नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी, 15 डिसेंबर 2023, रोजी शांघाय सहकार्य समितीच्या प्रादेशिक दहशतवाद संरचना विरोधी कार्यकारी समितीच्या पाठिंब्याने, एक संयुक्त दहशतवाद विरोधी सराव आयोजित केला होता. फुटीरतावादी, अतिरेकी आणि दहशतवाद्यांकडून होणारा इंटरनेटचा वापर ओळखून, त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला. भारताने या संयुक्त दहशतवाद विरोधी अभ्यासाचे यजमानपद स्वीकारले होते.
या संयुक्त सरावाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती :
- दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी हेतूंसाठी इंटरनेटचा केला जाणारा वापर ओळखून त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी, एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमधील परस्परसंवादाच्या यंत्रणेत सुधारणा करणे;
- डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक अनुभवाची देवाणघेवाण;
- दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी कारवायांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने डिजिटल मालमत्तेचा वापर रोखण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक अनुभवाची देवाणघेवाण;
- एससीओ सदस्य देशांच्या महत्त्वपूर्ण माहितीच्या पायाभूत सुविधांवर दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेकी संघटनांकडून सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या सक्षम अधिकाऱ्यांमधील संवादाची पातळी वाढवणे.
सरावातील निष्कर्षांची माहिती देताना, शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी नमूद केले की हा सराव, एससीओची दहशतवादविरोधी क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने, एकत्रित प्रयत्नांचे एक महत्त्वाचे पाऊल होते.