Home Blog Page 1398

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जबाबदार पर्यटनाच्या संकल्पनामुळे पर्यटन जोरात…

संपुर्ण जगामध्ये कोरोना विषाणुचे थैमान सरू होते. त्याचा सवाधिक फटका हा पर्यटन आणि पर्यटनासाठी काम करणाऱ्या लोकांना झाला. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि राबविलेल्या नवनवीन संकल्पनांमळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या वार्षिक आढाव्यामध्ये महामंडळाच्या सर्वच विभागांनी अप्रतिम कामगिरी केली असल्याचे या बैठकीमध्ये दिसन असले आहें. महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. श्रध्दा जोशी-शर्मा आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना विरोधातील राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यांमुळे महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट दिली आहे.मागिल वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यांनतर पर्यटक निवासांमध्ये वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ दिसुन आली आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात आल्याने आणि पर्यटनाची प्रसिध्दी विविध माध्यमातुन पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यामुळे पर्यटनास नवा आयाम मिळाला आहे असुन खाशा पर्यटकांना पर्यटनाची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे खेचुन ओढण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यशस्वी झाले आहे.
सध्या राज्यात मान्सुन सकिय झाला असुन सर्वत्र निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचं मनमोहक रुप मनात साठविण्यासाठी, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटक आसुसलेले आहेत. हे सर्व पर्यटक पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवांसांमध्ये येत आहेत. दमदार पावसामुळे निसर्गाने मनमोहक अशी हिरवाई वाढली आहे. त्यामळे सुरू झालेले हिवाळी हंगामातील पर्यटन जोरदार होणार असल्याने पर्यटकांनी नियोजन सुरु केल्याचे दिसुन येत आहे.
आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. वर्षा पर्यटन आणि हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटनासाठी जबाबदार पर्यटना बरोबरच नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “टुर पॅकेजची” सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. सोयी सवलतींमुळे आणि वर्षा ऋृतुतील आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनासाठी उत्साह दिसुन येत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा पर्यटनास बहर येणार आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत भरघोस प्रतिसाद दिला आहे.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
एमटीडीसीच्या माननीय व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ने एमटीडीसी रिसॉर्ट्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यालयांचे सर्व अधिकारी, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि निवास व्यवस्थापक उपस्थित होते. या आढावा बैठकीत एमटीडीसी रिसॉर्ट्सचा आर्थिक आढावा आणि कामगिरी, अ‍ॅक्वा टुरिझम, प्रादेशिक व्यवस्थापक आणि निवास व्यवस्थापकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, अभिप्राय व्यवस्थापन, रिसॉर्ट्सचा पायाभूत विकास, मालमत्ता धोरण विकास उपक्रम, विपणन, नवीन रिसॉर्ट्सचे संचालन, आरक्षण पुनरावलोकन, दुरुस्ती देखभाल आणि नूतनीकरण समस्यांचे पुनरावलोकन, पीएमयुद्वारे रिसॉर्ट परिस्थिती विश्लेषण, टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, सोशल मीडिया मार्केटिंग प्रेझेंटेशन आणि जबाबदार पर्यटन या विषयांवर चर्चा करण्यात आली.
महामंडळाच्या वार्षिक आढाव्यामध्ये गणपतीपुळे पर्यटक निवासांस एपिल 2021 ते माच 2021 या कालावधीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणुन प्रमाणित करण्यात आले असुन रत्नागिरी विभाग सवसाधारण सवोत्तम सरस असल्याचे दिसून आले आहे.
महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या मार्गदशनाखाली लक्षणिय कामगिरी करताना मागिल वषापेक्षा सरस कामगिरी करत विभागात पर्यटनाला मोठया प्रमाणावर चालना दिली आहे. औरंगाबाद विभागामध्ये असलेली अजंठा आणि वेरूळ ही जागतिक वारसा स्थळे, औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व या बाबीमळे मागिल वषापेक्षा पर्यटकांनी मोठा पतिसाद दिला आहे. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सातत्याने प्रसिध्दी क्षेत्रात कलेले काम, प्रिंट मिडीया आणि सोशल मिडीया मध्ये केलेले महामंडळाचे प्रमोशन यामुळे महामंडळास मोठया प्रमाणावर लाभ झाला आहे. या बाबींची नोंद घेवून प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांना महामंडळाने खास प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे.
महामंडळाने यावषी अभिनव संकल्पना राबविताना आंतरराष्टीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधत आपल्या सर्व उपहारगृहांमध्ये तृणधान्यापासुन तयार करण्यात आलेले पौष्टीक पदार्थ पदार्थ पर्यटकांना देत त्यांच्या आरोग्याची खास दखल घेतली आहे. जबाबदार पर्यटन संकल्पना राबविताना प्लॅस्टिक मक्त परिसर, भारतीय प्रजातीच्या झाडांची लागण केली आहे. त्यामळे पयावरणाचे रक्षण करण्याबरोबरच प्रदुषण मुक्तीचा संदेशही दिला आहे. योगा दिनानिमित्त योगाचे धडे, महीला दिनानिमित्त महीलांच्या सन्मानार्थ 50 टक्के सवलत, डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि “वर्क फ्रॉम नेचर” यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. कोजागिरी पौणिमा, दिपोत्सव आणि खिसमस हे भारतीय सण पयटक निवासांमध्ये साजरे करून महामंडळाने भारतीय संस्कृती जपली आहे.

“पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोतम प्राधान्य देताना पर्यटनांचा आनंद कमी न होता मा. व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी – शर्मा आणि महाव्यवस्थापक श्री.चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पना राबवुन पर्यटनास वेगळी दिशा देता आली आहे. वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांडयातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थाना दिलेलं प्राधान्य यांमुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकही निसर्गाचे आणि सरक्षिततेचे भान ठेवुन शासकिय नियमांचे पुरेपुर पालन करीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत. आगामी आलेल्या लाँग विकएन्ड साठी पयटक निवासे संपूर्णपणे आरक्षित झाली आहेत. आगामी कालावधीत जबाबदार आणि अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच वेगवेगळया अभिनव संकल्पना राबवुन पर्यटनामध्ये वाढ करण्याचा संकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आला आहे”.

निष्ठावंत,आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे, गडकरी बोलणार दिल्लीश्वरांशी …

पुणे- चांदणी चौक येथील पुलाचे लोकार्पण सोहळ्याने भाजपमधील विशेषतः कोथरूड मधील राजकीय खेचाखेची आणि भेदभावाचा आखाडा चव्हाट्यावर आणला . या सोहळ्याच्या आधीच पुणे भाजपमधील नेत्यांतील योग्य नेत्यांना डावलण्याचे कारभार वाढल्याने संताप व्यक्त झाले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॅमेज कंट्रोल करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. काल नाराजी व्यक्त करणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आज लोकार्पण कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसलेल्या दिसल्या. इतकेच नाही तर गडकरी यांनी पुण्यातील प्रकल्पांबाबत मेधा कुलकर्णी यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचा उल्लेख केला.या शिवाय त्यांनी अनिल शिरोळे , गिरीश बापट या दोन्ही खासदारांनी चांदणी चौकाच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार निवेदने दिल्याचाही उल्लेख केला .

नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्य विश्राम कुलकर्णी, कन्या Arc. कल्याणी कुलकर्णी सरदेसाई, जावई Arc कौशिक सरदेसाई, व्याही अजय सरदेसाई, लीना ताई सरदेसाई यांच्या बरोबर वार्तालाप केला.

पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वी भाजपमधील निष्ठावंतांचा संताप उफाळून आल्याचे पाहायला मिळाले होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी थेट आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यात मध्यस्थी करत नितीन गडकरी यांनी नाराजी दूर केल्याची चर्चा आहे. इतकच नाही तर कार्यक्रमानंतर गडकरी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली . यावेळी त्यांनी आता यापुढे कोणालाही डावलण्याचा प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त समजते आहे.या शिवाय आपण असे प्रकार होत असल्याचे पक्षातील आणखी वरिष्ठ असलेल्या नेत्यांशी बोलून निष्ठावंत , आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे अशी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे . त्यामुळे कोथरूड चा आखाडा आमचाच म्हणणाऱ्याना चाप बसणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाल्या होत्या मेधा कुलकर्णी
कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसल्याचा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात कुलकर्णी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.
चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?
मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.
गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.
देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.
माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

