भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा.
मुंबई, दि. १ मार्च २०२४ महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वयैक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे प्रकरण असून खोक्यामध्येच चालत राहणार, असे म्हणत या विधिमंडळात झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला. आमदारांच्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधान सभेतही उपस्थित करण्यात आला होता. धक्काबुक्कीची ही घटना बाहेर घडलेली नसून सभागृहाच्या लॉबितच घडलेली आहे, प्रकरण गंभीर असून तातडीने माहिती घेऊन यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी असे नाना पटोले म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास का नाही? अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास हा सदस्यांसाठी महत्वाचे आयुध आहे परंतु या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तासच ठेवलेला नाही. आपल्या मतदारंसघातील प्रश्न, समस्या मांडण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास असतो. सदस्यांचा तो अधिकार आहे. सदस्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची अध्यक्षांची जबाबदारी आहे. कोविड काळात अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला होता परंतु आताही अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. सरकारने विधेयके मंजूर करून घेतली पण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सदस्यांना संधीच मिळाली नाही, असे नाना पटोले म्हणाले.
अपघात किंवा कट: गोध्रा सेन्सॉर प्रक्रियेतून: निर्माता लवकरच नवीन रिलीज तारखेसह ट्रेलरचे अनावरण करेल
रणवीर शौरी, मनोज जोशी, हितू कनोडिया आणि राजीव सुरती यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश असलेला गोध्रा हा बहुप्रतिक्षित चित्रपट सध्या सेन्सॉर प्रक्रियेतून जात आहे. सेन्सॉरचे तात्काळ प्रमाणपत्र मिळाल्यावर, दुसऱ्या टीझरच्या अनावरणासह नवीन रिलीजची तारीख जाहीर करण्याची निर्मात्याची योजना आहे.
मूलतः 1 मार्च रोजी रिलीज होणार होता, चित्रपटाचे पदार्पण सेन्सॉर प्रमाणपत्र मिळेपर्यंत लांबले आहे. हे महत्त्वपूर्ण पाऊल हे सुनिश्चित करते की चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी सर्व नियामक आवश्यकता पूर्ण करेल असे निर्मात्याचे म्हणणे आहे .
गोध्रा चित्रपटाचा पहिला टीझर आगीत जळलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या शक्तिशाली प्रतिमेसह उघडणारा एक धक्कादायक टोन सेट करतो. हे चित्तथरारक दृश्य गोध्रा घटनेच्या दु:खद छायेत खोलवर डोकावणाऱ्या कथनाची प्रस्तावना म्हणून काम करते. हा चित्रपट केवळ करमणुकीच्या पलीकडे आहे, इतिहासातील एका गडद अध्यायाचे अन्वेषण करतो जो वेदना निर्माण करतो आणि दोन दशकांहून अधिक काळानंतर अनुत्तरीत प्रश्न उपस्थित करतो. 27 फेब्रुवारी 2002 च्या दु:खद घटनांनंतर 22 वर्षांनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ ही षड्यंत्रात भर घालत आहे. गोध्रा घटनेमागील सत्य उलगडून दाखवण्याचे वचन देते, दीर्घकालीन कथा आणि गृहितकांना आव्हान देते. ओम त्रिनेत्र फिल्म्स निर्मित या चित्रपटात रणवीर शौरी, मनोज जोशी, हितू कनोडिया आणि राजीव सुरती यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. प्रतिभावान अभिनेत्यांच्या या समूहाचे उद्दिष्ट आहे की इतिहासाचा मार्ग बदलणाऱ्या दिवसाच्या आकर्षक कथनात जीव फुंकणे.
अपघात किंवा षडयंत्र: गोध्रा घटनेच्या तपासासाठी नेमलेल्या नानावटी शाह मेहता आयोगाच्या निष्कर्षांपासून प्रेरणा घेते. चित्रपटाचा उद्देश स्पष्ट आहे – सत्यावर प्रकाश टाकणे, ट्रेन जाळणे हा एक दुःखद अपघात होता की अंतर्निहित तणावामुळे पूर्वनियोजित कृत्य होते हे शोधणे.
दिग्दर्शक एमके शिवाक्ष यांनी सांगितले की, गोध्राचा दिग्दर्शक या नात्याने या घटनेमागील सत्यावर प्रकाश टाकणे हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे. आमचा संदेश जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आम्ही सेन्सॉर प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत. ते गोध्राभोवतीच्या गुंतागुंतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते – घटनेपासून ते गुजरात दंगलीला कारणीभूत असलेल्या लहरी परिणामांपर्यंत. टीझरमध्ये मार्मिक प्रश्न आहेत: गोध्रा घटनेच्या केंद्रस्थानी काय आहे? घटना आणि उत्स्फूर्त चकमकींच्या कथनांनी पीडितांचे आवाज का झाकले गेले आहेत?
