Home Blog Page 1182

फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले ब्राह्मण 3 मिनिटांत संपवू म्हणणाऱ्याला सोडून द्या असे रोहित पवार पोलिसांना म्हणाले? विधानसभेत चौकशीचे आदेश

मुंबई-

देवेंद्र फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले ब्राह्मण 3 मिनिटांत संपवून टाकू वक्तव्यावर ज्याला पकडले त्याला सोडून द्या असे रोहित पवार पोलिसांना म्हणाले आहेत असा गंभीर आरोप राम कदमांनी आज विधानसभेत केला, या प्रकरणी चौकशीचे आदेश विधानसभेत देण्यात आले आहेत .राम कदम म्हणाले, महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचे मोठे षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असे त्यातला इसम बोलत आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले ब्राह्मण 3 मिनिटांत संपवून टाकू असे बोलताना दिसून येत आहे. याबाबत सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे.दरम्यान एक समाज 3 मिनिटांत आम्ही संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू असे व्हिडिओत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे असे मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास यायला लागला तेव्हा आता सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले.विजय वडेट्टीवार म्हणाले की, कुठल्याही नेते, समाजाविरोधात असे विधान करणे कुणीही मान्य करणार नाही. मात्र सभागृहात शरद पवारांचे नाव घेतले गेले, कुणाचेही नाव घेण्याआधी नोटीस द्यावी लागते. पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कुणाचेही नाव घेण्याचा अधिकार नाही. जर नाव घेतले असले तर कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Splitsvilla X5′ प्रोमो आउट ! सनी लिओन, तनुज विरवानी दिसणार मुख्य भूमिकेत 

 अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने ‘Splitsvilla X5’ शोचा एक प्रोमो शेअर केला आहे प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन जाणार आहे यात शंका नाही. 

 प्रोमोमध्ये सनीचा नवा को-स्टार तनुज विरवानी याचीही ओळख झाली असून या दोघांची खास केमेस्ट्री यातून बघायला मिळणार आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने लिहिले, “तुम्ही यासाठी तयार आहात का? @mtvsplitsvilla Gen Z लव्ह अँथम 1 मार्च रोजी ड्रॉप होईल! तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.” 

https://www.instagram.com/reel/C36vvHtJNwV/?igsh=dGNycDE0YzMycWk0

 ‘Splitsvilla X5’ सोबत सनी यावर्षी अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती ‘ग्लॅम फेम’ शोला जज करणार आहे. चित्रपटाच्या आघाडीवर, अभिनेत्री अनुराग कश्यपच्या बहुप्रतीक्षित ‘केनेडी’ मध्ये चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या प्रीमियरनंतर आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळाली. तिच्याकडे पाइपलाइनमध्ये ‘कोटेशन गँग’ नावाचा एक तामिळ चित्रपट आहे ज्यामध्ये ती जॅकी श्रॉफ, प्रियमणी आणि सारा अर्जुनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत किशोरी अंबिये नव्या भूमिकेत.

      सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. राजवीर (अजिंक्य राऊत) आणि मयूरी (जान्हवी तांबट) यांच्यामध्ये आता राजवीरची बालमैत्रीण जोजो हिची एंट्री झाली आहे. जोजोला यामिनी म्हणजेच राजवीरच्या आईने आणलं आहे. यामिनीची भूमिका अभिनेत्री दीप्ती केतकर करते आहे. यामिनीच्या ह्या नकारात्मक भूमिकेला  प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं आहे. अन् तिला राजवीरशी लग्न करायचं  आहे. यासाठी ती मयूरीसारखं वागण्याचा, तिला कॉपी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.  या कामात राजवीरची आई यामिनी (दीप्ती केतकर) जोजोला मदत करतीये. राजवीर मात्र या परिस्थितीचा वापर मयूरीशी जुळवण्यासाठी शस्त्र म्हणून करताना दिसतोय.

