३ सप्टेंबर २०२३ रोजी होईल.अधिक माहितीसाठी 8591244742 या क्रमांकावर संपर्क करावा. ऑनलाइन नोंदणी करता https://forms.gle/JPUWJ1c8poPU1HZr9 या लिंकवर जावून गुगल फॉर्म भरावा.