Home Blog Page 1397

तळागाळातील माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

औरंगाबाद, दि.13- गरिबांच्या कल्याणासाठी राज्यातील हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन समारंभास ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय  अर्थराज्यमंत्री  डॉ. भागवत कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ राठोड, संजय शिरसाठ, प्रशांत बंब, नारायण कुचे आदी उपस्थित होते.

प्रारंभी शिबिरासाठी उपस्थित सर्व तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, शिबिरासाठी सहकार्य करणारे शासकीय अधिकारी, संस्था यांचा श्री.फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

श्री.फडणवीस म्हणाले की, महाआरोग्य आरोग्य शिबीर सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी व उपचार मोफत करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली हा एक उच्चांक आहे. या शिबिरासाठी विविध दानशूर व्यक्ती,संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या  किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. सर्व देशवासियांना कोविडची लस मोफत देण्यात आली.  देशात अडीच लाख ‘वेलनेस सेंटर’च्या माध्यमातून गरीब लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळते. वयोश्री योजनेतून वयोवृद्धांना उपचार व सहाय्य साहित्य मोफत दिले जाणार आहे. राज्य शासनानेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना उपचार मिळणार आहेत. आता ही योजना राज्यातील 12 कोटी जनतेला लागू असणार आहे.  आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. उर्वरीत तीन लवकरच सुरु होतील, असे श्री.फडणवीस सांगितले.

महाआरोग्य शिबिरात आज तपासणी व उपचार होणाऱ्या रुग्णांना ते पूर्ण बरे होईपर्यंत उपचार, औषधी व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया इ. सगळे उपचार मोफत दिले जातील, असे सांगून त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही केली.

देशाच्या आरोग्य सुविधांच्या बजेटमध्ये सहापटीने वाढ- डॉ. भागवत कराड

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे. आयुष्मान भारत सारख्या योजनेतून देशातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्यात ग्रामीण अथवा शहरी असा भेदभाव नाही, साऱ्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गरीब कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर व्हावेत- गिरीष महाजन

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, गरीब कुटूंबातील हुशार विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी शासनाने उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यात 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली आहेत. या महाविद्यालयातून हुशार, गरीब विद्यार्थी डॉक्टर व्हावेत. त्यांनी डॉक्टर होऊन समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा करावी.

ते पुढे म्हणाले की, गरीब,गरजू नागरिकांना महाआरोग्य शिबिरातुन लाभ होणार आहे. मोफत मार्गदर्शन आणि वैद्यकीय उपचारातून आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. अधिकारी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी होत आहे.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व अधिकाधिक रुग्णांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ होईल. या संधीबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी केले. रामेश्वर नाईक यांनीही या आयोजनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिरिष बोराळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून पुण्यात ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक – उद्योग मंत्री  उदय सामंत

मुंबई,: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री श्री. सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. द. कोरीयामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूह सुद्धा पुण्यात 475 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.  कंपनीच्या हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला होता, द. कोरीयाच्या  दौऱ्यातील बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनीअम झाकणीचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी 5 एकर जागेची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. त्यामुळे या प्रकल्पास चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या एल.जी कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचे सांगितले असून कंपनी जवळपास 900 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.  जे उत्पादन कोरीयात होते, असे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

भारतात 4 डोअर फ्रीजचे उत्पादन, ट्रान्सफरन्ट दूरचित्रवाणी संच, फोल्डेबल टिव्हीचे सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याची विनंती सॅमसंग कंपनीला करण्यात आली आहे, तसेच डिसेंबर महिन्यात कॉस्मेटीक उद्योजकांचे मंडळ भारतात भेट देणार असून लॅकमे कंपनी राज्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. असे सांगून मंत्री श्री. सामंत म्हणाले द.कोरीया देशाचा दौरा यशस्वी झाला असून आघाडीच्या कंपन्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत.  तेथील उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील जे नागरीक द. कोरीयात आहेत, त्यांना राज्यात गुंतवणूक करायची असेल, तर अशा उद्योजकांना नवीन सवलती देण्यात येतील, राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असून विदेशी गुंतवणूक राज्यात होत आहे.