यावर निर्माता बी.जे. पुरोहित यांनी उद्धृत केले की आम्ही गोध्रा चित्रपटासाठी नवीन रिलीजची तारीख निश्चित करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहोत .चित्रपट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे हे आमचे प्राधान्य आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र हा गोध्रा प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. चित्रपट सर्व आवश्यक मानके पूर्ण करतो याची खात्री करण्यासाठी आम्ही ते मिळविण्याच्या प्रक्रियेत आहोत. अपघात किंवा कट: GODHRA आकर्षक संवाद, मनमोहक सिनेमॅटोग्राफी आणि भीषण ट्रेन हल्ल्यामागील कटात खोलवर जाण्याचे वचन देते. टीझर उलगडत असताना, ते त्या दुर्दैवी दिवशी जळत्या ट्रेनचे साक्षीदार असलेल्यांच्या आठवणींमध्ये अजूनही प्रतिध्वनीत असलेल्या वेदनादायक इतिहासाचा विचार करण्यासाठी दर्शकांना आमंत्रित करते.
पुणे- कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील एका राजकीय पुढाऱ्याच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तातडीने हालचाली केल्याने मंगळवार पेठेत पकडला गेला. २९ तारखेलाच खून करून तो इथे आला होता याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’कर्नाटक राज्य, जिल्हा कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मादन हिप्परगा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. १८/२०२४ भादवि कलम ३०२,३४ मध्ये (गुलबर्गा जिल्हयाचे एका राजकीय पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ) नामे महांतप्पा सिद्रामप्पा आलुरे रा. सरसांबा ता. आळंद, जि. कलबुर्गी (गुलबर्गा) यांचा दि. २९/०२/२०२४ रोजी पुर्व वैमन्यस्यावरुन निघुन खुन करण्यात आलेला होता. सदर संवेदनशील अशा गुन्ह्यातील संशयित आरोपी पुणे परीसरात असले बाबत पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे यांना माहीती मिळालेली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक, राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, सहा. पोलीस फौजदार प्रदिप शितोळे पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, तुषार भिवरकर यांची पथके नेमण्यात आलेली होती. सदर पथकाने संशयित आरोपी विषयी माहीती मिळवुन पुणे परीसरात शोध घेत असताना गोपनिय बातमीदाराकडुन सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी येणार असल्या बाबत माहीती मिळाल्याने सापळा रचुन संशयीत असलेला मयुर लक्ष्मण खेत्रे वय २६ वर्षे रा. फ्लॅट नं ४ संदानंद नगर मंगळवार पेठ, पुणे, यास ताब्यात घेतले. नमूद आरोपीस पुढील कारवाई कामी मादन हिप्परगा पोलीस स्टेशन तालुका आळंद, जि. गुलबर्गा राज्य कनार्टक यांचे पोलीस अधिका-यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे -२ सतिश गोवेकर, यांचे मागर्दर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, चे, पोलीस निरीक्षकप्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे शंकर संपते, तुषार भिवरकर यांनी केलेली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’, ‘लाडली बहना’ व ‘लेक लाडकी’ योजना कागदावरच.
मुंबई, दि. १ मार्च भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते परंतु त्यांच्या या योजना फक्त जाहिरातबाजीसाठीच आहेत. महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन जगजाहीर आहे. भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. NCRB च्या अहवालात महिला अत्याचारात ४ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले असून दिल्ली व मुंबईसारख्या मोठ्या शहरातही महिला असुरक्षित आहेत, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, २०२२ मध्ये महिला अत्याचाराच्या ४ लाख ४५ हजार २५६ घटनांची नोंद झाली म्हणजे दरतासाला ५१ घटनांची नोंद झाली. महिला अपहरणाच्या घटनांची १९ टक्के नोंद झाली असून बलात्काराच्या ७ टक्के घटनांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीत २०२० मध्ये १० हजार ९३ घटना घडल्या होत्या त्यात वाढ होऊन २०२१ मध्ये १४ हजार २२७ झाल्या. महिला अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातही महिला अत्याचार वाढले असून बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून त्यानंतर पुणे आणि नागपूर शहराचा नंबर लागतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रगचे साठे सापडत असून शहरापासून गाव खेड्यापर्यंत शाळा कॉलेजच्या बाहेर ड्रग्ज मिळत आहेत. तरुणाईला बर्बाद करण्याचे काम सुरु आहे. जगात देशाचे नावलौकिक वाढवलेल्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह वर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, तो आजही मोकाट आहे. बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करुन त्यांच्या घरातील ७ लोकांची हत्या करण्यात आल्याप्रकरणी ११ जणांना जन्मठेप शिक्षा ठोठावली होती पण गुजरात सरकारने त्यांची सुटका केली व भाजपाच्या लोकांनी या गुन्हेगारांचा सत्कार केला नंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवले. महाराष्ट्रातही महिला अत्याचाराचे गंभीर आरोप असलेले काही लोक मंत्रिमंडळात आहेत, तर काहीजण आमदार खासदार आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर भाजपा कारवाई न करता त्यांना पाठीशी घालते. महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे. पीडितेला संरक्षण दिले पाहिजे व अशी प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शासन केले पाहिजे, अशी मागणीही संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.
