पुणे- कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील एका राजकीय पुढाऱ्याच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तातडीने हालचाली केल्याने मंगळवार पेठेत पकडला गेला. २९ तारखेलाच खून करून तो इथे आला होता याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’कर्नाटक राज्य, जिल्हा कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मादन हिप्परगा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. १८/२०२४ भादवि कलम ३०२,३४ मध्ये (गुलबर्गा जिल्हयाचे एका राजकीय पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ) नामे महांतप्पा सिद्रामप्पा आलुरे रा. सरसांबा ता. आळंद, जि. कलबुर्गी (गुलबर्गा) यांचा दि. २९/०२/२०२४ रोजी पुर्व वैमन्यस्यावरुन निघुन खुन करण्यात आलेला होता.
सदर संवेदनशील अशा गुन्ह्यातील संशयित आरोपी पुणे परीसरात असले बाबत पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे यांना माहीती मिळालेली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक, राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, सहा. पोलीस फौजदार प्रदिप शितोळे पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, तुषार भिवरकर यांची पथके नेमण्यात आलेली होती. सदर पथकाने संशयित आरोपी विषयी माहीती मिळवुन पुणे परीसरात शोध घेत असताना गोपनिय बातमीदाराकडुन सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी येणार असल्या बाबत माहीती मिळाल्याने सापळा रचुन संशयीत असलेला मयुर लक्ष्मण खेत्रे वय २६ वर्षे रा. फ्लॅट नं ४ संदानंद नगर मंगळवार पेठ, पुणे, यास ताब्यात घेतले. नमूद आरोपीस पुढील कारवाई कामी मादन हिप्परगा पोलीस स्टेशन तालुका आळंद, जि. गुलबर्गा राज्य कनार्टक यांचे पोलीस अधिका-यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे -२ सतिश गोवेकर, यांचे मागर्दर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, चे, पोलीस निरीक्षकप्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे शंकर संपते, तुषार भिवरकर यांनी केलेली आहे.