यावर्षीपासून राज्यात राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार

यावर्षीपासून राज्यात उद्योगरत्न, उद्योग मित्र, मराठी उद्योजक व महिला उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला सोहळा दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी दु. 2 वाजता जिओ सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उद्योग मित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील सह्याद्री समुहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा किर्लोस्कर समुहाच्या गौरीताई किर्लोस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री श्री. सांमत यांनी यावेळी दिली.

मकरंद केदारी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पुणे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे विभाग प्रमुख मकरंद केदारी यांनी काल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला . शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले व शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला,पुणे शहरात शिवसेनेत विविध पदाधिकाऱ्यांचा येण्याचा ओघ वाढला असून यामुळे इतर पक्षात अस्वस्थता वाढली आहे वानवडी परिसरातील उबाठा गटाचे विभाग प्रमुख मकरंद केदारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुण्यातील शिवसेनेचे संघटन बळकट करण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले,शहरात शिवसेनेची ताकद वाढत असून दरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिकेचे काही माजी नगरसेवक व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्ष संघटन बळकट केले आहे,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या विकासासाठी सातत्याने लक्ष असून पुण्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असा शब्द दिल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले,यावेळी पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले यांनी विभाग प्रमुख मकरंद केदारी यांना शुभेच्छा देतांना एक खंदा शिवसैनिक शिवसेनेत परत आल्याची भावना व्यक्त केली, शिवसेनेचा आत्मा हा शिवसैनिक असून शिवसेनेकडे त्याचा ओढा कायम राहील असेही ते म्हणाले,यावेळी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे व असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते

ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू

ठाणे- महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात शुक्रवारीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता एका रात्रीत या रुग्णालयात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयांमधील अनागोंदी कारभार समोर आला आहे.

अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री 17 रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे समोर येत आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने आणि काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याचे कबुल केले आहे. तसेच, या रुग्णालयात लवकरच डॉक्टरांची भरती करून रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हस्के यांनी सांगितले.

दरम्यान, ठाण्यातील सिव्हील रुग्णालय बंद असल्याने सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत आहेत. त्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी 10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. आता केवळ शनिवारी रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नव्हते, रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नव्हते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात उपचार न मिळाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

शनिवारी रात्री मृत्यूमुखी पडलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या एका पाहुण्याला डायबिटीस आणि इतर त्रास असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. नंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूत दाखल केले. मात्र, त्यांना इन्सुलिन दिले गेले नाही. आम्ही वारंवार ते देण्याची विनंती करत होतो. रुग्णाकडे नातेवाईकांनाही दिले जाऊ जात नव्हते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर गोळ्या, जेवण याकडे पूर्ण दुर्लक्ष होत होते. नातेवाईक काही म्हटले तर त्यांना बाहेर हाकलले जात होते. आयसीयूतच रुग्णांची अशी हेळसांड असेल तर जनरल वॉर्डात किती भीषण स्थिती असेल याची कल्पना आपण करू शकता.