आव्हाडांनी संस्काराची भाषा करू नये-हर बात को नाना नही कहना कभी आना भी कहना‘ म्हणत पटोलेंचीही उडवली खिल्ली
मुंबई- कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असं विरोधक वारंवार म्हणत होते. मात्र आम्ही या गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही. तर त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. मात्र ज्यांचे गृहमंत्री हेच जेलमध्ये गेले आहेत. त्यांनी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काहीही शिकवू नये
एकनाथ शिंदे म्हणाले- कायदा सुव्यवस्थेचं समर्थन करणार नाही. मात्र या घटनेचं राजकारण करणं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. यामध्ये तरूणांचेही खून झाले आहेत. यात हनुमान चालीसा म्हटल्यावर देशद्रोहाचं उदाहरण, खासदार आमदारांना, अर्नब गोस्वामी, कंगना रनौत, याकुबच्या कबरीचं उदारीकरण केलं. यांना जीवा महाल यांचं स्मारक आठवलं नाही. मविआचे सरकार असतांना त्यांनी हुकुमशाही पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही कधीही कुणावर अन्याय केला नसल्याचेही शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले की, लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये दाखल केलं. जो कायदा मोडणार त्यालाही आम्ही सोडणार नाही. तसेच चुकीची कारवाईदेखील आम्ही कधी करणार नाही. पुणे पोलिसांनी ड्रग्ज पकडले त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. ज्यांचे गृहमंत्रीच जेलमध्ये जातात. त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेबद्दल काही शिकवू नये.
जितेंद्र आव्हाड तुमचा काय अधिकार आहे. तुम्ही या कायदा आणि सुव्यवस्थेवर काहीही बोलू नये. ज्यांनी एका सर्वसामान्य माणसाला काळ निळं होईपर्यंत मारलं आणि आता त्यांनीच आम्हाला संस्कार काय हे शिकवणे, हेच तुमचे संस्कार आहेत का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांवरही हल्ला चढवला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना शिंदे म्हणाले की, आधीच्या सरकारने राज्यातील ,सर्व प्रकल्प बंद पाडले आणि आम्ही आता सर्व सुधारीत प्रकल्पांना मंजूरी दिली. हर बात को नाना नही कहना कभी आना भी कहना असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली.
वस्तू आणि सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील भुसारा बाजारात घडली आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत महेश तोतामल दर्य़ानी (वय-52 रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी गुरुवारी (दि.29) मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सहा अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 170, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मार्कट यार्डमधील भुसार बाजारात व्यापारी पेढीत सहाजण आले. जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी फिर्य़ादी यांच्याकडे केली.
पेढीतील व्यवहारांची तपासणी करायची असल्याचे सांगून चोरट्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील वीस हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पळून गेले. तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी चित्रीकरण तपासण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.
पुणे : महापालिकेने मनावर घेतले तर काय होत नाही ? हे आज करून दाखविले पुणे महानगर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई ची मोहीम पाषाण परिसरात सुरु केली होती पण पालिकेच्या कारवाई विरोधात काही लोक न्यायालयात गेल्याने कारवाई थंडावली होती. मात्र, न्यायालयाकडून महापालिकेने स्थगिती उठवली आणि पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि.1) पाषाण येथील मुंबई-पुणे महामार्गावरीलविनापरवाना शोरुम, फर्निचर मॉल इत्यादीवर कारवाई केली. आज 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडून टाकले.
यापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर काही दुकानदारांनीउच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते. मात्र 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेने न्यायालयाकडून स्थगिती आदेश उठवले . या नंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली.न्यायालयीन आदेशा नंतर 6 दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या मध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली. 6 पैकी 5 दुकानदारांवर या पूर्वी कारवाई करण्यात आली होती. ज्या दुकानदारावर कारवाई झाली नव्हती त्याचेवर प्रथम कारवाई करण्यात आली. 6 दुकानदारां बाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेपण तोपर्यंत कारवाई झाली होती.
