पुणे :’पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे पावसाळी समूह प्रदर्शन ‘पॅलेट -३५ ‘ या शीर्षकांतर्गत दिनांक १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये राजा रविवर्मा आर्ट गॅलरी,(नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता पुणे) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असणार आहे.चित्र प्रदर्शनामध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील ३५ कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विविध विषयांवरील रचनाचित्र, निसर्ग चित्र, अमूर्त चित्र ,विणकाम मधील चित्र, त्रिमित चित्र, अध्यात्मिक चित्र अशा विविध विषयांवरील शंभर कलाकृती कलारसिकांना पाहता येणार आहेत . प्रदर्शनाचे नियोजन ‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे चित्रकार सुरेंद्र कुडपणे यांनी केले आहे.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे.पुणे आर्ट फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष गणेश केंजळे, नामवंत आर्किटेक्ट अभिजीत पवार, पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र कोंडे, प्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार दिनकरराव थोपटे, प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधाकर चव्हाण, प्रसिद्ध चित्रकार पांडुरंग ताटे, शिल्पकार बापूसाहेब झांजे, प्रसिद्ध ऑर्थोतज्ञ डॉ.आनंद केळकर, प्रसिद्ध चित्रकार डॉ. मुरली लाहोटी, चित्रकार डॉ.डी.आर.बनकर, एड. सोमनाथ हरपुडे, नितीनअण्णा थोरात , अभिनेते योगेश शिरसाठ, चित्रकार दत्ता ठुबे, श्रीकांत कदम, रूपेश पवार, चित्रकर्त्या अनुपमा पाटील, चित्रकार रुपेश पवार, चित्रकार अजय दळवी, शैलेंद्र पवार, उद्योजक अमित बेलदरे पाटील, उद्योजक चित्रसेन खुटवड, मुनीर तांबोळी हे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन २० ऑगस्टपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे. पुणे आर्टिस्ट ग्रुप हा नेहमी विविध कलाविषयक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करीत असतो.सर्व कलाकार त्यामध्ये उत्साहाने भाग घेत असतात