राम मांसाहारी … जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून आंदोलन
पुणे-हा सुंता झालेला जितुद्दिन औरंग्याची औलाद आहे ,त्याला पुण्यात तर येऊ द्यात … अशा शब्दात भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे त्यांना 5 वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी धडा शिकवला हाेता. आता पुन्हा आम्ही त्यांना खुले आव्हान देताे की, जितेंद्र आव्हाड पुन्हा पुण्यात आल्यावर त्याची पुनरावृत्ती करुन दाखवू. जितेंद्र आव्हाड यांना याेग्य त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. पुण्यात आव्हाड आल्यास त्यांना घाम फाेडल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी गुरुवारी दिला.
श्रीराम हे वनवासात असताना ते शाकाहरी नव्हते तर मांसाहरी हाेते अशाप्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्याविराेधात पुणे भारतीय जनता पक्षाचे वतीने अलका चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सियावर प्रभू रामचंद्र की जय’, ‘जय श्री राम’, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जयाचा पाेपट काय म्हणताे जय श्रीराम’ अशाप्रकारची जाेरदार घाेषणाबाजी केली. याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते. जितेंद्र आव्हाड पुण्यात आल्यानंतर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
धीरज घाटे म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारणातील शरद पवार गटातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुंता झाली आहे. त्यांचा मतदारसंघ अल्पसंख्याक असल्याने ते नेहमी हिंदूचे भावना दुखविण्याचे काम करतात. एका विशिष्ट धर्माची बाजू घेण्यासाठी वेळाेवेळी डाेके फिरल्यासारखे वक्तव्य ते करतात. हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे मंदिर निर्माण हाेत असल्याने जगभरातील हिंदू मध्ये आनंदाची लहर आहे. परंतु लाेकांचे भावना, श्रध्दा यांचा अपमान करण्याचे दृष्टीने आव्हाड चुकीची विधाने करुन वाद निर्माण करत आहे. खरेतर आड यांना चांगल्या मनसाेपचार तज्ञाची गरज आहे. अशापध्दतीने गरळ ओकण्याचे नेहमी काम आड करत असतात. मागे यांनी एक शाेध लावला की, औरंगजेब हा क्रूर नव्हता. ज्या औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे अताेनात हाल केले. भगवान विष्णू मंदिर पाडले. ज्यांनी हिंदूचे धार्मिक स्थानावर हल्ला केले अशा अाैरंगजेब, टीपू सुलतान यांचे उदात्तीकरण करण्याचे काम ते करत आहे. भाजप असे प्रकार सहन करणार नाही. ज्यादिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यात येईल त्यावेळी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ते, रामसेवक त्यास धडा शिकवतील. पाेलिसांकडे देखील आम्ही याबाबत तक्रार दाखल करणार आहे.