पुणे- माजी महापौर मुरलीधर मोहोळ,माजी सभागृहनेते गणेश बिडकर आणि नगरसेवक महेश वाबळे यांच्या समक्ष माध्यमांशी बोलतांना पुणे महापालिकेचे स्थायी समिती चे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज गंभीर आरोप केले आहेत.सुसंस्कृत कसब्यात आता काळी जादू केली जाते,धमक्या आणि शिवीगाळ केल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही अशी स्थिती असून हे सारे आमदार करतो आहे,ज्याचेवर महापलिका अधिकाऱ्यांनी गुन्हा हि दाखल केला आहे. असे रासने म्हणालेत.मात्र त्यांनी या आमदाराचे नाव घेतले नाही तुम्ही ते शोधा असे म्हणालेत. त्यांनी आज येथे आंबील ओढा आणि एकूणच पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटीचा निधी महापालिकेला दिला यात भाजपकडून उशीर झालेला नाही तर महाविकास आघाडीने हा प्रस्ताव रखडवत ठेवला होता हे प्रथम सांगितले. आपण काही बेकायदा फलक लावले होते ते आपण काढून टाकले मात्र काही लोकांचे बेकायदा फलक २/ २ महिने राहतात,महापालिका अधिकारी दहशतीखाली काम करतात असेही रासने यांनी नमूद केले आहे.