Home Blog Page 1310

पंतप्रधानांनी सूरत हिरे बाजाराचे केले उद्घाटन,15 मजले असलेले 9 टॉवर, ही सर्वात मोठी इंटरकनेक्टेड बिल्डिंग

0

यूएस डिफेन्स हेडक्वार्टर पेंटागॉनपेक्षा ही सर्वात मोठी एकमेकांशी जोडलेली आणि ऑफिसची इमारत आहे. त्याची 4500 हून अधिक कार्यालये आहेत. तत्पूर्वी, पीएम मोदींनी सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटन केले आणि रोड शो देखील केला.सुरत डायमंड बाजार 3,500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू झाले. त्याचे काम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झाले. SDB ची स्थापना सूरतच्या हिरे उद्योगाने उत्पादन आणि व्यापार दोन्हीसाठी एक-स्टॉप हब म्हणून केली आहे. सुरत जगातील 92% नैसर्गिक हिरे बनवते.

सुरत– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत  हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.

सुरत हिरे बाजार उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी हा बाजार म्हणजे सूरत शहराच्या वैभवात नवा हिरा बसवला  गेला अशी टिप्पणी केली.  “हा सामान्य हिरा नसून जगातील सर्वश्रेष्ठ हिरा आहे”, असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, सूरत हिरे बाजाराची चमक जगातील सर्वात मोठ्या वास्तूंना दिपवून टाकत  आहे. या बाजाराचे श्रेय पंतप्रधानांनी वल्लभभाई लखानी आणि लालजीभाई पटेल यांच्या नम्रतेला आणि एवढ्या मोठ्या मिशनच्या यशासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भावनेला दिले. पंतप्रधानांनी याप्रसंगी सूरत हिरे बाजाराच्या यशासाठी झटणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.  “जगातील हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीच्या चर्चेत भारतातील सूरत हिरे बाजाराचे नाव अभिमानाने घेतले जाईल”, हे त्यांनी अधोरेखित केले.  “सुरत हिरे बाजार भारतीय कलाकुसर, कारागीर, साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  ही इमारत नवीन भारताच्या क्षमता आणि संकल्पांचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.  सूरत हिरे बाजाराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिरे उद्योग, सुरत, गुजरात आणि भारतातील लोकांचे अभिनंदन केले.  पंतप्रधानांनी आज सकाळी सूरत हिरे  बाजार इमारतीला दिलेली भेट आठवून या इमारतीच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत हरित इमारतीचा उल्लेख केला. ही इमारत जगभरातील पर्यावरण समर्थकांसाठी एक उदाहरण बनू शकते तसेच इमारतीची एकूण वास्तुकला विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी शिकण्यासाठी एक साधन म्हणून उपयोगी ठरु शकते असे पंतप्रधानांनी या इमारती संदर्भात बोलताना सांगितले. पंचतत्व उद्यानाचा उपयोग लँडस्केपिंगचे आदर्श उदाहरण म्हणून केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सुरतला मिळालेल्या इतर दोन भेटवस्तूंबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सुरत येथे नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुरत विमानतळाचा दर्जा उंचावण्याचा उल्लेख केला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीची  पूर्तता झाल्यामुळे सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पंतप्रधानांचा सन्मान केला.  सुरत दुबई विमान सेवा सुरू झाल्याची तर हॉंगकॉंगसाठी लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  “सुरतसह, गुजरातमध्ये आता तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत”, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनचे सुरत शहराशी असलेले वैयक्तिक संबंध आणि शिकण्याची संधी देणाऱ्या   अनुभवांवर प्रकाश टाकताना त्यांनी सबका साथ सबका प्रयास या भावनेचा उल्लेख केला.  “सुरतची माती इतरा शहरांपेक्षा वेगळी आहे” असे ते म्हणाले. या प्रदेशात उत्पादीत कापसाची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.  सुरतच्या आजवरच्या प्रवासातील चढ-उतारावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, ब्रिटिश जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा सुरतच्या भव्यतेने त्यांना आकर्षित केले.  सुरत हे जगातील सर्वात मोठे जहाज बांधणीचे केंद्र होते आणि सुरतच्या बंदरावर 84 देशांच्या जहाजांचे झेंडे फडकत असत, त्या काळाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली.  “आता, ही संख्या 125 पर्यंत वाढेल”, असे ते म्हणाले.  शहराला भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी आरोग्यविषयक गंभीर समस्या आणि पूर यांचा उल्लेख केला तसेच शहराच्या स्फूर्तीवर कसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते याची आठवण करून दिली.  आजच्या प्रसंगाची दखल घेत पंतप्रधानांनी आत्मविश्वास व्यक्त केला आणि सूरत हे जगातील सर्वोत्कृष्ट 10 वाढत्या शहरांपैकी एक बनल्याचे सांगितले. त्यांनी सुरतची उत्कृष्ट खाऊ गल्ली, स्वच्छता आणि कौशल्य विकासावर प्रकाश टाकला.  पूर्वी सन सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरतने येथील लोकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने स्वतःचे डायमंड सिटी, सिल्क सिटी आणि ब्रिज सिटीमध्ये रूपांतर केले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  “आज लाखो तरुणांसाठी सुरत हे ड्रीम सिटी म्हणजे स्वप्न पूर्ण करणारे शहर बनले आहे”, असे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरतच्या वाटचालीचीही त्यांनी नोंद घेतली.  सुरतसारख्या आधुनिक शहराला हिरे बाजाराच्या  रूपात एवढी भव्य इमारत मिळणे हा एक  ऐतिहासिक क्षण आहे, असे  पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, “मोदींनी दिलेली हमी ही सुरतमधील जनतेच्या दीर्घकालीन परिचयाची आहे.” ते म्हणाले की हिरे बाजार हे सुरतच्या लोकांसाठी मोदींच्या हमीचे उदाहरण आहे. हिरे व्यापारातील लोकांशी केलेली चर्चा, दिल्लीत 2014 मध्ये झालेली जागतिक हिरे परिषद व या परिषदेतील हिरे व्यापारासाठी क्षेत्र अधिसूचित करण्याची घोषणा आणि त्यातून सुरतेत साकारलेला मोठा, एकछत्री हिरे बाजार या प्रवासाच्या स्मृतींना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. “पारंपरिक हिरे व्यावसायिक, कारागिर आणि व्यापारी या सर्वांसाठी सुरत हिरे बाजार हे वन स्टॉप केंद्र ठरला आहे, ” असे पंतप्रधान म्हणाले. या बाजारात आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्या, दागदागिन्यांचा मॉल या सुविधा उपलब्ध होणार असून त्यातून 1.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

सुरतेच्या सक्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या अर्थव्यवस्थेने जगात 10 व्या क्रमांकावरून 5 वा क्रमांक गाठल्याचा उल्लेख केला. ही अर्थव्यवस्था मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात  तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची हमी असल्याचे ते म्हणाले. आपल्या सरकारकडे पुढच्या 25 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलिअन डॉलर व त्यानंतर 10 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा आराखडा तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