आज 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. सदर बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे highway वर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवडय़ात समोरील बाजू कडील दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल. तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊस वरही कारवाई करण्यात येणार आहे असे उप अभियंता सुनील कदम यांनी सांगितले. यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हिंजवडी पोलीस स्टेशन चीफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.सदर कारवाई अधीक्षक राजेश बनकर , कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ, यांनी पूर्ण केली
‘वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर’ संकल्पनेवर चर्चा
पुणे : ‘इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन’ आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन १ मार्च २०२४ रोजी पुण्यात झाले.’वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर’ ही या परिषदेची संकल्पना असून ‘युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन’ पुणेच्या गोखलेनगर येथील सभागृहात परिषदेचे उदघाटन आज सकाळी १० वाजता मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव,ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक डॉ.वंदना शिवा,’इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन’ च्या अध्यक्ष डॉ.रंजना बॅनर्जी,उद्योजक मेहेर पदमजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारत,नेपाळ,भूतान,मालदीव,श्रीलंका,बांगलादेश,पाकिस्तान या देशातील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.’युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन-आशिया’ च्या उपाध्यक्ष डॉ.मीरा बोन्द्रे, ‘युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन,पुणे ‘च्या अध्यक्ष डॉ.उज्वला शिंदे,सचिव कल्याणी बोन्द्रे,खजिनदार एड.प्रेमा कुलकर्णी, असोसिएट रीप्रेझेंटेटिव्ह नीलम जगदाळे, अबेदा इनामदार आदी उपस्थित होते. कल्याणी बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.वंदना शिवा म्हणाल्या, ‘पर्यावरण संवर्धनात महिलांनी योगदान देण्याची गरज आहे.रिजनरेशनची ताकद पृथ्वी आणि महिलांमध्ये आहे.अन्नाद्वारे आपण पृथ्वीशी जोडले जातो. अन्नातून रासायनिक शेतीचे विष पोटात जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी एकत्रित येवून काम करण्याचा संदेश देणाऱ्या या परिषदेची गरज आहे. आपण भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. ‘पृथ्वीवर विविधता सर्वत्र आहे, ती जपली पाहिजे. अल्झायमर, ऑटीझम पासून विविध विकार हे पर्यावरण न जपल्याने होत आहेत. खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. प्रत्येक सूक्ष्म जीवाला बुद्धी असते. सूर्याकडून ऊर्जा मिळते. प्रकाश संश्लेषणाने वनस्पतीला आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.म्हणून निसर्ग मृत होऊ देता कामा नये.पूर्वी जमीन खासगी नव्हती, सर्वांची होती.अहिंसक शेतीची गरज आहे. त्यात किडे, मुंग्यांना ,जीवजंतूंना स्थान असले पाहिजे. सेंद्रिय शेती ही अहिंसक शेती आहे.एकूण शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचे प्रमाण चां
गले असेल तर निसर्ग शाबूत राहील. शेतकऱ्याविना शेती, शेतकऱ्याविना अन्न या चुकीच्या कल्पना आहेत.’एंट्रोपी’ जपली तर प्रदूषण,क्लायमेट चेंजवर मात करता येईल’. मेहेर पदमजी यांनी ‘ इंडस्ट्रियल सस्टेनेबिलिटी’ विषयावर मते मांडली. त्या म्हणाल्या,’क्लीन एनर्जी, क्लीन एअर, क्लीन वॉटर साठी उद्योगांनी पुढे आले पाहिजे. चांगल्या भवितव्यासाठी ते उपयुक्त ठरेल.भारतात गवत, पिकांचा उरलेला भाग पेटवून देणे घातक आहे. त्यातून ऊर्जा, निर्मिती केली पाहिजे.इंधन उद्योगानी सांडपाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे.शाश्वततेसाठी कार्यरत नसलेल्या समाजात उद्योग जगू शकणार नाहीत’. अख्तर खातून यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, ‘ असोसिएशनची सतत वाटचाल झाली, ही मोठी गोष्ट आहे. एसएनडीटी विद्यापीठाचा विचार केला तर महर्षी कर्वे यांच्यापासून शिक्षण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाची परंपरा आहे. महिला ही सक्षम असतेच, फक्त त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. महिलांनी भावनाना प्राधान्य देता देता कौशल्यांना प्राधान्य दिले पाहिजे. महिलांसाठी गुंतवणूक केल्यानेच प्रगती झाली आहे.त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. महिलांना आदर देण्याची गरज आहे.सकारात्मक बदल घडविण्यासाठी महिला नेतृत्व सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे. हे महिलांचे युग आहे.ते प्रगतीपथावर नेले पाहिजे’.
