Home Blog Page 1311

एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा

देशभरातील २७ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी
पुणेः एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरातील संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोममध्ये १९ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान देशभरातील २७ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १९ डिसेंबर रोजी होणार असून तो ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार व ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष, मृत्यूंजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ..मंगेश कराड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सोबतच, डॉ.सुनिता कराड, प्र,कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.    
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व त्यांच्या नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. एमआयटी एडीटी विद्यापीठ हे या स्पर्धेसाठीचे नोडल केंद्र असून या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. हे संघ कृषी, फूडटेक आणि ग्रामीण विकास, मेडटेक / बायोटेक / हेल्थटेक, हेरिटेज आणि कल्चर, फिटनेस आणि स्पोर्ट्स आणि स्मार्ट ऑटोमेशन या डोमेनमधून निवडलेल्या आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करतील.
२०१७ मध्ये सुरू झाल्यापासून स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची व्याप्ती प्रत्येक वर्षासह विस्तृत होत आहे. दरवर्षी राज्यपातळीवर ‘एसआयएच’मध्ये लाखो विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करतात.  या वर्षीच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘एआयएच’ महाअंतिम फेरीत १२००० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ त्यांच्या २५०० हून अधिक मार्गदर्शकांसह देशभरात सरकारतर्फे निवडल्या गेलेल्या नोडल केंद्रांमध्ये आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत.  भारताचे मा. पंतप्रधान स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या स्थापनेपासून दरवर्षी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. यावर्षी देखील १९ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.


स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२३ चे आयोजन शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि ‘आय४सी’ यांनी संयुक्तपणे केले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी हे यंदाचे मीडिया पार्टनर असून ‘एडब्लूएस’ आणि ‘हिरो’ हे अधिकृत भागीदार तर ‘हॅक२स्किल’ हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२३ चे नॉलेज पार्टनर असतील.
-डॉ. रेखा सुगंधी,
प्रमुख, ‘एसआयएच’ नोडल सेंटर,
एमआयटी एडीटीयू, पुणे.

हे देवेंद्र फडणवीसांचे पाप-‘अदानी हटाओ, धारावी बचाओ’ठाकरेंचा मोर्चा

0

हे सरकार अदानीच्या दारी:50 खोके कमी पडू लागले म्हणून हे बोके आता धारावी अन् मुंबई गिळायला निघालेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यात आला असून अदानी समूहाकडून या पुनर्विकासाचा कोणताही मास्टर प्लान देण्यात आलेला नाही. त्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिकासह धारावीतील लाखो नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.

धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

यांना खोके कुणी पुरवले?

आता पन्नास खोके कमी पडायला लागलेत त्यामुळे आता धारावी विकायला निघालेत अशी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडलं, आता सर्वांना समजलं असेल की त्यांना खोके कुणी पुरवले असेल, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केलं असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत यांना काहीच करता आलं नाही. त्यामुळे सरकार पाडलं.

हे देवेंद्र फडणवीसांचे पाप

आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, पण धारावीचा गळा घोटू असा एकही निर्णय घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2018 साली धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे पाप देवेंद्र फडणवीसांचे आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाचे संकट ज्यावेळी आलं होतं त्यावेळी धारावीच्या परिस्थितीवरून देशभर टेन्शन होतं. पण धारावी कोरोनाशी लढली, त्यावेळी आम्ही कुणालाही पात्र आणि अपात्र ठेवलं नाही. पण आता पुनर्विकासाच्या निमित्ताने अनेकांना अपात्र ठरवणार. त्यांना उचलून मिठागराच्या ठिकाणी ठेवणार.

या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची धमक नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिले, त्यावेळी 105 मराठी माणसांनी रक्त सांडलं. ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, त्याला हात लावाल तर याद राखा असा इशारा उद्धव ठाकरे म्हणाले.