                     पण आता मालिकेत एन्ट्री होणार आहे नव्या व्यक्तिरेखेची ती म्हणजे मयूरीची आत्या सत्यभामाची . या भूमिकेत किशोरी अंबिये दिसणार आहेत. किशोरी अंबिये त्यांच्या निरनिराळ्या व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सगळ्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी नेहमी आपलं प्रेम दाखवलं आहे. आता ही नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का, हे येत्या रविवारी ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पाहता येईल. मयूरीची आत्या सत्यभामा या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मालिकेत आणखीन रंगत येणार आहेत. आता आगामी काळात मयूरी-राजवीर अन् जोजो यांचा प्रेमाचा त्रिकोण कसा उलगडत जाणार? जोजो राजवीरला प्रेमात पाडण्यात यशस्वी होणार का? मयूरी-राजवीर आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार? जोजो अन् राजवीरची आई यांनी निर्माण केलेल्या कारस्थानाला मयूरी व राजवीर कसं उत्तर देणार? हे सर्व लवकरच ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेच, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आत्या आता मयूरीच्या लग्नाचा विषय घरी काढणार आहेत. त्यामुळे मयूरीवर एक वेगळं संकट येणार हे नक्की. तिला राजवीरकडे आपलं प्रेम व्यक्त करावं लागेल का? की आत्याच्या निर्णयाला सामोरं जाऊन ती सांगेल तिथेच लग्नाला होकार द्यावा लागेल. मयूरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला कळले असले, तरी मयूरी याचा खुलासा स्वतःहून कधी करणार व आपलं प्रेम कधी व्यक्त करणार, याच प्रतीक्षेत राजवीर असणार आहे.  

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, महाएपिसोड रविवार रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रदर्शित होत आहे

सुसंस्कृत कसब्यात काळी जादू ,धमक्या शिवीगाळीची दहशत, त्यामुळे पाण्याची झाली कमतरता- हेमंत रासने

पुणे- माजी महापौर मुरलीधर मोहोळ,माजी सभागृहनेते गणेश बिडकर आणि नगरसेवक महेश वाबळे यांच्या समक्ष माध्यमांशी बोलतांना पुणे महापालिकेचे स्थायी समिती चे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज गंभीर आरोप केले आहेत.सुसंस्कृत कसब्यात आता काळी जादू केली जाते,धमक्या आणि शिवीगाळ केल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही अशी स्थिती असून हे सारे आमदार करतो आहे,ज्याचेवर महापलिका अधिकाऱ्यांनी गुन्हा हि दाखल केला आहे. असे रासने म्हणालेत.मात्र त्यांनी या आमदाराचे नाव घेतले नाही तुम्ही ते शोधा असे म्हणालेत. त्यांनी आज येथे आंबील ओढा आणि एकूणच पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटीचा निधी महापालिकेला दिला यात भाजपकडून उशीर झालेला नाही तर महाविकास आघाडीने हा प्रस्ताव रखडवत ठेवला होता हे प्रथम सांगितले. आपण काही बेकायदा फलक लावले होते ते आपण काढून टाकले मात्र काही लोकांचे बेकायदा फलक २/ २ महिने राहतात,महापालिका अधिकारी दहशतीखाली काम करतात असेही रासने यांनी नमूद केले आहे.

स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात उत्साहात स्वागत

मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून शोभायात्रा : पादुका पूजन आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी स्वागत

पुणे : स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत पालखीवर पुष्पवृष्टी करत भक्तीमय वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत पुणेकरांनी उत्साहात केले. मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवनपर्यंत वाजत-गाजत स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

पालखी सोहळ्याचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती झाली. पालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.

मंडई चौकी – चितळे बंधू मिठाईवाले – नूमवि प्रशाला – अहिल्यादेवी शाळा- रमणबाग शाळा ते शिंदेपार आणि कॉंग्रेस भवन असा पालखीचा मार्ग होता. मिरवणुकीची सुरुवात मंडईतील शारदा-गजानन मंदिरापासून झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा आणि त्यामागे अश्वराज, राजकुमार, प्रभात, न्यू गंधर्व, स्वरांजली आदी बँडपथके सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या रथातील आकर्षक आरास केलेल्या पालखीचे पुष्पवृष्टी आणि रांगोळ््या घालून पुणेकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले.

यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार, दिनांक २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांचे सादरीकरण होणार आहे, तर २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस दिवसभर रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले – ब्रजेश पाठक

पुणे – आजवर सरकार दिल्ली आणि मुंबईतून चालायचे. परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या की नाही हे कधी विचारले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत पोहचल्या की नाही याची काळजी घेतली. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी रचना केली. गरीब कल्याणच्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून सर्व सामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले, असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी व्यक्त केले.पाठक म्हणाले, ही निवडणूक अद्भुत आहे. 2019 मध्ये विरोधीपक्ष एकत्र येऊन मोदींना थांबवायचा प्रयत्न करतील. पण मोदींनी मोठा विजय मिळविला.आता देशात मोदींची हवा आहे. त्यामुळे जगभरातील नेते म्हणतात येणार तर मोदीच.2014 पूर्वी देशात मोठा भ्रष्टाचाराची प्रकरणे झाली. भ्रष्टाचारी नेते तुरुंगात होते. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत होता. मोदींनी भारताला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. गरीब कल्याणच्या योजना राबविल्या. गरिबांना घरे दिली, शौचालय उपलब्ध करून दिली. गरिबांचे प्रश्न मोदींनी समजून घेतलेमहात्मा गांधीच्या नावाने काँग्रेसने सरकार बनविली पण स्वच्छता अभियान कधी राबविले नाही. ते मोदींनी केले.

जलजीवन मिशन राबवून मोदींनी घरोघर पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. नवयुवक कौशल्य विकास कार्यक्रम दिले. देशभर सौभाग्य योजनेतून गरिबांना वीज उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान द्वारे मुख्य प्रवाहात आणले. शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला. सावकाराच्या पाशातून मुक्त केले. महिलांसाठी लखपती दीदी योजना राबविली.गरिबांना आजारपणात आयुष्मान भारत योजना लागू केली. त्यांना सन्मानाने जगण्याची गॅरंटी दिली. पथारी धारकांना विना जामीन कर्ज दिले. बदलत्या भारताची जगाने नोंद घेतली आहे. राम मंदिर बनविले, 370 कलम हटवले, कोरोना लसीकरण देशात केले पण जगाला ही लस पुरवली. मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक कायदा केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणले. महिलांना आरक्षण दिले.पाठक पुढे म्हणाले, मोदींनी सर्वच क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे विरोधकांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पडावी. पुणे लोकसभा एकतर्फी भाजप विजय मिळवेल असा विश्वास वाटतो.आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आज पुणे क्लस्टरमधील पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे अध्यक्ष स्थानी होते.प्रदेश सरचिटणीस आणि निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष आणि क्लस्टर समन्वयक राजेश पांडे, प्रभारी माधव भांडारी, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळे, मकरंद देशपांडे, संयोजक श्रीनाथ भिमाले, मकरंद देशपांडे, जगदीश मुळीक, सुनील देवधर, वर्षा डहाळे, बापू पठारे, हेमंत रासने, राजू शिळीमकर, पुनीत जोशी, रवी साळेगावकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, करण मिसाळ, हर्षदा फरांदे, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर व्यासपीठावर उपस्थित होते.मोहोळ म्हणाले, आगामी निवडणुकीच्या तयारीची महाबैठक आहे. तीन मतदारसंघाचे क्लस्टर केले. देशभर क्लस्टर मध्ये बैठका आहेत. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून लोकसभेत विजय मिळवू. त्यासाठी सर्वांना खूप कष्ट करावे लागतील. वातावरण सकारात्मक आहे. देशात मोदींना पर्याय नाही. क श्रेणीतील बूथ वर मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल.सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या विकासासाठी केलेल्या योजनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचायचे आवाहन शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शंभर दिवस पक्षाच्या कामासाठी द्यावेत असे आवाहन पांडे यांनी केले.

निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड बाजा”

मिळकत करबुडवेगिरी विरोधात शिवसेना बँडबाजा राणेंच्या दारात.

पुणे:- पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमकपणे “बँड बाजा” वाजविला. पुणे महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत कर न भरल्यामुळे सील केली. शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या विरोधात “बँड बाजा” आंदोलन छेडले. यावेळी निलेश राणेंच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका देत डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने राणेपुत्राला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकित मिळकतीचा भाग सील केला. संबंधित मिळकतीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती. पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत. मात्र, एरवी एक मिळकत सील केली, तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अशातच सामान्य पुणेकरांना वेगळा न्याय आणि भाजप नेत्यांना वेगळा न्याय असे का, सामान्य माणसाला सन्मान नाही का, पुणे प्रशासन भाजप किंवा राणे यांना घाबरते का? असा प्रश्न आंदोलनात विचारण्यात आला. यावेळी या आठवड्यात जर राणे यांनी मिळकत कर नाही भरला तर शिवसेना पुन्हा डेक्कन येथील हॉटेल समोर येऊन बँडबाजा घेऊन आंदोलनं करणार असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले .

यावेळी शिवसेना शहप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिध्दी प्रमुख अनंत घरत, किशोर राजपूत, बाळासाहेब भांडे, अतुल दिघे, महेश पोकळे, उमेश वाघ, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, करुणा घाडगे, संतोष भुतकर, नागेश खडके, संदीप गायकवाड, राजेश मोरे, इम्रान खान, संजय वाल्हेकर, किरण शिंदे, राहुल शेडगे, आदिनाथ भाकरे, सचिन घोलप, विकी धोत्रे, प्रवीण डोंगरे, रणजित शिंदे, प्रतीक गालिंदे गणेश खलाटे, हरी सपकाळ, अनिल इनामदार, शशांक सोळंखी उपस्थित होते.

निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे, दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २१ विधानसभा स्तरावरील निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्रीमती कदम यांनी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी, तालुका स्तरावर आचारसंहिता पथक तयार करणे, आचारसंहितेच्या तक्रारींच्या निवारणासाठी दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देणे, आचारसंहिता जाहीर झाल्याबरोबर सर्व जाहिरात फलक, राजकीय फलक हटवण्याबाबत करावयाची कार्यवाही, मतदान केंद्राच्या १०० मीटर कार्यक्षेत्रात करावयाची कार्यवाही, उमेदवारी दाखल करताना वाहनांचा वापर, उमेदवारी दाखल करताना सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या तसेच निवडणूक काळात शासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन आदींबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणास फिरते निरीक्षण पथक, विडीओ निरीक्षण पथक, स्थीर निरीक्षण पथक, व निवडणूक खर्च पथकाचे प्रतिनिधी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्यसनी व्यक्तिला स्वतःहून व्यसन सोडण्याची इच्छा होणे महत्त्वाचे : विशाखा वेलणकर

पुणे : शहरात अंमली पदार्थांचे वाढणारे सेवन, त्याच्या आहारी गेलेली तरूणाई, व्हायरल झालेला व्हिडिओ आणि या सगळ्यामुळे खडबडून जागी झालेली यंत्रणा सध्या पाहायला मिळत आहे. याच विषयाचा गांभीर्याने विचार करून अशा घटनांवर उघडपणे चर्चा व्हावी आणि अंमली पदार्थांच्या विळख्यापासून शहर मुक्त व्हावे यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो, या संदर्भात माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी ‘पर्वती संवाद’ या महाचर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमास वक्ते म्हणून सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, ड्रग्स संबंधित काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर उपस्थित होते.

पुण्यातील एका टेकडीवर नुकतीच दुर्दैवी घटना घडली. महाविद्यालयीन मुली शुद्ध हरपलेल्या आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या,

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले की, पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत असेल तर अशा गोष्टी होऊच नयेत म्हणून कार्यरत असणारी संबंधित यंत्रणा काय करत होती, या गोष्टींसाठी सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे असं वाटतं. त्यात सोशल मीडियाचा होत असलेला दुरुपयोग आहेच. पॉझिटिव्ह व्यसनं हेच निगेटिव्ह व्यसनांना उत्तर असू शकत, त्यामुळे चांगली व्यसनं लावून घेणं गरजेचं. शिवाय अशा गोष्टी रोखण्यासाठी ‘एव्हरीथिंग इज मॅनेजेबल’ हा मंत्र बदलणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वेलणकर म्हणाल्या, ‘मला सगळं विसरायचंय याचं टेन्शन घेऊन अनेकजण ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे वळतात. पण ते हेच विसरतात की ड्रग्स आणि व्यसनाधीतेमुळे हे टेन्शन काही कालावधीसाठीच नाहीस होतं आणि पुन्हा नंतर सामोरं येतंच. स्वनियमन आणि स्वसंयम हाच ड्रग्स आणि व्यसनाधीतेकडे न वळण्याचा इलाज आहे. व्यसनी व्यक्तीला स्वतःहून जोपर्यंत व्यसन सोडावंसं वाटत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही, आणि यासाठी मनाचा ठामपणा गरजेचा आहे.

