पुणे :नंदकिशोर कल्चरल सोसायटी या नृत्यप्रशिक्षण संस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘कथक दर्पण’ कार्यक्रमातून शनीवारी सायंकाळी पुणेकरांना अनेक विलोभनीय नृत्य सादरीकरणे पाहायला मिळाली. शनिवार , दिनांक १२ ऑगस्ट रोजी पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळात ” कथक दर्पण ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानानिमित्त प्रारंभी तिरंगी झेंडे घेऊन मिरवणूक काढण्यात आली. दीपप्रज्वलन, गुरुवंदनेने कार्यक्रमास सुरवात झाली.सरस्वती वंदना तसेच कथक नृत्याच्या विलोभनीय सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीतेही सादर करण्यात आली. या कार्यक्रमात नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे १०० विद्यार्थ्यानी कथक नृत्य सादर केले. डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनीही कथक नृत्य सादर केले. या कार्यक्रमास रायगड घराण्याचे जेष्ठ कथक नृत्य गुरू पं.रामलाल बारेथ ( छत्तीसगड) व अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रम विना मुल्य होता. *नृत्यप्रशिक्षणाची चाळीस वर्षे* १९८३ साली भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते महात्मा फुले वस्तु संग्रहालय, घोले रोड येथे नंदकिशोर कल्चरल सोसायटी नृत्य संस्थेची स्थापना झाली. पं.बिरजूमहाराज यांचे पट्टशिष्य डाॅ.पं.नंदकिशोर कपोते हे या संस्थेचे संस्थापक आहेत.