  • खासदार विनायक राऊत म्हणाले की, लाखो लोकांची लुबाडणूक करणाऱ्या अदानी समूहाविरोधात हा मोर्चा आहे. हजारो विकासक या मुंबईत आहेत. त्यांना जाचक अटी लावल्या जातात. पण भाजपच्या चमचेगीरी करणाऱ्या विचारायचे आहे की, अदानींना कोणत्याही अटी का नाहीत. अदानींसाठी किती जीआर काढल्या, प्रत्येक जीआर हा अदानीसाठी होता. मुंबई महापालिका, एमएमआरडी यांना पंधरा दिवसात परवानगी द्यायची आहे. एफएसआय चार पट, विकास शुल्क माफी, जीना प्रीमीयम माफी, वीजविमा जीएसटीला माफ, कुठेही हा टीडीआर वापरला जाईल. अदानीकडून प्रत्येक बिल्डरला टीडीआर घ्यावाच लागेल. ९० टक्के बाजारमूल्याने अन्य विकासकांना टीडीआर घ्यावाच लागेल. झोपडपट्टीचा विकास व्हावा की नाही पण अदानीचा विकास सुरुच होणार आहे.
  • धारावीकरांना 400 फूट जागा घरांसाठी देणार आहात का? फडणवीस तुम्ही अदानींची चाकरी करणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.

‘अदाणींनी मुंबईसाठी काय केले? ‘मोदाणी’ला धारावीचे लचके तोडू देणार नाही’, वर्षा गायकवाड यांची टीका

धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अदाणी समूह आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. “अदाणींना सर्वच आंदण देण्याचा सपाटा लावला गेला आहे. अदाणींनी विमानतळ घेतले, पोर्ट घेतले, बँका घेतल्या. आता धारावी घेणार का? अदाणींनी मुंबईसाठी काय केले? पण धारावी तुमच्या हाती लागणार नाही. मोदाणींना धारावीचे लचके तोडू देणार नाही. धारावी एकट्याने लढणारी आहे. धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येऊन लढतील”, अशी भूमिका आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडली. मोदी आणि अदाणी यांचे नाव एकत्र करून मोदाणी असे करून काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपल्या मोर्चाची टॅगलाईन बनविली होती.वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, “काही लोकांना (भाजपा) वाटतं आपल्या मित्राला (अदाणी) मदत केली पाहीजे. म्हणून रोज नवीन नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आज राज्य आणि केंद्र सरकारचे कान आणि डोळे उघडले असतील. जनता काय बोलू इच्छिते हे आजच्या मोर्चातून त्यांना कळले असेल. धारावीचे धारावीपण टिकले पाहीजे. धारावी बीकेसीचे विस्तारीकरण होता कामा नये. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहीजे.”“धारावी बनविण्याचे काम धारावीतल्या जनतेने केलेले आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धारवी बनलेली आहे. ज्याला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. धारावीची ओळखच मुळात बिगेस्ट मायक्रो फायनान्स कॅपिटल म्हणून आहे. लेदर, गारमेंट, रिसायकलींग असे अनेक लघु उद्योग धारावीच्या घराघरात चालतात. धारावीची ओळख केंद्र आणि राज्य सरकारने करून घेतली पाहीजे. आपल्या मित्राला फायदा व्हावा, म्हणून निविदा बदलली गेली आणि ती आपल्या मित्राला म्हणजेच अदाणी यांना देण्यात आली. आम्हालाही धारावीचा विकास हवा आहे, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत. पण आमची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

मॅडी या गोष्टीमुळे ठरतोय मल्टी हायफेनेट 

आर. माधवन हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून दिग्दर्शनात पदार्पण करून त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट रचना रॉकेट्री: द नंबी इफेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. तीन भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटाचा हा गौरव आहे.

 माधवन हा नेहमीच ट्रेंडसेटर आणि युथ आयकॉन ठरला आहे. त्याच्या क्षेत्रात तो कायम अग्रगण्य ठरला. रॉकेट्री मधल त्याच वेगळंपण हे अनोखं ठरलं आणि जागतिक स्तरावर कोणीही न कमावलेलं नाव कमावलं. सध्या “द रेल्वे मेन” या वेब सिरीजमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तो प्रशंसा मिळवत आहे. मॅडीने एक अभिनेता म्हणून आणि आता एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माता म्हणून खूप लांब पल्ला गाठला आहे. संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तो भारतीय चित्रपट उद्योगात एक ट्रेलब्लेझर व्यक्ती ठरला आहे. 

 व्यापार विश्लेषक म्हणतात जोगिंदर टुटेजा: “आर. माधवनने ज्या प्रकारे पुढे जाऊन ‘द रेल्वे मेन’ मध्ये काम केले आहे ते पाहणे खरोखर खूप आनंददायी आहे. तो सुमारे अडीच दशके काम करत असल्यामुळे त्याच्या अष्टपैलुत्वाची ओळख प्रत्येक प्रोजेक्ट मधून दिसून येते. ज्या प्रकारे तो अजूनही चित्रपट साइन करत आहे आणि OTT शो मध्ये आपल्या कामाची जादू दाखवत आहे हे बघण उत्सुकतेच आहे. मला त्याला दरवर्षी आणखी हिंदी प्रोजेक्ट्स (चित्रपट/OTT) मध्ये बघायचे आहे.” 

