Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सोनी इंडियाचा जागतिक शटर सिस्टमसह१ फूल फ्रेम इमेज सेन्सर असलेला जगातील पहिला कॅमेरा, अल्फा 9 III बाजारात

Date:

नवी दिल्लीसोनी इंडियाने आज अभूतपूर्व असा नवीन अल्फा 9 III हा जागतिक शटर सिस्टमसह फूल फ्रेम इमेज सेन्सर असलेला जगातील पहिला कॅमेरा बाजारात आणला. आकर्षक आणि प्रभावशाली अश्या या नवीन ग्लोबल शटर फुल-फ्रेम इमेज सेन्सर कॅमेऱ्याने १२० एफपीएस (120fps) पर्यंत बर्र्स्ट स्पीडमध्ये देखील कोणतिही खराबी न येऊ देता किंवा कॅमेरा ब्लॅकआउट न होता चित्रीकरण करता येते. सोनीची अत्याधुनिक व अत्यंत प्रगत एएफ (AF) प्रणालीमध्ये अभिमानास्पद असे प्रति सेकंद १२० पट AF/AE फोकस कॅल्क्युलेशनसह आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ऑटोफोकस आहे. या सोनीच्या आजपर्यंतच्या सर्वात प्रगत अश्या एएफ (AF) प्रणालीसह ह्या नाविन्यपूर्ण सेन्सरला तयार केले आहे. तसेच चित्रीकरणाच्या सर्व वेगांमध्ये फ्लॅश समक्रमित करण्याची क्षमता असलेला अल्फा 9 III व्यावसायिक छायाचित्रकारांना अत्यंत महत्त्वाचे किंवा निर्णायक क्षण टिपण्यासाठी एक नवीन जग खुले करेल.

नव्याने विकसित जगातील पहिले ग्लोबल शटर पूर्ण फ्रेम अल्फा 9 III कॅमेरा अंदाजे २४.६ इफेक्टिव मेगापिक्सेल सह जोडलेले CMOS इमेज सेन्सर, अंतर्गत मेमरीसह व नवीनतम इमेज प्रोसेसिंग इंजिन BIONZ XR® (BIONZ XR®) सह सुसज्ज आहे. हे AF/AE ट्रॅकिंगसह प्रति सेकंद सुमारे १२० फ्रेम्सपर्यंत ब्लॅकआउट न होता सलग चित्रीकरण गती देते. नवीन अल्फा 9 III उच्च-घनता फोकल प्लेन फेज डिटेक्शन AF ने सुसज्ज आहे. यामधील अत्याधुनिक एआय प्रोसेसिंग युनिट उच्च अचूकतेसह जे टिपायचे आहेत असे विविध विषय (सब्जेक्ट) ओळखण्यासाठी रिअल-टाइम रेकग्निशन एएफ (ऑटोफोकस) [Real-time Recognition AF (autofocus)] वापरते. अत्यंत अचूक विषय (जे टिपायचे आहे ते सब्जेक्ट) ओळखणे आणि प्रति सेकंद १२० फ्रेम्स एवढ्या जलद गतीची कामगिरी या दोघांना एकत्र केल्याने या कॅमेऱ्याने जे उघड्या डोळ्यांनी टिपता येणार नाही अश्या अगदी महत्त्वाच्या किंवा निर्णायक दृश्यांचे आणि क्षणांचे छायाचित्रण करणे ही शक्य आहे. पूर्वीच्या कॅमेऱ्यांमध्ये वापरकर्त्याने फ्लॅशच्या सिंक्रोनाइझेशन वेगापेक्षा जास्त वेगाने शटर सोडले तर, प्रकाशाचे प्रमाण झपाट्याने कमी होई. परंतु आता फुल-स्पीड फ्लॅश सिंक्रोनाइझेशन या वैशिष्ठ्यामुळे अशा दृश्यांचे छायाचित्रण करणे शक्य आहे जे पारंपारिक तंत्रज्ञानाने सहजपणे टिपता येऊ जाऊ शकत नाहीत. अल्फा 9 III मध्ये  रिलीझ लॅग मोड निवडता येतो. त्यामुळे वापरकर्त्याला रिलीज लॅग किंवा व्ह्यूफाइंडर/मॉनिटर डिस्प्ले यामध्ये कशास प्राधान्य द्यायचे असं पर्याय निवडता येतो. या मध्ये नव्याने घातलेल्या प्री-कॅप्चर वैशिष्ठ्यामुळे वापरकर्त्याला एका सेकंदापर्यंत मागे जाता येते आणि शटर दाबण्यापूर्वीचा क्षण रेकॉर्ड करता येतो. शूटिंग दरम्यान सतत शूटिंग स्पीड बूस्ट बदल आणि वर्धित बर्र्स्ट स्टॅमिना महत्त्वपूर्ण क्षण विश्वासार्हपणे टिपले जातील हे सुनिश्चित करते. बफर मेमरी आणि वाढलेली एकूण सिस्टमस्पीड (प्रणालीची गती) अंदाजे ३९०  फाइन जेपीईजी (fine JPEG) प्रतिमा एका सतत ३० एफपीएस (30fps) बर्र्स्टमध्ये टिपता येतात. हा कॅमेरा अल्फा™ मालिकेतील पहिला कॅमेरा आहे जो क्रॉप न करता ४ के १२० पी (4K 120p) उच्च-फ्रेम-रेट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. वापरकर्त्यास त्यास हवे असलेल्या इच्छित दृश्याच्या कोनात चित्रीकरण करता येते. या कॅमेऱ्यामध्ये सहा के (6K) ओव्हरसॅम्पलिंगसह उच्च-रिझोल्यूशन ४के ६०पी (4K 60p) व्हिडिओ चित्रीकरण करणे देखील शक्य आहे. अल्फा 9 III मध्ये ४ -अक्षीय बहु कोनीय एलसीडी मॉनिटर (4-axis multi-angle LCD monitor) आहे, जे स्पर्शाद्वारे (टच करून) वापरता येऊ  शकते. याच्या सहाय्याने नवीनतम टच मेनू वापरून  इन्टयूटिव्ह कामकाज (intuitive operation) करता येते. इलेक्ट्रॉनिक व्ह्यूफाइंडर ९.४४  दशलक्ष-डॉट क्वाड एक्सजीए ओएलईडी (9.44 million-dot Quad XGA OLED) वापरतो. ज्यामुळे α7R V प्रमाणेच  ब्राइटनेससह उच्च प्रतीची दृश्यमानता (व्हिजिबीलिटी) मिळते आणि अंदाजे 0.90x एवढे प्रतिमा मोठी (magnification) करता येते. 

किंमत आणि उपलब्धता:

अल्फा 9 III कॅमेरा भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोर्समध्ये (सोनी सेंटर आणि सोनी एक्सल्युसिव्ह www.ShopatSC.com  पोर्टल वर आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये आणि अन्य ई कॉमर्स संकेत स्थळांवर २६ फेब्रुवारी २०२४ पासून उपलब्ध असेल.

मॉडेलकिंमत (रुपयांमध्ये)उपलब्धता
Alpha 9 III Camera५२९,९९०२६ फेब्रुवारी २०२४पासून
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?

नवा ‘फडणवीस वीमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांना विमा...

बारावीचा निकाल 13 मे ला लागणार:दहावीचा निकालही 15-16 मे रोजी अपेक्षित

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका...