Home Blog Page 1282

कंबरडे मोडेपर्यंत मारा’, ‘कुत्र्यासारखं मारा’, अशी भाषा वापरणारा अब्दुल सत्तार महाराष्ट्राला लागलेला कलंक.

अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील का?: अतुल लोंढे

भाजपाप्रणित सरकारमधील मस्तवाल मंत्र्यांचा माज जनताच उतरवेल.

मुंबई, दि. ४ जानेवारी
पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांचा आणखी एक मस्तवालपणा महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी या मंत्री महाशयांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचेच आदेश दिले. धक्कादायक म्हणजे “या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडे मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून ५० हजार लोकांना मारायला काय हरकत आहे?” असे सत्तार म्हणतात. हा अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुजोर सत्तारवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवतील काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार व शिंदे सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाप्रणित शिंदे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार यांचा मस्तवालपणा वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तारांनी सिल्लोड या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ होत आहे हे पाहून मंत्री महाशय संतापले व थेट लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला व पोलिसांनीही लाठीहल्ला केला. महाराष्ट्राचे पोलीस मंत्र्याच्या वाढदिवसाच्या बंदोबस्तासाठी आहेत का? अब्दुल सत्तारांची भाषा पाहता ते मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत पण अशा मुजोर मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात नाही.

मंत्री अब्दुल सत्तार हे वादग्रस्त आहेत, टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते, ३७ एकर गायरान जमीन घोटाळा, कृषी मंत्री असताना बोगस धाडी टाकून वसुली करण्यात सत्तारांच्या पीएचे नाव समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबतही सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरली होती. अब्दुल सत्तार हे नेहमीच त्यांची सत्तेची मस्ती दाखवून देतात पण आता अशा मुजोर, मस्तवाल सत्तारांना घरी बसवून जनताच त्यांची सत्तेची मस्ती उतरवेल, असे अतुल लोंढे म्हणाले.

चतुर्थीला मटण खाणारे आम्हाला काय शिकवणार?:अंबादास दानवेंचा भाजपवर निशाणा 

संभाजीनगर- जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामांविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. पण चतुर्थीच्या दिवशी जे मटण खातात, कोंबड्या कापतात, त्यांनी आम्हाला कोणतीही गोष्ट शिकवू नये. गोमांसाचे समर्थन करणाऱ्यांनी जरा स्वतःच्या पक्षाचे नेते काय बोलले हे आठवावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वादग्रस्त विधानावरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपचा समाचार घेतला आहे.

राम बहुजनांचा आहे. तो शिकार करून मांसाहार करत होता, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेत. भाजपने या प्रकरणी राज्यात विविध शहरांत आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आव्हाड यांच्या विधानाचा निषेध करत भाजपला त्यांच्या नेत्यांनी गोमांसाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांची आठवण करून दिली.

अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरजही वाटत नाही. पण प्रभू श्रीरामचंद्रांविषयी बोलताना काळजी घेतली पाहिजे. प्रभू श्रीराम आदर्श आहेत. आदर्शपुरुष व महापुरुष म्हणून देशात त्यांचा सन्मान होतो. त्यामुळे आदर्शांविषयी बोलताना तोंड सांभाळले पाहिजे.

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून आंदोलन करणाऱ्या भाजपलाही खडेबोल सुनावले. गोमांसाचे समर्थन करणाऱ्या भाजपने हिंदुत्वाच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. गोमांसाविषयी गोव्याचे मु्ख्यमंत्री व केंद्रीय मंत्री किरण रिजीजू काय बोलले होते हे आम्हाला माहिती आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही सर्वांनी मांसाहार सोडला आहे का? सध्या मांसाहार करणारेही आंदोलन करतात. गणपतीच्या दिवशी मांसाहार करत असल्याचे कित्येक आंदोलकांच्या घरांत पाहिले आहे. चतुर्थीच्या दिवशीही मांसाहार करणारे आम्ही पाहिलेत. चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे व कोंबड्या कापणारे आम्हाला काय शिकवणार? असा हल्लाबोलही अंबादास दानवे यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधताना केला.

अजितदादांच्या सरकारी बंगल्यावर अभ्यागतांना चहा-कॉफी, व्हेज-नॉन व्हेज थाळीचा पाहुणचार:सरकार खर्चणार बिर्याणीसाठी 35, व्हेज थाळीसाठी 95 रुपये

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी येणारे पाहूणे, अभ्यागतांच्या पाहूणचारासाठी सरकारने दीड कोटी रुपयांचे कंत्राट छत्रधारी कॅटरर्स या कंपनीला दिले आहे. ९ एप्रिल २०२५ पर्यंत ही कंपनी सेवा देणार असून त्यासाठी दीड कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटदाराला दरही ठरवून दिले आहेत. अभ्यागतांना मात्र त्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील खानपान सेवाही छत्रधारी कॅटरर्स याच कंपनीकडे आले. तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेसकडे सोपवण्यात अालेेले आहे. कंत्राटदार छत्रधारी कॅटरर्स यांना नोंदणी फी, मुद्रांक शुल्क व ३% अनामत रकमेची बँक गॅरंटी ठेवावी लागेल, अशी अट घालण्यात आली. विशेष महत्वाच्या प्रसंगी आवश्यकतेनुसार बाहेरुन अथवा अन्य पुरवठादाराकडून खाद्यपदार्थ मागविणे अथवा खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांस प्राधिकृत केले आहे.

कोथिंबीर वडी, रसमलाई, मोदकही मिळणार

१२५ मिली दुधाचा चहा- १८ रुपये, १२५ मिली कॉफी – १३ रुपये, शीतपेये – १५ रुपये, चिकन बिर्याणी-३५ रुपये, व्हेज थाळी-९५ रुपये आणि मांसाहारी थाळी ९८ रुपये असे दर टेंडरमध्ये निश्चित करण्यात आले आहेत.

कोथिंबीर वडी १५ रुपये, रसमलाई १८ रुपये, समोसा १५ रुपये, मसाला चहा व ग्रीन टी १४ रुपये, व्हीआयपी स्पेशल व्हेज स्नॅक्स १२० रुपये, व्हीआयपी स्नॅक्स ४० रुपये व मोदक १८ रुपये. स्पेशल व्हेज नॉन आणि नॉन व्हेज बुफे डिनर ३५० रुपये ही उपलब्ध खाद्यपदार्थापैकी सर्वात महाग डिश असेल.

आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ:श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल.. म्हणाले आव्हाड

 तुमच्या बापाने तर वडिलांनाच वनवासात पाठवले

ठाणे -राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला आहे. आव्हाड यांच्या घराबाहेर प्रभू श्रीरामांचे चित्र घेऊन हे कार्यकर्ते आरती करण्यासाठी पोहोचले होते. याप्रकरणी स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अजित पवार गटाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी आरती करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले. तर दुसरीकडे भाजपकडून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. घटनेनंतर आव्हाड यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तुमच्या बापाने तर वडिलांनाच वनवासात पाठवले
आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ”माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत”. असे आव्हाड म्हणाले

आव्हाड यांचे वक्तव्य काय?
राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हे आमचे, बहुजनांचे आहे. शिकार करून खाणारे राम हे बहुजनांचे आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे आव्हाड यांनी म्हंटले होते.

दरम्यान, येत्या 22 जूनला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. त्यावरून भाजपा आणि विरोधक असा सामना रंगला आहे. त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशातच, जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल्याने आता यावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे.

काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो:वक्तव्यावर आव्हाडांनी खेद केला व्यक्त, म्हणाले- आमचा राम आमच्या हृदयात, दिन दलित गरिबांच्या सेवेत …

0

रोहित पवार म्हणाले,’ विरोधकांच्या सापळ्यात अडकू नका , देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ..

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या आपल्या एका वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला आहे. मी श्रीरामांविषयी ओघात बोललो. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात, पण आमचा राम आमच्या मनातच आहे, असे ते म्हणालेत.

मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात पण आमचा राम आमच्या हृदयात आहे, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातील अयोध्ये कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कीनंतर एक 1891 चं डॉक्युमेंट प बंगालमध्ये पब्लिश झाले आहे. आताचे नाही. मी ते वाचून दाखवणार नाही, ज्यांना वाचायचे आहे त्यांना मी कॉपी देतो. मला भारतातील अनेक आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले. त्या त्या काळात कसे ट्रान्सलेशन केले गेले. वाल्मिकी रामायणात जे लिहिले असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का, त्यावर बोलावे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अन्नपूर्णी नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.

आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिला आहे. देव आणि धर्माचे कुणीही राजकारण करू नये. अशा राज्यकर्त्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले,’आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!

हा सुंता झालेला जितुद्दिन औरंग्याची औलाद आहे ,त्याला पुण्यात तर येऊ द्यात … भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचा इशारा

राम मांसाहारी … जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून आंदोलन

पुणे-हा सुंता झालेला जितुद्दिन औरंग्याची औलाद आहे ,त्याला पुण्यात तर येऊ द्यात … अशा शब्दात भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे त्यांना 5 वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी धडा शिकवला हाेता. आता पुन्हा आम्ही त्यांना खुले आव्हान देताे की, जितेंद्र आव्हाड पुन्हा पुण्यात आल्यावर त्याची पुनरावृत्ती करुन दाखवू. जितेंद्र आव्हाड यांना याेग्य त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. पुण्यात आव्हाड आल्यास त्यांना घाम फाेडल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी गुरुवारी दिला.

श्रीराम हे वनवासात असताना ते शाकाहरी नव्हते तर मांसाहरी हाेते अशाप्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्याविराेधात पुणे भारतीय जनता पक्षाचे वतीने अलका चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सियावर प्रभू रामचंद्र की जय’, ‘जय श्री राम’, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जयाचा पाेपट काय म्हणताे जय श्रीराम’ अशाप्रकारची जाेरदार घाेषणाबाजी केली. याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते. जितेंद्र आव्हाड पुण्यात आल्यानंतर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

धीरज घाटे म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारणातील शरद पवार गटातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुंता झाली आहे. त्यांचा मतदारसंघ अल्पसंख्याक असल्याने ते नेहमी हिंदूचे भावना दुखविण्याचे काम करतात. एका विशिष्ट धर्माची बाजू घेण्यासाठी वेळाेवेळी डाेके फिरल्यासारखे वक्तव्य ते करतात. हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे मंदिर निर्माण हाेत असल्याने जगभरातील हिंदू मध्ये आनंदाची लहर आहे. परंतु लाेकांचे भावना, श्रध्दा यांचा अपमान करण्याचे दृष्टीने आव्हाड चुकीची विधाने करुन वाद निर्माण करत आहे. खरेतर आड यांना चांगल्या मनसाेपचार तज्ञाची गरज आहे. अशापध्दतीने गरळ ओकण्याचे नेहमी काम आड करत असतात. मागे यांनी एक शाेध लावला की, औरंगजेब हा क्रूर नव्हता. ज्या औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे अताेनात हाल केले. भगवान विष्णू मंदिर पाडले. ज्यांनी हिंदूचे धार्मिक स्थानावर हल्ला केले अशा अाैरंगजेब, टीपू सुलतान यांचे उदात्तीकरण करण्याचे काम ते करत आहे. भाजप असे प्रकार सहन करणार नाही. ज्यादिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यात येईल त्यावेळी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ते, रामसेवक त्यास धडा शिकवतील. पाेलिसांकडे देखील आम्ही याबाबत तक्रार दाखल करणार आहे.

समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विश्वकर्मा योजना : सुनील देवधर

विश्वकर्मा फौंडेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा संपन्न

पुणे (दि.३ जानेवारी २०२४) जगाची निर्मिती प्रभू विश्वकर्मांनी केली आहे. या नावाने ओळखले जाणाऱ्या विश्वकर्मा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ पासून विश्वकर्मा योजना लागू केली आहे. याचा समाजातील युवकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन माय होम इंडिया या संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले.
विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुनील देवधर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक अंबादास सुतार, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, संस्थेचे मुख्य विश्वस्त विवेकानंद सुतार, संगीता सुतार, अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष पांडुरंग सुतार, महिला अध्यक्ष अमृता देगावकर आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा फौंडेशनच्या ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
सुनील देवधर यांनी सांगितले की, अहंकारी व्यक्तीचे पतन होते. नम्रतेने ध्येय गाठता येते, अंबादास सुतार यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी नम्रतेने आपले ध्येय गाठले आहे. असे निश्चित ध्येय गाठण्यासाठी व आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा वापर करून विकास साध्य करण्यासाठी विश्वकर्मा योजनेचा गरजू बेरोजगार युवकांनी लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी. या योजनेमध्ये पंधरा दिवसाचे प्रशिक्षण, प्रत्येक प्रशिक्षणार्थीला ७५०० रुपये शिष्यवृत्ती आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अनुदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्याचे जाहीर केले आहे.
सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, ताम्रकार पांचाळ या समाजातील व्यक्ती विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात. देशाचा विकास होण्यामध्ये यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. विश्वकर्मा फौंडेशनचे कार्य स्तुत्य असून या कार्यास सर्वांनी हातभार लावावा असेही देवधर म्हणाले.
प्रमुख पाहुणे उद्योजक अंबादास सुतार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वकर्मा समाज बांधव एकमेकांना संघटित करीत आहेत. हे अभिमानास्पद आहे या समाज बांधवांच्या अंगी असणारे कलागुण याचा वापर करून उद्योग व्यवसायात पुढे येता येते अशी अनेक उदाहरणे आहेत. विश्वकर्मा फौंडेशन या संस्थेची मागील ९ वर्षाची वाटचाल ही सर्व समावेशक आणि कौतुकास्पद आहे. विश्वकर्मा समाज आणि इतर न्याती बांधवांना देखील बरोबर घेऊन वधू वर परिचय मेळावे, विद्यार्थी गुणगौरव समाजभूषण पुरस्कार असे उपक्रम आयोजित करीत आहेत. आत्ताच्या आधुनिक युगात केवळ एका समाजाचा विचार करून विकासाचे ध्येय साध्य करता येणार नाही, तर इतर बांधवांनाही बरोबर घेऊन पुढे जावे लागेल तरच समाजाचा आणि देशाचा विकास होईल. समाजाच्या संघटनेची व्याप्ती आता देशभर होण्याची गरज आहे.
संस्थेचे मुख्य विश्वस्त विवेकानंद सुतार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या संस्थेच्या वतीने २४×७ ऑनलाईन पद्धतीने कार्यरत असणारी वधू वर नोंदणी वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. विश्वकर्मा फौंडेशन दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, शिष्यवृत्ती, वधु वर परिचय मेळावा, सामाजिक समस्या निराकरण वंचित निराधार वृद्ध व्यक्तींसाठी सहाय्य असे उपक्रम राबविण्यात येतात.
आयोजनात सुनील शिरसाठ, सुनील दिक्षित, विष्णूकांत पोतदार, ओंकार सुतार, किरण खरकड, नरेंद्र बोरसे, शेखर खिलारे, करण डूकले, राजू सूंभे, सोमनाथ गायकवाड, नीळकंठ सुतार, गणेश सुतार, अमेय सुतार, प्रदीप गाडे, विठ्ठल पांचाळ, सौ. सुरेखा सुतार, सौ.स्वाती पोतदार, ॲड.कोमल सुतार यांनी सहभाग घेतला.
स्वागत राजाराम दिवेकर, प्रास्ताविक विवेकानंद सुतार, सूत्र संचालन कुमार कोद्रे केले. आभार पांडुरंग सुतार यांनी मानले.

EVM मशीन आणि निवडणूक आयोग संशयाच्याच भोवऱ्यात..

पुणे- गेली कित्येक वर्षांपासून नव्हे तर EVM मशीन मतदानासाठी आल्यापासून ते आजपर्यंत संशयाच्या भोवऱ्यातच अडकून आहे.अनेकांना वाटते आहे, ज्या इंधन आणि गैस च्या किंमतीवर महागाईवर, भ्रष्ट कारभार आणि बेरोजगारीच्या समस्येवर सत्ता बदल झाला , तो सत्ता बदलानंतर देखील चढता आलेख आणखी वेगाने वर सरकला इंधनाने शंभरी पार केली आणि गैस सिलेंडर ने हजारी पार केली. सत्ता बदल होऊन कोणता फरक पडला नाही उलट समस्या आणि व्याधी वाढतच गेल्या तरीही भाजपाला मते , बहुमत कसे मिळते आहे ?हा प्रश्न आ वासून च उभा आहे .अनेकांना असेही वाटते कि बँकावर सायबर हैकिंग चे दरोडे पडतात तर EVM मशीन सुरक्षित कसे ? ज्यामुळे अजूनही EVM मशीन संशयाच्याच भोवऱ्यात गोते खात आहे. एवढेच नव्हे तर आता निवडणूक आयोगावरचा विश्वास देखील उडत चालला आहे.संजय राऊत , सुषमा अंधारे सारेच विरोधी पक्ष मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आग्रह करत आहेत . कॉंग्रेसचे एक नेते दिग्विजय सिंग यांनी आज या विषयाला पुन्हा वाचा फोडली आहे.

दिग्विजय सिंग यांनी ट्वी ट करत म्हटले आहे कि,’ आमच्या “मदर ऑफ डेमोक्रसी” मध्ये सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये माझे मत योग्यरित्या टाकले गेले आहे आणि योग्यरित्या मोजले गेले आहे हे जाणून घेणे हा आमचा अधिकार आहे. पहिल्या दिवसापासून मी ईव्हीएमवर विश्वास ठेवला नाही. माझं मत कुठे गेलं माहीत नाही. VVPAT ने मला 7 सेकंदाची झलक दिली आहे की माझ्या हातात मुद्रित VVPAT स्लिप का असू शकत नाही याची खात्री पटली की ती योग्यरित्या छापली गेली आहे. चिपवर सॉफ्टवेअर असलेले कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताळले जाऊ शकते. ती माझी आज्ञा ऐकणार नाही तर सॉफ्टवेअरची. VVPAT मध्ये चिपवर कोणते सॉफ्टवेअर आहे? आम्हाला माहित नाही. सॉफ्टवेअर कोणी लिहिले आहे? आम्हाला माहित नाही. जी व्यवस्था पारदर्शक नाही तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा? भारतीय मतदार कृपया आमच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी उठून तुमचे मत योग्यरित्या नोंदवले गेले आणि मोजले गेले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्कांसाठी लढा.

दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग पहिल्यांदाच इंदूरमध्ये आले होते. येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेतली.

ते म्हणाले, व्हीव्हीपीएटी स्लिपमधूनच मतांची मोजणी व्हायला हवी. ईव्हीएमद्वारे मतदान करू नये असे आम्ही कुठे म्हणतोय? मतदानानंतर व्हीव्हीपीएटीमध्ये पडणाऱ्या कागदाची स्लिप लोकांच्या हातात द्यावी आणि त्यांना स्वत:च्या हाताने स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवण्याचा अधिकार द्यावा, अशी आमची इच्छा आहे. हा देशातील 90 कोटी मतदारांचा हक्क आहे. बॉक्समध्ये टाकलेल्या स्लिप्सची मोजणी करून निवडणूक निकाल जाहीर करावा.आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केलेल्या प्रयोगाचा दाखला देत दिग्विजय सिंह म्हणाले – या विद्यार्थ्याचे वडील केंद्रीय मंत्री होते. त्यांनी प्रयोग केला आहे. जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा तेच निवडणूक चिन्ह दिसते, परंतु काहीतरी वेगळे छापले जाते. म्हणजे कोणतेही सॉफ्टवेअर अशा प्रकारचे असू शकते की एक गोष्ट दिसते आणि दुसरी छापली जाते.ते पुढे म्हणाले की, आम्हाला VVPAT मध्ये काहीही दाखवू नका, पण छापील स्लिप आमच्या हातात द्या.दिग्विजय सिंह म्हणाले, देशातील 90 कोटी मतदारांचा हा घटनात्मक अधिकार आहे. जे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. ते (भाजप) आता तेलंगणा, कर्नाटकात काँग्रेस कशी जिंकली ते सांगतात. चोरी करणारा कोणी गुपचूप सर्व माल घेऊन गेला तर तो पकडले जाईल. 2012 च्या गुजरात निवडणुकीनंतर ही चोरी सुरू झाली आहे. 2014 मध्ये बहुमत मिळेल असे सांगण्यात आले आणि सरकार स्थापन झाले. 2019 मध्ये 300 जागा आणतील असे सांगण्यात आले, पण 303 जागा मिळाल्या. ते (भाजप) निवडणुकीपूर्वीच घोषणा करतात. हे कसे दिसते? हा मोठा प्रश्न आहे.दिग्विजय सिंह यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले – निवडणूक आयोग विरोधकांच्या बैठकीत का अडथळा आणत आहे? प्रमुख विरोधी पक्षांना भेटण्यासही नकार देणाऱ्या निवडणूक आयोगावर आपण विश्वास कसा ठेवू शकतो? आयोग अधिक पारदर्शक का होऊ शकत नाही? जर ते इतके सुरक्षित असेल की कोणीही ते हॅक करू शकत नाही किंवा हाताळू शकत नाही तर सार्वजनिक डोमेनमधील चिपवर स्त्रोत कोड का आणू नये.

दरम्यान

आदित्य भगत यांनी हि याच विषयावर ट्वीट केले आहे .

त्यांनी असे म्हटले आहे कि,'
काही मूलभूत प्रश्न भारतातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारले पाहिजेत:
भारत सरकारने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना का काढून टाकले?
भारतीय निवडणूक आयोग गेल्या 1 वर्षापासून विरोधी पक्षांशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक का घेत नाही?
विकसित देशांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरणे का बंद केले आहे?
माध्यमे ईव्हीएमशी संबंधित समस्या का दाखवत नाहीत?
ईव्हीएम मुद्द्यांवर माध्यमांच्या चर्चेसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना का आमंत्रित केले जात नाही?

कारागृहात जात पाहून कैद्यांना दिले जाते काम ? सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस

नवी दिल्ली-कारागृहात जात पाहून कैद्यांना दिले जाते काम असा आरोप करणारी याचिका दाखल झाल्याने सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस बजावली आहे . धनंजय चंद्रचुड, न्या.जे.बी.पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा त्यांनी वरील आदेश दिले. सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या या याचिकेत तुरुंगात जेल मॅन्युअल आधारावर जातीनूसार भेदभाव करीत वेगवेगळ्या जातींना कामे दिले जात असून त्यास रोखण्याची मागणी केली आहे.

तुरुंगात जातीप्रमाणे कैदी आणि सराईत गुन्हेगारांना वागणूक दिली जाते. छोट्या जातीच्या कैद्यांसोबत भेदभाव केला जातो. त्यांना त्यांच्या जातीनूसार कामे दिली जातात असे ज्येष्ठ वकील मुरलीधर यांनी युक्तीवाद करताना म्हटले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालय आणि अन्य प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली आहे. महाराष्ट्रातील कल्याण येथील रहिवासी असलेल्या सुकन्या शांता यांनी ही याचिका दाखल केली आहे. याबाबत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपांवर उत्तर देण्यास सांगितले. तुषार मेहता यांनी यावर आपण तर जाती आधारित भेदभाव होत असल्याचे ऐकलेले नाही. कामाचे वाटप शिक्षा विचाराधीन कैदी आणि आरोपींवर आधारित असते असे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

राजस्थान सह देशातील अनेक राज्यात आजही ब्रिटीशकालिन जेल मॅन्युअलनूसार कामाचे वाटप केले जाते. आरोपीच्या जातीची विचारणा केली जाते. मानवी हक्कांवर काम करणाऱ्या एका संस्थेच्या मते खालच्या जातीच्या कैद्यांना शौचालय आणि तुरुंगाच्या सफाईची कामे दिली जातात. जातीच्या उतरंडीप्रमाणे सर्वात खालच्या जातीचे लोकांना साफसफाईची कामे करतात, त्याहून उच्च जातीचे लोक जेवण बनविणे, लीगल दस्ताऐवज विभाग सांभाळता. तर श्रीमंत आणि प्रभावशील कैदी कोणतेच काम करीत नाहीत. ब्रिटीशकालीन जेल मॅन्युअलमध्ये कमी सुधारणा झाल्या आहेत. अनेक राज्यातील तुरुंगात हे जेल मॅन्युअल वापरले जाते असे अहवालात म्हटले आहे.

या राज्यांना नोटिस केली जारी

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात देशभरातील 11 राज्यांना नोटीस जारी केली आहे. त्यात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पंजाब, झारखंड, केरळ,तामिळनाडू आदी राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांना नोटीस जारी करीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर ठेवली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने कार्यकर्त्या होऊन समाजाच्या नेतृत्व विकासाचे काम करू या… डॉ.नीलम गोऱ्हे

दिनांक ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आहे. १८३१ साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांनतर मुलींचे पहिली शाळा पुण्यामध्ये १८४८ सालाच्या सुमाराला सुरू झाली. यावेळी सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत काम करण्याबरोबरच अनेक सामाजिक कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी समाजामध्ये मुलींच्यावरती अन्याय करणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. यामध्ये बालविवाह, लग्नानंतर मुलींना टाकून देणे,मुलगीचा जन्म झाला तर मुलीच्या आई वर व मुली ना विविध मार्गाने त्रास दिला जायचा. अशा अनेक गोष्टींच्या विरोधामध्ये फुले दांपत्याने लक्ष घातले. त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच्या मार्फत अनेक समाजातील रूढी व परंपरा यांना विरोध केला. यासाठी समाज प्रबोधन स्वतःच्या कृतीतून सुरू केले. मुलींसाठी शाळा सुरू केल्यामुळे मुलींना शिक्षणासाठी अनेक दारे उघडी झाली. मुलींच्या शिक्षणाला जो विरोध होता तो दूर करण्याचे काम सुद्धा त्यांनी स्व:तच्या कृतीने केले. अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्त्री आधार केंद्र संस्थेची स्थापना दिनांक ३ जानेवारी १९८४ रोजी पुण्यामध्ये केली. तेव्हापासून आतापर्यंत ४० वर्ष आम्ही सातत्याने महिलांचे प्रश्नावर काम करतोय. यामध्ये मुलींचे शिक्षण प्रमाण वाढविणे, अत्याचारित मुलींना धीर देऊन त्यांचे पुनर्वसन करणे,त्यांच्या केसेस साठी कोर्टामध्ये मदत करणे हे काम स्त्री आधार केंद्र सातत्याने ४० वर्षे करत आहे. त्याचबरोबर विविध कायदे, शासकीय धोरण बदलने व नवीन महिला सबलीकरणासाठी आवश्यक कायदे करणे,समाजातील विविध संघटना मार्फत जनजागृती व शासकीय यंत्रणेला महिलांचे प्रश्नावरती अजून संवेदनशील करणे यावरती सुद्धा आम्ही काम करत आहोत.

स्त्री आधार केंद्राचे हे काम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांत पोहोचलेले आहे. विशेषतः पुणे, लातूर, धाराशिव, मुंबई, नाशिक, जळगाव, नागपूर,सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यां काम करत आहेत. आज स्त्री आधार केंद्राचा स्थापना दिवस पण आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने मी सावित्रीबाईना सगळ्यात प्रथम विनम्रपणें अभिवादन करते.

स्त्री आधार केंद्राचं जे सगळं काम चाललेले त्या कामाला अधिक चालना मिळण्यासाठी आपलं सहकार्य आम्हाला मिळत राहावे अशा प्रकारचे मी आवाहन करते. ०२०२४३९४१०३/०४ ह्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ११ ते सायं.०६ वाजेपर्यंत आमचे कार्यालय चालू असते. सोमवार ते शनिवार जरूर संपर्क करा आणि कार्यकर्त्या होऊन समाजाच्या विकासाचे काम करा असे मी आपल्याला शुभेच्छा देते. अनेकजणी या कामात सहकार्य करत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करते. आणि नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा ही देते…

डॉ.नीलम गोऱ्हे,
उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई.
मानद अध्यक्ष स्त्री आधार केंद्र, पुणे.

अंकिता लोखंडेच्या बिग बॉस 17 च्या घराची कॅप्टन 

 बिग बॉस 17 च्या घरात चर्चेत असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस सीझन 17 मध्ये घराची नवी कॅप्टन बनली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. अंकिताच्या बुद्धिमत्तेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिचं बिग बॉस च्या घरात कौतुक होतंय. 

तिला लक्झरी रूम ऍक्सेस आणि टास्क असाइनमेंटमध्ये अधिकार यासारख्या विशेष अधिकारां च्या सोबतीने ने हे कर्णधारपद मिळाले आहे. पती विकी, ईशा मालवीय आणि नील भट्ट यांनी तिचा विजय साजरा केला, तर इतर स्पर्धकांनी ऑन-कॅमेरा टिप्पण्यांद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली. अंकिताने तिच्या उपस्थिती ने आजवर सगळ्यांना मोहित केलं आहे. अंकिता विक्कीसोबत ती नवीन कॅप्टन बनली असून आता ती जबाबदारी आणि आव्हाने कशी हाताळते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३: पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २३३ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी १०, भोर ७, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी १, हवेली १७, जुन्नर २६, खेड ८, मावळ ३६, मुळशी २८, पुरंदर ९, शिरुर १२ आणि वेल्हे तालुक्यातील ६८ अशा जिल्ह्यातील एकूण २३३ गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे.

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसिल कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

कोथरुड आणि कटक मंडळ मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे दि.३ : कोथरुड आणि कटक मंडळ येथे मुलींच्या विभागीय शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतीगृहासाठी २० ते २५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये किमान २० ते २५ खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.

कोथरुड आणि कटकमंडळ परिसरातील इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा ८४८४८९६६७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

पुणे लोकसभा कॉंग्रेसच जिंकणार, लोकशाहीसाठी तानाशहा विरोधातील ही लढाई- नाना पटोले

0

पुणे-काँग्रेस सकारात्मकतेने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, कसब्यात रविंद्र धंगेकर जिंकणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी काही पत्रकार हसत होते.आता ज्याचे नाव मेरीट मध्ये येईल त्याला घरी जाऊन उमेदवारी देऊ , असे सांगत कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये 450 रुपये ला गॅस सिलेंडर देतात . मग देशातील दुसऱ्या राज्यात गॅस महाग का? हजारो कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी ते अदानीला फायदा करून देत आहे.मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा राहुल गांधी काढणार आहेत. गेल्या 10 वर्षांत एकही काम मोदी सरकारने केले नाही. निवडणूक आयोगाची पारदर्शकता राहणार की नाही? अशा स्थितीत हि निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठीच महत्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Pune) आज काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जेष्ठ नेते उल्हास पवार, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, अनंतराव गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे उपस्थित होते. पटोले म्हणाले,’ धंगेकर यांना दिल्लीत काही यावे लागले नाही. मेरिटच्या आधारे पुण्यातील उमेदवार ठरवून घरपोच तिकीट देणार आहे. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, महाआघाडीचा लोकसभा निवडणुकीचा फारमुला तयार आहे. राज्यात 50 जागा भाजप सांगणार आहेत. उद्याची बैठक राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेसाठी आहे. महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकारची बोलणी चांगल्या प्रकारे आहे. राम मंदिराचे बांधकाम अपुरे असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले आहे.

केवळ निवडणुकीसाठी या मंदिराचा उपयोग होत आहे. मी पण हिंदू आहे. राम मंदिर छोटे दाखवून मोदी यांना मोठे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. 22 तारखेला काहीही उपयोग नाही. राम मंदिराचा राजकारणासाठी वापर होतोय. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच ठरविणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी काँग्रेसची भूमिका आहे.

उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत आंबेडकर यांचे बोलणे झाले. पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मेरिटच्या आधारे जागा वाटपाचा फारमुला तयार आहे. आम्ही तिघांची भूमिका स्पष्ट आहे. उध्दव ठाकरे यांनी जागेसंदर्भात काहीही बोलणे केले नाही. संघटनेची पुण्यात बैठक होणार आहे. काँग्रेसने 60 वार्षात लोकांना सांभाळले. मोदी सरकारने 10 वर्षांत काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही.

पटोले म्हणाले, आगामी वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात मालवाहतूक दारांचा संप सुरू आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना होत आहे. देशात तानाशाही सुरू आहे. आता जो कायदा केला आहे, त्यामध्ये 7 लाख दंड, आणि 10 वर्षांची शिक्षा आहे.

हा कायदा करण्यामागचा हेतू काय आहे, लोकांनी वाहने वापरू नये, का लोकांनी पायीच चालावे, ही तर सरकारची मानसिकता आहे का? समृद्ध माहामार्गावर किती तरी बळी जात आहेत. टाटा गरम होऊन त्यामध्ये अनेक नागरिकांचा बळी जातोय. भाजप सरकारला याचे काहीही देणेघेणे नाही. आवश्यक ते केमिकल या समृद्धी महामार्गावर वापरण्यात आले नाही.

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महात्मा फुले यांच्या वाडयात भेट दिली असता पीएचडी विध्यार्थी रडत होते. महराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करतायेत. शेतकरी विरोधातील हे सरकार आहे.

डीपी रस्त्यावर भाजपचे नवीन शहर कार्यालय,रविवारी स्नेह मेळावा

पुणे, ३ जानेवारी : शहर भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.घाटे म्हणाले, नूतन कार्यालयाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, प्रशासन आदी क्षेत्रांतील मान्यवरांना येत्या रविवारी (दिनांक ७ जानेवारी) दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत स्नेह-मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या स्नेहमिलनासाठी उपमुख्यमंत्री देवेन्द्रफडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नूतन कार्यालयात एक मोठे सभागृह, अध्यक्षीय दालन, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, कॉन्फरन्स रूम, वॉर रूम यांची व्यवस्था केलेली आहे.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष आणि पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वर्तमान युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने आणि माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, प्रभावी जनसंपर्क करता या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे घाटे यांनी सांगितले.

पुणे शहरातील भारतीय जनसंघाचे कार्यालय सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मंदिराच्या शेजारी असलेल्या भिडे वाड्यातील एका छोट्या खोलीत सुरू झाले. १९८३ साली भिडे वाड्याचे नूतनीकरण होऊन त्याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरील नवीन जागेत कार्यालय स्थलांतरित झाले. तेव्हापासून २०१७ पर्यंत पुणे शहर भाजपाचे सर्व कामकाज तेथूनच चालू होते. काळाची गरज म्हणून सन २०१६ मध्ये जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथे मध्यवर्ती कार्यालय हलविण्यात आले.

परंतु ती ही जागा अपुरी पडू लागल्याने महानगरपालिका भवनाच्या जवळील जागेत ३ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा एकदा कार्यालय स्थलांतरित केले.काळाच्या ओघात भाजपाच्या कामाची व्याप्ती सतत वाढत गेल्याने पुणे मनपा जवळील कार्यालय अजून मोठ्या जागेत आणि पार्किंग व्यवस्था मुबलक असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे शहराचे मध्यवर्ती कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरीत करीत आहोत, अशी माहिती घाटे यांनी दिली.