निर्यातवाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या हिरे व्यापाराची यात मोठी भूमिका असेल. हिरे व्यापारातील मातब्बर व्यक्तींनी  सुरतहून देशाची निर्यात वाढवण्याच्या शक्याशक्यता आजमावून पाहाव्यात. भारत सध्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत अग्रणी आहे, सिल्वर कट हिरे आणि प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीसह देशाचा मौल्यवान खडे, दागिन्यांच्या निर्यातीतील वाटा फक्त 3.5% आहे. “मात्र सुरत ने ठरवले तर हा वाटा दोन अंकी संख्येवर जाईल,” असे सांगत सरकारच्या पाठबळाचा त्यांनी पुनरुच्चार केला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हे क्षेत्र प्राधान्याचे म्हणून घोषित करणे, नक्षीसाठी पेटंटला प्रोत्साहन, निर्यातक्षम उत्पादनांमध्ये विविधता आणणे, चांगल्या तंत्रज्ञानासाठी सहकार्य, प्रयोगशाळेत हिरे उत्पादनाला, ग्रीन डायमंडला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी आदी उपाययोजना करण्याचा मानस असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगाच्या भारताकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा आणि ‘मेक इन इंडिया’ ब्रँडची वाढती लोकप्रियता यांचा हिरे क्षेत्राला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरतच्या  क्षमता  वाढवण्यासाठी  शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकार भर देत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे आणि हजिरा बंदरासह सुरतमधील बंदरे, खोल पाण्यातील एलएनजी टर्मिनल आणि बहुद्देशीय मालवाहतुकीसाठी बंदर यांनी सुरतला अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रांशी जोडले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगातल्या मोजक्याच शहरांना अशी आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटी असल्याचे त्यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्प आणि  वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे सुरु असलेले काम यामुळे सुरतची उत्तर आणि पूर्व भारताशीही असलेली जोडणी अधिक दृढ होईल, दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गामुळे सुरतमध्ये व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, या सर्वांचा शहरवासियांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सुरतेच्या प्रगतीमुळे गुजरातची प्रगती शक्य होईल व पर्यायाने देशाचीही प्रगती होईल, असे सांगून पंतप्रधानांनी पुढच्या महिन्यात नियोजित ‘वायब्रंट गुजरात शिखर परिषदे’साठी शुभेच्छा दिल्या.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय व पुरषोत्तम रुपाला, केंद्रीय राज्य मंत्री दर्शना जरदोश, खासदार सी. आर. पाटील, सुरत हिरे बाजाराचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी, धर्मानंदन डायमंड लि.चे लालजीभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अधिक माहिती

सुरत हिरे बाजार हे जगातील अत्याधुनिक व सर्वात मोठे हिरे व दागिने व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र असेल. पॉलिश केलेले आणि न केलेले हिरे आणि आभूषणे व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल. इथे आयात व निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाचे कार्यालय, किरकोळ व्यवहारांसाठी दागिने मॉल व आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्यांची सुविधा यांचा समावेश असेल

हृदयरुपी समुद्राच्या मंथनातून निघेल अमृतकलश -कवी डॉ. कुमार विश्वास 

 पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी उद्बोधन 

पुणे : आपण पूजा करतो, परमेश्वराची प्रार्थना करतो, ती प्रत्येकाने मनापासून करायला हवी. जेवढी मनापासून प्रार्थना करू, त्यापेशा जास्त श्रद्धेने ईश्वर आपला स्वीकार करेल. समुद्रमंथानातून १४ रत्ने निघाली ही आपली आस्था आहे. जशी समुद्राची खोली काळात नाही, तशी ह्रदयाची खोली देखील कळत नाही. त्यामुळे आपण या ह्रदयरुपी समुद्राचे मंथन करत राहायला हवे, त्यातून शेवटी नक्कीच अमृतकलश प्राप्त होईल, अशी आशा प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी पुणेकरांशी बोलताना व्यक्त केली. 

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे  ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या दुस-या  दिवशी (शनिवार, दि.१६ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. 

श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, रामा रामा रटते रटते…बिती रे उमरिया, जो सुख पायो राम भजन मै, बोलो जय हनुमान यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. 

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, समुद्रमंथनाच्या सुरुवातीला ‘विष’ बाहेर आले. त्याप्रमाणे आजच्या काळात सुरुवातीला प्रत्येकाला विषरुपी अपमानाला सामोरे जावे लागते. त्यानंतरच आपल्याला प्रतिभारूपी गाय म्हणजे ‘कामधेनू’ प्राप्त होते. त्यानंतर हळूहळू आपल्या संकल्पाना गती देणारा ‘उच्चैश्रवा’हा घोडा मिळतो. त्यावर बसून संघर्ष करणा-या आणि दृष्ट्या भावाने जगाकडे पाहणा-या व्यक्तीस ‘ऐरावत’ हत्ती मिळतो. 

ते पुढे म्हणाले, अशा यशस्वीतेच्या हत्तीवर बसून मार्गक्रमण करताना जग आपल्या कपाळावर ‘कौस्तुभ मणी’ रुपी विजय तिलक लावते. त्यानंतर आपण जी इच्छा मागू, ती पूर्ण करणारा ‘कल्पवृक्ष’ आपल्याला प्राप्त होतो. याच वेळी अनेकदा अप्सरा रुपी असलेली ‘रंभा’वासनेच्या रूपात येण्याची शक्यता देखील असते. त्या अप प्रवृत्तीवर विजय मिळविला, तर ‘लक्ष्मी’ माता आपल्यावर प्रसन्न होते आणि ‘चंद्र’ शीतलतेच्या माध्यमातून विराजमान होतो. त्याचवेळी आपल्या विजयाचा घोष ‘पांचजन्य’ च्या माध्यमातून जगात दुमदुमतो. अंतिम टप्प्यात जगातील दु;खावर उपचार करणारा ‘धन्वतरी’ प्राप्त होतो आणि शेवटी ‘अमृत’ मिळवून आपण मृत्यूनंतरही जिवंत राहतो, हे समुद्रमंथन, १४ रत्ने आणि मानवी जीवनातील संबंधाचे सार आहे. 

पुण्यामध्ये गणेशोत्सवात आनंद व दु:खाचा मिलाफ हीच खरी आस्था 

गणेशोत्सवात पुण्यामध्ये मातीच्या गणपतीचे आगमन होते, त्यानंतर उत्साहात पूजन आणि विसर्जन होते. यावेळी आगमन होताना पुणेकरांच्या चेह-यावर आनंद असतो आणि विसर्जनाच्या वेळी पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा दिसतात, तेथे दु:ख असते. त्यामुळे पुण्यात आस्था प्रत्येकामध्ये दिसून येते. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला. त्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा होतो. ती ठेवणे चुकीचे नाही, मात्र त्यामागे वेडे होणे चुकीचे आहे. महत्वाकांक्षा अमृत आहे, तर त्यातून काहीतरी मिळविण्याची हावरटपणाची वृत्ती ही विष आहे. हेच आजच्या युवकांना अध्यात्माद्वारे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

वैभव वाघ लिखित ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन

मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवेल-परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव

पुणे : “मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवतो. समाजातील प्रत्येकाने कर्तव्य हाच धर्म मानून मानवी कल्याणाचे काम केले, तर देशात, समाजात शांततेचे वातावरण नांदेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती व त्याच्या पूर्तीसाठी कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड उपयोगी ठरते,” असे मत  कारगिलच्या लढ्यातील शौर्याबद्दल १९ व्या वर्षी परमवीर चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव यांनी व्यक्त केले. तरुणाईने तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्याचा गरजेपुरता चांगला वापर करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. 
सामाजिक जाणीवेतून वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘#व्हायरल_माणुसकी’, निगेटिव्ह काळातील पॉजिटीव्ह गोष्ट पुस्तकाचे प्रकाशन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते झाले. प्रसंगी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे संचालक शरद तांदळे, वैभव वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक लोकांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या योद्ध्यांची कथा वाघ यांनी या पुस्तकातून मांडली आहे. प्रसंगी या लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातांचा, तसेच कोरोना काळात कार्यरत विविध संस्थांचा सन्मान यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
योगेंद्रसिंग यादव म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या पावन भूमीवर येणे, हे माझे भाग्य समजतो. कोरोना काळात वाघ यांनी केलेले कार्य कौतूकास्पद आहे. आपल्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्व आहे. आईच आपल्याला जीवन जगत असताना प्रेरित करते. भारत देशाला आपण माता संबोधतो. आईच्या प्रेरणेतून हे कार्य करण्याची ऊर्जा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. वाघ यांनी आपल्या सामाजिक जाणिवेतून समाजाप्रती कर्तृत्वाचे जबाबदारीचे, केलेल्या कार्याचे शब्दांमधून बंधुतेचे, मानवतेचे उत्तम दर्शन घडवले आहे.”
“मानवता हाच धर्म समजून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मानवतेचे कल्याण व आपल्या संस्कृतीचे संरक्षण करायचे असेल, तर आपण सर्वानी एकत्र येऊन समाजाप्रती असणारी कर्तव्ये, भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीयांमध्ये रुजवायला हवीत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल स्वतःला एक सूत्रामध्ये बांधायला हवे. भारतीय म्हणून संरक्षण करायचे असेल, तर प्रत्येकाला सैन्यात जायची गरज नाही. आपण आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडूनही राष्ट्रभक्ती करता येते,” असेही योगेंद्रसिंग यादव म्हणाले.
योगेंद्रसिंग यादव पुढे म्हणाले, “देशाची प्रगती साधायची असेल, तर शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. सामाजिक शांततेप्रमाणे वैयक्तिक शांतताही महत्वाची आहे. जीवनात यशस्वी व्हायचे, तर स्वप्न बघा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रत्येक गोष्टीकडे सकरात्मकतेच्या दृष्टीने पाहायला हवे. नकारात्मक विचार दूर ठेवून स्वतःला आत्म्याशी जोडून घ्यावे. नैराश्यातून बाहेर येण्यास ‘#व्हायरल_माणुसकी’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परंतु त्याचा अत्याधिक वापर आपल्यासाठी घातक आहे, हे समजायला हवे. जेव्हा आपण एखाद्या अधिकाराविषयी बोलतो तेव्हा त्यासोबतच येणाऱ्या कर्तव्यांची जाण असायला हवी. ध्येयपूर्तीसाठी उद्दिष्ट, आवड आणि प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.”
वैभव वाघ म्हणाले, “कोरोना काळातील चळवळीतून ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाची सुरुवात झाली. आज अनेकदा युवा पिढी नैराश्याने ग्रासलेली दिसते. हेच नैराश्य दूर करायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहावे. या दोन वर्षांच्या कठीण काळातील नकारात्मक वातावरणात घडलेल्या अनेक सकारात्मक गोष्टींचा हा लेखाजोखा आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अनेक योद्ध्यांनी केलेल्या कार्याची कथा यातून मांडली आहे.”
सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले. शरद तांदळे यांनी आभार मानले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची कर्वेनगर येथे उपस्थिती

पुणे दि.१६- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्वेनगर चौक येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी यात्रेबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य गरजू नागरिकांना देण्यासाठी योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहीचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यात्रेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानात दीड कोटी पेक्षा अधिक पुरुषांची आरोग्य तपासणी

0

पुणे, दि. १६– राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत १ कोटी ५९ लाख पेक्षा अधिक पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आले आहे.

अभियानांतर्गत १६ डिसेंबर पर्यंत १८ वर्षांवरील १ कोटी ५९ लाख ५१ हजार ४०९ पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यापैकी १ कोटी ५० लाख ७ हजार ७७५ लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ८५ हजार ७०३ लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आलेले आहेत, तर जवळपास १८ हजार ८०१ लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत आणि गरजेनुसार रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे, गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर अॅपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे

पुस्तक महोत्सवाने सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली- डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे उद्घाटन

पुणे दि.२३: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाने सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणून पुण्याची मान उंचावली आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, शहीद भगतसिंह यांचे पणतू यादवेंद्रसिंग संधू, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पुणे पुस्तक महोत्सवासारखा जनतेचा सोहळा इतरत्र पाहिला नसल्याचे नमूद करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने पुस्तकांशी संवाद घडतो. पुस्तक मार्गदर्शन करतात, सांत्वन करतात, विचार देतात, समाजातील एकोपा वाढवितात. त्यामुळे पुस्तक वाचनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उदारीकरणाचा फायदा मध्यमवर्गाला होत असल्याने शिक्षणाचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, डिजिटल माध्यमांमुळे वाचन संस्कृतीला धक्का पोहोचतो आहे, असेही त्या म्हणाल्या.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि पुण्याच्यादृष्टीनेही महत्वाचा असा हा पुस्तक महोत्सव आहे. महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना मोफत देण्यात येणार आहे. चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग ही पुण्याची संस्कृती असल्याने महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव साहित्य , कला आणि खाद्य संस्कृतीचा महोत्सव असून २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ग्रंथ चळवळीशी संबंधित सर्व घटकांना एका ठिकाणी आणून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. भांडारकर संशोधन संस्थेतील ज्ञानभांडार अनुवादित करून देशभरात पोहोचविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यास करेल, असे त्यांनी सांगितले.

श्री.संधू म्हणाले, शहीद भगतसिंग यांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गीत लिहिल्यावर महाराष्ट्र आणि त्यांच्या कुटुंबाचे नाते जोडले गेले. त्यांनी कारागृहात असताना शंभरपेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन केले. त्यांनी लिहिलेली जेल डायरी पुणेकरांना पाहता यावी यासाठी महोत्सवात ठेवण्यात येत आहे. या डायरीच्या दर्शनाने युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच पुणे पुस्तकांचे केंद्र म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक श्री.मलिक म्हणाले, देशातील कोणत्याच पुस्तक महोत्सवात स्थापित झाले नाहीत असे चार विश्वविक्रम पुण्याच्या महोत्सवात होत आहे. पुण्याला जगातील पुस्तकांची राजधानी म्हणून स्थापित करण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यास सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी राज्य शासनाचे विशेष सहकार्य मिळल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.पांडे यांनी केले. पुस्तक प्रदर्शनातील २५० दालनात २० पेक्षा अधिक भाषांमधील २० लाख पुस्तके उपलब्ध आहे. महोत्सवात १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.

श्री. संधू यांच्या हस्ते ‘हिंदवी स्वराज्य स्थापना- शिवराय छत्रपती झाले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तके महोत्सवाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी सकाळपासून १० हजार पुस्तक प्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिली.