आचार्य अत्रे यांचे स्मारक मुंबईत उभारावे

ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जन्मशताब्दीचा प्रारंभ

पुणे ः संयुक्‍त महाराष्ट्र आणि मराठी भाषेकरीता  आचार्य अत्रे यांनी आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत काम केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कुटील डावदेखील ?त्यांनी हाणून पाडला.  प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भिड आचार्य अत्रे यांचे विचार, साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहचले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कलाकार श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबुराव कानडे यांनी व्यक्‍त केली. आचार्य अत्रे यांच्या योगदानामुळे मुंबई महाराष्ट्रात आहे. त्याच मुंबईत त्यांचे स्मारक राज्य शासनाने उभारावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.संवाद, पुणे व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या 125 व्या जन्मशताब्दीचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. या निमित्ताने गेल्या 50 हून अधिक काळ आचार्य अत्रे यांच्या स्मृती जतन करणार्‍या आणि जिवंत ठेवणार्‍या श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबुराव कानडे यांचा ‘प्र. के. अत्रे कोहिनूररत्न पुरस्कार’ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख व  सिक्किमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. सन्मापत्र, पुणेरी पगडी, शाला व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. ‘संवाद’चे सुनील महाजन, निकिता मोघे, विजय कोलेते, पंडित वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.आज झालेला सत्कार हा माझा नसून आचार्य अत्रे यांचा आहे. माझ्या 50 वर्षाची दखल पुणेकरांनी घेतली, यांचा आनंद आहे, अशा भावाना कानडे यांनी व्यक्‍त केल्या. ते पुढे म्हणाले, अत्रे यांनी महाराष्ट्राला हसवायला शिकविले. त्यांनी केलेला मराठी भाषेचा जागर वर्षभर विविध उपक्रमाने त्यांच्या साहित्य, विचारांची महाराष्ट्रभर जनजागृती करणार आहे. मुंबईत आचार्य अत्रे यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कानडे यांनी सांगितले.डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांचे मोठे योगदान आहे. कर्नाटकातील बेळगाव, कारवार मधील मराठी भाषा टिकविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. अत्रे यांनी प्रत्येक टप्प्यात विविध कामे केली. आदर्श शिक्षक, पत्रकार, लेखक अशा बहुआयामी निर्भिड व्यक्‍तीमत्व महाराष्ट्राला मिळाले. स्त्रीमुक्‍तीसाठीदेखील त्यांनी कामे केली.  सीमा भाषिकांसाठी, मराठीसाठी, तसेच मराठी कायदा करण्याठी आपण चळवळ उभी केली पाहिजे. महाराष्ट्र जरी झालेला असला तरी बेळगाव, कारवारसह सीमा भागातील सुमारे 750 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात आलेली नाहीत. या सर्व गावातील मराठी भाषा जीवंत ठेवण्यासाठी काम करून अत्रे यांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याचा निर्धार करणे हीच अत्रे यांना खरी आदरांजली ठरेल.श्रीनिवास पाटील म्हणाले, आचार्य अत्रे यांना जवळून पाहण्याचा योग मला आला. मराठी माणसाठी अवघे जीवन त्यांनी वाहून दिले होते. त्यांचे कार्य विचार आपण पुढे नेला पाहिले. अत्रे यांची स्मृती जपण्यासाठी अत्रे यांचे साहित्यांचा अभ्यास करायला हवा. अत्रे यांनी सातारा येथील साहित्य संमेलनातील अत्रे यांचा आम्ही एकाचे दोन करणा-यापैकी नाहीत हा प्रत्यक्ष अनुभलेला प्रसंग सांगितला. इथे अत्रे यांच्या स्मृती गेली ५० वर्षे जीवंत ठेवणा-यालाही आज श्रीधर व्यंकटेश नव्हे तर बाबूचराव कानडे म्हणूनच ओळखले जाते हा योगायोन नसून ती अत्रे याच्या केलेल्या सेवेचे फळ म्हणून कानडे यांना मिळालेले आहे.कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, या राजधानीत महाराष्ट्रासाठी योगदान देणारे व्यक्‍तीमत्वांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणार्‍यांचा  सन्मान झाला पाहिजे. गेल्या अनेक  वर्षांपासून  ‘संवाद’च्या  वतीने महाराष्ट्राती नामवंत साहित्यिक, कलाकार लेखकांच्या जन्मशताब्दिनिमित्त उपक्रम राबवून विचार पोहचवित आहे. अत्रे यांचे विचार पोहचविण्यासाठी काम हाती घेण्याची गरज आहे. सुनिल महाजन प्रस्ताविकात म्हणाले, गेली 30 ते 40 वर्षांपासून सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कलाकार, लेखक, साहित्यिक कार्याचा विचार आम्ही उपक्रमातून पोहचवितो. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विनिता आपटे यांनी केले. तर निकिता मोघे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर आचार्य अत्रे यांच्या साहित्यावर आधारित ‘बहुआयामी अत्रे’  दृकश्राव्य कार्यक्रम डॉ. विनिता आपटे व वारजे शाखेच्या मसापच्या अध्यक्षा माधुरी वैद्य यांनी सादर केला. यामध्ये अत्रे यांचे नाटकांतील प्रवेश, गाणी, कविता, नाटके व चित्रपटातील विविध विनोदी किस्से  सांगून त्यांनी आचार्च अत्रे यांनी उलगडे. त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे, किस्से, विनोद सांगून अत्रे यांचा काळ कार्यक्रमातून उलगडण्यात आला. 