 रॉकेट्री: द नंबी इफेक्टस हा चित्रपट एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित आहे.त्याने केवळ एक उत्कृष्ट नमुनाच तयार केला नाही तर चित्रपट निर्माते म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे ज्याने सिनेमॅटिक लँडस्केपची नवी व्याख्या तयार केली आहे. स्वप्ने पाहण्याची आणि पुन्हा परिभाषित करण्याची हिंमत त्याने यातून केली आहे. माधवनने शशिकांतच्या क्रिकेट ड्रामा टेस्ट आणि विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण सोबत शीर्षक नसलेल्या चित्रपटातील भूमिकांसह सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.१६: सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कोथरूड येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ भेटीप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात जनहिताच्या अनेक चांगल्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून होत आहे. अनेक लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळाला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे अशा योजना आपल्या दारापर्यंत आल्या आहेत. या यात्रेत पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना अशा योजनांचा लाभ देण्यासोबत आरोग्य तपासणीदेखील करण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री.पाटील आणि खासदार श्री. जावडेकर यांनी यात्रेला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. श्री.पाटील यांच्या हस्ते लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वाटप करण्यात आले.

यात्रेत नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित आरोग्य तपासणीचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे:केंद्राचा इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा

0

मुंबई-केंद्राने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा आपला निर्णय अखेर मागे घेतला आहे. यामुळे राज्यासह संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राच्या निर्णयानुसार, साखर कारखान्यांना 17 लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे.

केंद्राने 7 डिसेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे 2023-24 ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली होती. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला होता. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असा दावा सरकारने केला होता. पण या निर्णयाला देशभरातील ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांनी कडाडून विरोध केला होता. राज्य सरकारनेही या प्रकरणी केंद्राकडे हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, केंद्राने अवघ्या 15 दिवसांतच केंद्राने आपला मागे घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच हे उशीरा सूचलेले शहाणपण असल्याचा टोलाही त्यांनी सरकारला हाणला आहे.

इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा होता. जगभरातील देशांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सध्याच्या जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. केंद्राने 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्याची घातली आहे. राजू शेट्टी यांनी ही अट 35 लाख टनापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

केंद्राने देशभरातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सबसिडी व व्याजात सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले होते. त्यामुळे साखर कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल इथेनॉल निर्मिती उद्योगात गुंतवले होते. पण केंद्राने अचानक इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे त्याचा मोठा फटका कारखानदारांना बसण्याची भीती निर्माण झाली होती. पर्यायाने त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसणार होता. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाला शेतकऱ्यांसह कारखानदारांनी कडाडून विरोध केला होता.

धारावी हा पहिला घास त्यानंतर अख्खी मुंबई गिळण्याचा गुजराती लॉबीचा डाव, संजय राऊत यांचा आरोप

0

मुंबई-धारावी विकास प्रकल्पात देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा सुरू आहे. त्यामुळे धारावी वाचली तरच मुंबई वाचेल. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे मोठे कारस्थान आहे, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचा ठाकरे गट आज धारावी विकास प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या अदानी उद्योग समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे. या निमित्ताने संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी धारावीत देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा सुरू असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, धारावी प्रकल्पात देशातील सर्वात मोठा घोटाळा सुरू आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे कारस्थान गुजराती लॉबीने रचले आहे. या प्रकरणी गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे.

सरकारनेच प्रकल्प हाती घ्यावा

उद्योगपती गौतम अदानी भाजपचे जावई आहेत. त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावाने केला आहे. धारावीत गरीब लोकांची घरे व व्यवसाय आहेत. त्यांना तिथेच जागा मिळाली पाहिजे. सरकारने हा प्रकल्प अदानींच्या घशात घालण्यापेक्षा स्वतःच त्याठिकाणी संयुक्त उपक्रम राबवावा, असे संजय राऊत म्हणाले.

आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न

गत काही काळापासून गुजरातमध्ये सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात येत आहे. आता ते अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असतील तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे. हा मुंबई विकण्याचा प्रयत्न आहे. देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा कुठे सुरू असेल, तर तो धारावी पुनर्विकास प्रकल्पा होत आहे, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधताना केला.