कार्यक्रमपूर्वी विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्या-त्या देशाचे नृत्य आणि संगीत सादर केले. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ या १८ हजार ७५१ पुस्तकांनी ‘जयतू भारत’ हे जगातील पुस्तकांनी बनलेले सर्वात मोठे वाक्य बनवून विश्वविक्रम साकार करण्यात आला. यापूर्वीचा विक्रम ११ हजार १११ पुस्तकांचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे स्वप्नील डांगोरीकर यांनी याबद्दलचा निकाल जाहीर केला व आयोजकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले.
000

इच्छाशक्तीवर उभा राहिलेला तिरंदाज- आदिल अन्सारी

त्याच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होते. पण, बारावीत असताना झालेल्या एका अपघाताने त्याला कायमस्वरुपी दिव्यांग केले. पण, यानंतरही तो स्वस्थ बसला नाही. यातूनही तो उभा राहिला आणि तिरंदाजीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सराव आणि मेहनतीने उभा राहत आता पॅरालिम्पिकचे वेध लागलेला हा खेळाडू म्हणजे मुळ भिवंडीचा पण, पुण्यात रणजित चामले यांच्याकडे प्रशिक्षण घेणारा आदिल अन्सारी.
पॅरालिम्पिकची तयारी करत असतानाच आदिलने प्रवासात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतही आपली छाप पाडली आणि महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. हातानेही धनुष्याची प्रत्यंचा ओढायला जेथे कठिण जाते, तेथे आदिल तोंडाने प्रत्यंचा ओढतात. अपघातात त्यांच्या हात आणि पायाच्या बोटांमधील संवदेना जवळ जवळ संपुष्टात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या धनुष्यातही आवश्यक ते बदल करून घेतले. आता तो यासगळ्याला चांगला सरावला आहे. दिव्यंगत्व आल्यानंतरही खेळात कारकिर्द घडविण्याचा ध्यास घेतलेल्या आदिलने पोहण्यापासून सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकही मिळविले. मात्र, त्यानंतरही जलतरण व्यवस्थापनाने त्यांना पोहण्यास मनाई केली. सुवर्णपदकानंतर मला अडवलसे जाणार नाही असे वाटले होते. मात्र, माझी शारीरिक स्थितीपाहून त्यांनी मला पोहण्यापासून दूरच ठेवले. त्याचवेळी तिरंदाजी प्रशिक्षक चामले यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या प्रेरणेने मी तिरंदाजीचा सराव करायला सुरुवात केली असे आदिल सांगतो. आशियाई क्रीडा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ आदिलने आता खेलो इंडियातही आपला दबदबा राखला. आशियाई स्पर्धेतील यशानंतर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी संवाद साधला होता. हा आपल्या कारकिर्दीमधील मोठा क्षण असल्याचे तो मानतो.
आदिलच्या कामगिरी संदर्भात प्रशिक्षक रणजित चामले यांच्याशी संपर्क साधला असता, ‘डब्लूवन’ या पॅरा तिरंदाजीतील कठिण प्रकारातील आदिल सर्वात यशस्वी तिरंदाज आहे. आज तो अव्वल क्रमांकाचा तिरंदाज आहे. प्रचंड मेहनत करून त्याने यश मिळविले आहे आणि त्याने पॅरालिम्पिकचे उद्दिष्ट बाळगले असून, तो त्यातही यशस्वी होईल, असे चामले यांनी सांगितले.

तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

0

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा:डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिल

नवी दिल्ली – क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची थकलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा शनिवारी तिरंदाज आदिल अन्सारीने पूर्ण केली.
पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. आदिल आणि नवीन ही जोडी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीमधील सुवर्णपदक विजेती जोडी आहे. या दोघांमध्येच अंतिम झुंज होणार हे अपेक्षित होते. त्या प्रमाणेच झालेल्या या अंतिम लढतीत आदिलने पहिल्या सेटपासून एकतर्फी वर्चस्व राखले. यात दुसऱ्या सेटला दोनदा आणि चौथ्या सेटला दोनदा १० गुणांचा वेध घेत आदिलने आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर अखेरचा सेटही तेवढाच अचूक खेळत त्याने सुवर्णपदक निश्चित केले. नवीनला आज आदिलच्या सातत्यसमोर टिकताच आले नाही. त्याला लय गवसली नाही. मात्र, आता आम्ही दोघेही नव्याने पॅरा ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचे सांगितले.

डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिल
पदार्पणामध्ये या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्यासाठी मी खास डावपेच आखले हाेते. यामुळे मला यानुसार दर्जेदार कामगिरी करता आली. यातूनच मी चॅम्पियन हाेण्याचे स्वप्न यशस्वीपणे साकारले. यासाठी मला  सर्वांचे माेलाचे सहकार्य लाभले, अशा शब्दामध्ये आदिलने सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.

आदिलची कामगिरी कौतुकास्पद : नीतू इंगोले
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतची आदिलची कामगिरी कौतुकास्पद ठरली. याच दर्जेदार कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवता आला. महाराष्ट्र संघासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली. यातून महाराष्ट्र संघाच्या नावे तिरंदाजीमध्ये विक्रमी पदकाची नोंद झाली, अशा शब्दामध्ये मुख्य प्रशिक्षक नीतू इंगोले यांनी पदक विजेत्या आदिलच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे पुरुष खेळाडू अंतिम फेरीत
टेबल टेनिस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, महिला विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
पुरुषांच्या पहिल्या एकेरीच्या उपांत्य लढतीत दत्तप्रसाद चौगुलेने तमिळनाडूच्या नितिशचे आव्हान कडव्या प्रतिकारानंतर ११-७, ११-५, ९-११, ११-८ असे परतवून लावले. त्यानंतर विश्व तांबेने अंतिम फेरी गाठताना दिल्लीच्या योगेश मुखर्जीचा एकतर्फी लढतीत ११-६, ११-७, ११-३ असा पराभव केला.
अशोक कुमार आणि रिषित नथवानी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातच्या ध्रुव योगेश चुघने अशोककुमारचा तीन सेटच्या लढतीत ११-६, ११-५, ७-११, ११-६ असा पराभव केला. पवन कुमार शर्माने महाराष्ट्राच्या रिषीत नथवानीचे आव्हान असेच तीन गेमच्या लढतीत ११-६, ११-७, १२-१०, ११-५ असे संपुष्टात आणले.

महिलांमध्ये वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हा दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला. चंडिगडच्या पूनमने वैष्णवीचे आव्हान ११-८, ७-११, ११-६, ११-९ असे मोडून काढले. गुजरातच्या भाविका कुकोडियाने उज्वलाचा ११-३, ११-९, ११-७ अस पराभव केला.

महाराष्ट्राचे सहावे स्थान कायम
पदक तालिकेत महाराष्ट्र १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्राँझ अशा २८ पदकांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. हरियानाने पदकाचे शतक गाठले असून, आघाडी कायम राखताना त्यांना आतापर्यंत ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि २४ ब्राँझपदके मिळविली आहे. उत्तर प्रदेश (२४, २१, १०) दुसऱ्या, तमिळनाडू (१८, ७, १३) तिसऱ्या, गुजरात (१४, १८, १६) चौथ्या आणि राजस्थान (१०, २०, १३) पाचव्या स्थानावर आहेत.