तब्बल ४०३ महाराष्ट्रीयन फेटे बांधून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् :महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनचा उपक्रम 

पुणे : भारत माता की जय… च्या जयघोषात तब्बल ४०३ महिला व पुरुषांनी फेटे बांधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झालेल्या महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देखील दिला.
डेक्कन जवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम करण्यात आला. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डसच्या पुणे विभागाच्या प्रमुख चित्रा जैन यांनी असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी असोसिएशनच्या अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती देशमुख आणि डॉ प्रेरणा बेराकी यांसह इतरही सदस्य उपस्थित होते.


चित्रा जैन म्हणाल्या, एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशने पुण्यामध्ये केला आहे. तब्बल ४०३ फेटे अवघ्या ५९ मिनिटांमध्ये बांधण्यात आले आहेत. यामाध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देखील देण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांना एकत्रित करुन मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा आगळावेगळा उपक्रम होता.
अभिलाषा बेलुरे म्हणाल्या, प्रत्येकाला ११ ते १३ फूट लांबीचा फेटा घालण्यात आला. फेटे बांधण्याकरिता ६ पुरुष कारागिर होते. पुण्यासह मुंबई, सातारा,लातूर उस्मानाबाद, नगर यांसह विविध शहरांतून नागरिक सहभागी झाले होते. मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम करण्यात आला. याशिवाय दोन दिवसीय राखी व फेस्टिव एक्झिबिशनचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने भालचंद्र नेमाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निषेध सभा


पुणे : बाजीराव पेशव्यांचा विजय असो… नानासाहेब पेशव्यांचा विजय असो… भालचंद्र नेमाडे यांचा धिक्कार असो…अशा घोषणा देत हिंदू म्हणून जगण्याची अडगळ वाटते का? असा प्रश्न करीत नेमाडे  यांच्या पेशव्यांविषयीच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक पद्धतीने जोडे मारो आणि पुस्तकांची होळी  करण्यात आली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या पेशव्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल पूना हॉस्पीटल जवळील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधीस्थळ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, इतिहासतज्ञ जगन्नाथ लडकत, मकरंद माणकिकर, पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे,  चिंतामणी क्षीरसागर, श्रीकांत नगरकर, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, नेमाडे आणि त्यांच्यासारखी थोर महापुरुषांबद्दल वादग्रस्त  वक्तव्य करणारे लोक हे समाजातील लोकांची मने बोथट करण्याचे काम करीत आहेत. ब्राह्मण वर्गाने बुध्दी आणि ज्ञानासोबत शक्तीची उपासना केली पाहिजे. नेमाडे यांना त्यांच्या घरी जाऊन अज्ञान पिठाचा पुरस्कार द्यायला हवा.

दुसऱ्या कोणत्याही समाजावर असे शाब्दिक हल्ले झाले असते, तर त्या त्या समाजाने ते सहन केले असते का? आम्हाला सर्व राष्ट्र पुरुषांबद्दल अभिमान आहे. समजतील सर्व लोक जेव्हा एक होऊ तेव्हा यांची जिरेल. वादग्रस्त विधान करणाऱ्यांना  हिंदू म्हणून अडगळ वाटते का असा सवाल ही मेधा कुलकर्णी यांनी केला.

कुंदनकुमार साठे म्हणाले, साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासाची मोडतोड करुन चुकीचा इतिहास मांडून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या केलेल्या उदात्तीकरणाबद्दल तसेच पराक्रमी पेशव्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. हे अत्यंत निषेधार्ह आहे. थोर महापुरुषांच्या विषयी केलेल्या वक्तव्यासाठी निषेध सभा घ्यावी लागते हे आपले दुर्दैव आहे, अशी खंतही साठे यांनी व्यक्त केली. जगन्नाथ लडकत आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.