‘डिफरंट अस्पेक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी ‘या विषयावर दुपारी १२ वाजता झालेल्या चर्चासत्रात डॉ.वंदना शिवा,निमलका फर्नांडो,मेहेर पदमजी,अक्रम खातून सहभागी झाल्या.अडीच वाजता झालेल्या चर्चसत्रात ‘सार्क’ चे सदस्य असणाऱ्या देशातील प्रतिनिधी सहभागी झाले.सव्वा चार वाजता झालेल्या चर्चासत्रात ‘सुशील भारद्वाज जीवनगौरव पुरस्काराचे वितरण केले गेले.तसेच गायत्री वत्सालय यांच्या ‘डाएट सस्टेनेबिलिटी विथ मिलेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी ‘आशियातील युनिव्हर्सिटी वूमन्स असोसिएशन ‘ या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात बांगलादेश,भारत,पाकिस्तान,जपान,थायलंड,हॉन्गकॉन्ग या देशातील प्रतिनिधी सहभागी होतील.अडीच वाजता ‘सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट्स’ विषयावर सादरीकरणे होतील.
पुणे : श्री वखारिया महाजन पंच संस्थेला १७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त समाजातील बांधवासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दादावाडी येथील अहिंसा भवन येथे करण्यात आले होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी रवींद्र शहा व पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिली ते बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मेरिट शिल्ड देण्यात आले, तसेच ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमात जैन उपवास तपश्चर्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. समाजातील बांधवांना रुग्णालयात ऍडमिट करणे तसेच एखादे ऑपरेशन कमीत कमी खर्चात कसे करता येईल, याचे मार्गदर्शन संस्थेचे डॉ.धर्मेंद्र शहा यांनी केले. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
कमलेश मोतीवाले यांनी पीपीटी द्वारे वार्षिक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर व रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आल्याचे सांगितले. विकलांग लोकांना पाय व हात मोफत देण्यात आले. समाजातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत देखील संस्थेतर्फे देण्यात येते. वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती दिली. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. रविन्द्र शाह यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे नियोजन कार्यकारिणी समिती ने केले. त्यामध्ये कमलेश मोतिवाले, सुनिल परिख, दिपक शहा, ॲड.महेन्द्र शहा, परेश अ.शहा, अभिजित शहा, अतुल शहा, सुहास शहा, प्रकाश शाह, डॉ राजेश दोशी, राजेंद्र शहा, आशिष शहा, राहुल शहा, अंकुर परिख, राजेश शहा, मयुर गांधी, डॉ धर्मेंद्र शाह, हितेंद्र शहा, ॲड.मितेश शहा, भावेश शहा, परेश ची.शाह हे होते. परेश अ.शहा यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया ‘ओडेला 2’ मध्ये झळकणार असून आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटाच पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तमन्ना भाटिया या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तमन्ना या चित्रपटासाठी काशी सारख्या भव्य दिव्य शहरात या अलौकिक थ्रिलरचे शूटिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक अशोक तेजा दिग्दर्शित ” ओडेला 2 ” संपत नंदी निर्मित आणि डी. मधू निर्मित आहे. https://www.instagram.com/p/C39gIyxJjoU/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
लस्ट स्टोरीज 2, प्लॅन ए प्लॅन बी आणि अनेक प्रकल्पांसह तमन्नाने एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘ओडेला 2’ हा सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असून तिचे चाहते तिला नव्या रूपात बघण्यासाठी उत्सुक आहेत. तमन्ना भाटिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘ ओडेला 2’ मध्ये ती नेमकी काय साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी ‘कलासेतू’
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यविभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात (दादासाहेब फाळके चित्रनगरी ) यांच्या वतीने गुरुवारी ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.
पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर, वितरक समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी बोलतं केलं. या परिसवांदाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला. ‘मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने’ या पहिल्या परिसंवादात ‘ १५०० हुन अधिक चित्रपट तयार होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
‘शासकीय धोरण आणि वेबपोर्टल’ या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी झाले होते. मराठीला चित्रनगरीत ५० % सवलत देणे, SGST बंद करणे, करपती योजना चालू करणे , अनुदान बंद करणे, निर्माता होण्याकरिता नियमावली तयार करणे, आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे, निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ,सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला.
तिसऱ्या परिसंवादात ‘चित्रपट निर्मिती, वितरण, विपणन’ याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे, दीपक देऊळकर,अभिनेत्री किशोरी शहाणे, चैतन्य चिंचलीकर, विकास खारगे या मान्यवरांनी सहभाग घेतला. नवीन निर्मात्यांना मार्गदर्शन करणे,मल्टिप्लेक्स दर कमी करणे, मराठीसाठी २०० हुन अधिक चित्रपटगृह बांधणे, एसटी स्टॅडजवळ मल्टीप्लेक्स उभारणे, वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदी अनेक उपायांचा अंतर्भाव यात करण्यात आला.
भविष्यातील बदलाची पावले ओळखून आणि येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाचा विचार करून मराठी चित्रपटसृष्टीने सर्वांगाने वेगळा विचार करण्याचा सूर ‘कलासेतू’ च्या परिसंवादात उमटले. आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटांचा सहभाग, मराठी चित्रपट महामंडळाचे योगदान, चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा देणे, इतर भाषिक लोकांचे रजिस्ट्रेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे, फिल्मसिटीमध्ये AUGMC त्यात करणे, चित्रपटगृह, नाट्यगृह उभारणे आदी सुविधा प्रामुख्याने होणे गरजेचं असल्याचं मत सर्वांनीच मांडलं.
या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. शासनातर्फे अनेक नव्या योजना, प्रस्ताव लागू करण्याचा मानसही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलून दाखविला. कलासेतू च्या माध्यमातून संवादाचा निर्माण झालेला हा पूल मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा ‘राजमार्ग’ ठरेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी किरण शांताराम,समृद्धी पोरे,प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे,नानूभाई जयसिंघानी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तंत्रज्ञ आणि वाहिन्याचे प्रमुख उपस्थित होते.
थिएटर जगवा…अशी हाक पुण्यातील सलाम पुणे संथेने दिली असून त्यादृष्टीने शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत.सिंगल स्क्रीन ला पूर्णतः करमाफी द्यावी ,वीज मिळकत कर,पाणीपट्टी ,सफाई कर अशा कोणत्याही पद्धतीचा तसेच कोणतीही GST लावू नये. सिंगल स्क्रीन च्या आवारात असलेल्या रेस्टॉरंटलाही कर माफी असावी ,त्यांच्या कडून त्याच्या पुरते फार तर विजेचे बिल घ्यावे. अशा पद्धतीने देता येईल तेवढे दिल्यास सिंगल स्क्रीन चा जमाना पुन्हा पूर्ववत कुठे उभा करता येईल .सिंगल स्क्रीन जगवा अशी हाक सालाम पुणे ने दिली आहे.
राशी खन्नाने बॉलीवूड चित्रपट “योद्धा” करताना ” मला इंडस्ट्रीत न्यू कमर असल्यासारखे वाटत ” असे सांगितल
आगामी ॲक्शनर ” योद्धा ” मध्ये नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिला नवीन कलाकारासारखे का वाटले ? याबद्दल खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटासाठी तिला इतका वेळ का लागला ? याबद्दल बोलताना तिने सांगितले की तिला अर्थपूर्ण स्क्रिप्ट हवी होती. अष्टपैलू पॉवरहाऊस असलेली राशी म्हणते ” जर स्क्रिप्ट अर्थपूर्ण असेल तरच मला काम करावं असे वाटत. मला व्यक्तिरेखा आवडतात. त्यात येण्यासाठी माझ्यासाठी हे एक चांगलं पॅकेज असायला हवं आणि हा चित्रपट तसाच होता. मला तो चित्रपट पैसा वसुल करणार आहे असं वाटतं “
राशी या चित्रपटा बद्दल खूप उत्सुक असून या चित्रपटात “थ्रिलिंग एलिमेंट्स”, आणि “रोमान्स” आहे आणि “सीट थ्रिलरची ” एक मज्जा सुद्धा आहे असं तिला वाटतं. योद्धा मध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, ‘योधा’ 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
नवी दिल्ली: सोनी इंडियाने आज अभूतपूर्व असा नवीन अल्फा 9 III हा जागतिक शटर सिस्टमसह फूल फ्रेम इमेज सेन्सर असलेला जगातील पहिला१ कॅमेरा बाजारात आणला. आकर्षक आणि प्रभावशाली अश्या या नवीन ग्लोबल शटर फुल-फ्रेम इमेज सेन्सर कॅमेऱ्याने १२० एफपीएस (120fps) पर्यंत बर्र्स्ट स्पीडमध्ये देखील कोणतिही खराबी न येऊ देता किंवा कॅमेरा ब्लॅकआउट न होता चित्रीकरण करता येते. सोनीची अत्याधुनिक व अत्यंत प्रगत एएफ (AF) प्रणालीमध्ये अभिमानास्पद असे प्रति सेकंद १२० पटAF/AE फोकस कॅल्क्युलेशनसह आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ऑटोफोकस आहे. या सोनीच्या आजपर्यंतच्या सर्वात प्रगत अश्या एएफ (AF) प्रणालीसह ह्या नाविन्यपूर्ण सेन्सरला तयार केले आहे. तसेच चित्रीकरणाच्या सर्व वेगांमध्ये फ्लॅश समक्रमित करण्याची क्षमता असलेला अल्फा 9 III व्यावसायिक छायाचित्रकारांना अत्यंत महत्त्वाचे किंवा निर्णायक क्षण टिपण्यासाठी एक नवीन जग खुले करेल.
नव्याने विकसित जगातील पहिले१ ग्लोबल शटर पूर्ण फ्रेम अल्फा 9 III कॅमेरा अंदाजे २४.६ इफेक्टिव मेगापिक्सेल२ सह जोडलेले CMOS इमेज सेन्सर, अंतर्गत मेमरीसह व नवीनतम इमेज प्रोसेसिंग इंजिन BIONZ XR® (BIONZ XR®)सह सुसज्ज आहे. हे AF/AE ट्रॅकिंग३सह प्रति सेकंद सुमारे १२० फ्रेम्सपर्यंत४ ब्लॅकआउट न होता सलग चित्रीकरण गती देते. नवीन अल्फा 9 III उच्च-घनता फोकल प्लेन फेज डिटेक्शन AF ने सुसज्ज आहे. यामधील अत्याधुनिक एआय प्रोसेसिंग युनिट उच्च अचूकतेसह जे टिपायचे आहेत असे विविध विषय (सब्जेक्ट) ओळखण्यासाठी रिअल-टाइम रेकग्निशन एएफ (ऑटोफोकस) [Real-time Recognition AF (autofocus)] वापरते. अत्यंत अचूक विषय (जे टिपायचे आहे ते सब्जेक्ट) ओळखणे आणि प्रति सेकंद १२० फ्रेम्स एवढ्या जलद गतीची कामगिरी या दोघांना एकत्र केल्याने या कॅमेऱ्याने जे उघड्या डोळ्यांनी४ टिपता येणार नाही अश्या अगदी महत्त्वाच्या किंवा निर्णायक दृश्यांचे आणि क्षणांचे छायाचित्रण करणे ही शक्य आहे. पूर्वीच्या कॅमेऱ्यांमध्ये वापरकर्त्याने फ्लॅशच्या सिंक्रोनाइझेशन वेगापेक्षा जास्त वेगाने शटर सोडले तर, प्रकाशाचे प्रमाण झपाट्याने कमी होई. परंतु आता फुल-स्पीड फ्लॅश सिंक्रोनाइझेशन या वैशिष्ठ्यामुळे अशा दृश्यांचे छायाचित्रण करणे शक्य आहे जे पारंपारिक तंत्रज्ञानाने सहजपणे टिपता येऊ जाऊ शकत नाहीत. अल्फा 9 III मध्ये रिलीझ लॅग मोड निवडता येतो. त्यामुळे वापरकर्त्याला रिलीज लॅग किंवा व्ह्यूफाइंडर/मॉनिटर डिस्प्ले यामध्ये कशास प्राधान्य द्यायचे असं पर्याय निवडता येतो. या मध्ये नव्याने घातलेल्या प्री-कॅप्चर वैशिष्ठ्यामुळे वापरकर्त्याला एका सेकंदापर्यंत मागे जाता येते आणि शटर दाबण्यापूर्वीचा क्षण रेकॉर्ड करता येतो. शूटिंग दरम्यान सतत शूटिंग स्पीड बूस्ट बदल आणि वर्धित बर्र्स्ट स्टॅमिना महत्त्वपूर्ण क्षण विश्वासार्हपणे टिपले जातील हे सुनिश्चित करते. बफर मेमरी आणि वाढलेली एकूण सिस्टमस्पीड (प्रणालीची गती) अंदाजे ३९० फाइन जेपीईजी६ (fine JPEG) प्रतिमा एका सतत ३० एफपीएस (30fps) बर्र्स्टमध्ये टिपता येतात. हा कॅमेरा अल्फा™ मालिकेतील पहिला कॅमेरा आहे जो क्रॉप न करता ४ के १२० पी (4K 120p) उच्च-फ्रेम-रेट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. वापरकर्त्यास त्यास हवे असलेल्या इच्छित दृश्याच्या कोनात चित्रीकरण करता येते. या कॅमेऱ्यामध्ये सहा के (6K) ओव्हरसॅम्पलिंगसह उच्च-रिझोल्यूशन ४के ६०पी (4K 60p) व्हिडिओ चित्रीकरण करणे देखील शक्य आहे. अल्फा 9 III मध्ये ४ -अक्षीय बहु कोनीय एलसीडी मॉनिटर (4-axis multi-angle LCD monitor) आहे, जे स्पर्शाद्वारे (टच करून) वापरता येऊ शकते. याच्या सहाय्याने नवीनतम टच मेनू वापरून इन्टयूटिव्ह कामकाज (intuitive operation) करता येते. इलेक्ट्रॉनिक व्ह्यूफाइंडर ९.४४ दशलक्ष-डॉट क्वाड एक्सजीए ओएलईडी (9.44 million-dot Quad XGA OLED) वापरतो. ज्यामुळे α7R V प्रमाणेच ब्राइटनेससह उच्च प्रतीची दृश्यमानता (व्हिजिबीलिटी) मिळते आणि अंदाजे 0.90x एवढे प्रतिमा मोठी (magnification) करता येते.