“नोकऱ्यांमधील वाढती स्त्री-पुरुष असमानता चिंताजनक”

करोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर देशातील नोकऱ्यांमध्ये स्त्री – पुरुष  असमानता  चिंताजनक रीत्या वाढल्याचे नुकत्याच एका प्रसिद्ध झालेल्या पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला वर्गाला नोकऱ्यांमध्ये डावलण्यात येत आहे. एका बाजूला शहरी भागातही एकूणच रोजगार उपलब्धतेमध्ये घसरण होत आहे. रोजगार विषयक या अहवालाचा घेतलेला हा धांडोळा.

करोना महामारीच्या काळामध्ये शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर गदा आली. शासनाने लादलेल्या निर्बंधामुळे कामाच्या ठिकाणी नोकरदारांना जाता येत नव्हते. परिणामतः वर्क फ्रॉम होम नावाची संकल्पना अस्तित्वात आली व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांनाच दिवस-रात्र वर्क फ्रॉम होम करावे लागले. मात्र करोनाची बंधने उठली आणि नंतर पुन्हा एकदा सर्व शहरांमधील कार्यालयांमध्ये नोकरदार वर्गाला  हळूहळू पाचारण करण्यास प्रारंभ झाला.मात्र गेल्या एक-दोन वर्षाचा शहरी भागातील रोजगाराचा आढावा घेतला असता दरमहा वेतन घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये लक्षणीय घसरण झालेली आढळली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही मध्ये म्हणजे एप्रिल ते जून 2023 या कालावधीत 54 टक्के महिलांना नोकऱ्या दिल्या जात होत्या. जुलै ते सप्टेंबर 2023 या दुसऱ्या तिमाही मध्ये यात लक्षणीय घट झाली असून केवळ 52.8  टक्के महिलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. महिला नोकरदारांची ही घसरलेली टक्केवारी चिंताजनक असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या सहा वर्षात सातत्याने शहरी भागातील नोकऱ्यांचे प्रमाण सातत्याने कमी कमी होत जाताना दिसत आहे. नोकरदार महिलांच्या तुलनेत स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या टक्केवारीत मात्र या सहा महिन्यात नोंद घेण्याइतकी वाढ होऊन ती 39.2 टक्क्यांवरून 40.3 टक्क्यांवर गेली आहे.

अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट( आयआयएम) या संस्थेने देशातील महिला व पुरुषांच्या दिवसांमधील घरकामाच्या तासांची पाहणी केली होती.  या पाहणीत असे आढळले की महिलावर्ग दररोज 7.2 तास सरासरी कोणतेही वेतन न घेता काम करीत असतात मात्र पुरुष वर्ग घर कामासाठी दिवसभरात केवळ 2.8 तास काम करतात. घरकाम करणाऱ्या देशातील सर्व महिलांना जर त्यासाठी वेतन दिले तर ती रक्कम देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपीच्या 7.5  टक्के इतकी मोठी आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने याबाबत केलेल्या पाहणीमध्ये या आकडेवारीला दुजोरा दिलेला आहे. जून 2018 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये केलेल्या पाहणीमध्ये स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या टक्केवारीत लक्षणीय म्हणजे 14 टक्के वाढ होऊन 65 टक्के महिला स्वयंरोजगार करणाऱ्या होत्या. मात्र नंतरच्या दोन वर्षांमध्ये त्यात लक्षणीय घसरण झालेली आहे. करोना महामारीच्या पूर्वी देशातील 30 टक्के महिला नोकऱ्या किंवा स्वयंरोजगार करीत होत्या.  करोनानंतर त्यात तीन टक्के वाढ झालेली असली तरी आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा ही टक्केवारी खूपच कमी आहे. आपल्यापेक्षा श्रीलंका, बांगलादेश व नेपाळ या शेजारी राष्ट्रांमध्ये महिलांच्या नोकऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर महिला व पुरुषांच्या वेतनामध्येही गेल्या काही वर्षात मोठी तफावत आढळलेली आहे. जे काम पुरुष वर्ग करतो तेच काम महिलांनी केले तर त्यांना मिळणाऱ्या वेतनामध्ये लक्षणीय फरक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना केवळ 76 टक्के वेतन दिले जाते असे पाहणी मध्ये आढळलेले आहे.

महिलांच्या रोजगारामध्ये ही तफावत मोठ्या प्रमाणावर दिसत असली तरी उच्च पदस्थ पदांवरील महिलांमध्ये यापेक्षा फार काही परिस्थिती वेगळी नाही. देशातील विविध  कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालकपदी काम करणाऱ्या  व्यक्तिं मध्ये महिलांचे प्रमाण केवळ 24.7 टक्के आहे. कंपनी कायद्यानुसार नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्यांच्या स्वतंत्र संचालक पदाची पाहणी केली असता ही आकडेवारी खाली गेलेली असून ती केवळ 19.7 टक्के इतकी आहे.

पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये डावलण्याची जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये पुरुषसत्ताक समाजातील  पूर्वग्रहदुषित पद्धती व महिलांची सुरक्षितता अशी  दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. भारतातील महिलांवर त्यांच्या कुटुंबामध्ये कराव्या लागणाऱ्या घरकामाचा मोठ्या प्रमाणावर दबाव असतो. घरातल्या महिलेने घर कामाला प्राधान्य द्यावे अशी मानसिकता बहुतेक सर्व पुरुषांच्या मध्ये आढळते. त्यामुळे नोकरी करण्यासाठी किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्याची तयारी पुरुष वर्गामध्ये कमी आढळते. देशातील खाजगी क्षेत्राबरोबरच सार्वजनिक क्षेत्रांमध्येही महिलांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवण्याची गरज आहे. केवळ केंद्र सरकारनेच नाही तर प्रत्येक राज्यातील सरकारांनी महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी व त्यांच्या भरतीसाठी सर्वांकष प्रमाणात योजना हाती घेण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांसाठी  सर्वसमावेशक वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे.

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ कल्पनेच्या पलीकडे लोकप्रिय आहे. या खेळाची मक्तेदारी असलेल्या बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे बीसीसीआय या क्लब ने गेल्या वर्षी पुरुष व महिला क्रिकेटर्सना “समान वेतन” दिले जाईल अशी घोषणा केली होती. महिलांच्या प्रीमियर लीग मध्ये त्यांना जास्त रक्कम मानधनाची जास्त रक्कम दिली जाईल असेही सांगण्यात आले होते.  प्रत्यक्षात परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती निश्चितच पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना डावलणारी  होती. स्मृती मानधना या लोकप्रिय महिला खेळाडूला सर्वाधिक म्हणजे 3.4 कोटी रुपये बोली लावण्यात आली. मात्र पुरुषांच्या आयपीएल मध्ये सॅम करन  या परदेशी क्रिकेटपटूला पंजाब किंग संघाने 18.5 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. त्यामुळे भारतात पुरुष व महिला यांच्यामध्ये असलेली एकूणच कामाची वेतनाची किंवा लिलावातील बोलीची तफावत लक्षणीय आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ऑक्सफॅम इंडिया यांनी 2022 मध्ये महिला पुरुष यांच्यातील भेदभावाबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये भारतातील महिलांना केवळ नोकरी भरती मध्येच भेदभाव केला जातो असे नाही तर नोकरी करताना दिल्या जाणाऱ्या वेतनामध्ये लक्षणीय भेदभाव केला जातो असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. या अहवालातील एका आकडेवारीनुसार किरकोळ काम किंवा कॅज्युअल काम करणाऱ्या पुरुषांना 9017 रुपये सरासरी मासिक वेतन दिले जात होते मात्र त्याच कामासाठी महिलांना केवळ 5709 रुपये वेतन दिले जात होते. त्याचप्रमाणे नेहमीच्या नोकऱ्यांमध्येही पुरुषांना सरासरी 19,779 दिले जात होते तर त्याच कामासाठी महिलांना 27 टक्के रक्कम कमी देऊन ती 15,578 रुपये इतके दिले जात होते.या अहवालानुसार शहरी भागातील स्वयंरोजगार मिळणाऱ्या महिलां व व पुरुषांमध्ये खूपच मोठी तफावत आढळलेली होती.

