१५ ऑगस्ट ला पुण्यात राज्यपाल हेच ध्वजारोहण करतात , चुकीच्या बातम्या देऊ नका -अजित पवार
पुणे-मंत्रालयातील ‘वॉर रूम’वरून तसेच इतरही अनेक मुद्द्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे. ‘वॉर रूम’वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचे बोलले जात असतानाच यावर अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची चर्चाअर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा, विकासकामांचा आढावा घेऊ शकतो, असे म्हणत अजितदादांनी वॉर रूमच्या आपल्या अधिकारांवर भक्कमपणे दावाच केला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. पुण्यात आज चांदनी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही शिंदे गैरहजर राहणार असल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.मविआतही बैठका घ्यायचोमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या कोल्ड वॉरवर आज अजित पवारांनीच खुलासा केला. अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? महाविकास आघाडीत असताना अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसाने आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो?अजित पवार म्हणाले, स्वत: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांना त्या समितीची जबाबदारी दिली आहे. मी माझ्या पद्धतीने आढावा घेत आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो? महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो. लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेलो. वेगवेगओळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गेलो. हे सर्व करत असताना देश पातळीवर मोदींना सपोर्ट करण्यासाठी गेलो. यात कोणाला काय अडचण आहे?राधेश्याम मोपलवारही बैठकीला होतेअजित पवार म्हणाले, अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. मात्र एखाद्या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. दरम्यान, मी जी आढावा बैठक घेतली, त्या बैठकीला राधेश्याम मोपलवारही हजर होते. मात्र, माध्यमांनी मोपलवारांना वगळून बैठक घेतली, अशा बातम्या चालवल्या. माध्यमांनी खरे तर खातरजमा न करता अशा चुकीच्या बातम्या दाखवू नये. माझ्या बैठकीमुळे राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात. मी बैठकीत पॉलिटेक्निक, महावितरण आणि खासगी जागेचे प्रश्न होते. त्याचा आढावा घेतला.