‘पर्वती संवाद’ या कार्यक्रमाला स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचे सामाजिक विषयांवरील कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी नोंदविले.

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

नामांकित ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग व मेळाव्याला तरूणांचा उदंड प्रतिसाद

अहमदनगर दि. २८ फेब्रुवारी :- बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍िन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून अहमदनगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे यांनी आभार मानले.

व‍िभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद

भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या होत्या. या रोजगार मेळाव्याच्या पह‍िल्या द‍िवशी पाच ज‍िल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रत‍िसाद द‍िला. महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत.

महामार्गवरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहेसुस्थितीत ठेवा- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई दि.२८: राज्यातील सर्व महामार्गवरील, पेट्रोल पंपवरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी व अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा ही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याची अस्तित्वातील सर्व स्वच्छतागृहे ही सुस्थितीत ठेवावीत.
तसेच ज्या ठिकाणी स्वच्छ्ता गृहे नाहीत त्या ठिकाणी अद्ययावत अशी स्वच्छतागृहे उभारली जावीत. त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. विशेषतः महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुस्थितीत राहतील आणि त्यामध्ये पुरेसे पाणी,सॅनिटरी पॅड साठी मशीन,ओला व सुका कचरा टाकणेसाठी स्वतंत्र कचरा पेटी, हात धुण्यासाठी साबण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देनेबाबत खबरदारी घेतली जावी.अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या.

त्यापुढे म्हणाल्या की, राज्यभर पेट्रोल पंपावर स्वच्छता गृहांची तपासणी विशेष मोहीम द्वारे करावी. व अस्वच्छ व दुर्लक्षित स्वच्छता गृहे तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छता गृहे उपलब्ध बाबत ॲप तयार करावे. या ॲपमार्फत उपलब्ध स्वच्छतागृहांची माहिती लोकांना मिळेल. तसेच या स्वच्छता गृहांचे मानांकन करून ॲपवर घ्यावे. त्यामुळे चांगल्या स्वच्छता गृहंची माहिती लोकांना या ॲप मध्ये उपलब्ध होईल.
तसेच आळंदीसह राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रे,पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ही आवश्यक त्या ठिकाणी चांगली व आधुनिक व सर्व सोयीनियुक्त अशी स्वच्छता गृहे बांधावीत असेही डॉ सांगितले.

आज विधानभवनातील सभापती यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या.

यावेळी मंत्रीमहोदय श्री रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, याविषयासंदर्भात हमसफर संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याचसोबत प्रत्येक हॅाटेल व रिझॅार्ट मधील स्वच्छतागृहे सर्वांना व महिलां प्रवाशांना कायद्याने खुली केली आहेत परंतु त्याची माहिती सर्वदूर पोचविण्यात येईल अशी ग्वाही मंत्री महोदय ना.श्री.रवींद्र चव्हाण यांनी दिली . उपसभापती यांनी केलेल्या सूचनांनुसार लवकरच त्या अनुषंगाने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असेही श्री .चव्हाणांनी सांगितले.

पीसीसीओई एसीएम स्टुडन्ट चॅप्टर सहाव्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पिंपरी, पुणे (दि. २८ फेब्रुवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ‘पीसीसीओई एसीएम स्टुडंट चॅप्टर’ या संघाने ‘एसीएम इंडिया बेस्ट स्टुडंट चॅप्टर फॉर आऊटस्टँडिंग ऍक्टिव्हिटीज अवॉर्ड’ हा पुरस्कार पटकावला. पीसीसीओई एसीएम स्टुडंट चॅप्टरने वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी व समाजातील विविध घटकांसाठी आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. याचे स्वरूप ४०,०००/- रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. या संघाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहा वेळा पुरस्कार पटकावले आहेत.
हा पुरस्कार वितरण सोहळा भुवनेश्वर येथे नुकताच एसीएम इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमात एसीएम इंडियाचे कार्यकारी संचालक हेमंत पांडे आणि पर्सिस्टंट सिस्टीमचे विनीत कपूर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अमेरिकेतील इथरनेटचे संशोधक आणि एसीएम टुरिंग पुरस्कार विजेते रॉबर्ट मेटकॅफ, फोर्टीन ट्रीज फाउंडेशन संस्थापक प्रवीण भागवत, ब्राऊन युनिव्हर्सिटीचे श्रीराम कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत होते. एसीएम इंडिया वार्षिक कार्यक्रम ही भारतातील संगणक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ आणि उद्योग समूहाची नामांकित संस्था आहे.
महाविद्यालयाच्या वतीने पीसीसीओईचे एसीएम स्टुडन्ट चॅप्टर चे समन्वयक प्रा. राहुल पितळे आणि प्रा. गणेश देशमुख, विद्यार्थी अध्यक्ष प्रथमेश बच्छाव आणि विद्यार्थी खजिनदार नितीन पंडित यांनी पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, संगणक विभागाच्या प्रमुख डॉ. के. राजेश्वरी यांनी अभिनंदन केले.