राहुल गांधींनी उटीमध्ये आदिवासींसोबत केले नृत्य

वायनाड-

काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवस (12 आणि 13 ऑगस्ट) त्यांचा संसदीय मतदारसंघ वायनाडला भेट देत आहेत. ते शनिवारी दिल्लीहून निघाले आणि सकाळी साडेनऊ वाजता कोईम्बतूरला पोहोचले. येथून राहुल वायनाडला रवाना झाले.

दुपारी दोनच्या सुमारास राहुल यांनी उटीजवळील मुथुनाडू गावात तोडा आदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली. येथे लोकांनी शाल पांघरून त्यांचे स्वागत केले. राहुल गांधींनी आदिवासींसोबत नृत्यही केले.

राहुल आज वायनाडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच वायनाड दौरा आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या भेटीची माहिती दिली होती.

त्यांनी सांगितले की, वायनाडच्या लोकांना लोकशाहीचा विजय झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. त्यांचा आवाज संसदेत परतला आहे, राहुल हे केवळ त्यांचे खासदार नाहीत तर कुटुंबातील सदस्य आहेत.

यापूर्वी राहुल गांधी खासदारकी गेल्यानंतर 16 दिवसांनी 10 एप्रिल 2023 रोजी वायनाडला गेले होते. त्यानंतर येथील एका जाहीर सभेत ते म्हणाले होते – माझे संसदेचे सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. माझे घर हिसकावून घेण्यात आले, माझ्यामागे पोलिस लावले गेले, पण या सगळ्याचा मला काही फरक पडत नाही. त्यांनी मला तुरुंगात टाकले तरी मी प्रश्न विचारत राहीन.

ते लोक जेवढे वाईट असू शकतात तेवढे ते क्रूर असतील, मी तेवढा सज्जन असेल. भाजप देशाचे एकच व्हिजन मांडत आहे, पण आम्ही देशाचे खरे व्हिजन घेऊन चालत आहोत. ते मला जितका त्रास देतील तितकेच त्यातून कळेल की मी योग्य मार्गावर आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार-नितीन गडकरी

पुणे दि.१२: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक वेगाने विकसित होणारं शहरही पुणेच आहे. चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते पुण्यासाठी आवश्यक आहेत. भारत सरकारच्यावतीने निश्चितच पुण्याचा विकासासाठी सहकार्य करण्यात येईल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.

शहरातील प्रदूषण कमी करा
श्री.गडकरी म्हणाले,चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही पर्याय म्हणून अभ्यास करावा. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल.

ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगीकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. पुण्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनाने नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सोलापूर, पुणे आणि नाशिक सारख्या शहरातील रस्ते प्रकल्पाच्या कामांसाठी भूसंपादन वेगाने झाले. चांदणी चौकातील प्रकल्पासाठीही या निर्णयाचा उपयोग झाला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केल्याचे श्री.गडकरी म्हणाले.

एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’ द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल.

पुण्यात १० किलोमीटर जाण्याचा वेळ ३० ते ४० मिनिटे आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून यासाठी राज्य शासनही यासाठी आपला वाटा उचलेल.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महानगरपालिकांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे. पुण्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. त्यादृष्टीने पुण्यात नवे विमानतळ होणे गरजेचे आहे. पुरंदरला विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल. पुण्यातील अनेक क्लस्टरसाठी हे कार्गो वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पामुळे शहरातील आणि शेतीसाठी पाण्याची समस्या दूर होईल. पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात पुणे देशातील सुंदर आणि राहण्यायोग्य शहर होईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
मेट्रोच्या कामांना गती देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आले. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनानेही चांगले प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस आणि नागरिकांचेही सहकार्य लाभले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.

पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शहरातील पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने पुणे शहराला त्याचा लाभ होणार आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासन आणि पुणेकर यासाठी सर्व सहकार्य करतील असेही श्री.पवार म्हणाले

एनडीए चौकतील प्रकल्पामुळे वाहतूक कोडी दूर होण्यास मदत-पालकमंत्री
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त ठरण्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास उपयुक्त ठरणार आहे. शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६ पासून मेट्रोची फेरी सुरू केल्यास सकाळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. राज्यात १८ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग झाले आहेत , असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची-डॉ.नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, रस्ते बांधणीच्या माध्यमातून देशाची बांधणी होत आहे. विशेषतः दुर्गम भागात विविध सुविधा पोहोचविण्यासाठी रस्ते उपयुक्त ठरतात. अशा रस्त्यांमुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. महाराष्ट्राच्या विकासातही रस्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. एनडीए चौकातील प्रकल्पामुळे नागरिकांना चांगली सुविधा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. केंद्र आणि राज्याने प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिल्याने चांदणी चौकातील रस्ते प्रकल्प पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पुणे वन कार्ड’चे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, सुनिल कांबळे, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

असा आहे एकात्मिक पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर सर्व मार्गिकांसहित एकूण १६.९८ किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत ८६५ कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ८ वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.

मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.

एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.

एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.

खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी १४.१३७ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ४९५ कोटी आहे.
0000

आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’

मुंबई, दि.12 :  राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ चे आयोजन केले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांनी दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे.

‘महाराष्ट्र स्टुडंट ‘इनोव्हेशन चॅलेंज’ च्या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि.31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांना 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभाग नोंदविता येणार आहे.

या स्पर्धेमध्ये उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल जणांच्या समूहामध्ये सहभागी होऊ शकणार असून उमेदवार तसेच शैक्षणिक संस्थांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहित मुदतीत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त श्री. रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

CM शिंदेंची प्रकृती खूप खराब, 15 ऑगस्टनंतर त्यांना बळजबरीने ॲडमिट करणार, संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खूप खराब आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 15 ऑगस्टनंतर बळजबरीने रुग्णालयात ॲडमिट करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. ते पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यालाही उपस्थित राहिले नाही. प्रारंभी ते या कार्यक्रमाला ऑनलाइन हजर राहतील असे सांगण्यात आले. पण ते ऑनलाइनही हजर राहिले नाही. त्यातच आता संजय शिरसाट यांनी त्यांच्या तब्येतीविषयी उपरोक्त विधान केल्यामुळे नवी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती ाहे. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही त्यांना ‘बळजबरी’ने… हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. आम्ही त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे की, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहिती आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रकृ्तीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एक दिवस त्यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते गावी गेलेत. आपल्या गावी जाऊन 1 दिवस आराम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते लंडनला गेले नाहीत, असा टोलाही शिरसाट यांनी यावेळी ठाकरे गटाला हाणला.

सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई, दि. 12 :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन – सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो. सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे.  राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.

शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे, दि. १२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह,महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, टाटा प्रोजेक्ट्स कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूकांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे.

गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक ४५ मीटर रुंदीचा रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे, आवश्यक तेथे वाहतूक वळविणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने उशीर लागता कामा नये, असे निर्देश देतानाच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित जागांशी निगडित प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन थेट संपर्क साधत सूचना केल्या. तसेच खासगी जागांबाबतही जागामालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. भविष्यातील ५० वर्षांचा विचार करुन प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग आदी कामाचा तसेच समस्यांचा आढावा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी घेतला.

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘मॉनिटरींग कक्षा’ची भूमिकामुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’साठी सहायक व पुरक

विकासकामातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांकडे
सर्वांनी वस्तुनिष्ठ, सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे

मुंबई, दि. 12:- कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तात्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून कार्यरत असून हा कक्ष मुख्यमंत्री महोदयांच्या ‘वॉर रुम’ला सहाय्यक, पुरक भूमिका बजावत आहे. ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा उद्देश राज्याच्या विकासकामातील अडथळे दूर करुन विकासप्रक्रिया गतिमान करणे, महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवणे हा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याची विकासप्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखिल ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’चा माध्यमातून आपले योगदान देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’ची बैठक ही 24 वी बैठक होती. या बैठकीत कोकणातील पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, सातारा-अलिबागची वैद्यकीय महाविद्यालये, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूरचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदीं विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. तसेच विकासकामतील अडथळे दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. दर पंधरवड्याला नियमितपणे कक्षाची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातील. विकासप्रक्रिया गतिमान केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी ‘वॉर रुम’च्या माध्यमातून निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी, ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष’ सहायकाची भूमिका यापुढेही पार पाडत राहील. राज्यातील विकासप्रकल्पांना केंद्राची मंजूरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, ‘वॉर रुम’चे प्रमुख राधेशाम मोपलवार हे सर्वच जण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून ‘वॉर रुम’ तसेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून योगदान देत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चितंच दिसतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. विकासप्रक्रिया गतिमान करण्याच्या या प्रयत्नांकडे वस्तुनिष्ठ आणि सकारात्मकपणे पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे

अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, तुम्हाला काय त्रास? आपल्या अधिकारांवर अजितदादा ठाम

१५ ऑगस्ट ला पुण्यात राज्यपाल हेच ध्वजारोहण करतात , चुकीच्या बातम्या देऊ नका -अजित पवार

पुणे-मंत्रालयातील ‘वॉर रूम’वरून तसेच इतरही अनेक मुद्द्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे. ‘वॉर रूम’वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचे बोलले जात असतानाच यावर अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची चर्चाअर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा, विकासकामांचा आढावा घेऊ शकतो, असे म्हणत अजितदादांनी वॉर रूमच्या आपल्या अधिकारांवर भक्कमपणे दावाच केला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. पुण्यात आज चांदनी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही शिंदे गैरहजर राहणार असल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.मविआतही बैठका घ्यायचोमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या कोल्ड वॉरवर आज अजित पवारांनीच खुलासा केला. अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? महाविकास आघाडीत असताना अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसाने आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो?अजित पवार म्हणाले, स्वत: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांना त्या समितीची जबाबदारी दिली आहे. मी माझ्या पद्धतीने आढावा घेत आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो? महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो. लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेलो. वेगवेगओळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गेलो. हे सर्व करत असताना देश पातळीवर मोदींना सपोर्ट करण्यासाठी गेलो. यात कोणाला काय अडचण आहे?राधेश्याम मोपलवारही बैठकीला होतेअजित पवार म्हणाले, अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. मात्र एखाद्या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. दरम्यान, मी जी आढावा बैठक घेतली, त्या बैठकीला राधेश्याम मोपलवारही हजर होते. मात्र, माध्यमांनी मोपलवारांना वगळून बैठक घेतली, अशा बातम्या चालवल्या. माध्यमांनी खरे तर खातरजमा न करता अशा चुकीच्या बातम्या दाखवू नये. माझ्या बैठकीमुळे राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात. मी बैठकीत पॉलिटेक्निक, महावितरण आणि खासगी जागेचे प्रश्न होते. त्याचा आढावा घेतला.

DRDOचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा हटवला का? संजय राऊतांचा मोदींना सवाल

मोदींचे कायदे इंग्रजांनाही मागे टाकणारे,तुरुंगात जाणारे आता भाजपमध्ये

मुंबई-डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी मोदी सरकारने देशद्रोहाचा कायदा रद्द केला का? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 16 महिन्यानंतर वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला. त्याचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, राज्याचे मंत्री असलेले नवाब मलिक यांच्या खटल्याची अजून ट्रायलही सुरू झालेली नाही. त्यांची तब्येत खराब असतानाही त्यांना जामीन मिळत नव्हता. हा कोणता कायदा आहे? देशाचे गृहमंत्री देशद्रोहाचा कायदा रद्द केला म्हणतात. पण ज्याच्यावर हा कायदा लावायचा होता त्याच्यावर लावला नाही. पुण्यामध्ये डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला सुरक्षेसंबंधी गोपनीय माहिती दिली. तो आरएसएसचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर मात्र देशद्रोहाचा कायदा लावला नाही. त्याला वाचवण्यासाठी हा कायदा रद्द केला का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावरून संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने हा ब्रिटीशकालीन कायदा रद्द केला असला तरी या कायद्यालाही मागे टाकणाऱ्या कायद्यांचा वापर राजकीय विरोधकांना गुंतवण्यासाठी केला जात आहे. राजकीयदृष्ट्या भविष्यामध्ये ज्यांचा त्रास होऊ शकतो अशा राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. सत्ता, पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडणे हा देशद्रोहच आहे.संजय राऊत म्हणाले, ब्रिटीशांपेक्षाही भयंकर कायदे केंद्र सरकारने निर्माण केले असून त्याचा वापर राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जातोय. जे भाजपमध्ये जातात त्यांना वाशिंग मशीनमध्ये धुवून घेतले जाते. महाराष्ट्रातही हेच झाले. नवाब मलिक 16 महिन्यांनी सुटले, पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते त्यांना भाजपने मंत्री केले. देश हुकुमशाहीकडे चालल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याची टिमकी वाजवू नका. ब्रिटीशांपेक्षाही भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांसाठी केला जातोय आणि तो देशद्रोहच आहे.