कलियुगातील संशयाला दूर करणारी ‘रामकथा’ – कवी डॉ. कुमार विश्वास

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन 

पुणे : श्रीराम कथा भारतीयांच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या ह्रदयात आहे. प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयांच्या ‘डीएनए’ मध्ये रामकथा सामावलेली आहे. विविध ठिकाणी साधू संत ही कथा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्षाला दूर करणारी ही कथा असून आजच्या काळात श्रीराम कथेची संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले. 

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे  ‘अपने अपने राम’ या तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवा, दि.१५ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अयोध्येमध्ये जानेवारी २०२४ मध्ये पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला.

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, धर्म आणि अध्यात्माची चेतना ही सांसारिक कार्य झालेल्या व्यक्तींसाठी असते, हा समज आहे. भागवत, गीता हे ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. मात्र, आपण ते किती वेळा वाचतो, हे महत्वाचे आहे. आपण आपले बँक खाते आणि त्यातील बॅलन्स किती वेळा पाहतो आणि हे ग्रंथ किती वेळा वाचतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. 

ते पुढे म्हणाले, महर्षी वाल्मिकी यांनी ही कथा आपल्याला ऐकविली. ते आद्य कवी होते. त्यानंतर गीतेला देखील कवितेच्या रूपात सांगण्यात आले. कवी हा द्रष्टा असतो, त्याला पुढचे पाहण्याची शक्ती असते. रामकथा ही मधुर, सोपी आणि तितकीच मनोहारी आहे. त्यामुळे या कथेचे विविध प्रकारे वाचन व श्रवण करून यातून अनेक गोष्टी आपण शिकायला हव्या, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याविषयी अनेक गोष्टी देखील सांगितल्या.

श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, देवा श्री गणेशा, श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीनेमे, सजादो घर को दुल्हन सा.. मेरे घर राम आये है यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 

भारतीय इतिहास व अध्यात्माचा इतिहास पुण्यात लिहिला गेला :

डॉ. कुमार विश्वास 

नामदार गोखले, रानडे यांच्यापासून ते ओशो रजनीश यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मोठे कार्य पुण्यामध्ये झाले. पुण्याला आयटी हब म्हटले जाते. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून जगविख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील आहे. भारतीय इतिहास व अध्यात्माचा इतिहास देखील येथे लिहिला गेला. त्यामुळे येथे आले की मनाला वेगळा आनंद मिळतो.  

एक रुपयांत प्लान्ट विकत घेण्याची रतन इंडियाची राज्य शासनाला अनोखी ऑफर

0

नागपूर-

‘वीज निर्मिती क्षेत्रातील रतन इंडिया प्लान्ट बंद आहे. त्यांची वीज राज्यशासन विकत घेऊ शकत नाही. रतन इंडियानचा प्लान्ट एक रुपयात घ्या’, अशी ऑफर कंपनीने राज्य सरकारला दिली. मात्र एक रुपयांत प्लान्ट घेऊनही सरकार तो प्लान्ट चालू शकत नाही. उद्देश चांगला आहे. प्रकल्प झाला पाहिजे असे वाटते. मात्र हा प्रकल्प व्यवहार्य नाही’, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी दिली.

शासनाने नाशिक येथील एकलहरे येथे 660 मेगावॅट प्रकल्प 29 नोव्हेंबर 2011 रोजी मंजूर करूनही तो स्थगित ठेवण्यात आल्याचा मुद्दा आमदार सरोज आहिरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. सौरऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात होत आहेत. उपकरणांची निर्मिती आपल्याकडे आता सुरू झाली आहे. यास्वरूपाचा पार्क तयार करता येऊ शकतो का, याबाबतही विचार सुरू आहे.

अधिवेशन झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत यावर बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मागणी वाढल्यानंतर महागडी वीज खरेदी केली जाते. वर्षातले किमान 10 महिने तरी वीज विकत घेऊ शकत नाही. प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा मांडण्यात आला, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल, असे फडणवीस म्हणाले.

पृथ्वीमातेचे जतन करण्याचे, वसुंधरेवर प्रेम करण्याचे आणि हरित आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळण्याचे टाटा पॉवरतर्फे सर्वांना आवाहन

  कंपनीच्या ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ चळवळीशी सुसंगत COP 28 मध्ये ‘दुनिया अपने  हवाले’ ही नवीन ब्रँड फिल्म सादर

मुंब: भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक टाटा पॉवरने  “पृथ्वी मातेचे संवर्धन करा. वसुंधरेवर प्रेम करा. हरित आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळा.” असा संदेश देत  “दुनिया अपने हवाले” ही नवीन ब्रँड फिल्म  सादर केली आहे.  