गेल्या काही वर्षांमध्ये नोकऱ्यांमध्ये किंवा स्वयंरोजगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढताना दिसत असला तरीसुद्धा तज्ञांच्या मते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये तसेच ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्येही महिलांचा सहभाग विविध कारणांमुळे कमी आहे. “चूल आणि मूल” याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या क्षमतेचा वापर करण्याची सामाजिक मानसिकता फार कमी प्रमाणात असल्याने महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीला  सामोरे जावे लागते.

भारतीय महिलांच्या राष्ट्रीय महासंघाच्या सरचिटणीस अँनी राजा यांनी याबाबत अत्यंत परखडपणे सांगितलेले आहे की सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात मोठ्या प्रमाणावर तफावत असून  चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात दिलेली आकडेवारी व वस्तुस्थिती ही अत्यंत खेदजनक आहे. भारतातील महिला वर्गाला कुपोषण, अशक्तपणा (  अँनेमिक कंडीशन), बालमृत्यु, स्रीभृणहत्या अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. देशाचा खऱ्या अर्थाने समतोल विकास साधावयाचा असेल तर पुरुष आणि महिला यांच्यातील ही तफावत विविध मार्गांनी कमी करून महिलांना रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

भारतातील महिलांचा अभ्यास केलेल्या मेरी जॉन यांनी असे मत व्यक्त केले आहे की कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी, कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणाची प्रतिकूलता आणि चांगल्या नोकऱ्यांचा अभाव अशा विविध कारणांमुळे देशात महिलांना चांगल्या शिक्षणाची सुविधा असूनही त्याचे प्रत्यक्षात रूपांतर नोकऱ्यांमध्ये किंवा रोजगारामध्ये होताना दिसत नाही. अनेक पदवीधर व सुशिक्षित महिला यांना घर कामांमध्येच गुंतवून ठेवले जाते. बाळांच्या तसेच सर्व कुटुंबाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच टाकली जाते आणि त्याचा कोणताही मोबदला  दिला जात नाही.  दुसरीकडे चांगले शिक्षण घेतलेल्या महिलांनाही घर कामाला झोपले जाते आणि नोकरीपासून वंचित ठेवले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्री पुरुष समानता विषयक अनेक तरतुदी आहेत. परंतु देशातील एकूणच राजकारण्यांनी या विषयाचा चोथा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर स्त्री पुरुष असमानतेची दरी कमी करणे हे सरकारच्या निश्चित हातात आहे. त्यांनी त्या दृष्टीने सकारात्मक धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे.

-लेखक :प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

0

नागपूर दि. १६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना  प्रवाशांकडून जाणून घेतल्या. मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे या परभणी येथून नागपुरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या प्रवाशाने सांगितले. इतर प्रवाशांनी देखील मेट्रो बाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना श्री पवार यांनी मेट्रोरेल्वे प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागपूरच्या हिरवळीचे कौतुक

प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री. हर्डिकर यांचेकडून घेतली. नागपुरात सर्वत्र दिसत असलेल्या हिरवळीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

०००

डॉ. शर्वरी इनामदार यांनी जिंकला स्ट्रॉंग वुमन एशिया किताब,आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मलेशिया

पुणे : जोहर बाहरू- मलेशिया येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया किताब पटकावला.  १३४ किलोच्या आशियाई स्कॉट रेकॉर्ड सह ३५६.५ किलो एकूण वजन उचलत  शर्वरी इनामदार यांनी भारतासाठी विजयश्री खेचून आणली.

कझाकिस्तान, जपान, चायना, कुवेत, मंगोलिया, पाकिस्तान, कतार, फिलिपिन्स, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, थायलंड इत्यादी २६ देशांचे सुमारे ४५० स्पर्धक सहभागी झाले होते.  

बेस्ट लिफ्टर होण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाची फाम थाओ आणि हॉंगकॉंगची जेनिफर मेकॉंमबी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकासह त्यांनी मानाचा “स्ट्रॉंग वुमन एशिया” हा किताबही पटकावला. २०२३ मधील क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर लगेचच झालेल्या या आशियाई स्पर्धेत त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व टिकवून ठेवले. आशियाई रेकॉर्ड, टोटलचे गोल्ड मेडल, स्कॉट गोल्ड मेडल, डेडलिफ्ट सिल्व्हर मेडल, बेंचप्रेस सिल्व्हर मेडल, “स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया” टायटल असे चौफेर यश मिळवत त्यांनी स्पर्धा गाजवली. “आहार “आयुर्वेद क्लिनिक व “कोड ब्रेकर” जिम च्या संचालिका डॉ. शर्वरी यांचे या अतुलनीय कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक होत आहे. आपले कुटुंबीय, आप्तेष्ट व देशासाठी खेळण्याची जिद्द यामुळे सतत न थकता प्रयत्न करण्याची ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले.

रितेश कुमारांचे शतक पार ..नितीन दत्तात्रय रणझुंजारआणि त्याच्या दोन साथीदारावर मकोका कारवाई ठरली १०१ वी ..