निवडणूक आल्यावर महापालिकेला दिला,आंबीलओढ्याच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा निधी

पुणे -तब्बल साडेचार वर्षे उलटली, त्या काळ्या दिवसाची आठवण अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे २५ सप्टेंबर २०१९….पुण्यातील आंबिल ओढ्याला पूर आला, २० पेक्षा अधिक जणांचा बळी या पुराने घेतला, यावेळी कोण फिरकले कोण फिरकले नाही हे सोडाच पण यु टर्न कसा घेतला या ओढ्याने तो सरळ केला कि नाही ? लोकांना जाहीर केलेली आर्थिक मदत केली कि नाही ?असे अनेक प्रश्न वाऱ्यावर सुटले. पण आता लोकसभा निवडणूक आल्यावर मात्र राज्य सरकारने आंबील ओढ्याच्या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी द्यावा असा महापालिकेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
२०१९ च्या पुरा नंतर महापालिकेकडून मदत न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी होती. कात्रजपासून ते नवी पेठ या दरम्यान आंबिल ओढ्याच्या लगतच्या प्रभागातून भाजपचे २३ नगरसेवक निवडून आलेले होते. तसेच पर्वती विधानसभा व पुणे लोकसभा मतदारसंघात या भागाचा समावेश आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्य सरकारने २०० कोटीचा निधी मंजूर तर केला आहे.शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी आपण महापौर असल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर त्यांनी निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.हे आपल्या पाठपुराव्याचे यश आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते. म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती.मोहोळ म्हणाले,’ फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन ‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.

मोहोळ म्हणाले, ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे.देवेंद्रजींचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’‘हा निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’, असेही मोहोळ म्हणाले.

आंबील ओढा सीमाभिंतीचा ठराव मान्यतेनंतरही ४५ दिवस स्थायी समितीमध्ये पडून..’गौडबंगाल ‘ काय ?

कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये महापालिकेला देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. हा निर्णय होऊन तीन आठवडे उलटून गेले तरी हा निधी अद्याप महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे भूसंपादनाचे काम ठप्प आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी, पंडालवरच १३ कोटींचा खर्च, जबरदस्तीने गर्दी जमवण्याचा प्रयत्न – नाना पटोले

यवतमाळची जनता यावेळी नरेंद्र मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, २०१४ च्या हमीभावाच्या गॅरंटीचे काय झाले ?

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा.

नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच.

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल झाले. मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ पंडालवरच १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपये खर्च केला असून हेलिपॅडसाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले असून ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वयंघोषीत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे, एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर RTO कारवाई करतात मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपासाठी कायदा वेगळा आहे का? जनता नरेंद्र मोदी व भाजपाला कंटाळली आहे. मोदींच्या सभेतील खुर्चीवर राहुल गांधी यांचे पोस्टर लावून जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. याच यवतमाळमध्ये २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती परंतु सत्तेत येतात मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली. यवतमाळ संतांची भूमी आहे, संतांच्या भूमित नरेंद्र मोदी खोटे बोलले. आता यवतमाळची जनता व शेतकरी मोदींच्या भुलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, शेतकरीच भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल.

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.

महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष व गोंधळ आहे, त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे, काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन्ही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार असून विजयी होणार आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अनिल पटेल, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी महापौर अब्दुल्ल सत्तार, ज्येष्ठ नेते बी. आर. कदम, केदार पाटील साळुंखे, यांच्यासह नांदेड शहर व जिल्ह्यामधील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

10/12 निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

0

मुंबई दिनांक २८ : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.