हायकोर्टाने राज्य सरकारला झापले; रस्ते चांगले ठेवणे हे तुमचे कर्तव्य नव्हे तर बंधन, आमचा वेळ का वाया घालवावा?

पालिकांप्रमाणे राज्य सरकारही जबाबदारकर्तव्य नव्हे तर बंधन

मुंबई-शहरांमधील खड्डे महापालिका बुजवतात की नाही, यावर राज्य सरकारने देखरेख ठेवायला हवी. राज्य सरकारची कर्तव्य आम्ही का पार पाडावीत? अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले आहे.राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोर्ट म्हणाले, महापालिकांइतकीच राज्य सरकारचीही नागरिकांप्रति जबाबदारी आहे. राज्य सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडायला हवी होती. आमचा वेळ का वाया घालवता?

रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासंदर्भात 2018मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांवर तसेच बांधकाम विभाग (रस्ते) विभागाच्या सचिवांवर अवमान कारवाई करावी, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व अरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सरकारवर कठोर ताशेरे ओढले.

विशेष म्हणजे सुनावणीला सर्व महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. या आयुक्तांसमोरच कोर्टाने सरकारला झापले. तसेच, रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याबाबत तपशिलात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश आयुक्तांसह राज्य सरकारला दिले.पादचारी किंवा सायकलस्वार उघड्या मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत. घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार रस्ते सुस्थितीत ठेवणे तुमचे केवळ घटनात्मक कर्तव्य नाही तर बंधनही आहे, असे न्यायालयाने सुनावले.

खोटे बोलण्याच्या 3 पद्धती, कोर्टाचा टोला

मुंबईतील 2050 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दिली. मात्र, या आकडेवारीने आपण प्रभावित होणारे नाही. आपणही सांख्यिकी शास्त्राचा विद्यार्थी होतो, असा टोला न्यायालयाने लगावला. तसेच, आम्हाला शिकवले आहे की, खोटे तीन टप्प्यांत सांगण्यात येते. पहिले म्हणजे खोटे, दुसरे धादांत खोटे आणि तिसरे सांख्यिकीय खोटे, असा चिमटाही न्यायलयाने काढला.

शिंदे गटाच्या आमदाराने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या पत्रकाराचा कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा

पाचोरा -येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला होता. या हल्ल्यात संदीप महाजन हे जखमी झाले होते. तरी देखील पोलिस माझ्या तक्रारीसह मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 15 ऑगष्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिली आहे. इतकेच नाही तर आपण कुटूंबासह आत्महत्या करणार असल्याचेही ते म्हणाले असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे .

चार पाच जणांच्या टोळक्याने पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. महाजन त्यात गंभीर जखमी झाले होती. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

पत्रकार संदीप महाजन यांनी पाठवलेला संदेश

‘आमदार किशोर पाटील, त्यांचा मुलगा सुमीत, त्याचे नातेवाईक व ठेकेदार पदधिकारी, त्यांचे समर्थक यांच्या कडून केली जाणारी बदनामीसह दहशत आणि सदर प्रकरणी दुर्लक्षीत करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हयातील मंत्री त्यांच्या इशारावर चालणारे व माझ्या तक्रारीसह मागणीला दुर्लक्षीत करणारे पोलीस प्रशासन यांनात्रासुन अन्याय-अत्याचारग्रस्त पत्रकार संदीप महाजन ( पाचोरा ) आपल्या कुटूंबासह 15 ऑगष्ट रोजी आत्महत्या करणार’

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ कैद्यांना विशेष माफी

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे.  या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना(कैद्यांना )विशेष माफी देण्यात येणार आहे.