पुणे- १०० कारवायात साडेसहाशे आरोपींना मकोका चा झटका दिल्यानंतर आता पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी हे शतक पार करत मकोका ची १०१ वी कारवाई पूर्ण केली आहे. धायरीगाव चा नितीन दत्तात्रय रणझुंजार (टोळी प्रमुख) व त्याचे इतर दोन साथीदार यांचेवर मकोका कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी येथे दिली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक २८/११/२०२३ रोजी फिर्यादी यांचे अंबाईमाता मंदीराजवळ धायरी पुणे येथील दुचाकी व चारचाकी वाहनाचे गॅरेज व वॉशिंग सेंटर असुन त्याठिकाणी असलेल्या बिल्डींग बांधकामाच्या वादातुन टोळी प्रमुख आरोपी नामे नितीन दत्तात्रय रणझुंजार व त्याचे टोळीतील त्याचे साथीदार नामे १. किरण युवराज भिलारे वय २१ वर्षे, रा. सई बिल्डींगच्या मागे, प्लॉट नं.०१, जय महाराष्ट्र मंडळ चव्हाटा, मारुती मंदिराजवळ, धायरी पुणे व २. हर्षद नामदेव खोमणे, वय २३ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीरामागे, नाईक आळी, नं ३६ धायरी, पुणे यांनी दुचाकी वरुन येवुन गॅरेजमध्ये घुसुन तेथे असलेल्या वॉचमनला धारदार हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व त्यांचे कुटुंबास धारदार हत्याराचा धाक दाखवुन गॅरेजच्या शेड मध्ये लावलेल्या सहा दुचाकी वाहनांना व चार चारचाकी वाहनाना पेट्रोल ओतुन आग लावुन गॅरेज परिसरात पार्क केलेल्या इतर सहा वाहनांचे काचा फोडुन नुकसान केले. तसेच गॅरेजच्या ऑफिसची काच फोडुन आत मध्ये प्रवेश करुन सर्व सामानाची तोडफोड करुन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व एक टॅब तसेच ड्रॉवर मध्ये ठेवलेले ४ हजार रुपये आणि टेबलावरील एक सीपीयु ची जबरी चोरी करुन हातातील धारदार शस्त्र हवेत फिरवुन मी एक मर्डर करुन जेलमधुन बाहेर आलो आहे, असे म्हणुन परीसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५८१/२०२३ भादवि कलम ३९७,४३५,५०६(२),३४ क्रिमीनल अमेन्टमेंट अॅक्ट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपासादरम्यान आरोपी नामे १) नितीन दत्तात्रय रणझुंजार, वय ३३ वर्षे,रा.२७८, नाईक आळी, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरीगाव, पुणे (टोळी प्रमुख) २) किरण युवराज भिलारे वय २१ वर्षे, रा. सई बिल्डींगच्या मागे, प्लॉट नं.०१, मारुती मंदिराजवळ, धायरी पुणे व ३) हर्षद नामदेव खोमणे, वय २३ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीरामागे, नाईक आळी, धायरी, पुणे यांना अटक करण्यात आली असुन सध्या जेलमध्ये आहेत.
नमुद आरोपी नितीन दत्तात्रय रणझुंजार, वय ३३ वर्षे, रा.२७८, नाईक आळी, भैरवनाथ मंदिरा जवळ, धायरीगाव, पुणे (टोळी प्रमुख) याने स्वतःचे तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणार गट तयार केला. असुन टोळी प्रमुख याचेवर मागील १० वर्षामध्ये खुन, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा, जबरी चोरी, बलाद्ग्रहण करण्यासाठी क्षती पोहाचविण्याची भिती घालणे, किंवा भिती घालण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थाने आग लावणे अशा प्रकारचे गंभिर गुन्हे केले आहेत, टोळी प्रमुख याने आपले वर्चस्व सिंहगड रोड, दत्तवाडी पोलीस स्टेशन या परिसरामध्ये प्रस्थपित व्हावे, दहशत निर्माण व्हावी व आर्थिक फायदा व्हावा यासाठी आपल्या संघटीत टोळीच्या वतीने एकट्याने व टोळीतील सदस्यांनी संयुक्तपणे दहशत पसरवून ते आपली चेनबाजी, शोकबाजी करीत आहेत.

त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभिर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वताःचे टोळीचे फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव होण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरीक्षक, गुन्हे जयंत राजुरकर यांनी मा. पोलीस उप आयुक्त परि ३, पुणे शहर सुहेल शर्मा, यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, यांना सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५८१/२०२३ भादवि कलम ३९७,४३५,५०६(२),३४ क्रिमीनल अमेन्टमेंट अॅक्ट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, यांनी मान्यता दिलेली आहे.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे अप्पासाहेब शेवाळे, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे, (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री. रामनाथ पोकळे मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि.३, पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अप्पासाहेब शेवाळे, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण जाधव यांचेसह सव्र्व्हेलन्स पथकाचे पोउनि गणेश
मोकाशी, स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईन लक्ष देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १०१ वी कारवाई आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता नाहीच .

मुंबई- उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढून पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा असल्याचे नमूद करून रद्द करून निवडणूक घेण्याबाबत कायदेशीरदृष्ट्या पुढील प्रक्रिया राबविण्याचे आदेश 13 डिसेंबरला दिले होते. सदर आदेशात 15 डिसेंबरला उच्च न्यायालयाकडून दुरुस्ती करून बदल करण्यात आला आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता मावळली आहे.

 मुंबई उच्च न्यायालयाने 13 डिसेंबरच्या आदेशात, संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ असेल. असे नमूद होते तर काल 15 डिसेंबर च्या आदेशात, संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असता. असा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. 13 डिसेंबरच्या आदेशातील 11 अनुक्रमांकाच्या मजकुरात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने दुरुस्तीसह सुधारित आदेश देखील काल 15 डिसेंबरला जारी केला आहे.  पोटनिवडणूक टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील १५१ (ए) अंतर्गत दोन अपवाद करण्यात आले आहेत. लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असणे हा पहिला अपवाद आहे. तर कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराईमुळे सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणे अशक्य असल्याने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून निवडणूक आयोगाने प्रमाणित करणे हा दुसरा अपवाद करण्यात आला आहे. पुण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील ‘अ’ व ‘ब’ ही दोन्ही उपकलमे लागू पडत नव्हती कारण पुण्याची जागा २९ मार्चला रिक्त झाली होती. विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत १७ जून २०२४ रोजी संपत आहे. म्हणजेच जागा रिक्त झाली तेव्हा १५ महिन्यांचा लोकसभेचा कालावधी शिल्लक होता. कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, रोगराई वा अन्य कोणतेही कारण पुण्यासाठी लागू होत नाही तरीही आगामी लोकसभेचा कालावधी अत्यल्प व त्याच्या कामातील व्यस्तता असल्याचे कारण देऊन पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जारी केले होते. सदर प्रमाणपत्रच लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने ते रद्द केले.
मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत कायदेशीरदृष्ट्या पुढील प्रक्रिया राबविण्याचे आदेश 13 डिसेंबरला दिले होते. सदर आदेशात 15 डिसेंबरला उच्च न्यायालयाकडून दुरुस्ती करून बदल करण्यात आला. वास्तविकपणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी लागणार असून विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत संपण्यास 6 महिन्यांचाच कालावधी उरलेला आहे त्यामुळे रिक्त जागेचा कालावधी 1 वर्षाहून कमी असल्यास पोटनिवडणूक न घेण्याचा नियमातील अपवाद महत्त्वपूर्ण ठरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेशामध्ये पोटनिवडणूक झाली असती तर संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ असेल, असे नमूद होते मात्र ते सुसंगत नसल्याने संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असता, असा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता मावळली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचा सुरक्षित व भाजपचा गड मानला जाणारा कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला त्यामुळे वरिष्टांकडून या पराभवाची गंभीर दखल घेत रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक टाळण्याच्या रणनीतीचा अवलंब केल्याचे न्यायालयाच्या निकालावरून अधोरेखित झाले. पोटनिवडणूक जाणीवपूर्वक टाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये पोटनिवडणूक टाळण्याची आवश्यकताच नव्हती असा सूर भाजप व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नावांची चर्चा पुणेकरांना पहावयास मिळाली. पोटनिवडणूक जाणीवपूर्वक टाळल्याचे समोर येत असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना पाहायला मिळेल. भाजपकडून अनेक नावे समोर येत आहेत तसेच काँग्रेसकडून देखील अनेक इच्छुक तयारीला लागल्याचे दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक होणार नाही तरी पुण्यातील राजकीय पक्षांच्या तयारीला मात्र वेग आला आहे.
भाजप तर्फे माजी खासदार संजय काकडे , राष्ट्रीय सचिव सुनील देवधर,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे सुरुवातीपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. या शिवाय आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी,अशी भाजपकडे इच्छुकांची अशी मोठी यादी आहे. मात्र यातून एकाची निवड करणं यातच नेतृत्वाची कसोटी लागणार आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट महायुतीत सामील झाला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाची मदत महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रमेश बागवे,अभय छाजेड, आबा बागुल या नावांची चर्चा आहे. रवींद्र धंगेकरांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यात मोहन जोशी यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लोकसभेसाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. मोहन जोशी यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे समर्थक माजी महापौर प्रशांत जगताप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी उपमहापौर दीपक मानकर देखील संधी मिळाल्यास लढण्याची तयारी असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.
दरम्यान लोकसभा कालावधी 6 महिन्यांच्या आत कालावधी राहिल्यास पोट निवडणूक घेता येत नाही, या नियमान्वये देखील पोट निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालात जाण्याची शक्यता असून आदेशातील दुरुस्तीमुळे देखील पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे.