टाटा पॉवर ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ या आपल्या बांधिलकीशी समर्पित असल्यामुळे, नागरिकांना शाश्वत जीवनशैली प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. स्वच्छ, हरित भविष्यासाठी वैयक्तिक कृती आणि जबाबदारीचे महत्त्व यातून अधोरेखित होत आहे.

एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून, टाटा पॉवर कॉर्पोरेटसह त्यांच्या मोठ्या ग्राहक वर्गासाठी हरित ऊर्जा उत्पादने आणि सेवांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देत आहे. उर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी

रुफटॉप सोलर, ईव्ही चार्जिंग, सोलर मायक्रोग्रीड्स, ग्रुप कॅप्टिव्ह सोल्यूशन्स, पंप्ड हायड्रो पॉवर, स्मार्ट होम ऑटोमेशन सोल्यूशन्स यांसारख्या परवडणाऱ्या हरित उपायसुविधांचा व्यापक प्रमाणात अवलंब करून लाखो भारतीयांसाठी शाश्वत जीवनशैली कशी ‘शक्य’ आहे हे रुजवून, लोकप्रिय करण्यावरही काम करत आहे.

हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, तामिळ आणि कन्नड बातम्या आणि व्यवसाय चॅनेलसह, ही मोहीम डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह आहे आणि लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवत आहे.

जंगलतोड, बांधकाम, औद्योगीकरण आणि शहरीकरण यासारख्या मानवी क्रियांमुळे आपल्या वसुंधरेचा रोजच्या दिवसाला कसा दुरुपयोग केला जात आहे आणि हानी होत आहे हे दाखवून जगाचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे हे या फिल्म मध्ये दाखविण्यात आले आहे. या प्रवासाच्या शेवटी, हे जग धूळमातीने माखलेले आणि मोडकळीला येत असताना भावी पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी दोन मुले हे जग वाचवतात. ते स्वच्छ करतात आणि प्रेमाने जवळ करतात. आपल्या वसुंधरेसाठी आपल्याला आज याच प्रेम आणि काळजी करण्याची गरज आहे. व्हिडिओचा शेवट एका मजबूत संदेशासह होतो: “पृथ्वी मातेचे संवर्धन करा. वसुंधरेवर प्रेम करा. हरित आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळा.” पार्श्वभूमीवर “होल्ड मी टाइट” हे बोल असलेले गाणे गायले जाते.

येथे ही फिल्म बघू शकता:

टाटा पॉवरच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन्स प्रमुख सुश्री ज्योती बन्सल म्हणाल्या, “जसे आपण COP28 मध्ये जागतिक नेत्यांना एकत्र येताना आणि चर्चा, वादविवाद करताना पाहतो, तेव्हा हे स्पष्ट होते की ‘नो अ‍ॅक्शन’ म्हणजेच कृती न करणे हा पर्याय असू शकत नाही. टाटा पॉवरने ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ या आपल्या सूत्रासह योग्य संवाद साधण्यात पुढाकार घेतला आहे. आम्ही लोकांना त्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आवाहन करत तसेच शाश्वत जीवनशैली आणि स्वच्छ उर्जा उपाय यांचा अंगिकार करण्यासाठी चालना देत या गोष्टीला पुढील स्तरावर नेत आहोत. ही फिल्म आपल्या वसुंधरेवर सखोल प्रेम करण्याची प्रेरणा देते. फिल्म मध्ये लहान मुले जग स्वच्छ करताना दाखवली आहेत. लहान, छोट्या कृतीही मोठ्या बदलासाठी कशा चालना देणाऱ्या बनू शकतात याचे हे एक शक्तिशाली प्रतीक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपले एकमेव घर असू शकणाऱ्या या प्लॅनेट अर्थचे संरक्षक बनण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्‍यासाठी ही चळवळ बनवण्‍याचा आम्ही प्रयत्‍न करत आहोत.”