पीसीईटी आणि वर्ल्डलाइन कंपनीमध्ये सामंजस्य करार

पुणे – पुणे जिह्यामधील नामांकित शिक्षण संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि वर्ल्डलाइन ग्लोबल या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. वर्ल्डलाइन ग्लोबल कंपनीचा जगभर ४० देशांमध्ये विस्तार असून १८००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आहे. या करारामुळे पीसीईटीच्या चारही अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि नोकरीसाठी उपयोग होईल. पीसीटीच्या पुढील वाटचालीसाठी हा करार उपयोगी ठरेल यामुळे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व संस्थेच्या विश्वस्तांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे अशी माहिती पीसीईटी, नूतन व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.
या कराराअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विध्यार्थ्यांना कंपनीमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सामंजस्य करारावर पीसीईटी च्या वतीने डॉ. शितलकुमार रवंदळे आणि वर्ल्ड लाइन ग्लोबल कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वेंकट श्रीरामागिरी यांनी हिंजेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयात सामंजस्य केला. यावेळी वर्ल्डलाइनतर्फे पॅरिस येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख फ्लोरेन्स गॅलॉईस, शिल्पा हडके व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर पीसीईटी च्या वतीने डॉ. महेश कोलते, डॉ. विलास देवतारे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. अर्चना चौघुले व डॉ. अपर्णा पांडे उपस्थित होते.
सामंजस्य करारासाठी पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, ट्रस्टी व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.

उड्डाणपुलामुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवा, नाना भानगिरे यांचे नितीन गडकरींना निवेदन

पुणे : हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी नितीन गडकरी यांना निवेदन दिले.

या निवेदनात नाना भानगिरे यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्या नेतृत्वात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात विविध ठिकणी रस्ते आणि महामार्गाची कामे अत्यंत वेगाने सुरु आहेत. अनेक वर्षे रेंगाळलेल्या रस्त्यांची कामे आपल्या नेतृत्वात मोठ्‌या कमी कालावधीत पूर्णत्वास येत आहेत, त्याबद्दल आपले सर्वप्रथम मनःपूर्वक आभार.गेल्या कित्येक वर्षापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा प्रश्न आपण विक्रमी वेळेत सोडवला. चांदणी चौकासारखाच वाहतुकीचा प्रश्न पुणे महानगरातील हडपसर उपनगरात असलेल्या संत ज्ञानेशवर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे नागरिकांना सतावतोय. सदर उड्डाणलापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (जुना क्रमांक ९) पुणे ते मच्छलीपट्टणम सुरु होतो या महामार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये जोडली गेली आहेत त्यामुळे सदर उड्डाणपुलावरून मोठया प्रमाणात सातत्याने वाहतूक असते. . मुळात एकच असलेल्या या पूलाला पुढे सासवड रस्त्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग बांधण्यात आला. या जोडकामामुळे मुळातील पूल अत्यंत कमकुवत झाला आहे. परिणामी आठवड्यातील चार ते पाच दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत आहे.

‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’ चे पावसाळी चित्रप्रदर्शन १५ ऑगस्ट पासून ३५ कलाकारांच्या शंभर कलाकृतींचा समावेश

पुणे :’पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे पावसाळी समूह प्रदर्शन ‘पॅलेट -३५ ‘ या शीर्षकांतर्गत दिनांक १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये राजा रविवर्मा आर्ट गॅलरी,(नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता पुणे) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असणार आहे.चित्र प्रदर्शनामध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील ३५ कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विविध विषयांवरील रचनाचित्र, निसर्ग चित्र, अमूर्त चित्र ,विणकाम मधील चित्र, त्रिमित चित्र, अध्यात्मिक चित्र अशा विविध विषयांवरील शंभर कलाकृती कलारसिकांना पाहता येणार आहेत . प्रदर्शनाचे नियोजन ‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे चित्रकार सुरेंद्र कुडपणे यांनी केले आहे.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे.पुणे आर्ट फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष गणेश केंजळे, नामवंत आर्किटेक्ट अभिजीत पवार, पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र कोंडे, प्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार दिनकरराव थोपटे, प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधाकर चव्हाण, प्रसिद्ध चित्रकार पांडुरंग ताटे, शिल्पकार बापूसाहेब झांजे, प्रसिद्ध ऑर्थोतज्ञ डॉ.आनंद केळकर, प्रसिद्ध चित्रकार डॉ. मुरली लाहोटी, चित्रकार डॉ.डी.आर.बनकर, एड. सोमनाथ हरपुडे, नितीनअण्णा थोरात , अभिनेते योगेश शिरसाठ, चित्रकार दत्ता ठुबे, श्रीकांत कदम, रूपेश पवार, चित्रकर्त्या अनुपमा पाटील, चित्रकार रुपेश पवार, चित्रकार अजय दळवी, शैलेंद्र पवार, उद्योजक अमित बेलदरे पाटील, उद्योजक चित्रसेन खुटवड, मुनीर तांबोळी हे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन २० ऑगस्टपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे. पुणे आर्टिस्ट ग्रुप हा नेहमी विविध कलाविषयक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करीत असतो.सर्व कलाकार त्यामध्ये उत्साहाने भाग घेत असतात