मकोका ची शंभरी.. अप्परइंदिरानगरचा फरार सौरभ शरद शिंदे आणि त्याच्या ४ साथीदारांवर मकोका कारवाई

आता पर्यंत एकूण ६४९ आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई

पुणे – पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्या नंतरची मकोका अंतर्गत १०० वी कारवाई केली आहे.
सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार यांचे वरील मकोका कारवाई हि १०० वी कारवाई ठरली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०८/११/२०२३ रोजी कुसळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतुन आत, तीन मंदिराचे मोकळ्या मैदानात, अप्पर बिबवेवाडी, पुणे. येथे यातील फिर्यादी यांचा मुलगा हा रात्रौ १२.३० वा चे सुमारास जेवण करुन घरी परत येत असताना त्याचे ओळखीचे आरोपी नामे १) सौरभ शिंदे, २) तेजस जगताप, ३) चंदर राठोड, ४) अनिकेत काटकर व ५) पंकज दिवेकर सर्व अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी आपआपसात संगनमतकरुन फिर्यादी यांचा मुलास पकडुन त्यास कुसळकर किराणा मालदुकानाचे गल्लीतुन आत तीन मंदिराचे मोकळ्या मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवुन जावुन पुर्वी झालेल्या वादावरुन सदर आरोपींनी त्यांच्या कडील लोखंडी रॉड व बांधकामासाठी वापरण्यात येणारी लाकडाची फळीने त्याचे दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघा व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं. २३९/२०२३, भा.दं. वि. कलम ३०७,३२३,१४३,१४७,१४८,१४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.
दाखल गुन्हयांचे तपासा दरम्यान आरोपी नामे १) तेजस शंकर जगताप, वय २० वर्षे, रा. बी/३५/१२, अप्परइंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे. (टोळी सदस्य) २) अनिकेत सुधीर काटकर, वय २२ वर्षे, रा. बी/३६/०३, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे. (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन ते सद्या येरवडा जेल पुणे येथे आहेत. तसेच आरोपी नामे १) सौरभ शरद शिंदे वय २२ वर्षे, रा.बी ३५/१२ अप्परइंदिरानगर बि. वाडी पुणे. (टोळी प्रमुख) २) चंदर उन्नप्पा/हुन्नप्पा राठोड, वय २२ वर्षे, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी पुणे. (टोळी सदस्य) व ३) पंकज संजय दिवेकर वय १९ वर्षे, रा. स.नं. ६४९, गणपतीमंदिरा जवळ, खडकेवस्ती, अप्पर बिबवेवाडी पुणे (टोळी सदस्य) हे सदर गुन्हयामध्ये WANTED आरोपी आहेत.
आरोपी सौरभ शिंदे (टोळी प्रमुख) याने टोळीमधील वरील सदस्यांना बरोबर घेवुन दखलपात्र गुन्हा करुन, टोळीची दहशत व वर्चस्व निर्माण करुन, त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा जुलुग जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने बेकायदेशीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दरोडा या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. यातील नमुद आरोपी यांचे विरुध्द वेळोवेळो प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii),३(२), ३(४)प्रमाणे अंतर्भावकरणे कामी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती सविता ढमढेरे यांनी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५, पुणे शहर, श्री. आर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून बिबवेवाडी पोलीस ठाणे, गुन्हा नोंदक्र.२३९/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७,३२३,१४३,१४७,१४८,१४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, शाहुराजे साळवे, हे करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार). रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा,पोलीस उप आयुक्त परि.०५, पुणे शहर, श्री. आर राजा, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग,. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती सविता ढमढेरे, पोलीस उप-निरीक्षक बाळु शिरसट, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे व कृष्णा फुले यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, रितेशकुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भरदेण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली सन २०२३ या चालू वर्षातीस एकूण १०० वी कारवाई आहे. आता पर्यंत एकूण ६४९ आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात

विषय: केंद्रीय संचार ब्युरो (सी बी सी) (जाहिरात आणि दृक प्रसिद्धी संचालनालय) (डी ए व्ही पी) आणि प्रकाशन विभाग संचालनालयाच्या (डी पी डी) कला आणि उत्पादन स्टाफच्या सामान्य संवर्गातील उत्पादन व्यवस्थापन (मुद्रित प्रसिद्धी)/ उत्पादन अधिकारी (उत्पादन) करिता ०१ रिक्त पद प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरण्याबाबत.

संदर्भ: जाहिरात क्रमांक एक – २४०२२/६/२०२३ – एम यु सी – II दि. १७ नोव्हेंबर, २०२३.

………..

वरील संदर्भीय विषयान्वये मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक  (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित (मंत्रालयीन नसलेले) वेतन मॅट्रिक्स स्तर – ११ मध्ये ०१ पद प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाचे आहे.

प्रतिनियुक्तीचा कालावधी – सुरुवातीला ०१ वर्षे (कमाल ३ वर्षे)

वर्गीकरण – सामान्य केंद्रीय सेवा , गट अ राजपत्रित, अ – मंत्रालयीन

भरतीची पद्धत – प्रतिनियुक्तीवर व बदली अनुसार

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला ५६ वर्षे

वेतनस्तर – डी ओ पी टीच्या ओ एम क्र. क्र. ६/८/२००९- स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१० आणि ओ एम क्र. २/६/२०१६ – स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१६ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार व वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार करण्यात येईल.

पे मॅट्रिक्स स्तर -११ (रु.६७७००- २०८७००) (पी बी -३ + जी पी रू ६६०० ची पूर्व – सुधारित वेतनश्रेणी)

अर्ज करण्याचा पत्ता व अर्जाची शेवटची मुदत – परिपूर्ण अर्ज परिशिष्ट – II मध्ये विहित पद्धतीत कक्ष क्र. १२५ – ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली, ११०००१ या ठिकाणी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत गेल्या ५ वर्षातील त्यांच्या अद्ययावत ए सी आर एस/ ए पी आर एस सह दोन प्रतींमध्ये पाठवावे.

यासंदर्भातील पात्रता अटी व अधिक माहितीसाठी सोबतची जाहिरात पहावी.

Tags:Govt.OfMaharashtra #Govt.OfIndia #Ministryofinformationandbrodcasting #dgiprmaharashtra