रीडिफ्यूजनचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री. प्रमोद शर्मा म्हणतात, “ही फिल्म थेट हृदयापासून आहे. जर आपण वसुंधरेची हानी करणे ताबडतोब थांबवले नाही तर आपल्याला दररोज त्याची शिक्षा भोगायला लागेल. आणि मग ते थांबवणे शक्य होणार नाही. दुर्दैवाने, आपण जे काही करतो ते बरेच अज्ञानामुळे आहे आणि बरेच काही उदासीनतेमुळे आहे. दोन्ही वृत्ती पृथ्वी मातेला मारक ठरत आहेत. संवादाच्या या भागामध्ये समस्या स्पष्टपणे मांडल्या आहेत आणि टाटा पॉवर वैयक्तिक पातळीवर तसेच सामाजिक स्तरावर त्वरित कृती करण्याचा निःसंदिग्ध संदेश देत आहे.”

फिल्म पोर्टफोलिओवर देखरेख करणार्‍या रीडिफ्यूजनच्या कार्यकारी संचालिका श्रीमती कॅरोल गोयल पुढे म्हणाल्या, “आम्ही संदेश खरा, वास्तव ठेवला आहे. हे कठोर आहे. आपल्या चुकांचे जगभरात  जे परिणाम भोगायला लागत आहेत ते आपण दररोज पाहतो परंतु त्याबद्दल काहीही करत नाही.  या फिल्मला अतिशय मजबूत आणि गुंतवून ठेवणारे संगीत आणि बोल मिळाले आहेत. त्यामुळे ही फिल्म नक्कीच संस्मरणीय आणि चिरस्थायी होईल अशी आम्हाला आशा आहे.”

टाटा पॉवर देशातील सर्वात पसंतीचा आणि विश्वासार्ह ग्रीन एनर्जी ब्रँड बनण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीने २०२३ पर्यंत स्वच्छ आणि हरित ऊर्जा स्रोतांमधून ७०% क्षमता निर्मिती आणि २०४५ पर्यंत कार्बन नेट न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्याची योजना आखली आहे.

अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त:पुण्यातील मुंढवा पोलिसांनी केली कारवाई

पुणे

मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घतले. त्याच्याकडून चोरीच्या 2 लाख 75 हजार किंमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

वाहन चोरीच्या गुन्हयात पकडलेले अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून संशयितरित्या जात असतांना त्यांना पोलीस अंमलदार दिनेश राणे दिसला. त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने समाधानकार उत्तर दिले नाही. यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता सदर वाहने मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची तक्रार देण्यात आली होती. यानंतर अल्पवयीन मुलाकडे अधिक तपास केला असता हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 5 दुचाकी, मुंढवा आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 5 दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 2 लाख 75 हजारांच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक संगीता रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप , राहुल मोरे ,स्वप्नील रासकर ,दिनेश भांदुर्गे ,सचिन पाटील यांच्या पथकाने केली आहे.

पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक

0
  • महाराष्ट्र (९, ६, १२) २७ पदकांसह सहाव्या स्थानावर
    -नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश
  • टेबल टेनिसमध्ये आगेकूच

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि साई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरु असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची स्पर्धेत आता ९ सुवर्ण, ६ रौप्य, १२ ब्रॉंझ अशी २७ पदके झाली असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. हरियाना ३५ सुवर्ण, ३७ रौप्य, १९ ब्रॉंझपदकांसह ९१ पदके मिळवून अग्रस्थान टिकवून आहे. उत्तर प्रदेश (२४, १८, ९) ५१, तमिळनाडू (१७, ६, १३)३६, गुजरात (११, १६, ११) ३८ आणि राजस्थान (९, १९, ११) ३९ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थनावर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या एलिट १०७ किलो वजन गटात १४८ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. त्याचे रौप्यपदक केवळ दोन किलोंनी हुकले. राजस्थानच्या मिलन कुमारने १५० किलो वजन उचलताना रौप्यपदकाचा मान मिळविले. महाराष्ट्राचे हे या क्रीडा प्रकारातील चौथे पदक ठरले.

कामगिरी समाधानकारक – सारिका सरनाईक
पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राने चार पदके मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. खेळाडूंच्या कठोर मेहनतीमुळेच हे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात अनेक युवकांना या कामगिरीने प्रेरणा मिळेल, अशा शब्दात प्रशिक्षक सारिका सरनाईक यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

टेबल टेनिसमध्ये आगेकूच
महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना आपली आगेकूच कायम राखली. पुरुष गटात दत्तप्रसाद चौगुले, विश्व तांबे यांनी विजय मिळविले. महिला गटात क्लास ६ प्रकारातून वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. या कामगिरीने महाराष्ट्राची या खेळातील पदकाची खात्री निर्माण झाली आहे.