राज्यातील ‘आयटीआय’ मधील ७५ ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन

मुंबई, दि.12: व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये  75  व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी दु. 12 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्किल इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये  हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे 419  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, 547 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य  विकास  करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात येईल.

या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.

आचार्य अत्रे यांना पोवाडा आणि रंगावलीतून मानवंदना-

पुणे :  जन्मुनी मराठी मुलखात, झाले विख्यात, ठेवा लक्षात, प्र.के.अत्रे माहीर जगताला, संयुक्त महाराष्ट्र लढा लढला, शाहिराला विसर नाही पडला… अशा शब्दांत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी स्वरचित पोवाडा विद्यार्थ्यांसमोर सादर केला. आचार्य अत्रे यांना शाहिरांनी पोवाडयातून आणि कलाकारांनी रंगावलीतून आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे, राष्ट्रीय कला अकादमी पुणे आणि न्यू एज्युकेशन सोसायटीची आगरकर प्रशाला यांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रणी व आगरकर प्रशालेचे संस्थापक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेत आचार्य अत्रे यांच्या भव्य रांगोळीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गिरीश धडपळे, विश्वास कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता लोणकर आदी उपस्थित होते. अरुण कुमार बाभूळगावकर, अक्षदा इनामदार, डॉ. मृणालिनी दुसाने, प्रतीक यादव, होनराज मावळे (हार्मोनियम), मुकुंद कोंडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी रंगावली साकारली. 
महाराष्ट्र गौरव प्र. के. अत्रे यांच्या प्रतिमा पूजनानंतर त्यांच्या जीवन गौरवपर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेला पोवाडा सादर केला. यावेळी शाहिरांनी पोवाडयाद्वारे आचार्य अत्रे यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. पोवाडा लिहिलेली प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.

नंदकिशोर कल्चरल सोसायटीचा चाळीसावा वर्धापनदिन महोत्सव संपन्न   

पुणे :नंदकिशोर कल्चरल सोसायटी या नृत्यप्रशिक्षण संस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘कथक दर्पण’ कार्यक्रमातून शनीवारी सायंकाळी  पुणेकरांना अनेक विलोभनीय नृत्य सादरीकरणे पाहायला मिळाली. शनिवार , दिनांक १२ ऑगस्ट रोजी  पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,  घोले रोड  येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळात ” कथक दर्पण ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानानिमित्त प्रारंभी तिरंगी झेंडे घेऊन मिरवणूक काढण्यात आली. दीपप्रज्वलन, गुरुवंदनेने कार्यक्रमास सुरवात झाली.सरस्वती वंदना तसेच कथक नृत्याच्या विलोभनीय सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीतेही सादर करण्यात आली. या कार्यक्रमात नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे १०० विद्यार्थ्यानी  कथक नृत्य सादर केले.  डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनीही कथक नृत्य सादर केले. या कार्यक्रमास रायगड घराण्याचे जेष्ठ कथक नृत्य गुरू पं.रामलाल बारेथ ( छत्तीसगड) व अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे  उपस्थित होते.कार्यक्रम विना मुल्य होता. *नृत्यप्रशिक्षणाची चाळीस वर्षे*  १९८३ साली भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते महात्मा फुले वस्तु संग्रहालय,  घोले रोड  येथे नंदकिशोर कल्चरल सोसायटी नृत्य  संस्थेची स्थापना झाली. पं.बिरजूमहाराज यांचे पट्टशिष्य डाॅ.पं.नंदकिशोर कपोते हे या संस्थेचे संस्थापक आहेत.                                   