किंमत आणि उपलब्धता:
अल्फा 9 III कॅमेरा भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोर्समध्ये (सोनी सेंटर आणि सोनी एक्सल्युसिव्ह www.ShopatSC.com पोर्टल वर आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये आणि अन्य ई कॉमर्स संकेत स्थळांवर २६ फेब्रुवारी २०२४ पासून उपलब्ध असेल.
Netflix ने काल त्यांच्या स्मॅश-हिट मालिकेच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली – ये काली काली आंखे. मुख्य अभिनेता ताहिर राज भसीन याने बहुप्रतीक्षित मालिकेच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या सीझनच्या घोषणेवर आपला उत्साह व्यक्त केला आहे. जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या पहिल्या सीझनच्या जबरदस्त यशासह, ताहिर राज भसीन, त्याच्या उत्तुंग कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे, मालिकेच्या गुंतागुंतीच्या जगात खोलवर जाण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत आहे.
या घोषणेबद्दल बोलताना, ताहिर राज भसीन यांनी आपला उत्साह व्यक्त केला, “माझ्या कारकिर्दीतील शेवटची काही वर्षे ही एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हती. माझ्या कामासाठी सर्व स्तरातून प्रेम मिळण्यापासून, एकामागून एक हिट्स पाहण्यापर्यंत. वैविध्यपूर्ण पण आश्चर्यकारकपणे चमकदार भूमिका सादर केल्या, ही यशाची उत्कंठावर्धक राइड आहे. या यादीत एक वेगळा प्रोजेक्ट निश्चितपणे ये काली काली आंखें आहे कारण मला पडद्यावर एक नायक साकारायला मिळाला आहे जो गरज असताना अत्यंत ग्रे देखील आहे! तो जे काही करतो त्यामध्ये तो जीवनापेक्षाही संबंधित आहे! ये काली काली आंखे हा एक असा प्रकल्प आहे ज्याने मर्दानीसह मला कदाचित सर्वाधिक प्रशंसा मिळवून दिली आहे!”
तो पुढे म्हणतो, “म्हणून, नेटफ्लिक्सने या हिट सिरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केल्याने मला आनंद झाला आहे. मला आशा आहे की त्याद्वारे अधिक प्रेम आणि अधिक प्रशंसा मिळेल! नायकाची भूमिका करणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते आणि मला ते ये काली काली आंखेंसोबत पुन्हा जगायला मिळणार आहे! मला आशा आहे की तुम्हाला हा अत्यंत स्वादिष्ट थ्रिलर आवडेल.”
मराठा समाजाविषयी फडणवीसांच्या मनात खुन्नस आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला पद जनतेच्या रक्षणासाठी दिले आहे. संचारबंदी करून गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांची जिरवायला लागलेत. मराठा नेत्यांना हाताशी धरले आहे. मराठा समाजाने शांतपणे हे बघावे, आंतरवाली सराटीत संचारबंदी का लावली? एवढी दडपशाही का केली जात आहे, गृहमंत्री असा नसावा, जनतेवर दडपशाही करून स्वत:ची गुंडगिरी लावावी, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी बोलल्यावर राग कसा येतो? मराठा समाजाचे आमदार, मंत्री खूप मोठी चूक करत आहे. आंदोलनामुळेच कुणबी दाखले मिळाले, 10 टक्के आरक्षणही यामुळेच मिळाले. मराठा नेत्यांनी भानावर या. मी घाबरत नाही. मराठे गप्प बसणार नाही. कालपासून बैठका सुरू झाल्या आहेत. ताकदीने मराठा समाज बैठका घेत आहे,फक्त मला साथ द्या, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
10 टक्के आरक्षण दिले आहे ते 50 टक्क्यांच्या आत द्या. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध झाले आहे. मग ओबीसीतून आरक्षण का देत नाही. मराठा समाजाने एकजूट राहावे. माझ्याविरोधात टोळी उभी केली आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर उलट्या बुद्धीची लोक मला अटक करा म्हणत आहे, असा टोला लगावतानाच जातीपेक्षा तुम्हाला पक्ष मोठा झाला का? अशी संतप्त भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मला जेलला टाकले तरी मी मागे हटत नाही. मी नेत्याला बोललो म्हणून काहींना झोंबले आहे. काही आमदार असे तुटून पडलेत जसे पूर्वीचा राग आहे. तुमची माया गोरगरिब मराठ्यांसोबत नाही, मी गोरगरिब मराठ्यांचा लढा लढतोय म्हणून माझी चौकशी करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तर राज्यात जाणुनबुजून जे षडयंत्र सुरू आहे त्याकडे मराठा समाज शांत बघून पाहत आहे. सत्तेचा गैरवापर करून एसआयटी लावली जात आहे. हजारो कोट्यवधी घोटाळे करणारे आसपास फिरायला लागलेत. त्यांच्यावर चौकशी लावत नाही.