टेबल टेनिस निकाल –
क्लास ९ – दत्तप्रसाद चौगुले वि. वि,. ब्रिजेंद्र सिंग ११-३, ११-९, ११-२
क्लास १० – विश्व तांबे वि.वि. जगन्नाथ मुखर्जी ११-५, १६-१४, ८-११, ११-५, ओम लोटलीकर पराभूत वि. हितेश दलवानी ७-११, ८-११, ७-११
क्लास ८ – स्वप्नील शेळके पराभूत तुषार नागर ९-११, ७-११, ११-९, ८-११
क्लास ५ – विवेक मोरे पराभूत वि. आर. अलागर ४-११, ५-११, ४-११, रिषीत नथवानी वि.वि. अभिषेककुार सिंग ११-५, ११-४, ११-७

महिला –
क्लास ६ – वैष्णवी सुतार पराभूत वि. भाविका कुकाडिया ७-११, ९-११, ६-११, वैष्णवी सुतार वि.वि. नयना कांबळे ११-१, ११-१, ११-१,
क्लास ९,१० – पृथ्वी बारे वि.वि. मेहक कासार ९-११, १७-१५६, ८-११, ११-५, ११-९,
क्लास ६ – उज्वला चव्हाण पराभूत वि. पूनम ३-११, ४-११, ७-११, उज्वला चव्हाण वि.वि. उर्मिला पाल ११-७ ११-८, ४-११, १४-१२

2023 मध्ये दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी हेतूंसाठी इंटरनेटचा होणारा वापर ओळखण्यासाठी आणि त्यावर आळा घालण्यासाठी, शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांचा संयुक्त दहशतवादविरोधी सराव आयोजित

0

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2023

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी, 15 डिसेंबर 2023, रोजी शांघाय सहकार्य समितीच्या प्रादेशिक दहशतवाद संरचना विरोधी कार्यकारी समितीच्या पाठिंब्याने,  एक संयुक्त दहशतवाद विरोधी सराव आयोजित केला होता. फुटीरतावादी,  अतिरेकी आणि दहशतवाद्यांकडून होणारा इंटरनेटचा वापर ओळखून, त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला. भारताने या संयुक्त दहशतवाद विरोधी अभ्यासाचे यजमानपद स्वीकारले होते.

या संयुक्त सरावाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती :  

  • दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी हेतूंसाठी इंटरनेटचा केला जाणारा वापर ओळखून त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी, एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमधील परस्परसंवादाच्या यंत्रणेत सुधारणा करणे;
  • डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक अनुभवाची देवाणघेवाण;
  • दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी कारवायांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने डिजिटल मालमत्तेचा वापर रोखण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक अनुभवाची देवाणघेवाण;
  • एससीओ सदस्य देशांच्या महत्त्वपूर्ण माहितीच्या पायाभूत सुविधांवर दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी संघटनांकडून सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमधील संवादाची पातळी वाढवणे.

सरावातील निष्कर्षांची माहिती देताना, शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी नमूद केले की हा सराव, एससीओची दहशतवादविरोधी क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने, एकत्रित प्रयत्नांचे एक महत्त्वाचे पाऊल होते.

भारतीय लष्करासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 5,336.25 कोटी रूपयांचा 10 वर्षासाठी करार

संरक्षण मंत्रालयाने 15 डिसेंबर 2023 रोजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे सोबत 10 वर्षांच्या कालावधीसाठी, एकूण 5,336.25 कोटी रुपये खर्चाच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.  ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाचा एक  भाग म्हणून,हा करार ‘भारतीय उद्योगांद्वारे भारतीय लष्करासाठी युद्धसामग्री  निर्मिती’ अंतर्गत युद्धसामग्री  खरेदीसाठी करण्यात आला असून  हा सरकारी उपक्रम 10 वर्षांच्या दीर्घकालीन गरजांच्या पूर्ततेसाठी   आहे. आयात कमी करण्यासाठी युद्धसामग्रीची साठवणूक करणे , युद्धसामग्रीच्या  उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करणे, महत्वाचे  तंत्रज्ञान मिळवणे  आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे प्रभावित होणारा युद्धसामग्रीचा  साठा