शरद व अजित पवार यांची पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक ?

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी एक गुप्त बैठक झाल्याची माहिती येथे मिळतेआहे. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील घरी हे दोघे एकमेकांना भेटले. यावेळी या दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण ही चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर होती, असा दावा केला जात आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार,बैठकीनंतर प्रथम शरद पवार हे चोरडियांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडला. या घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.शरद व अजित पवार यांच्या शनिवारच्या गुप्त भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार काय? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी मोठ्या नेत्यांनीही शरद पवारांची साथ सोडली. हा गट थेट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. त्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर मंत्री कॅबिनेट मंत्री झाले.

या शपथविधीनंतर अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची वाय बी सेंटरवर जाऊन भेट घेतली. या बैठकीत त्यांनी शरद पवारांची समजूत काढून त्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी भाजपसोबत जाण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार व शरद पवारांत गुप्त भेट झाल्यामुळे राज्याच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले.

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. ११ : सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या 6 महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. पर्यावरणपुरक विकास हे तत्त्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. वाघमोडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थिती  होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बांबूपासून वेगवेगळे साहित्य, फर्निचर, इथेनॉल, अलंकार वस्तू बनवू शकतो, या सर्वांच्या निर्मितीतून बांबूपासून उत्पनाचे एक चांगले मॉडेल तयार होईल. कांदाटी खोऱ्यातील जमीन उंच सखल आहे.  या जमिनीचा वापर बांबू उत्पादनासाठी होऊ शकतो.  बांबूसाठी हेक्टरी 6 लाख 90 हजारापर्यंतची रक्कम शासन शेतक-यांना टप्याटप्याने देते.  चौथ्या वर्षी उत्पादन सुरु झाल्यावर एकरी एक लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकते.  शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे.  शेतकरी केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे.  त्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय आपण घेत आहोत.  या भागातील शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, सर्वसामान्य माणसाला नोकरीसाठी आपले गाव सोडून जावे लागू नये, त्याला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.

यावेळी त्यांनी बांबूपासून अलंकार बनविण्या-या गुवाहाटी येथील नीरा शर्मा यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा झाली असून कांदाटी खो-यातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे सांगितले.

यावेळी पाशा पटेल यांनी बांबू उत्पादन लागवड, शासनाचे अनुदान, बांबू निर्मितीपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन मुख्यमंत्री महोदयांनी बांबू मिशनअंतर्गत राबविण्यात येणा-या कार्यक्रमाला दिवसभरातला मोठा वेळ देणे, हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगितले.   त्यांनी बांबूपासून बनिविण्यात आलेली खुर्ची, विठ्ठल   मुर्ती व अन्य बांबूपासून निर्मित वस्तू मुख्यमंत्री महोदयांना सादर केल्या.   बांबूचे उत्पादन घेणे शेतक-यांसाठी  किफायतशीर असल्याचे सांगत असताना भावी पिढीला शुध्द हवा, पाणी आपल्याला देता यावे, यासाठी बांबू लागवडीची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सातारा जिल्ह्यात येत्या दोन-तीन महिन्यात 10 हजार हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्ह्यात पर्यटन वृध्दीच्या दृष्टीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.  यामध्ये सातारा जिल्ह्याला लाभलेली नैसर्गिक विविधता, गड किल्ले, व्याघ्र प्रकल्प पक्षी अभयारण्ये , मंदीरे, ट्रेकींगची ठिकाणे, पुणे मुंबई याठिकाणी असलेली आंतरराष्ट्रीय विमानतळे या सर्वांचा पूरेपूर  वापर करुन पायाभूत सूविधांची गुणवत्ता वाढवून पर्यावरण पुरक पर्यटनाला चालना व त्यातून रोजगार निर्मिती यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या दौऱ्यात मेरी मिट्टी, मेरा देश या उपक्रमांतर्गत ग्रामंपचायत पिंपरी तांब येथे शिलाफलकाचे उदघाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.