माफी योजनेचा उद्देश हा बंद्यांमध्ये कारागृहातील शिस्त व आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे.

केंद्रीय गृह सचिव, भारत सरकार यांनी 23 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये प्रस्तुत माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. विहित निकषामध्ये बसणाऱ्या राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी दि. 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी 206,  दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी  189 बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले  आहेत.

अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण 581 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे. त्याबाबत या विभागाच्या 8 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये गृह मंत्रालय, भारत सरकार यांना कळविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या बंद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरूष बंदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 बंदी आहेत. तरूण गुन्हेगार 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 10 बंदी आहेत. हे बंदी माफी वगळता आहेत. निर्धन व दीन बंदी, ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 बंदी, तसेच ज्यांनी एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश अथवा 66 टक्के कालावधी पूर्ण करणारे 167 बंदी आहेत.

कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी

येरवडा जि. पुणे खुले जिल्हा कारागृह 1, येरवडा मध्यवर्ती कारागृह 16, नाशिक रोड जि. नाशिक मध्यवर्ती कारागृह 34, ठाणे मध्यवर्ती कारागृह 1, नागपूर मध्यवर्ती कारागृह 23, अमरावती खुले कारागृह 5, अमरावती मध्यवर्ती कारागृह 19, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 5, कोल्हापूर खुले 5, जालना 03, पैठण खुले 02, औरंगाबाद खुले 02, औरंगाबाद मध्यवर्ती 24, सिंधुदुर्ग जिल्हा 13, मुंबई मध्यवर्ती 07, तळोजा मध्यवर्ती 08, अकोला 06,  भंडारा 01, चंद्रपूर 02, वर्धा जिल्हा 02, वर्धा खुले 01, वाशिम 01, मोर्शी जि. अमरावती खुले 01, गडचिरोली 04, असे एकूण 186 बंदी.

००००

भंडारदरा आणि आंबोलीत १२ ते १६ ऑगस्ट कालावधीत ‘वर्षा महोत्सव’ – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई, : पाऊस पडल्यानंतर पावसाची अनेकविध रुपे पाहण्यासाठी, पावसाळी पर्यटनाचा आनंद व उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ‘वर्षा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटनप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. या महोत्सवात पावसाचे मंतरलेले पाच दिवस अनुभवलेच पाहिजेत. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण. त्याचबरोबर खाद्य परंपरा, दुर्ग आणि किल्ले, येथील जैव विविधता अशा अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने भंडारदरा व आंबोली  पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे.

पर्यटन संचालनालयाचे पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, स्थानिक पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पहावी अशी ठिकाणे अंब्रेला फॉल्स, विल्सन धरण, कळसूबाई शिखर, रंधा धबधबा, रतनवाडी गाव, अगस्त ऋषींचा आश्रम, रतनगड  किल्ला, अमृतेश्वर मंदिर, रिव्हर्स वॉटर फॉल, कोकणकडा, उंबरदरा खिंड, कुलंग खिंड, मदनगड अलंगड, पांजरेबेटे, कोलटेंभे फॉल, नेकलेस फॉल, सांदनदरी ही आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत आंबोली, माधवगड पॉईंट, तारकर्ली समुद्रकिनारा, धामापूर तलाव, शिरगावकर पॉईंट, नांगरतास धबधबा ही ठिकाणे पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी  पर्यटन संचालनालय, १५ वा मजला, नरिमन भवन, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी चॅटबोट ९४०३८७८८६४ वर हाय पाठवा, अहमदनगरच्या माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१-९५९४१५०२४३ ,  ९१-९९२१६६४००९ वर तर सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणीसाठी ९३७१७३९६६६, ९४२०२०७०५५ वर संपर्क साधा तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.