सुरक्षित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
इलेक्ट्रॉनिक फ्यूज हे मध्यम ते अवजड क्षमतेच्या  तोफखान्यांचे अविभाज्य घटक आहेत जे लष्करी मोहिमांसाठी  शाश्वत तोफखाना सापेक्ष क्षमता  प्रदान करतात.उत्तर सीमेवरील अती उंचीच्या प्रदेशांसह विविध प्रकारच्या भूप्रदेशात शस्त्रसाठा  असलेल्या तोफखान्यांमध्ये वापरण्यासाठी फ्यूज खरेदी केले जातील.
इलेक्ट्रॉनिक फ्यूजचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या  पुणे आणि आगामी  नागपूर प्रकल्पामधे  केले जाईल.हा प्रकल्प दीड लाख मनुष्य दिवसांसाठी रोजगार निर्माण करेल आणि दारूगोळा उत्पादन आणि देशातील दारूगोळा उत्पादन व्यवस्था  व्यापक करण्यासाठी एमएसएमईसह भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन देईल.

शासकीय मैदाने नागरिकांसाठी खुली करावीत–आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

नागपूर – नागरिकांना व्यायामाकरिता फिरण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी शहरातील शासकीय संस्थांची मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत शुक्रवारी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात कृषी महाविद्यालय, पोलीस ग्राऊंड, सीओईपी, औंध आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज आदी शासकीय संस्था आहेत. या शासकीय संस्थांच्या मैदानामध्ये नगरीकांना व्यायामासाठी येण्यास परवानगी नाकरण्यात येत आहे. पुणे शहरात मोजकीच मैदाने आहेत. त्यातही नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही तर नागरिक व्यायामासाठी जाणार कुठे? फिरण्याची सुविधा नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न अधिक भेडसावतो. तसेच मुलांना शारीरिकदृष्ट्या खेळ महत्वाचा आहे. त्यांनाही मैदानांची गरज आहे. तरी ही सर्व शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांना व्यायामासाठी व मुलांना खेळण्यासाठी खुली करण्यात यावीत, असे मुद्दे आमदार शिरोळे यांनी ही मागणी करताना मांडले.

मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलतींत भरीव वाढ करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

आरक्षणाची कायदेशीर लढाई
तडीस न्यावी

नागपूर – मराठा समाजातील तरूणांसाठीच्या शैक्षणिक सवलतींत भरीव वाढ करावी आणि आरक्षणाची कायदेशीर लढाई तडीस न्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत गुरुवारी केली.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजित पवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षणाची गरज का निर्माण झाली? याला जबाबदार कोण आहे? याचे आत्मचिंतन व्हायला हवे, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.

मराठा समाजाला मतपेटी (व्होट बँक) मानणारा एक वर्ग १९८० पासून महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाला. या राजकीय वर्गाने मराठा समाजाला कायम गृहित धरले. परिणामी मराठा समाजातील गरीब वर्ग अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिला, याकडे आमदार शिरोळे यांनी त्यांच्या भाषणातून लक्ष वेधले. आपल्या लेकरांना आपण न्याय देऊ शकत नाही, असे शल्य मराठा समाजातील प्रौढांमध्ये निर्माण झाले. सध्याची मराठा समाजाची अवस्था अशी आहे, असे आमदार शिरोळे म्हणाले.

२०१४च्या निवडणुकीच्या तोंडावर न टिकणारे आरक्षण काँग्रेसच्या तत्कालीन मुख्य मंत्र्यांनी दिले. त्या़ंच्यानंतर मुख्य मंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तळमळ दाखविली, व्यापक अभ्यास करून टिकणारे आरक्षण दिले. दुर्दैवाने २०१९ मध्ये अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने टिकणारे आरक्षण देण्यासाठी कोणताच प्रामाणिक प्रयत्न केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, घटनात्मक आरक्षण देण्यासाठी जो वेळ लागतो, तो वेळ देण्याची मानसिकता मराठा समाजात राहिलेली नाही, असे प्रतिपादन आमदार शिरोळे यांनी केले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य मंत्री असताना दिले. त्यांच्याच काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्था सक्षम आणि सशक्त केल्या. खाजगी महाविद्यालयांमधील मराठा मुलांचे शुल्क (फी) कमी केले आणि वसतीगृहात (हॉस्टेल) राहाणाऱ्या मराठा मुलांना निवासी भत्ता चालू केला, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. ज्या मराठ्यांचे कुणबी पुरावे मिळाले आहेत त्यांना त्वरीत कुणबी दाखले देण्यात यावे जेणेकरून त्यांना शिक्षणात आणि नोकर्यांमध्ये मदद होईल अशी मागणी शिरोळे यांनी विधान सभेत केली.